मांसाहार: एक विरोधाभास

Submitted by पद्म on 14 December, 2016 - 10:14

मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.

आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.

साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....

२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.

आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.

मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......

कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिकनमटन खरेदी करतात म्हणून चाइल्ड कॅनिबलिझम सुरु होईल अशी कल्पना ज्या शाकाहारी माणसाच्या डोक्यात येऊ शकते त्यांच्या सात्विक मनाला सलाम...

हे चा.कॅ. एकदम नविन दिसलं म्हणून प्रतिसाद दिला.. Happy

मी इथे काही लिहिणार नव्हतो.... पण

>>>>> काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते. <<<<<

वरील शंका येणे रास्त आहे.
मात्र मूलतः माणुस हा "प्राणी" आहे, "जनावरच" आहे, व प्राणी/जनावर/पशू पासुन "मानव" बनण्याची प्रक्रिया दीर्घकाल चालत आलेली असली तरी मानवातील मूळचे पशुत्त्वाचे गुण उफाळून वर येतातच, हे मूलभुत वास्तव, लक्षात राहिले नाही की वरील सारखी शंका उपस्थित होऊ शकते.
वाघिण अथवा सिंहिण देखिल माता असतातच, त्या शिकार करुन कच्चे मांस खातात अन आपापल्या अपत्यांना दुध पाजुन सांभाळतात व तसे करताना त्यांच्या "मातृप्रेमाच्या वर्षावात" कुठेही कमतरता दिसत नाही.
तिथे जर त्यांना मांसाहार करुनही अपत्यांच्या संगोपनात प्रेमवर्षाव करण्याबाबत प्रश्न पडत नाही, तर मानवातील मातांना का पडावा? असो.

एक मात्र खरे, की मला स्वतःलाही कुठेही हॉटॅल/पार्टीमधे गेल्यावर, सुंदर साजशृंगार केलेल्या, मेकअप केलेल्या, गालावर लाली अन लिपस्टीक वगैरे लावलेल्या यौवनेने/स्त्रीने, हातात हड्डी घेऊन त्याला डकलेले / (चिकन लॉलिपॉप च्याबाबतीत डकवलेले) मांसाचे पुंजके तोंड/गाल वेडेवाकडे करीत, पटाशीच्या दातांनी वा दाढेने ओढून, ताणुन, ओरबाडुन घेऊन, वेळेस लाळ गळत असताना, असे विचित्रपणे खाताना पाहिले की कसेसेच होते...... Wink
माझ्या स्त्रीसौंदर्याच्या कल्पनेत "अशा पद्धतीने मांस खाणारी स्त्री" बसत नाही (तत्काळ "रिजेक्ट" होते Proud ) [यावर ऋबाळाचे मत जरुर विचारात घेतले पाहिजे... (आपल्या) ज्ञानात भर पडु शकेल , कारण त्याचे अनुभवविश्व दांडगे आहे ! )

>>>अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते. <<<<<
ही भिती मात्र अनाठाई आहे
कोणता तो एक कीडा असतो (बहुधा टोळ /कोळी जातीचा), ज्यात समागमाचे वेळेस मादी नरास खाऊन टाकते...... तुम्ही नशिब थोर समजा, की आपण मानव "सस्तन पशूंमधे" मोडतो, "तसल्या कीड्यांमधे" मोडत नाही Lol त्यामुळे मानवातील मादी समागमाचे वेळेस नरास खाणार नाही, तद्वतच, मानवी मादी आपल्या अपत्यासही खाणार नाही, काळजी करू नये. अन तितकीच शंका रहातच असेल, तर त्या मादीस बाळंतपणाचे वेळेस भुकेले ठेवू नये, तिचा सासूरवास करू नये, चांगलेचुंगले खाउ घालवे.... शक्यतो साजुक तुप , डिंकाचे लाडू वगैरे.... ! म्हणजे मग बाळंतपणाचे वेळेसच्या भुकेल्या स्वतःचेच अपत्य खाऊन टाकणार्‍या सिंहिणीसारखे/अन्य चतुष्पाद सस्तन प्राण्यांसारखे होत/होणार नाही.. ! Happy

