"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसंय ना,

मी इथे क्रिब मारणार्‍या 'एक दोन' आयडीज पैकी आहे.

खरे तर माझ्याकडे भरपूर ५००-१००० च्या नोटा होत्या, व त्यानंतरही सरकारकृपेने, (एक डॉक्टर म्हणून) जुन्या नोटा घेऊन त्या बँकेत भरणे हा प्रकार मला करावाच लागला आहे. (यातल्या "काळ्या" किती अन पांढर्‍या किती, तो हिशोब मागायला इन्कमटॅक्सवाले, अन हिशोब द्यायला माझा सीए, समर्थ आहेत.)

आता, हे करताना "मला" व्यक्तिशः काही त्रास झालाय का? असल्यास किती? कसा? अन जर व्यक्तीशः मला त्रास होत नसेल, तर इथे 'लोकांना त्रास होतोय' अशा पोस्टी मी का टाकतो आहे?

व्यक्तिशः मला या प्रकरणातून छटाकभरही त्रास झालेला नाही.

तसाच तो त्रास कोणत्याही भरपूर नोटावाल्यांना झालेला नाही.

कसा?

तर, उदा. माझे पैसे भरताना जर जुन्या नोटा असतील, मी एक लेटर "डिक्टेट" करतो, ज्यात माझे अकाउंटंट अमुक तमुक यांना मी हे पैसे माझ्या खात्यात भरण्यास मी मुखत्यार नेमले आहे, असे म्हटलेले असते, व त्यांनी खाली केलेली सही माझ्यासमोर केलेली आहे असे लिहिलेले असते. हे एकदा झाले की सेक्रेटरीला समजलेले असते, नेक्स्ट टाईम काय करायचे ते.

त्या पत्राखाली खाली माझी, अन त्याची सही असते.

सोबत माझ्या पॅनकार्डची झेरॉक्स, सेल्फ अटेस्टेड, ज्यावर नोटा कोणत्या किमतीच्या किती, ते लिहिलेले अस्ते, सोबत त्याच्या आधारची झेरॉक्स.

हे सगळं करून कागद प्रिंटरवर छापून माझ्या समोर येतात, मी सही करतो, पैसे बँकेत जमा होतात. कोण किती वेळ कोणत्या लायनीत राहतो, मला फरक पडत नाही, पैसे भरायला, मला लागलेला वेळ = सही करायला लागलेले १०-१२ सेकंद. +- डिक्टेशनचा अर्धा मिनिट.

मला कॅश हवी असली, तर हवी तितकी कॅश रोजच्या कलेक्शनमधूनच येते. बँकेतून काढायची वेळच येत नाही. आली, तरी लायनीत उभे राहून बँकेची कामे करायला मी गेल्या कित्येक वर्षांपासून नोकर नेमलेले आहेत. त्यांनी त्यांच्या लायनीतला वेळ वाचवण्यासाठी त्यांचे नेटवर्क उभे केलेले आहे.

***

तर मग मी इथे बोंबा का मारतो आहे?

शेतात काम करताना इन्सेक्ट बाईट : उर्फ कोणतं तरी किडं "उभरलं" व ते गावातल्या डॉक्टरकडून बरं झालं नाही म्हणून दवाखान्यात आलेली रोजंदारीवरची मजूर, जिला मालकाने ५००ची जुनी नोट अन १००ची एक फाटकी नोट देऊन पाठवलेलं असतं.

मी जुन्या नोटा घेऊन ट्रीटमेंट करणार असलो, तरी इतरत्र नव्याच हव्या असणार्‍या "कॉर्पोरेट" लॅब्ज, इमेजिंग सेंटर्स असतात.

नव्याच नोटा यासाठी, की त्यांच्या कार्ड पीओएसवर घासायला यांच्याकडे कार्ड नसते, अन चेक इज नो गुड. कुणीही फसवू शकते. माझ्या धंद्यात अनोळखी माणसाचा चेक कधीच घ्यायचा नसतो. (संपूर्ण अ‍ॅडव्हान्स घेतल्याशिवाय ऑपरेशनही करायचे नसते, हे मी फार पूर्वी शिकलोय. ऑपरेशन झाल्यानंतर पूर्ण पैसे देणारे फार कमी मूर्ख भेटतात. सगळे हुशार लोक माझे पैसे बुडवतातच, हा अनुभव आहे. मी मोदींच्या वतीने कॅशलेसची भलावण करायला नव्हे, तर "सुखाने पोट भरायला" <संदर्भः परममित्र बेफ्फी> दुकान टाकून बसलो आहे, हे कृपया ध्यानी घ्या.. अन पुण्यामुंबईच्या स्टोर्‍या मला सांगू नका.)

