मांसाहार: एक विरोधाभास

Submitted by पद्म on 14 December, 2016 - 10:14

मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.

आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.

साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....

२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.

आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.

मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......

कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.>>> अगदी बरोबर.

शाकाहारी लोकांना अन्न मिळावे म्हणून शेतीसाठी जे deforestation केले जाते आणि त्यामुळे हजारो प्राण्यांचा जीव जातो त्याबद्दल आपले काय मत आहे?

स्वतःच्या शेतीत घरे बांधण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी प्लॉट पाडले जातात आणि शेतीसाठी डिफॉरेस्टेशन, हा पण एक गोंधळवणारा मुद्दा आहे...इथे ऍडमिनिस्ट्रेशन कमी पडते...

स्वतःच्या शेतीत घरे बांधण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी प्लॉट पाडले जातात आणि शेतीसाठी डिफॉरेस्टेशन, हा पण एक गोंधळवणारा मुद्दा आहे. इथे ऍडमिनिस्ट्रेशन कमी पडते. >>>> केवळ भारतात नाही हो जगभरात deforestation होत आहे!! आणि वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या पुरवठ्यास पडेल इतक्या अन्नधान्याची निर्मिती हा सर्व जगापुढचा एक खूप मोठा प्रश्न आहे.

शाकाहारी लोकांनी शाकाहार सोडावा असे नाही. पण विविध प्राण्यांच्या हत्येस सगळेच (शाकाहारी,मांसाहारी, vegans, इत्यादी) directly किंवा indirectly जबाबदार असतात एवढी जाणीव ठेवली तरी पुष्कळ आहे!!

आमच्या शाळेत एक मारकुटे मास्तर होते. पट्टीने मारत पोरांच्या मांड्या लाल करणे हा छंद होता. आमच्या शाळेत दहावीपर्यंत हाल्फ चड्ड्या असल्याने खरोखरच मांड्या अक्षरशा लाल व्हायच्या. ज्यांची प्यांट गुडघ्यापर्यंत असेल त्याला ती वर फोल्ड करायला लावायचे आणि मग मांडी सोलून काढायचे.

नंतर शिक्षकदिनाच्या दिवशी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र वनभोजनाचा कार्यक्रम होता. त्यात आम्हाला समजले की ते सर शुद्ध शाकाहारी होते. प्राण्यांची क्रूर हत्या करत त्यांना अन्न म्हणून खाणे सरांना मंजूर नव्हते.

बस्स त्यादिवशी माझा माणूसकीवरून विश्वास उठला. एक माणूस दुसरया माणसाला साधी भूतदयाही दाखवू शकत नाही हे समजले.

पण त्याच बरोबर आणखी एक गोष्ट कायमची मनात ठसली - माणसाच्या आहार सवयी आणि त्याचे विचार यांचा आपसात ताळमेळ असेल असे नेहमीच नसते.

मी स्वत: कर्क राशीचा आहे. ईतके हळवे मन आहे की चटकन डोळ्यात पाणी तयारच असते. रक्त, मग ते कोणाचेही बघू शकत नाही. स्वत:चे असेल तर चक्करच येते.

पण विरोधाभासच म्हणा हवे तर, मी अट्टल मांसाहारी आहे. रोज मांस खाऊ शकतो, किंबहुना जवळपास खातोच. यासाठी कुठलाही सणवार पाळायची झंजट ठेवली नाहीये. बस्स मूड आला की कापला कोंबडा.

प्रत्येकाचे काही धार्मिक विचार असतात. माझ्यामते जी माणसं पाप करतात ते मेल्यावर कोंबड्या बकरयांच्या जन्माला येतात. त्यांना या जन्मातही आपले भक्ष्य बनत मरायचेच असते, ती त्यांनी गतजन्मात केलेल्या कर्माची शिक्षा असते. आपण त्यांना खाऊन मोक्ष देतो. जर ते दुसरया कुठल्या पद्धतीने मेले तर मात्र त्यांना पुन्हा या जनावर-जन्म-मृत्युच्या फेरयात फिरत बसावे लागते.
म्हणूम मी तर म्हणतो मांसाहार करा, प्रायश्चितात होरपळणारया जीवांना मोक्ष द्या, आणि पुण्य कमवा Happy

@ऋन्मेऽऽष, तू राहूल गांधींचे भाषणं जास्त ऐकतोस का? तू तसाच बोलतोस.....
@सुमुक्ता, कदाचित शाकाहारी लोक जबाबदार असतीलही, पण ते स्वेच्छेने करत नाहीत & vice a versa

@सुमुक्ता, कदाचित शाकाहारी लोक जबाबदार असतीलही, पण ते स्वेच्छेने करत नाहीत & vice a versa >>> स्वेच्छेने करत नाहीत म्हटले की जबाबदारी टाळता येत नाही. मांसाहारी लोकांना क्रूर म्हणणार्‍या लोकांना स्वतः करत असलेल्या क्रोर्याची (प्राण्यांवर आणि निसर्गावरसुद्धा) जाणीवही नसते!! मांसाहारी लोकांमुळे निसर्गाची हानी होत नाही असे मात्र माझे मुळीच म्हणणे नाही!!

