मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.
आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.
साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.
काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....
२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.
आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.
मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......
कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....
सकाळच माबो उघड्लयावर काय मस्त
सकाळच माबो उघड्लयावर काय मस्त लेख वाचायला मिळालाय. दिन बन गया.
पद्म मस्त लिहिलंय.
<<<<<<<<काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.>>>>>>>>
हे काय्च्याकाय भारीच आवडलंय.
तुम्ही ह्या विषयावर अजुनही तुमचे मौलिक विचार लिहावेत अशी रीक्वेश्ट करते.
@देवकी, भगवद्गीता ३.१३ & ९.२६
@देवकी, भगवद्गीता ३.१३ & ९.२६ यांची सांगड घालून मंथन करा. लोणी नक्कीच मिळेल.
It seems you have done
It seems you have done masters in Thermal Engineering.
Then how comes you are not applying law of conservation of mass that states the mass can not be created or destroyed, it can just be transformed from one form into another. This applies to humans and other animals too.
अहो बेफिकीर, ते mass वेगळं
अहो बेफिकीर, ते mass वेगळं आणी हे मांस वेगळं
>>>>>>>Then how comes you are
>>>>>>>Then how comes you are not applying law of conservation of mass that states the mass can not be created or destroyed, it can just be transformed from one form into another. This applies to humans and other animals too.<<<<<<<<
It's the law of conservation of energy not mass. But OK, will work here. But you are talking only about quantity of energy but think about draw backs in first law. So, you must refer second law which tells about quality of energy.
anyways, all gross laws are not useful on subtle platform. Do u follow?
<<<काही तरुण मुली चिकन/मटण
<<<काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.>> ग्रो अप बडी , एवढचं म्हणू शकतो .
ग्रोन अप बडी. इट्स युअर टर्न
ग्रोन अप बडी. इट्स युअर टर्न नाऊ.
ते mass वेगळं आणी हे मांस
ते mass वेगळं आणी हे मांस वेगळं
<
मानवी इतिहासाच्या ३ लाख
मानवी इतिहासाच्या ३ लाख वर्षांत आजवर जन्माला येऊन गेलेल्या शतलक्ष पिढ्यांतील अगणित बायकांनी स्वहस्ते शिकार करून, नवर्याने/इतरांनी मारून आणलेला प्राणी फाडून, किंवा पाळीव प्राणी स्वतः कापून स्वयंपाक केलेला आहे. करीतही आहेत.
हे असे असताना, बसल्याबसल्या भूक लाग्लिये, तर चला, एकादं पोरगं शिजवून खाऊ, किंवा गेलाबाजार एकाद्याची तंगडी तोडून भाजून खाऊ अशा प्रकारचा चाइल्ड कॅनिबलिझम जगभरात काही कुठे सुरू झालेला दिसला नाही.
असं असताना, " भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल" हे इतकं ग्रोनअप लिखाण वाचून जरा भंजाळलोय. काय्च्याकाय उचल्ली बोटं लागले टंकायला..
(भारतात पण म्हणजे जगभरात सुरूच आहे का?)
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते. << अरे बापरे..
ते मास वेगळं आणि हे मांस
ते मास वेगळं आणि हे मांस वेगळं!

बसल्याबसल्या भूक लाग्लिये, तर
बसल्याबसल्या भूक लाग्लिये, तर चला, एकादं पोरगं शिजवून खाऊ, किंवा गेलाबाजार एकाद्याची तंगडी तोडून भाजून खाऊ >>>
(भारतात पण म्हणजे जगभरात
(भारतात पण म्हणजे जगभरात सुरूच आहे का?)>>>>>>>>> हो! त्याशिवाय थोडीच ही कन्सेप्ट लिहिली...
भरपूर देशांमध्ये महिला आपला गर्भ child cannibalism साठी भाड्याने देतात...आणि नरभक्षक माणसे त्यातले अर्भक शिजवून खातात.
https://moniquemonicat.wordpress.com/2009/10/14/chinas-boiling-eating-ba...
