तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
काल ग्रामीण भागात फिरून आले.
काल ग्रामीण भागात फिरून आले. राग, असंतोष नाही जाणवला. गैरसोय होतेय कि नाही हे विचारण्यासाठी वेळ नाही मिळाला. ग्रामीण भागतल्या निवडणुकांमुळे गडबड चालू होती. पोलिसांकडून प्रत्येक संशयित गाडीचे चेकिंग चालू होते. ( सुदैवाने मला नाही अडवलं). जेजुरी, सासवड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भाजीवाले भाजीविकीसाठी बसले होते. शेकडो गाड्या रस्त्याच्या कडेला थांबून भाजी घेताना दिसले. याचा अर्थ रोखीने व्यवहार होताहेत. भाज्या फेकून द्याव्या लागतात वगैरे आता प्रत्यक्षात चित्र नाही. हा माझा अनुभव आहे, काही दिवसांनी सर्व सुरळीत होईल याचा विश्वास होताच.
प्रत्येकाला नोव्हेंबर महिन्यात किमान चार हजार रूपये कॅश ( रांगेत उभे राहून का होईना) मिळाली आहे. एव्हढी रोख रक्कम महिन्याभराच्या भाजी साठी पुरेशी आहे. आता सहा हजार रूपये एका वेळी आणि महिन्याला चोवीस हजार मिळताहेत. किराणा दुकानदारांकडे कार्ड रीडर असतील तर सहा हजार रूपये रोख रक्कम एका कुटुंबाला पुरेशी आहे.
पुर्वी फिरणारे एकच होते. आता
पुर्वी फिरणारे एकच होते. आता दोन झाले... बेफिक्रे !
https://www.facebook.com/indi
https://www.facebook.com/indiatvnews/videos/1282126488510308/
ग्रामीण बँकांना का अधिकार दिले नाहीत याचे उत्तर.
जुन्या नोटा रद्द करून ३२ दिवस
जुन्या नोटा रद्द करून ३२ दिवस झाले. १० डिसेंबरपर्यंत साधारण ५ लाख करोड इतक्या मूल्याच्या नव्या नोटा चलनात आल्यात. (रद्द केलेल्या नोटांचे मूल्य १५.५ लाख करोड). म्हणजे महिन्याभरात एक तृतीयांश इतके इंधन भरले आहे.
८ नोव्हेंबरपर्यंत ९ ते १० लाख करोड इतक्या मूल्याचे चलन बाजारात होते, (उरलेले लोक जमा करून ठेवत असत) असा सरकारी अंदाज आहे.
१० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या काळात बँकांमध्ये ५००/१००० रुपयांच्या नोटांत १३.२३ लाख करोड जमा झालेत. (रद्द केलेल्या चलनाच्या ८४%)
दरम्यान सरकार २०,००० टन करन्सी पेपर आयात करण्याच्या तयारीत आहे.
(इंडियन एक्स्प्रेसमधल्या बातमीतून)
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=mrbyO7CpAdY
https://m.youtube.com/watch?v=2gr0U69RAtM
गैरसोईत गैरसोय!
आपल्याला थंड करुन बडी धेंडं
आपल्याला थंड करुन बडी धेंडं जगणार आहेत >>> बडी धेंडं बडी कधी झाली? जन्मतः नाही आणि गेल्या दोनच वर्षात नक्कीच नाही.
शुभ प्रभातः आजचा अपडेट.:
शुभ प्रभातः आजचा अपडेट.:
फॉक्स्कॉन कंपनीने जवळ जवळ १७०० वर्कर्सना पेड लीव्ह देउन घरी बसवले आहे. ही कंपनी मेक इन इंडिया अंतर्गत मोबाइल हँडसेट्स बनवते. ५००० रु व त्याखालील किंमतीचे हँडसेट्स कॅश मध्ये घेतले जातात. कंपनीचा सेल डीमो नंतर ५०% डाउन झाला आहे. कंपनीने प्रॉडक्षन अर्ध्याने कमी केले आहे.