असे अनेकानेक किस्से आहेत. आपल्या परिघाबाहेरच्या अनेक लोकांशी माझा संबंध येत असल्याने कदाचित मला प्रश्नाची व्याप्ती अधिक तीव्रतेने दिसत असावी.

तीच व्याप्ती इथे मी मांडतो आहे.

गैरसोय थोडीशी नक्कीच नाहिये.

भारतातल्या प्रत्येक माणासाला, रोजचे कामं धंदे सोडून, स्वतःच्याच पैशासाठी हे उचकधंदे करावे लागणे यातच एक मोठा लोचा आहे.

इतक्याच जीपीएस चीपवाल्या, रेडिओअ‍ॅक्टिव इंकवाल्या नोटा होत्या, तर त्या सरळ चलनात आणून जिथे जमा झाल्या तिथे छापे मारता आलेच असते. इन्कम टॅक्स डीपार्टमेंट अधिक कार्यक्षम करता आलंच असतं. टॅक्सबुडव्या कॉर्पोरेट्सचा टॅक्स वसूल करता आलाच असता.

उलट ज्या खेड्यापाड्यातल्या गरीबांना अर्जंट मध्यरात्री बँक उपलब्ध नाही, त्यांनी अडीअडचणीला हात मोकळा असावा म्हणून कनवटीला लावून ठेवलेले पाच-पंधरा हजार बँकेत भरायला भाग पाडून, कॉर्पोरेट लोन्स राईट ऑफ करण्याचा गोरखधंदा यांनी केला.

विणकर, बांधकाम, अन असल्याच सेमिस्किल्ड अनेक व्यवसायिकांची वाट लावली. अहो, आयफोन बनवणार्‍या इंडिअयन सब्सिडिअरईनेही कॅशक्रंचमुळे नोकर हाकलून दिलेत.

ही सामान्य जनतेची गैरसोय नाही का?

किती ढोल पिटणार आहोत आपण?

असो. लांबतंय फार/

पुन्हापुन्हा भजनी पोस्ट येत राहतील तितक्या वेळा मी प्रतिवाद करीत राहीन.

धन्यवाद.

कराड अर्बन बॅंकेत
<<
इथे भरायला वेळ जास्त लागणारच नाही, कारण टोटल अकाउंट्स कमी आहेत.

आयसीआयमधून पैसे काढले म्हणता, जिथे कॅश भरली तिथून का पैसे काढले नाहीत?

आयसीआयसीआय सारख्या मोठ्या बँका त्यांच्याकडे ठेवी असणार्‍या लहान बँकांची गळचेपी करत आहेत असे इथेच आपण वाचले नाही काय?

कसंय ना, गाळून वाचली नाही तर पोस्टीतली "तथ्ये" उर्फ "गाळीव रत्ने" हाती लागत नाहीत. वरवर याला भरायला लय कमी वेळ लागला अन काढताना लय भारी पैकं भेटले इतकंच दिसतं!

बाकी सगळं भक्तिसंगीत.

प्लस,

>>
सुरुवातीलाच सांगतो की कुठलाही पक्षीय चष्मा न वापरता आणि व्यक्तिप्रेमात अथवा द्वेषात न बुडता एखाद्या घटनेचे किंवा निर्णयाचे आणि त्याच्या परिणामांचे स्वत्ंत्रपणे मूल्यमापन करण्याचे तारतम्य असलेला मी एक साधासुधा नागरिक आहे!
<<
हे असले डिस्क्लेमर फक्त व फक्त भक्त पोस्टीं आधी सापडतं. विरोधी पोस्ट लिहिणारा कुणीही हे असलं लिहीताना दिसला नाही, ना ही फक्तशिरोमणी बेफींनी अस्लं काही अभद्र लिहिलंय Wink

खुल्लं सांगावं ना भो, का हा माझा अण्भव आहे. आन लिव्तोय. पटत आसन तं पा. नैतं गेलं उडत! सोतालेच इत्की इशेश्नं काब्रं लावून र्‍हाय्ले?