खरं म्हणजे कोवळं मांस जास्त
खरं म्हणजे कोवळं मांस जास्त शिजवू नये.
कोल्ड कटस खावे शक्यतो.
किंवा जास्तीत जास्त वाफेवर शिजवावं!
काय कळत नाही त्या मूर्खांना,
डेलीकसी आणि फाईन डायनिंग म्हणजे काय ते!
काय कळत नाही त्या
काय कळत नाही त्या मूर्खांना,
डेलीकसी आणि फाईन डायनिंग म्हणजे काय ते!>>>
>>>>It's the law of
>>>>It's the law of conservation of energy not mass<<<< अहो काहीही काय? एनर्जीचा एक लॉ आहे आणि मासचाही एक लॉ आहे. कमाल झाली.
फेरफटका, ते मांस आणि हे मांस वेगळ<<<<
त्यांना समजलंय मला काय म्हणायचंय ते! पण ते आता ते एनर्जीवर ढकलतायत!
>>>>So, you must refer second
>>>>So, you must refer second law which tells about quality of energy.<<<<
अहो एनर्जीचा लॉ आहे तसाच मासचाही आहे हे आधी लक्षात घ्या. एखादा जीव गेला तर त्याच्या रुपाने असलेले मास तेवढेच राहते. मृत्यूकाळच्या वेदना ह्या मास ह्या सदरात मोडत नाहीत. तुम्ही कोंबडी मारली नाहीत तर तिला अमरत्व प्राप्त होणार नाही. जगात असे प्रदेश आहेत जेथे शाकाहार करणे शक्यच नाही. तेथील माणसे, तरुण मुली वगैरे स्वतःच्या मुलांना येताजाता फटके टाकतात असे म्हणायचंय का?
आणि क्वॉलिटी ऑफ एनर्जी कसली? त्याचा मांसाहाराशी नेमका संबंध काय?
>>>>anyways, all gross laws are not useful on subtle platform. Do u follow?<<<<
हेच वाक्य तुमच्या लेखाला लागू करून पाहिलंत तर लक्षात येईल की समोर प्राण्यांचे मुडदे पाडले जात आहेत हे पाहूनही कोवळ्या वयाच्या तरुणी ते मांस विकत घेतात तरीही स्वतःच्या पोटच्या मुलाशी नीट वागू शकतात.
आता ह्याला तुम्ही दुटप्पीम्हणा म्हणणार. तेव्हा मज्जा आहे एकंदर!
<< मी शाकाहाराची वकिली करत
<< मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण... >> हाच एक विरोधाभास आहे ! असो.
मीं अहिंसक वृत्तीचा असूनही मांसाहारी [ मासेखाऊ ] आहे व कोकणातल्या बहुसंख्य जनतेचं मासे हेंच प्रमुख्य खाद्य आहे. आम्हां भावंडांपैकीं दोघानी जन्मापासून मांसाहारी असूनही तात्विक भूमिका घेवून मांसाहार बंद केला व त्यांच्याबद्दल मला खूप आदर वाटतो. पण जन्मतःच शाकाहारी असलेले केवळ आपण मांसाहारींपेक्षां श्रेष्ठ असल्याचा आव आणण्यासाठी जेंव्हां मांसाहारावर तोफ डागतात , तेंव्हां मला त्या वृत्तीचा तिटकारा येतो. सगळी मानव जातच ह्याहूनही भयानक असे अनेक विरोधाभास पचवतच जगत असते उदा. स्वातंत्र्य व राष्ट्रभक्तीच्या नांवाखाली लढल्या गेलेल्या लढायांतन लाखो माणसांचे बळी दिले/घेतले जातात, प्रगतिच्या नांवाखालीं मोजक्या लोकांच्या भरभराटीसाठी अगणित लोकाना वेठीस धरलं जातं , जाती-पातीच्या कृत्रिम रेषा आखून पिढ्यान-पिढ्या समाजाच्या मोठ्या भागाला अमानुष वागणूक दिली जाते इ.इ. त्यामानाने, जगात प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या लोकांचं मांसाहार हें अन्न आहे, त्यानाच हा विरोधाभास दाखवून हिणवणं हाच एक विरोधाभास आहे.