लाव्हा चा प्लांट शट डाउन होतो आहे व ५००० वर्कर्स आठव ड्याच्या रजेवर आहेत. इंटेक्स ५०० लेबर ला जानेवारीत काढून टाक ण्याची शक्यता आहे.
सिंबा: धाग्याचे दोन भाग आवश्यक आहेत. १) सर्वसाधारण जनतेला होणारा त्रास व गैरसोय.
२) इकॉनॉमी, उद्योग धंद्यांवर होणारे परिणाम. ह्यात शेती छोटे उद्योग धंदे आलेच, एंटायर सेक्टर्स आर सफरिंग. स्लो डाउनचे परिणाम.
मला एक शंका आहे. ज्या नव्या नोटा रेड मध्ये जप्त होतात. त्या एविडन्स म्हणून ठेवल्या जातात का लगेच परत सर्क्युलेशन मध्ये आणतात. कन्सिडरिंग नोटांचे दुर्भिक्ष्य आहे? तसे असेल तर नोटा मिळणे अजूनच अवघड आहे.
परवा काढलेल्या पैकी एक २००० ची नोट जेवायला गेले तिथे खपवली. फ्लेम मध्ये अजूनहि एटीम बंद आहे. अॅक्सिस बँकेचे आहे. साड्या फॉल लावायला टाकल्या तिथे विचारले सुटे देणार का तर तो म्हणे कार्ड घेउ. विषय संपला.
काल सासवड मध्ये दोन हजाराची
काल सासवड मध्ये दोन हजाराची नोट खपवली. तेव्हढ्यासाठी तिखटजाळ मिसळ झाल्ली. छोटंच पण फेमस आहे हे कातोबा मिसळ दुकान. ड्रायव्हरची शिफारस. . नाकातून कानातून धूर निघाल्यासारखं वाटलं. पण टेस्टी आहे हे नक्कीच !
(इतके डिटेल्स अमेरिकेत बसून नाही मिळू शकत ना ?)
तेव्हढ्यासाठी तिखटजाळ मिसळ
तेव्हढ्यासाठी तिखटजाळ मिसळ झाल्ली.>> केव्ढ्याला मिसळ ताई? सुट्टे किती मिळाले?
काल फ्रँकफूर्टमध्ये व्हेज
काल फ्रँकफूर्टमध्ये व्हेज चिलि व हक्का नूडल्स खाल्ले... मस्त चविष्ट होते... रेस्टरावाल्याने कार्ड घेतले.
इतके डिटेल्स मानखुर्दात बसुन नाही ना मिळणार ?
अचे, टूर गाईड नायतर ड्रायवरची
अचे, टूर गाईड नायतर ड्रायवरची शिफारस राहिली हो!

लोकांना २००० ची नोट "खपवावी"
लोकांना २००० ची नोट "खपवावी" लागते. यातच सगळे सार आले. बाकी चालू द्या.
फॉक्स्कॉन कंपनीने जवळ जवळ १७०० वर्कर्सना पेड लीव्ह देउन घरी बसवले आहे. ही कंपनी मेक इन इंडिया अंतर्गत मोबाइल हँडसेट्स बनवते. ५००० रु व त्याखालील किंमतीचे हँडसेट्स कॅश मध्ये घेतले जातात. कंपनीचा सेल डीमो नंतर ५०% डाउन झाला आहे. कंपनीने प्रॉडक्षन अर्ध्याने कमी केले आहे.>>>>
एलएनटी वाल्यांनी सुध्दा प्रचंड लोकांना घरी बसवले आहे.
एटीएम समोर रांगा नाहीत कारण
एटीएम समोर रांगा नाहीत कारण तिथे फक्त गुलाबो मिळते आणि तिला ढुंकुन काळं कुत्रे देखिल विचारत नाही. ५००च्या नोटा गायबच झाल्यात १५ दिवस झाले, घरासमोर असेलेल्या येस बँक एटीम मध्ये रोकड भरली नाहीये. तिथे १००च्या नोटा मिळत.
सिंबा: धाग्याचे दोन भाग
सिंबा: धाग्याचे दोन भाग आवश्यक आहेत. १) सर्वसाधारण जनतेला होणारा त्रास व गैरसोय.