सोतंत्र मूल्य्मापन? कराड अर्बण ब्यांक पैकं द्येईना का भो? थित्ल्या ज्या लोकाईचं अका उंटं आशाय्शाय मदे न्हाई त्यास्नी काय करवं बा?

जौद्या.

भक्तगण रिसरच करायलेत. काल्दिं उत्तरं येतीनच. भल्ती ग्वाड पोस्ट यील का कसं पाणी पुरीवालं २०००चं सुट्टं द्यायलंय, किंवा मदतनीस चेकनं पगार घ्यायलंय. नायतर बिगर लाईनवाल्या एटिएमचे फोटू. थितं पैकं हाईत-न्हाईत अलाहिदा! Wink

शुभ्रात्री.

२००० च्या नोटेचे सहजी सुट्टे मिळ्त नाहीत. १४०० ची खरेदी करुनही सुटे द्यायल नाही म्हणाला दुकानदार. बँकेतुन २००० च्याच नोटा मिळाल्या. कामाला येणार्यांचे पगार रोखीनेच द्यावे लागले. चेक भरायला वेळ नाही त्यांच्याकडे. पैसे डिपॉझीट करायला सुट्टी काढलीहोती कामाला येणार्या ताईंनी. नातेवाईकांकडे कार्य होते. त्यासाठी पैशांची जमवाजम्व करीत होतो सगळे मिळून. जिकडे तिकडे रांगा.

Lol मूळ ग्रामीणांची वर्जिनल आयकाय्ला आवडेल Wink

नकली आयडीज वाचवतही नाहीत, अन त्यांचा फुललेला पिसारा... आहाहा!! अश्शी गिरकी मारली, तर.... ऊफ्फ! क्या बात्तै! क्या नजा़रा!

पाऊस पडणारच्चै म्हणे, येत्या ४-२ दिवसात. मग पिसारा फुलवून अजून नाचतील मोर! =))

- डोळे अनिमिष उघडे ठेवून फुललेले पिसारे, इस्पेशली गिरक्या पाहणारा.. ( मीच )..

ता.क.

महोदय,
तुमच्या नादी लागून मी आयडि उडवून घेणार नाही. तुमचे/माझे भरपूर अवतार माबोने पाहिले आहेत. आता पुढे तुमची मर्जी. आय अ‍ॅम नॉट गोइंग टु प्ले.
बाय.

तुमचा ओरिजिनल आणि सात्विक आयडी म्हणून जर कुणी कुठे सत्कार करणार असतील तर कळवा प्लीज..
(बाय. आमच्याकडे रात्री झोपण्याची पद्धत आहे. मायबोलीवर येऊन चित्रविचित्र जांभई छाप विनोद प्रसवण्याची ही वेळ नव्हे )

झाडू,

हे वरचे प्रतिसाद म्हणजे विषयांतर नाही होत का?

============

काल सकाळी वीस रुपयांचे आले लिंबू, आवळा कढीपत्ता बीट इत्यादीचे ज्यूस पे टी एम वर घेतले.

नंतर दहा रुपयांचा चहा पे टी एम वर घेऊन प्यायला.

फोटो उपलब्ध आहेत.

हे वरचे प्रतिसाद म्हणजे विषयांतर नाही होत का?>>. त्यांच्याकडे राज्यघटनेची प्रत असल्याने त्यांना त्यातून सूट आहे..
( एक कुठला तरी सिनेमा पाहिला होता त्यात ठराविक वेळ झाली कि कादरखानला दिसत नसते. तसंच ठराविक वेळ झाली की काही आयडीजचे असंबद्ध प्रतिसाद येत असावेत )

भक्तिसंगीत तर भक्तिसंगीत.... रडगाणी गाण्यापेक्षा ते कधीही बरे!

अहो माझी चार-पाच बॅंकेत अकाउंटस आहेत.... कुठल्या बॅंकेत भरावेत आणि कुठल्या बॅंकेतुन काढावेत जेणेकरुन कमीत कमी श्रम पडतील आणि कमीतकमी गैरसोय होईल याचा विचार करण्याइतका व्यावहारिक शहाणपणा आहे माझ्याकडे!