अहो तुम्हाला काय खायचे आहे ते
अहो तुम्हाला काय खायचे आहे ते खा. आमच्या ताटात का डोकावताय!
सगळ्यात पहिल्या सुमुक्ता यांच्या प्रश्नाला गुंडाळून ठेवलयं तुम्ही.
भाऊंना १००% अनुमोदन.
भाऊंना १००% अनुमोदन.
भरपूर देशांमध्ये महिला आपला
भरपूर देशांमध्ये महिला आपला गर्भ child cannibalism साठी भाड्याने देतात...आणि नरभक्षक माणसे त्यातले अर्भक शिजवून खातात.
<<
जहाल करमणूक आहे ती साईट. सनातनप्रभात परवडली त्यापुढे!
it's folly to be wise, where
it's folly to be wise, where ignorance is bliss......
no more comments..
अश्या मुली पाहून, भारतात पण
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.>>>>> हे वाक्य म्हणजे लेखातला कळसाध्याय आहे. या वाक्यातून असे प्रतित करायचे आहे की सर्व जगभर असे प्रकार सुरू आहेत. असे काहीही नाही हा भाग वेगळा. स्वत:च्या या वाक्याला पुरक म्हणून जी लिंक दिली तीच काहीच्या काही आहे.
मानवाच्या इतिहासात नरमांसभक्षणाच्या गोष्टी घडल्या असतील पण त्यावेळी तो एकतर असंस्कृत होता किंवा काही विशिष्ट परिस्थितीत त्याने असे केले असेल.
मानवाच्या इतिहासात
मानवाच्या इतिहासात नरमांसभक्षणाच्या गोष्टी घडल्या असतील पण त्यावेळी तो एकतर असंस्कृत होता >>>>> जगण्यासाठी ही धडपडत असेल.
फार पुर्वी एक पुस्तक वाचल होत.त्यात नॅशनल लेवल च्या खेळाडुच विमान बर्फात कोसळत,आणी स्वतःचा जीव जगवण्यासाथी त्यांना सहकार्यांच मांस भक्षण कराव लागत.
मांस भक्षण करणे अथवा नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुददा आहे.
शाकाहारी लोक गाईच दुध आहारात घेतात.तेव्हा त्यांना अस का नाही वाटत की ते दुसर्यांच आधी अन्न आहे? परत वैचारीक गोंधळ नाही जाणवत का इथे धागाकर्त्यांना ??
वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड..">>> हे मात्र मला फार इरीटेंटीग वाटत.भरीस भर म्हणुन आपल्याकडेचे विक्रेते ही जैन सॅन्ड्वीच, जैन भाजी, जैन अमक ,जैन तमक म्हणौन माल खपवत असतात.
हल्ली पुण्यात ही ज्या व्हेज सोसायटी झाल्या आहेत आनि होऊ पहात आहे त्याचा ही मला भयंकर राग येतो.
जी माणसं मांसाहार करत नाही
जी माणसं मांसाहार करत नाही म्हणत म्हणत इतरांची डोकी खातात अशांचे काय करावे.
१. निसर्गातले मांसाहारी
१. निसर्गातले मांसाहारी प्राणी भुकेले असतात तेव्हाच शिकार करतात अथवा खातात , मनुश्य मात्र अनावश्यक वेळीसुधा चवी साठी खातो ; ही मनुश्यव्रुत्ती नकारता येत नाही.
२. शाकाहारी लोक ज्या वनस्पती मुख्यत्वे खातात त्या वनस्पतीना पूर्णतः न मारता मिळवतात , निदान तसे शक्य असते ,
सर्वात महत्वाचे
३. माणसाला पचनक्रियेसाठी असलेले अवयव शाकाहारी खाण्यासाठी designed आहेत.