तुमच्याच लेखात तुम्ही पुढील वाक्य लिहिले आहे: त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत. तेव्हा सर्वांनीच स्वतःच्या तत्त्वांचा खोलात विचार करावा

@ऋन्मेऽऽष, तू राहूल गांधींचे भाषणं जास्त ऐकतोस का? तू तसाच बोलतोस.....
>>>>>
आमचा नेटफ्रेण्डसचा व्हॉटसग्रूप आहे. तिथे मला म्हणतात मोदींनंतर तूच.
थोडक्यात मी राष्ट्रीय नेत्याच्या कॅलिबरचे मटेरीअल आहे Happy

@ शाकाहार आणि मांसाहार हे सारे मानण्या न मानण्यावर आहे. आस्तिक नास्तिक वादासारखेच आहे हे. तुम्हाला ठाम निष्कर्श कधीच मिळणार नाही.

तसे तर जमिनीवर चालल्यानेसुद्धा भरपूर जीव मारतात..म्हणून do the needful & not what you want.

there are bugs in a program.

असले विरोधाभास शोधायला गेलात, तर दुसरं काही काम च उरणार नाही आणी हे संपणार ही नाही. उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढू नका.

माणसाच्या वागण्यातली विसंगती सुद्धा संपूर्णपणे जेन्युईन असते, कारण प्रत्येक वेळची भुमिका, कारण, संदर्भ, परिस्थीती वेगवेगळी असते.

दिखावा असा मराठी शब्द नाहीये, देखावा आहे.

बाळा, तुला मी काय बोललो ते कळलंच नाही.

दिखावा असा मराठी शब्द नाहीये, देखावा आहे>>>>>> शब्दों को छोडो भावनाओं को समझो

"शब्दों को छोडो भावनाओं को समझो" - भावनांविषयी पहिल्या दोन परिच्छेदात प्रतिक्रीया देऊन झाल्यावर, तिसर्या परिच्छेदात शब्दांविषयी लिहीलं.

वनस्पतींना जीव असतो,हे जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केले आहे.मग ते पण खाऊ नये की कसे?

लेख आवडला.
खास करून ते चाईल्ड कॅनाबलिझम आणि तरूणींचं उदाहरण.
एवढेच नव्हे तर लोक उद्या नरभक्षकही होतील आणि ते जस्टीफाय करतील.

बाकी, तुम्हाला सोया चिल्लिची रेस्पि दिली होती ती करून पाहिलीत की नाही?

. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे...... >> लोक त्यांच्या तत्वावर नीट चालत असतात. बघणार्‍यांना वाटते कि, बघणार्‍याने ठरवलेल्या (लोकांच्या) तत्वांच्या interpretation वर लोक नीट चालत नाहीत.

लेख आवडला.
खास करून ते चाईल्ड कॅनाबलिझम आणि तरूणींचं उदाहरण.
एवढेच नव्हे तर लोक उद्या नरभक्षकही होतील आणि ते जस्टीफाय करतील.>> +१

मेरे मन कि बात छिनली साती तुने..

त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.>> मी तर उलट्या काळजाचीच आहे मग.. वाईट्ट...

त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.

जीवो जीवस्य जीवनम
काहीतरी नष्ट झाल्याशिवाय दुसरे काही वाढणार नाही - Law of total conservation of energy इ. इ.
असे आहे तर किती खोलात विचार करणार?

nature is having very much for human need, but very less for human greed.

हे तर फार उत्तम विचार - पण need व greed मधील रेषा अगदी पुसट आहे. लवकर दिसत नाही, जाणवत नाही - ज्याला आम्ही भारतात greed म्हणत होतो त्याला अमेरिकेत need समजतात.
आता?

किती किती विचार करायचे? जगायचे केंव्हा, कसे?

राहू द्या हो आजोबा, आता विचार करायचं बॅट्न तुम्ही नव्या पिढीकडे द्या.
तुम्ही मस्तं जगा!
बर्‍याच दिवसांत आला नसाल ना भारतात?
हल्ली इकडेपण पूर्वी ग्रीड समजायचे त्याला नीड म्हणतात.

टीना, असं नाही गडे, पूर्ण सहमती दे. मांसाहार करणारे वाईट आणि दुटप्पी असं लिहीच गडे इथे.