बर आणि इतका स्पष्ट डिस्क्लेमर देउनसुद्धा शिक्के मारायची सवय जात नसेल तर काय बोलणार!
बसा फोडत खडे!

ज्या बँकेत भरले, तिथे मिळत नव्हते का? अजून कमी वेळ लागला असता! जुने भरणे, चेक तिथेच देणे, लग्गेच नवे पैसे हातात घेणे! बरोबर ना?

इतक्या सिंपल प्रश्णाचं उत्तर देता येत नाही का, स्वरूप? किती पांघरूणं घालणार आहात भक्तीवर?

व्यावहारिक शहाणपण नागपुराहून थेट आलंय का?

तिथुनही मिळाले असते की न मिळायला काय झालय?
पण कुठे भरायचे आणि कुठुन काढायचे हा माझा प्रश्न आहे ना?

मुर्खासारखे ATM च्या रांगेत न उभारता बॅंकेत गेलात तर मिळतात पैसे

असोच!
Get well soon Happy

मुर्खासारखे ATM च्या रांगेत न उभारता बॅंकेत गेलात तर मिळतात पैसे >> म्हणजे एटीएम च्या रांगेत उभारणारे सगळे मूर्ख आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? फडणवीस साहेब तर त्यांना देशभक्त म्हणतात...

मागच्या आठवड्यात आयसीआयसीआय पौड रोड शाखेत २ तास उभं राहूनही काउंटरला पोहोचल्यावर कॅश संपली म्हणून सांगण्यात आलं. दुसर्‍या दिवशी परत अडीच तास उभं राहिल्यावर मग २० हजार काढता आले.. घराशेजारचं एक एटीएम ९ नोव्हेंबर पासून उघडलंच नाही. एसबीआयच्या एटीएम ला रोज संध्याकाळी कमीत कमी ३० लोकांची रांग असते (आणि हे सगळं कोथरूडमधे). बँकेत बॅलन्स असून काय उपयोग? माझ्याच कष्टाचे, टॅक्स भरून मिळालेले पैसे माझ्याच अकाउंट मधून माझ्याच कामासाठी काढायला बंधनं आलीत. एखाद आठवड्याचा प्रश्न असता तर काहीच प्रॉब्लेम नव्हता पण आता एक महिना होउन गेला तेच चालू आहे आणि हे लवकर सुटायची चिन्ह नाहीत.. शिवाय भ्र्ष्टाचार काही कमी झालाच नाही उलट नोटा बदलून देण्यात अजूनच मोठे घोटाळे होतायत. एकातरी मंत्र्यानं/आमदारानं रांगेत उभं राहिलेलं पाहिलं का कोणी? सामान्य माणसाला लग्न कार्यासाठी अडीच लाख देताना दहा गोष्टी तपासून दिल्या पण रेड्डींनी, गडकरींनी कोट्यावधी रूपये सहज खर्च केले त्याबद्दल कोणी बोलत नाही इतरांना मात्र देशासाठी लग्नात खर्च कमी करा असा सल्ला दिला गेला. ल्ग्नात स्वतःचा (काळा/पांढरा पैसा) खर्च करायला माझी हरकत नाही पण इतरांना सल्ले देउ नयेत..

कॅशलेस होण्याबद्दल प्रॉब्लेम नाही कारण मी स्वतः प्लास्टीक मनी खूप वापरतो.. पण त्याच्या सक्तीबद्दल प्रॉब्लेम नक्कीच आहे. माझा पैसा मला कसाही वापरता आला पाहिजे.. कॅशलेस आणि कॅश शूड गो हँड इन हँड विथ पीपल डिसायडींग व्हॉट टू युज..

