मांसाहार: एक विरोधाभास

Submitted by पद्म on 14 December, 2016 - 10:14

मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.

आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.

साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....

२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.

आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.

मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......

कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती, आता रात्री घरी असल्याने नो मांसाहार. पण काही हरकत नाही कढीभात माझ्या अफाट आवडीचा आहे.

फक्त ते आतल्या बाजूने गालात गाल. साला अजून समजत नाहीये. ट्राय करायची इच्छा होतेय कुठेतरी, पण आडकणार नाही ना याची भिती वाटतेय. या भितीनेच दातखीळ बसली तर आणखी पंचाईत Sad

त्या हर्पेनचं काही ऐकू नको.
खास मेळघाटातून शोधून आणलेली तिथल्या आदिवासींची सिक्रेट पद्धत आहे.
तू इथे मुंबई पुण्यात ट्राय करायला गेलास तर तुझंच 'झिंगालाला हो' होऊन जाईल.

ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असल्या तरच ते टेक्निक शक्य आहे.
(आणि हर्पेनला कारण तो इंड्युरन्स स्पोर्ट्स खेळतो!)

ओहह! म्हणजे लैंगिक समाधान ईज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ शेविंग ! नोटेड... लिखाणावरून वाटत नसलो तरी मी एंजिनीअर आहे. . हे राहील लक्षात.

अ‍ॅडमिन,
कृपया या धाग्यावरच्या मांसाहाराशी (non veg) संबंध नसलेल्या पोष्टी उडवा!
Wink

खूप सुंदर विचार आहेत. मी आधीच येणार होते लिहायला. पण तेवढ्यात शेजारचा दीड वर्षाचा चिंटू आला आमच्याकडे खेळायला. मला खूप भूकही लागली होतीच. मग काय ....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी आणि चिंटूनी मॅगी बनवून खाल्ली आणि मगच इथे आले.

अग्ग आई ग..... ती चिमुरडी मॅगी गेली की हो तुमच्या पोटात...
चिंटूची बहिण.
चिंटूच्या आई ... बरं राहिलं.... बाबांचा तरी विचार करायचात!
कुफेहीपा.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
तळतळाट
एकट्याने डबलवाल पॅक संपवल्याबद्दल! Light 1

साती यांच्याशी सहमत, खास करून त्या गालाला आतून आतला गाल लावणे तर नॉनवेजची हद्द आहे. काल रात्रभर निव्वळ विचारांनीच माझे पाणी झालेय. एखाद्या नरामध्ये अश्या भावना प्रज्वलित करायचे सामर्थ्य फक्त नॉनवेज गोष्टींमध्येच असते.

पण तुम्ही ज्या मॅगी दाखवल्या आहेत त्या आता डरना मना है सारखे सफरचंद झाल्या आहेत. आता त्यांना खाणे हे शाकाहारात मोडेल.

बाकी ऐप्पल ऐप्पल एवरी डे, डॉक्टर डॉकटर अवे अवे हे ईंग्रजी सुभाषित एक अंधश्रद्धा आहे तर. त्यांनी छानसे लिंबूमिरची सारखे सफरचंद दारालाच टांगलेय तरी तुम्ही अगदी आतवर घुसून आलात Happy

साती

ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असल्या तरच ते टेक्निक शक्य आहे.
(आणि हर्पेनला कारण तो इंड्युरन्स स्पोर्ट्स खेळतो!)
>>> _/\_

हे असं ना तुझं!
फक्त अधनं मधनं करणार मग तू नेहमी नेहमी समाधानी कसा होणार?
>>> Rofl

फक्त अधनं मधनं करणार मग तू नेहमी नेहमी समाधानी कसा होणार? >>> Lol , अहो त्याला थोडा ब्रेकपण घेऊद्या , बच्चे की जान लोगे क्या Proud

काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.>>>> हे म्हणजे खर्रच कायच्या काय कायच्या काय...

अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.>>>> म्हणजे नक्की किती वर्षांनी?? आमच्याकडे गावी कोंबडं कापण्याचे, मासे मारण्याचे काम बायका वर्षानुवर्षे करत आहेत.. अजूनतरी child cannibalism सुरु झालं नाहीये.

प्रतिज्ञा, कदाचित तुमच्या गावच्या मुलींचे ईंग्रजी माझ्यासारखेच कच्चे असावे. child cannibalism  चा अर्थच माहीत नसावा. एक शक्यता वर्तवली, चुकीचीही असू शकेल. पण प्रयोग म्हणून आज तुम्ही त्यांना हा अर्थ समजवून सांगा आणि साधारण सहा सात वर्षांनी याच धाग्यावर येऊन आपले अनुभव लिहा.

किती छान वास्तव मांडलेय, खास करुन शेवटले रोजचे दिसणारे चित्र..
मी तर ब्वा मांसाहार करणार्‍या लोकांच्या घरी, मांसाहारी रेस्टॉरंटमध्ये जातच नाही.
कोणी सांगावे मलाच ... इइइइइ... शहारा येतो अंगावर.....

मानव मसाला फ्राय!
Wink

हैद्राबदच्या गटगला सिग्नेचर डिश ठेवणार आम्ही!

smiley-sad001.gif

मी तर नावानेच बदनाम आहे. मी काही धाग्याचा रोख वळवण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना माझ्या पोस्ट पाहिल्या तर मी लैंगिक मांसाहारावरच चर्चेचा फोकस कसा राहील हे बघितले आहे.

>> Uhoh

मी शाकाहारी आहे.
एक हवेशीर आयडीज आहेत माहितीचे. ते आयडीहारी आहेत. आयडीज खातात . त्या आयडीजना झालेले बालआयडीज सुद्धा खातात. हा प्रकार शाकाहारात मोडतो कि मांसाहारात ?

Pages