काय? मी म्हणतो ते पटते आहे ना? Wink

व्वा limbutimbu!!
मी फक्त भीती वाटते असं बोललो(जसे काहींना बाईक च्या मागे बसून, चालवणारा ठोकेल की काय अशी भीती वाटते.) मुळात घडेलच असे नाही....
(अशी भिती काळजीपोटीच वाटते हो! जसे आजीला नातू बाईक चालवताना पाहून थोडीतरी भीती वाटतेच.)

म्हणजे मग बाळंतपणाचे वेळेसच्या भुकेल्या स्वतःचेच अपत्य खाऊन टाकणार्‍या सिंहिणीसारखे/अन्य चतुष्पाद सस्तन प्राण्यांसारखे होत/होणार नाही.. ! >>>>> माफ करा पण कोणतीही माता अथवा पिता आपल्या पिल्लाला इजा पोहोचवित नाही. मांजर आपलेच एक पिल्लु खाते वैगेरे सगळे खोटे आहे. मार्जार जातीमध्ये (वाघ, सिंह, मांजर, इत्यादी) एक नर दुसर्‍या नराचे पिल्लु मारतो पण स्वतःचे अपत्य कोणीही मारत किंवा खात नाही.

Sumukta tumhi negal wachala ahe ka? >> नाही वाचलेले.

>>>> माफ करा पण कोणतीही माता अथवा पिता आपल्या पिल्लाला इजा पोहोचवित नाही. मांजर आपलेच एक पिल्लु खाते वैगेरे सगळे खोटे आहे. मार्जार जातीमध्ये (वाघ, सिंह, मांजर, इत्यादी) एक नर दुसर्‍या नराचे पिल्लु मारतो पण स्वतःचे अपत्य कोणीही मारत किंवा खात नाही.<<<<

सुमुक्ता, तुमच्या मताचा आदर करुनही मी त्याचेशी सहमत नाही.
व मी केवळ ऐकिव/वाचिक माहितीमुळे सहमत नाही असे नसुन मांजरीबाबत प्रत्यक्ष घटना बघितल्याने सहमत होऊ शकत नाही.

स्पर्धक निर्माण होऊ नये म्हणून अन्य नर/भूकेमुळे अन्य पशू नवजात पिल्लान्ना खातात /खाऊ पहातात हे तर सूर्यप्रकाशाइतके सत्य आहेच्च, त्याबद्दल दुमत नाही.

पर्धक निर्माण होऊ नये म्हणून अन्य नर/भूकेमुळे अन्य पशू नवजात पिल्लान्ना खातात /खाऊ पहातात हे तर सूर्यप्रकाशाइतके सत्य आहेच्च, त्याबद्दल दुमत नाही. >>> ते मी माझ्या प्रतिसादात म्हटले आहेच. की एक नर दुसर्‍या नराचे पिल्लु मारतो. स्वतःचा वंश पुढे जावा म्हणून अथवा तुम्ही म्हणता तसे स्पर्धक निर्माण होऊ नये म्हणून.

प्राणी पिल्लांना जन्म देतात तेच मुळात वंशवृद्धीसाठी. स्वतःचीच पिल्ले मारली किंवा खाल्ली तर वंशवृद्धी कशी होईल?