फक्त कॅशलेसचा डंका वाजविणार्‍यांनी, पुण्यात गेल्या शनिवारी आणि रविवारी रात्री बराच वेळ बरीचशी कार्ड स्वाइप मशीन्स, पेटीएम, मोबाइल बँकिंगच्या सेवा बंद पडल्या होत्या तेव्हा व्यापार्‍यांचे, गिर्‍हाइकांचे काय हाल झाले त्याचाही विचार करावा. चेन्नईच्या वादळानं पुण्यातल्या इंटरनेट सेवांना प्रॉब्लेम्स आले तर खुद्द चेन्नइमधे लोकांचे किती हाल झाले असतील तेही बघावं.. आपलं इंटरनेटचं पेनिट्रेशन किती, किती लोकांकडं कार्डस आहेत आणि बँकांचे सर्व्हर्स त्या कपॅसिटीचे आहेत का हे चेक केलं का डंका पिटायच्या आधी? मोबाइल वरून भाषण देतोय म्हणून तुम्ही मोबाइलवरून व्यवहार सहजगत्या करा असले सल्ले दिले जातात आज काल.. हास्यास्पद आहे सगळं.

मुर्खासारखे ATM च्या रांगेत न उभारता बॅंकेत गेलात तर मिळतात पैसे

साक्षात देशभक्तांचा अपमान !

Proud

कार्ड्वापरुन पैसे काढणारे मूर्ख !

रिक्षाचे पैसे जाळून अर्धा दिवस खाडा करुन ब्यान्केत जाउन पाच रुपये कॉस्टचा एक चेक घालवुन नोटा घेतल्य की तो शहाणा

आणि गप्पा मारायच्या मोदीने किती सुंदर कॅशलेस इकॉनॉमी आणली

अवांतर: ७००+ अन्रेड कामेंट्स वाचुन आत आलो तर अजुन तेच दळण? माबोचा हा धागा आता बिगबाॅस सिजन १० झालेला आहे. सत्ताधारी पक्शाचे समर्थक - सेलब्रेटि आणि विरोधक इंडियावाले. यात स्वामी ओम, प्रियांका जग्गा, मन्विर, बानी, लोपा वगैरे कोण हे स्पष्ट होत चाललेलं आहे... Lol

राज
तुम्ही इतक्या कमेण्ट्स वाचल्या यातच तुमच्या संयमाची ओळख पटते. माझ्याही सुरुवातीपासूनच्या कमेण्ट्स वाचा. सुरुवातीपासून रांगा आहेत, त्रास होतो हे मान्य करूनही निर्णय चांगला होता असे म्हटल्याबरोबर यांनी मला भक्तांच्या कंपूत ढकलले आहे. प्रॉब्लेम भक्तांचा नाही, कुठल्या न कुठल्या कंपूत ढकलणा-यांचा आहे. न्युट्रल, राईट लिबरल्स असे अनेक प्रकार असतात हे काहींच्या गावीच नसते.

त्यातून प्रतिवाद करता आला नाही कि मग कुणाचा तरी ड्युआय !!
आणि यांच्या त्या कंपूत म्हणे सगळे ओरिजिनल रूपात दर्शन देतात , तपस्या केलेल्यांना !!!

<७००+ अन्रेड कामेंट्स वाचुन आत आलो तर अजुन तेच दळण? >

नोटाबंदीच्या निर्णयाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाल्यानंतर परिस्थितीत किती फरक पडला, सरकारचं कसं नरेटिव्ह काळ्या पैशाकडून कॅशलेसकडे कसं वळलं, सामान्य किवा त्याखालच्या लोकांना स्वतःचाच पैसा वापरताना येणार्‍या अडचणी आणि बुडत असलेला रोजगार आणि दुसरीकडे इतक्या वेल प्लान्ड वेल कन्सीव्हड वेल थॉट ऑपरेशनमध्ये रोज येणार्‍या नव्या नियमावली (प्रोअ‍ॅक्टिव्ह डिसिजन मेकिंग, राइट?) तरीही नव्या नोटांची मोठी मोठी बंडलं बड्या धेंडांकडं सापडणं या सगळ्यावर एक दोन शब्द लिहिण्यापेक्षा जे बोलतात त्यांना रडगाणं म्हणणं नक्कीच सोपं आहे.

अर्थात दुसर्‍या कशाचीही अपेक्षा नाही.''बँकेच्या रांगेत मेलेले लोक काळापैसावाले होते'', ''ज्यांच्याकडे काळापैसा आहे त्यांची झोप उडालीय,'' असं केंद्रीय मंत्री आणि प्रधानसेवक म्हणत असताना त्यांच्या भक्तांच्या चिमुकल्या मेंदूकडून मुद्द्याला धरून काही लिहिलं जाईल अशी अपेक्षा कोण ठेवेल?