(२ आणि ३ हे शाकाहारासाठी कल दर्शवतात)
या मुद्यान्वरून आपण आपल्यासाठी योग्य वाटणारा मार्ग ठरवू शकतो
मुळात हे द्वन्द्व आस्तिक आणि नास्तिक या प्रकारातले आहे , त्याला स्वतःची मनोधारणाच मार्गदर्शक असते. यात चूक / बरोबर असे असू शकत नाही.
जसे "खरे बोलणे" हे सापेक्श असते , ते चूक / बरोबर हे काही वेळा सन्दर्भानुसार घ्यायला लागते. (यात कुठलाही चुकीचा / अर्थ अपेक्शित नाही)
माझ्या मते मांसाहारलोक लहान्पणापासून त्यान्च्या नकळत मांसाहार करू लागलेले असतात ," प्राण्याला मारून खातो आहोत" हे कळायला लागायच्या अधीपासूनच ते आचरले गेलेले असते ; ते अन्ग्वळणी पडलेले असते.
त्यामुळे ते क्रूर म्हणणेही योग्य नाही.
'ईशावास्यं इदं सर्वं,
'ईशावास्यं इदं सर्वं, यत्किञ्च जगत्यां जगत्'...
ईशावास्य उपनिषदातला हा पहिलाच श्लोक सुप्रसिद्ध आहे. याचा बहुमान्य अर्थ असा आहे, " या जगातली प्रत्येक वस्तु (जगात जे काही आहे ते) ईश्वराने व्यापलेलीआहे. तर तू त्याचा त्यक्त वृत्तीने उपभोग घे. दुसर्या कोणाच्याच धनाची इच्छा करू नकोस."
इथे 'तेन त्यक्तेन भुञ्जीथा:' हे वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे. सांगणे असे आहे की तू या सर्वांचा उपभोग घे, पण अतिशय त्यक्त-विरक्त वृत्तीने घे'. हे समजायला थोडे कठिण आहे. कारण त्याग आणि भोग एकत्र वास करू शकत नाहीत. त्यामुळे 'त्यागून भोग' हा उपदेश वरवर अजब वाटतो. सोपे करून सांगायचे तर उपभोगताना 'हे माझे नव्हेच' अशी विरक्त वृत्ती ठेवली किंवा चांगल्यावाईटाचा समभावाने स्वीकार केला तर तो भोग राहात नाही. तो त्याग ठरतो. त्यातल्या हावेचा (greed), कामनेचा(desire) त्याग म्हणजेच 'त्यक्तेन भुञ्जीथा:' जेव्हढे आवश्यक तेव्हढेच घ्यावे, मिळतेय म्हणून ओरबाडू नये. त्यातच संतुष्ट राहावे.
या अर्थाची अनेक संतवचने आहेत.
(No subject)
जी माणसं मांसाहार करत नाही
जी माणसं मांसाहार करत नाही म्हणत म्हणत इतरांची डोकी खातात अशांचे काय करावे.> +१
सगळ्यात पहिल्या सुमुक्ता
सगळ्यात पहिल्या सुमुक्ता यांच्या प्रश्नाला गुंडाळून ठेवलयं तुम्ही. >>> जाऊ द्या हो. बर्याच शाकाहारी लोकांना हा प्रश्न मी विचारला आहे आणि ते अशीच टाळाटाळ करतात. म्हणजे आपला तो बाब्या दुसर्याचं ते कार्टं ह्यातली गत आहे
माणसाला पचनक्रियेसाठी असलेले अवयव शाकाहारी खाण्यासाठी designed आहेत.>>>> हे चूक आहे. माणसाची पचनसंस्था शाकाहारी पदार्थ आणि शिजलेले मांस पचविण्यासाठी design केली आहे. माणूस omnivorous आहे!!!
जी माणसं मांसाहार करत नाही म्हणत म्हणत इतरांची डोकी खातात अशांचे काय करावे.>>>
Pages