>>> प्राणी पिल्लांना जन्म देतात तेच मुळात वंशवृद्धीसाठी. स्वतःचीच पिल्ले मारली किंवा खाल्ली तर वंशवृद्धी कशी होईल? <<<<
सुमुक्ता, हा प्रश्न "मानवी बुद्धिमधुन येतो" तर प्राण्यांना वंशवृद्धी व पोटाची भूक, दोनही बाबी केवळ नैसर्गिक प्रेरणेमुळे असतात. प्राण्यांचे बाबतीत ज्या वेळेस जी प्रेरणा नैसर्गिकरित्या प्रभावी त्या त्या प्रमाणे वर्तन घडेल.
(किंबहुना, मी तर असेही म्हणेन, की नैसर्गिक प्रेरणेच्या विरुद्ध जाऊन काही एक विचार/वर्तन घडते, तेव्हाच माणुस नावाचा प्राणी "मानव " म्हणून संबोधला जाऊ श्कतो)
अन नैसर्गिकरित्याही, वंशविस्तार ही प्रमुख प्रेरणा असली, तरी "जीव वाचविणे"ही त्याहीपेक्षा जास्त प्रभावी मूलभूत प्रेरणा असते, जी सर्वच सजीवांमधे प्रकर्षाने प्रभावीच आढळते.
तळ्यात उभी केलेली माकडीण व तिचे पिल्लु याची गोष्ट माहित असेलच. जोवर जीव जात नाही, तोवर माकडीण पिल्लास वाचवु पहाते, पण तिचेच नाकातोंडात पाणी जाऊन जीव जातोय असे वाटल्यावर पिल्लाच्या जीवाचि काळजी न करता त्यास पायाखाली घेते.
समजा वरिल गोष्ट जुगवलेली वाटत असेल्,तर मानवांमध्येही, ठिकठिकाणच्या शहरात कचराकुंडीमध्ये मारुन/मराय्ला फेकुन दिलेली नवजात अर्भके हे देखिल उदाहरण घ्यायला हरकत नसावी. तिथे, कितीही अपत्यप्रेम अस्ले तरी बाह्य सामाजिक/व्यावहारिक परिस्थितीमध्ये ते अपत्य बाळगने/वाढवणे जर जीवघेणे शाबित होणार असेल्, तर मानवातील माताही अपत्याचा त्याग करते.
हे देखिल पटत नसेल, तर कुंतिने त्यागलेल्या कर्णाचे उदाहरण आठवा.
अन मग कदाचित त्या पुराणातल्या कथा/वांगी पुराणात राहुदेत असे काही युक्तिवाद माबोकरांकडुन येणार असतील, तर मात्र मला अधिक काही सांगता येणे सध्यातरी अवघड आहे. Happy

मग सरळ गुगल करुन माहिती गोळा करणे उत्तम

प्राणी पिल्लांना जन्म देतात तेच मुळात वंशवृद्धीसाठी. स्वतःचीच पिल्ले मारली किंवा खाल्ली तर वंशवृद्धी कशी होईल?
_>>>>>

हे पटत नाही. प्राणी आपल्या शरीराची भूक भागवतात आणि त्या संबंधातून पिल्ले होतात. त्यांना जर प्रतिबंधक उपाययोजना पुरवली तर समजेल की कोण नक्की वंशवृद्धीसाठी पिल्लांना जन्म देतोय. अन्यथा पिल्ले होऊ नये यासाठी योजायचे उपाय त्यांच्याकडे नसल्याने ते बस्स होतात. असे मला वाटते.

>>> प्राणी आपल्या शरीराची भूक भागवतात आणि त्या संबंधातून पिल्ले होतात. त्यां <<<
अर्धसत्य. शरिराची लैंगिक "भूक(?)" भागविण्याकरताची उत्तेजना/प्रेरण प्राण्यांना नैसर्गिकरित्या होत असते. व जी जीवजमात संख्येने कमी होऊ लागते तिथे ही प्रेरणा अधिक कार्यरत होऊ शकते, किंवा जो जीव जगण्याच्या जीवोजीवस्यजीवनम या तत्वात, जगण्याच्या स्पर्धेत ताकदिने कमी पडतो, त्यांचि संख्या अपरिमित असते हे देखिल बघता येईल.