नोटबंदी आस्तिकांनी हा लेख वाचायची गरज नाही. वाचूनही काही फरक पडणार नाही. कारण त्यांच्यामते एका विशिष्ट आर्थिक/सामाजिक/शैक्षणिक पातळीखालचे लोक म्हणजे देश नाहीच. उलट ते ऐतखाऊ, फुकटे, भिकारडे, इ.इ.

http://scroll.in/article/822402/demonetisation-is-a-permanent-transfer-o...

नोटबंदी मुळे उपाय सुचवा असे म्हतल्यावरही भक्त असल्याचा संशय घेण्याची मानसिकता किंवा मग ड्युआय ठरवण्याची मानसिकता ज्यांच्या ठायी त्यांना कष्ट होईल असे न लिहीण्याचे काही नियम असावेत जेणेकरून ते वाचूनच इतरांनी आपल्या पोस्टी सज्ज कराव्यात.

तुम्हाला स्वतःला लॉजिकल, स्वतंत्र आहोत असे ठरवायचे असेल तर त्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. ते एका ठिकाणी मिळते. त्यांचे काटेकोर निकष तुम्हाला पाळावे लागतात.

१. चांगले अनुभव लिहू नयेत.
२. त्रास होतो असं वाटत नसल्यास आपण भक्त आहात.
३. त्रास होतो असे वाटते पण निर्णय चांगला आहे असेही वाटते तरी देखील भक्त आहात.
४. उपाय सुचवताना कार्ड रीडर मोफत पुरवायला हवे (स्वाईपिंग मशीन) अशी सूचना केल्यानंतर एखादा सदस्य नकली ग्रामीण भाषेत ट्रॅण्झॅक्शन वर चार्जेस किती याचे बौद्धिक घेऊ लागला की तुझेच असे म्हणावेत. कुठून दुर्बुद्धी झाली आणि लिहीले असे काही म्हणू नये. नाजूक भावना दुखावल्या जातील .
५. गेल्या महिन्याभरातील सूचनांचा विचार करून युपीए एप्लीकेशन संपूर्ण मोफत दिलेले आहे, त्याबद्दल अवाक्षरही लिहू नये नाहीतर तुम्ही भक्त.
६. तुम्हाला अंमलबजावणी चुकलीय हे ही मान्य आहे , त्रास होतो हे ही मान्य आहे आणि तसे तुम्ही प्रत्येक वेळी लिहीतही आहात तरी पण मोदीजींच्या इतर निर्णयाबद्दल चांगले लिहीले कि तुमचे आधीचे पुण्य शून्य होते आणि तुम्ही भक्त ठरता.
७. बरं निर्णयही चुकलाय हे तुम्ही एकदा या बाजूने विचार करून लिहीले आणि पुन्हा दुस-या बाजूने इथून पुढे निर्णयाचे फायदे होतील असेही लिहीले तर तुम्ही तळ्यात मळ्यात ठरता. तुम्हाला एका कंपूत जाणे मस्ट आहे. नाहीतर मग तुम्ही नापास !
८. या काळात तुमच्यावर धावून येणा-या सदस्याला निरुत्तर करू नये. जर जुने असाल तर तुम्हाला ट्रंपची उदाहरणे दिली जातील् . नवे असाल तर मग तुम्ही कुणाचे तरी ड्युआय असल्याचे प्रमाणपत्र मिळेल. त्यासाठी तुमच्यामागे इंटरपोल, सीबीआय, आयएसआय, केजीबी लावून देण्यात येईल. त्यांचे अहवाल नकारार्थी येण्याआधीच तुम्ही कुणाचे ड्युआय हे अ‍ॅडमिनला ही नवीन असलेले संशोधन इथे देण्यात येईल.

सध्या तरी एव्हढे नियम जनहितार्थ देण्यात येत आहेत. आठवलेच तर आणखी देईनच.