२) इकॉनॉमी, उद्योग धंद्यांवर होणारे परिणाम. ह्यात शेती छोटे उद्योग धंदे आलेच, एंटायर सेक्टर्स आर सफरिंग. स्लो डाउनचे परिणाम.
अमा, बरोबर आहे तुमचे,
धागा demon च्या 3ऱ्या दिवशी काढल्याने त्यात industry अँगल आला नाहीये, आज जमले तर हेडर बदलतो, इंडस्ट्री चे नुकसान हा महत्वाचा परिणाम आहे (हा साईड इफेक्ट नाही, मेन इफेक्ट आहे)
आजच्या इंडियन एक्स्प्रेसमधली
आजच्या इंडियन एक्स्प्रेसमधली बातमी :
गेल्या डिसेंबरमध्ये ज्या शेतकर्याला २० क्विंटल टमाटोसाठी ३०,४०० रुपये मिळालेले, त्याला आता तेवढ्याच टमाटोंसाठी २,००० ची एक नोट मिळाली.
डिमोनेटायझेशनमुळे होणारे संपत्तीचे वाटप हाही एक मुद्दा आहे.
बादशहाने वजीराला विचारलं,
बादशहाने वजीराला विचारलं, "राज्यकर्त्याची सगळ्यात मोठी ताकद कशात असते?"
वजीर म्हणाला, "प्रजेच्या सहनशक्तीत… आणि चतुर राज्यकर्ता ती नेहमीच मधूनमधून तपासून पाहात असतो हुजूर."
बादशहा म्हणाला, "नेहमीप्रमाणे मला तुझं उत्तर पटलेलं नाही."
वजीर म्हणाला, "हुजूर, जे आपल्याला कळत नाही, ते आपल्याला पटलेलं नाही,
असं म्हणणं सोपं असतं आणि त्यातून फुकाचा आबही शिल्लक राहतो.
तुम्हाला कार्यानुभवातूनच समजवावं लागेल. मी सांगतो तसा एक फतवा काढा."
बादशहाने अतिशय शंकाकुल मनाने तो फतवा काढला.
राजधानीच्या मधोमध एक नदी होती.
तिच्यावर एकच पूल होता.
तो राज्यातला सगळ्यात महत्त्वाचा पूल होता.
जवळपास सगळ्या प्रजाजनांना त्याचा वापर करायला लागत होता.
त्या पुलाचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला दोन अशर्फींचा कर द्यावा लागेल, असा तो फतवा होता.
असा फतवा निघाला, तर प्रजेत प्रचंड असंतोष निर्माण होईल, अशी राजाला भीती वाटत होती. पण, तसं काही झालं नाही. लोक निमूटपणे
कर भरू लागले.
बादशहा चकित झाला. वजीराला म्हणाला, "तुझा मुद्दा खरा ठरतोय बहुतेक."
वजीर म्हणाला, "हुजूर, खेळ आत्ता कुठे सुरू झालाय. आता हा कर दहापट
करा. उद्यापासून २० अशर्फी द्यायला सांगा प्रत्येकाला."
बादशहा म्हणाला, "तू माझं सिंहासन उलथायला निघालायस की काय?"
वजीर गालातल्या गालात हसला.
कर दसपट झाला. लोकांनी खळखळ करत का होईना, तो भरायला सुरुवात केली. अत्यावश्यक काम असेल, तेव्हाच लोक पुलाचा वापर करायला लागले. नदीतल्या नावाड्यांना बरकत आली.
काही दिवसांनी हा कर चाळीस अशर्फींवर गेला. तरीही लोक रांगा लावून कर भरत होते. त्यानंतर वजिराने बादशहाला भयंकर भासणारा हुकूम काढायला लावला… पूल वापरणाऱ्याला चाळीस अशर्फींचा कर द्यावा लागेल, शिवाय जोड्याचे दहा फटके खावे लागतील, असा तो हुकूम होता.