काही लोकांनी विचारले की, वनस्पतींना जीव असतो म्हणून खावे की खाऊ नये....(अगदी योग्य प्रश्न)
यासाठी शास्त्रांमध्ये प्रमाण सापडते. इषोपनिषदात सांगितले आहे की या जगात प्रत्येक जीव दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असतो. पण, असेही सांगितले आहे की निसर्गाने प्रत्येकाला त्याचा quota ठरवून दिलेला आहे, त्यानुसार चालावे. जसे, वाघ आणि सिंहासारख्या प्राण्यांच्या कोट्यात मांस आहे म्हणून त्यांनी ते खाणे अयोग्य नाही. माणसांच्या कोट्यात शाकाहार आहे, म्हणून त्यांनी ते खाणे अयोग्य नाही. यासाठी शास्त्रीय प्रमाण आहेत, सीमित बुद्धीद्वारा आणि शब्दांचे जाळे गुंफून जस्टीफाय करणे योग्य नाही.

>>>>>>पण need व greed मधील रेषा अगदी पुसट आहे. लवकर दिसत नाही, जाणवत नाही - ज्याला आम्ही भारतात greed म्हणत होतो त्याला अमेरिकेत need समजतात.
आता?<<<<< त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, भरकटलेत बिच्चारे......ते तर अवैध स्त्रीसंग पण योग्य समजतात, आणि हे तुम्हालाही योग्य वाटत असेल, तर जास्तीची मदत मी करू शकत नाही.

@साती, रेसिपी अजून तरी नाही केली. रूमवर असतांना किचनमध्ये कूक येऊ देत नाही, आणि घरी किचनमध्ये जायचा आळस.

@असामी, लेखातील उदाहरणे परत वाचा...

@फेरफटका, 'हवे असेल तर पुरावे देईन.' - द्या.>>>>>>> Untitled.png

गुगल करेंगे, गुगल करेंगे , गुगल करेंगे!
ओ गुगल नका करू!
गुगल ना अमिता दिदी म्हण्जे काय दाखवत होतं माहित्येय का?

बाकी सगळ्या मायबोलीला माहित्येय!
Wink

éçäväsyam idam sarvaà
yat kiïca jagatyäà jagat
tena tyaktena bhuïjéthä
mä gådhaù kasya svid dhanam
SYNONYMS
éça—by the Lord; äväsyam—controlled; idam—this; sarvam—all; yat kiïca—whatever; jagatyäm—within the universe; jagat—all that is animate or inanimate; tena—by Him; tyaktena—set-apart quota; bhuïjéthäù—you should accept; mä—do not; gådhaù—endeavor to gain; kasya svit—of anyone else; dhanam—the wealth.
TRANSLATION
Everything animate or inanimate that is within the universe is controlled and owned by the Lord. One should therefore accept only those things necessary for himself, which are set aside as his quota, and one should not accept other things, knowing well to whom they belong.

येथे कॉपी पेस्ट केल्यामुळे रोमन लिपीतच लिहावे लागले.

<<काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.>>

हे भयंकर अतिरंजित विधान आहे.
मी मांसाहारी कुटुंबात जन्माला आले. माझ्या आईने मांस, मासे असं विकत आणलं, शिजवलं अन आम्हा मुलांना प्रेमानं खाऊ घातलय... तिच्यातल्या ममतेवर शंका घेणारा जीव अजून जन्माला यायचाय असं मला आत्तापर्यंततरी वाटत होतं.

मी ही त्याच वाटेवर चालते आहे. नावड म्हणून माझा स्वतःचा मांसाहार कमी झालाय पण लेकासाठी आणते, शिजवते... ते त्याच्याप्रति असलेल्या "ममते"मुळेच.

असो... ह्यापेक्षा अधिक लिहिणं म्हणजे विनोदी होईल ते...

हेच तर नेमकं विरोधाभासाचं कारण आहे. आपल्या मुलावरील ममतेसाठी, दुसऱ्याशी क्रूरता....
समजा उद्या एखाद्या मुलाने child cannibalism चा हट्ट केला, तर ममतेपोटी ती आई हा पण हट्ट पूर्ण करेल.
आत्ता ही अतिशयोक्ती वाटत असेल. पण हे स्लो पॉयझनिंग आहे. एके दिवशी उग्र रूप दाखवेल. त्यादिवशी सर्व माबोकर child cannibalism ला सुद्धा जस्टीफाय करतील.
असो. सर्वांनीच मान्य केलं तर, कलियुगाचा अपमान होईल.......

माणसांच्या कोट्यात शाकाहार आहे, म्हणून त्यांनी ते खाणे अयोग्य नाही. यासाठी शास्त्रीय प्रमाण आहेत,>>>>>द्या की गडे.जर ज्ञानात भर पडली तर बरेच होईल न.

Pages