( आणि एक महत्वाचे राहीलेच की
प्रमाणपत्र समैतीमधे काही पुरूष सदस्य असे आहेत की स्त्रियांकडून त्यांचा कुठेही विनयभंग होत असतो. त्यांच्या लेडीकिलर व्यक्तीमत्वामुळे ते स्विमिंग पूलवर गेले की टॉवेल सरकतात. त्यामुळे (ख-या / खोट्या) स्त्री सदस्यांनी आपण विनयाभंग तर करत नाहीत ना याची खात्री आधी करून घ्यावी.

आणखी एक राहीले.
खोट्या स्त्रियाही लाडात येणार नाहीत इतके सातजन्माचे लाडात येणे अंगी असणा-यांबद्दल नो कमेण्ट्स . आता कंस पूर्ण करते :हाहा:)

हे दोन भक्त! एक ज्युसविक्रेता आणि एक चहाविक्रेता! फोटो घेऊ द्यायला आणि प्रकाशित करायला ह्यांनी परवानगी तर दिली नाही ती नाहीच वर पे टी एम सुविधा ठेवून व्यवसाय सुरळीत चालवत आहेत आणि सरकारच्या भीषण अमानवी निर्णयाचे समर्थनही करत आहेत. ज्यूसविक्रेत्यानेतर आणखीही कसलीतरी पाटी लावून ठेवलीय ज्यावर बँक डिटेल्सपण आहेत. म्हणजे बहुधा आणखी एका मार्गाने व्यवसाय सुरळीत ठेवण्याचा त्याचा कपटी हेतू असणार. हे दोघेही युनायटेड स्टेट्स ऑफ कोथरुड येथे आपापला व्यवसाय चालवतात. त्यामुळे इतरत्र स्थित असलेल्या कोट्यावधी व्यावसायिकांनी ह्यांचे अजिबात अनुकरण करू नये. साम्राज्यातून फतवा निघेल तसेच वागावे. आमच्याकडे मागासलेला फोन असल्यामुळे त्याचा कॅमेरा खास नाही. त्यामुळे फोटो नीट दिसतील ह्याची खात्री नाही. तेव्हा हे फोटो मॉर्फ्ड असल्याचा संभाव्य आरोप आम्ही आधीच मान्य करून टाकत आहोत.

Juicemaker.jpgTeamaker.jpg

Consider this: according to data in March 2015, India’s 10 most indebted corporate groups were holding Rs 7.3 lakh crores in bank debt. A drop in interest rates by a single percentage point would benefit these 10 companies with Rs 7,300 crores this year alone. If this just seems like good luck, consider that this benefit is occurring purely because crores of people cannot access their own money. Banks and corporates are effectively utilising that money rather than its owners.

सायना नेहवाल ला एका मोबाईलचा फोटो तिच्या ट्विटरवर टाकला तर तिला देशद्रोही, चीनचा मोबाईलची जाहीरात करते म्हणून हिणवले गेले. तर

इथे भक्त लोक चीनची भागीदारी असणार्‍या "पेटीएम" ची जाहीरात जागोजागी करत फिरत आहे त्यांना काय म्हणायचे? "भारतात न्मलेले पाकिस्तानी" असे म्हणावे का?

उठसूट कुणालाही देशद्रोही ठरवण्यात येत असेल तर प्रतियुत्तर म्हणून बोलावे लागेल.

कहर आहेत लोक

लेटेस्ट मेसेज आलाय. साती हरिनामे डॉट जेपीजी नावाची अ‍ॅटॅचमेंट आहे Rofl

sati hariname.jpg

यांनी एकदा नक्की करावं की माबोट्रंप आहे कि असंबा आहे कि यांना फोन करत होते ते Lol
कदाचित यांचेच इतके ड्युआय असल्याने एकाला मांडीवर घेतलं की दुसरा फोन करत असावा रडून रडून Lol
बायदवे
मला अति लाडात बोललेलं मुळीच आवडत नाही. आता कुणी बोलू लागलंच तर तोंडावर सांगत जाईन कि डोण्ट कम इन लाड.

शुभरात्री (अमेरिकन वेळेनुसार)
गुड डे ( पुणेरी वेळेनुसार)
भेटू सकाळी / संध्याकाळी टाईमझोननुसार . एकदा मी कोण हे तुमचं ठरलं म्हणजे माझाही गोंधळ कमी होईल.

Pages