तो अंमलात येऊन एक दिवस होतो ना होतो, तोच राजवाड्यासमोर प्रजाजनांची प्रचंड गर्दी गोळा झाली. बादशहा सचिंत मनाने बसला होता.
वजीर आला. बादशहा म्हणाला, "हे तू काय करून ठेवलंयस? पाहतोस ना
बाहेर सगळ्या राज्यातली प्रजा गोळा झालीये. कर भरा आणि वर दहा जोडे खा,
हे कोणती प्रजा सहन करील?"
वजीर म्हणाला, "हुजूर, ते काय म्हणतायत ते न ऐकताच तुम्ही मला बोल
का लावताय? मी त्यांची मागणी आत्ताच ऐकून आलोय आणि ती पूर्ण
करण्याचं आश्वासनही देऊन आलोय."
बादशहा थरथरत म्हणाला, "काय होती ती मागणी?"
वजीर हसून म्हणाला, "हुजूर, त्यांची फक्त इतकीच तक्रार होती की पुलावर दोन्ही बाजूला एकेकच कर्मचारी आहे. तोच कर घेतो, तोच जोडे मारतो. त्यात खूप वेळ जातो. मोठ्या रांगेत खूप वेळ थांबावं लागतं. जोडे मारण्यासाठी दोन्ही टोकांना वेगळा कर्मचारी नेमला, तर आमचा खोळंबा होणार नाही."
-मुकेश माचकर Mukesh Machkar
उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये
उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील एका निवृत्त जवानाने बँकेतीन रोख रक्कम न मिळाल्याने आत्महत्या केली. केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवा बजावलेले राकेश चंद अनेकदा पैसे काढण्यासाठी बँकेत गेले. मात्र प्रत्येक वेळी त्यांना खाली हाताने माघारी परतावे लागले. त्यामुळेच त्रस्त झालेल्या राकेश चंद यांनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडली. राकेश चंद यांना उपचारांसाठी पैशांची गरज होती.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/retired-crpf-man-commit-suicide...
ए बि पी न्यूज या चॅनलने
ए बि पी न्यूज या चॅनलने देशभरातील ७५५ एटीएम्सच्या केलेल्या सर्वेत ७५५ पैकी केवळ ७७ एटीएम मध्ये कॅश होती.
ही ॲक्सिस , आय सी आय सी आय आणि एच डी एफ सी बँकेचे ए टी एम्स होती.
हे लोक युनायटेड स्टेट्स ऑफ कोथरूडमध्ये आले नसणार सर्वेला.
अ३, छान लिहिलंय माचकरांनी!
अ३, छान लिहिलंय माचकरांनी!
मुद्दामुन ती लोक ९ नंतर एटीएम
मुद्दामुन ती लोक ९ नंतर एटीएम तपासायला गेली. ६ ला जेव्हा "मॅनेजर" कॅश एटीएम मधे भरतो तेव्हा का चेक केले नाही. ???
अश्विनीमामी, उद्योगधंद्यांबाब
अश्विनीमामी,
उद्योगधंद्यांबाबत खरे तर वेगळा धागा आवश्यक आहे कारण एका मोठ्या कामगार समुहाची व्यथा त्यातून पुढे येईल.
'थोडीशी गैरसोय - मायबोलीकरांनी आपापले अनुभव सांगावेत' असे ह्या धाग्याचे नामकरण केले असते तर इथे चालू असलेले 'व्यक्तीगत ट्रोलिंग' 'कदाचित' झाले नसते.
इतरांच्या व्यथांच्या लिंक्स येथे डकवून, त्या इतरांसाठी काहीही न करून, तथाकथित इन्टेलेक्च्युअल प्रतिसाद देऊन, स्वतःचे पोट आनंदात भरणार्यांनी कदाचित काही वेगळे लिहिले असते.
हा प्रतिसाद किंग्डम ऑफ अड्डासाठी (उर्फ स्वयंघोषित सत्ताबाह्य आक्रमक बेट) नाही, तरीही त्यांचे प्रतिसाद स्वागतार्हच आहेत.
नवीन घर सजवायच काम चालू आहे.