अरे धागा कोणता आहे, धाग्याचा विषय काय आहे, अन आपण बोलतोय कशावर? Uhoh Proud
अन तरीही अजुन कोणी साळसूद ऑब्जेक्शन घेत आला नाहीये इथे..... Lol

गुगल म्हणत आहे की अतिशय तणावाखाली असणार्‍या मांजरी, नविन आई झालेल्या मांजरी आपली पिल्ले मारून खातात, मृत जन्माला आलेली पिल्ले/अथवा लवकरच मरणारी पिल्ले पण मांजरी खाऊ शकतात. अर्थात अतिशय प्रतिकुल/असामान्य परिस्थितीमध्ये हे वर्तन आढळते. माझे विधान बदलून मी असे म्हणेन की "सामान्यतः स्वतःचे अपत्य कोणताही प्राणी मारत किंवा खात नाही". माणसाबद्द्ल बोलणे नकोच कारण माणसाला बुद्धी असल्याने त्याच्याएवढे unpredictable कोणीच वागू शकत नाही. असो

अरे धागा कोणता आहे, धाग्याचा विषय काय आहे, अन आपण बोलतोय कशावर? Lol

माणसाला बुद्धी असल्याने त्याच्याएवढे unpredictable कोणीच वागू शकत नाही.

>>> भन्नाट आवडलं हे वाक्य!! जबरा!

200

हायला श्री!!!
पाचेक मिनिटापुर्वीच माझ्या मनात हा विचार आलेला.

पद्म म्हणजेच बी, पद्म म्हणजेच गौरप्रेम, कोणीतरी म्हटले पद्म म्हणजेच ऋन्मेष, पद्म म्हणजे मालकांची आत्मा........चालू द्या.......
मला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर झालाय असं वाटतंय........

पद्म म्हणजे मालकांची आत्मा >>>> हे नाही कळलं.>>>>>>>> हे तर मलाही नाही कळालं....
विचारलं तर म्हणे तुम्हाला लिंक नाही लागणार..........पण कोणीतरी भगव्या रंगाचे जूने माबोकर होते.....डब्बा गटग मध्ये वाचलं होतं.

हॉटॅल/पार्टीमधे गेल्यावर, सुंदर साजशृंगार केलेल्या, मेकअप केलेल्या, गालावर लाली अन लिपस्टीक वगैरे लावलेल्या यौवनेने/स्त्रीने, हातात हड्डी घेऊन त्याला डकलेले / (चिकन लॉलिपॉप च्याबाबतीत डकवलेले) मांसाचे पुंजके तोंड/गाल वेडेवाकडे करीत, पटाशीच्या दातांनी वा दाढेने ओढून, ताणुन, ओरबाडुन घेऊन, वेळेस लाळ गळत असताना, असे विचित्रपणे खाताना पाहिले की कसेसेच होते...>> लिंबू काय हे Lol

(चिकन लॉलिपॉप च्याबाबतीत डकवलेले) मांसाचे पुंजके तोंड/गाल वेडेवाकडे करीत, पटाशीच्या दातांनी वा दाढेने ओढून, ताणुन, ओरबाडुन घेऊन, वेळेस लाळ गळत असताना,
>>>>>>>>>>

चिकन लॉलीपॉपच्या वेळेस लाळ गळत नाही.
ते काहीतरी वेगळे असेल. एकतर ते चिकन लॉलीपॉप नसेल, एकतर ती लाळ नसेल.

चिकन तंदूरी मात्र नुसते बघूनच लाळ गळायला सुरुवात होते Happy

हा तर मंदार जोशीचा भटकता आत्मा दिसतोय
>>
मंदार जोशींचा आत्मा नाहीये...मंदार जोशी अडिचाव्या सेकंदाला ओळखु येतात आणि कितीही काहीही केलं तरी मंदार जोशी जास्त वेळ स्वतःचा अपमान सहन करू शकत नाहीत Proud

आणखी कोणी जुना आयडी मॅच होतोय क अबघा... ज्याला खरच पर्सॅलीटी डिसॉर्डर होती, जो सतत नाव चेंज करत रहायचा.. वगैरे वगैरे Wink

Pages