नवीन घर सजवायच काम चालू आहे. पण प्रचंड उशीर होईल कारण रोख पैसे द्यावे लागतील. पण आठवड्यातून एकदाच 24 हजार काढू शकतो. चेक घ्यायला सरळसरळ नकार देतात. वर आम्ही दोघे वर्किंग असल्याने बॅंकेत 2_3 तास घालवणं सहज जमणार नाही. आपलेच कष्ट करून कमवलेले पैसे मिळवण्यासाठी किती मरमर करावी लागतेय.
'आपापले अनुभव' ह्या
'आपापले अनुभव' ह्या सदरात!
काल १३० रुपयांची कणिक आणि आज २०० रुपयांची भाजी पे टी एम वर घेतली.
घेताना ट्रॅन्झॅक्शन सरचार्ज, 'मोबाईल बटव्यात जमा केलेले चार हजार जातील की काय' ही भीती मी तरी गुंडाळून ठेवली.
चीन ने पुन्हा आपले इरादे साफ
चीन ने पुन्हा आपले इरादे साफ केले. भारताला एनएसजी म्धे प्रवेश नाही आणि मसुदला पाठींबा कायम आहे. म्हणे
आता भक्त लोक काय "पेटीएम" मोबाईल मधून काढून टाकणार का? दिवाळीत तर चायना माल बॅन करा म्हणून बेंबीच्या देठापासून बोलत होते. आता ? कि इथे ही "युटर्न?"
इतरांच्या व्यथांच्या लिंक्स
इतरांच्या व्यथांच्या लिंक्स येथे डकवून, त्या इतरांसाठी काहीही न करून, तथाकथित इन्टेलेक्च्युअल प्रतिसाद देऊन,
<<
इतरांसाठी काही केले नाही हे कोणत्या कर्णपिशाच्चाने तुमच्या कानात सांगितले?
मी तर अॅनॉन आहे. सातींनी स्वखर्चाने एका गावासाठी तयार केलेली शुद्धपाणीपुरवठा सिस्टीम, व त्यामुळे साथीच्या आजारांपासून त्या संपूर्ण गावाला मिळालेली मुक्ती याबद्दलची बातमी माबोवर तुम्हालाही मिळालेली आहेच. तेव्हा व्यक्तिगत आकसातून असे क्षूद्र मनोवृत्ती दाखवणारे प्रतिसाद लिहिलेच पाहिजेत का?
तुघलकी नोटबंदीमुळे अडचणीत असलेल्या पेशंट्ससाठी पदरमोड करून त्यांनी वा मी काय केले, हेदेखिल लिहिलेले आहेच. पुन्हा एकदा मी अॅनॉन आहे, सो त्याला अर्थ नको. पण सातींनी केलेल्या कामाबद्दल व्हेरिफिकेशन करता येईलच.
शिवाय, उच्चशिक्षित, विचारवंतांनी, इंटेलेक्चुअल प्रतिसाद द्यायचे नाहित, तर काय भक्त देतात तसे मंदबुद्धी प्रतिसाद द्यायला हवेत की काय?
स्वतःच्या व्यथा तर आमच्याकडून भरपूर सांगून झाल्यात. तरीही,
तुम्ही कारण नस्ता असले अभद्र प्रतिसाद लिहिता म्हणून उत्तरादाखल तुम्हाला व्यक्तिगत बोलले जाते. ज्याला तुम्ही ट्रॉलिंग म्हणता! हास्यास्पद!
सुधरा हो साहेब.
काका, कशाला लिहिताय तुम्ही
काका,
कशाला लिहिताय तुम्ही हे.
हे आगामी आकर्षण म्हणायला तयारच आहेत.
अश्विनीमामी, उद्योगधंद्यांबाब
अश्विनीमामी,
उद्योगधंद्यांबाबत खरे तर वेगळा धागा आवश्यक आहे कारण एका मोठ्या कामगार समुहाची व्यथा त्यातून पुढे येईल.
'थोडीशी गैरसोय - मायबोलीकरांनी आपापले अनुभव सांगावेत' असे ह्या धाग्याचे नामकरण केले असते तर इथे चालू असलेले 'व्यक्तीगत ट्रोलिंग' 'कदाचित' झाले नसते.
इतरांच्या व्यथांच्या लिंक्स येथे डकवून, त्या इतरांसाठी काहीही न करून, तथाकथित इन्टेलेक्च्युअल प्रतिसाद देऊन, स्वतःचे पोट आनंदात भरणार्यांनी कदाचित काही वेगळे लिहिले असते.
स्मित
हा प्रतिसाद किंग्डम ऑफ अड्डासाठी (उर्फ स्वयंघोषित सत्ताबाह्य आक्रमक बेट) नाही, तरीही त्यांचे प्रतिसाद स्वागतार्हच आहेत. स्मित
<<
पुन्हा एकदा,
विनासंदर्भ, विनाकारण, किंग्डम ऑफ अड्डा, सत्ताबाह्य, आक्रमक, स्वयंघोषित इ. शेलकी विशेषणे वापरून, "मुद्दाम उचकवणारे प्रतिसाद"चा नवा मासला शायरसाहेबांनी पेश केलाय. (आपल्या त्या ह्यांनी त्या तिथे सांगितलं ते सपशेल इग्नोर करून बर्का.)
एन्वे, इद मुबारक तुम्हाला! किंवा दुसर्या शब्दात हॅपी पैगंबर जयंती. अन पैगंबर पुण्यतिथीची सांत्वनादेखी सेम्टाईम.
झाडू, तुम्ही व्यक्तीशः खूप
झाडू,
तुम्ही व्यक्तीशः खूप चांगल्या स्वभावाचे आहात. हे माझे प्रामाणिक मत आहे.
पण तुम्ही इतरांनी केलेले जे काही सांगत आहात त्याचा नोटबंदीशी संबंध असला तर नक्कीच ह्या धाग्याशी संबंधीत आहे.
शिवाय,
>>>>अडचणीत असलेल्या पेशंट्ससाठी पदरमोड करून त्यांनी वा मी काय केले, हेदेखिल लिहिलेले आहेच. पुन्हा एकदा मी अॅनॉन आहे, सो त्याला अर्थ नको. पण सातींनी केलेल्या कामाबद्दल व्हेरिफिकेशन करता येईलच.<<<<
तुम्हाला त्यांनी धाडल्यासारखे का बोलत आहात? तुमचे तुम्ही सांगा की? आणि त्याचा ह्या नोटबंदीच्या धाग्याशी असलेला संबंधही अवश्य सांगा!
तुम्ही इतर माबोसदस्यांबाबत का बोलत आहात हे समजले नाही. 
बाकी पदरमोडीबाबतः - मी काही बोलणार नाही. मी असे काहीही करत नाही.
इतरांच्या व्यथांच्या लिंक्स
इतरांच्या व्यथांच्या लिंक्स येथे डकवून, त्या इतरांसाठी काहीही न करून, तथाकथित इन्टेलेक्च्युअल प्रतिसाद देऊन, स्वतःचे पोट आनंदात भरणार्यांनी कदाचित काही वेगळे लिहिले असते
<<
रच्याकने,
भक्त नसाल, तर स्वतःचे पोट आनंदात भरणे हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे! असे माझ्या नुकतेच लक्षात आले आहे.
की "तथाकथित इंटेलेक्चुअल प्रतिसाद" सोशल साईट्सवर देऊन स्वतःचे पोट आनंदात भर्ण्याची नवी सोय आपल्या सर्कारने केलेली आहे आजकाल?
श्या! गेल्या ३ दिवस प्रवासाने अन आल्यावरच्या कामाच्या बॅकलॉगने जरा हे रत्न सुटलंच होतं नजरेतून.
बेफि, तुम्ही ही मनाने अगदी
बेफि,
तुम्ही ही मनाने अगदी जेम ऑफ अ पर्सन आहात, असे म्हणतो. फक्त उचकवत जाऊ नका ब्वा. काये ना, सर्जन'स टेंपर उफाळून येतं मग.
शुभरात्री!
Pages