"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संध्याकाळी ७ च्या सुमारास station ते घर चालत येताना जांभळी नाका ते टेंभीनाका दरम्यनच्या सिंडिकेट बॅंक आणि SBI ह्या चालू atm बाहेर प्रत्येकी अंदाजे ८-१० लोकाची लाईन होती. मी स्वत: बघितल्यामुळे ही ऐकीव बातमी नाही. मी अधूनमधून atm मधून पैसे काढून ठेवतेय त्यामुळे माझ्याकडे पुरेशी रोकड आहे. ऑफिसमधल्या sbi आणि icici bank च्या दोन्ही atm मध्ये नोटा असतात. लाईन नसतेच. सरळ जावून पैसे काढून ५ मिनिटात Deptt मध्ये परत जाता येतंय.

अश्विनी ताई,
कोणत्या नोटा मिळत आहेत ते सांगाल का? केवळ 2000 च्या नोटा देणारी 1-2 atms मी आजच सोडली (तिकडे 4-5 जणांची /नो लाईन स्थिती होती)

सिंडिकेट बॅंकेत ५०० च्या येत होत्या. sbi च रस्ता क्रॉस करून असल्याने तिथलं माहित नाही. ऑफिसमधली atm 2000 च्या नोटा देतायत. तिथे एकदाही ५००/१०० आले नाहित. बांद्रा पूर्वेच्या govt. Colony जवळच्या Yes bank atm मध्ये एकदा सगळ्या १०० च्या नोटा मिळाल्या होत्या. माटुंग्याच्या सिंडिकेट बॅंक ब्रांचमध्ये साबांना १०० रुपयांचं बंडल आणि १० रुपयांची बंडलं miLaaली.

मी शाकाहारी आहे. पण काल मला ओळखणाऱ्या एका कोळीणीने आपणहूनअला vichआरलं की शंभरच्या noटा हव्यात का? मी माझ्याकडल्या ५०० च्या दोन नोटा देवून सुट्टे घेतले. तिच्याकडे १०००० रुपये सुट्टे होते. आमच्या कॅंटीनचा कॅशियर, घराजवळचा वाणी सुट्टे देतोय. मी बरेचसे व्यवहार कॅशलेस करतेय. पण ज्या काही 2 हजारच्या नोटा घेतल्या होत्या त्या मार्केटात किंवा कॅंटीनमध्ये, वाण्याकडे अल्प खरेदितही लगेच सुट्या करून मिळाल्या.

[कॅशलेस इंडियासाठी अर्थमंत्र्यांकडून 11 मोठ्या घोषणा

1) पेट्रोल-डिझेलचं बिल ऑनलाईन भरल्यास (एटीएम/डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी) 0.75 टक्क्यांची सूट मिळणार
100 रु वर 75 पैश्याची सूट, माझ्या झिंग मध्ये 300 रु चे पेट्रोल बसते, त्यावर 2.25 रु ची भारी बचत, अरे काय incentive आहे का चेष्टा??

2) 10 हजार लोकसंख्या असलेल्या 1 लाख गावांना ऑनलाईन व्यवहारांसाठी प्रत्येक 2 स्वाईप मशिन्स मोफत दिल्या जाणार
हि 2 स्वाइप मशीन कुठे बसवणार? आणि त्यावर नेमके कसले व्यवहार होणार या बद्दल च्या माहितीच्या प्रतीक्षेत.

3) नाबार्डच्या माध्यमातून 4.32 कोटी शेतकऱ्यांना रुपे कार्ड देणार. सगळे व्यवहार कार्डवरुन करण्याची मुभा असेल.
आजच्या लोकसत्त्याच्या बातमी नुसार नसिपी ने दिलेली 31 कोटी पैकी11.5 कोटी रूपे कार्ड अजूनही वापरात आली नाही आहेत. अशा परिस्थितीत अजून कार्ड वाटणे हा उपाय कसा ठरू शकतो? शेतकरी सगळ्या ठिकाणी कार्ड वापरू शकतात का? मजुरी, हमाली, वाहतूक etc

4) उपनगरी रेल्वेचे मासिक पास आणि सिझनल तिकिटाची डिजिटल खरेदी केल्यास 0.5 टक्के सूट मिळेल. मुंबईतून 1 जानेवारीपासून सुरुवात होईल.
100 रु वर 50 पैसे सूट, लोकल चा 3 महिन्याचा पास साधारण 1000 च्या आसपास धरला तरी 5 रु ची सूट, incentive आहे का भीक?

5) सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचं तिकीट ऑनलाईन बुक केल्यास 5 टक्के सूट, तसेच 10 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेल. कॅश पेमेंट करणाऱ्यांना विम्याची सुविधा मिळणार नाही.
एकीकडे, तिकीटवरची सबसिडी सोडा म्हणून मागणी (हि सर्व वर्गाला,)आणि दुसरीकडे फक्त सुपरफास्ट गाड्यांचे online तिकीट घेणाऱ्या वर्गाला सवलती... बोहोत ना इंनसाफि है,

6) रेल्वे कॅटरिंग, अकोमोडेशन आणि रिटायरिंग रुम यांसारख्या सुविधांसाठी डिजिटल माध्यमातून पेमेंट केल्यास 5 टक्के सूट मिळेल.
यांच्या किमती माहित नाहीत , म्हणून नो कॉमेंट.

7) सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या पोर्टलवरुन जनरल इन्शुरन्स ऑनलाईन घेतल्यास 10 टक्के, तर लाईफ इन्शुरन्स ऑनलाईन घेतल्यास 8 टक्के सूट मिळेल. नव्याने विमा काढणाऱ्यांसाठीच सूट मिळणार आहे.
माझ्या मते सगळ्या विमा कंपन्या चेक ने पेमेंट घेतात. चेक पेमेंट कॅशलेस नाही का?त्यांना सूट का नाही?
जुन्या विम्याचे आताचे हफ्ते ऑनलाइन भरले तर त्याला सूट का नाही?

8) क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरुन 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर सर्व्हिस चार्ज लागणार नाही.
चांगला निर्णय, मात्र कधी पर्यंत लागणार नाही याचे स्पष्टीकरण द्यावे. कायमचा काढून टाकलाय का टॅक्स?मग 10k ची खरेदी 5 ट्रांझाक्शन मध्ये दाखवली तर कसे?

9) राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवर जर डिजिटल पेमेंट केलं, तर 10 टक्क्यांची सवलत मिळेल.
I hope digital payment म्हणजे क्रेडिट/डेबिट कार्ड वापरणे नसावे. तसे असेल तर पर गाडी ट्रांझाक्शन टाइम प्रचंड वाढेल.आणि ट्राफिक जाम होईल.
E टॅग असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण या टॅग चा वापर freqent ट्रॅव्हलर करतील, adhoc ट्रॅव्हलर वापर करणार नाहीत.

10) सरकारी कार्यालयातील कर किंवा अन्य रक्कम भरताना कोणत्याही प्रकरणाचा ट्रान्झॅक्शन चार्ज लागणार नाही.
सर्विस चार्ज लागेल का?उल्लेख नाही, पण नसावा अशी आशा,
चांगले पाऊल

11) डिजिटल पेमेंटचा कोणताही अतिरिक्त भार ग्राहकांवर पडू न देणार नाही. शिवाय, व्यवहारासाठी डिजिटल साधनं वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना महिन्याला 100 रुपयांहून अधिकची रक्कम मोजावी लागणार नाही.
हे प्रॉमिस सरकार कार्ड कंपनी च्या वतीने देत आहे का? व्यापाऱ्यांकडून टक्केवारी घेऊन त्या कंपन्या आपले दुकान चालवत आहेत, त्यांनी आपला धंदा बंद का करावा?

सरकारने जाहीर केलेल्या मुद्द्यांबद्दल कोणाला जास्त माहिती असेल तर्म्स अँड कंडिशन बद्दल तर कृपया इकडे द्यावी.

..

आमच्या कडेही अगदी एक किमी नाही तरी शंभरेक लोक असतील एव्हढ्या मोठ्या रांगा आहेत. आनंदनगरपासून ते धायरीफाट्यापर्यंत रांगा आहेत. एक दोन एटीम बाहेर काल आठलाच पैसे नाहीत म्हणून बोर्ड लावले आहेत. आमच्या इथे एटीम आहेत ती दोन आठवडे बंदच आहेत. जेवण झाल्यानंतर दोघे पायी पायी गिरीनगरपर्यंत गेलो. तिथे रस्त्यात अ‍ॅक्सिज बँकेच्या एटीम मधे पैसे काढता आले. पण दोन हजारच्या नोटा आहेत.

शंभरेक लोक असतील एव्हढ्या मोठ्या रांगा आहेत. > एका व्यक्तीला एटीएम मधुन पैसे काढायला साधारण अडीच मिनिटे लागतात. त्या १०० व्य क्रमांकावर असलेल्या व्यक्तीने २५० मिनिटे आपली कार्यक्षमता वाया घालवावी ? का?

बेफिकिर वृत्तांत...

आज काजूबाडा , भागलपाडा , ढेक्युणगाव इ आदिवासी पाड्यातून फिरलो.. सर्वत्र रोजचेच आनंदी वातावरण होते.. लोक खात पीत चरत गात बागडत व नाचत होते.

मी विचारलं ... काय हालहवाल ? कसाबच्या गोळीबाराचा काही इफेक्ट ?

तॉ बोल्ला ... कोण कसाब ?

आणि टीव्हीवाले कसाबमुळे कसे दहशतीचे वातावरण पसरलेय याचे वार्तांकन करत होते.
मूर्ख कुठले .... लोकांच्या जीवनावर कसाबचा कोणताच इफेक्ट नव्हता. काही मूर्ख लोक मात्र हे देशावर दहशती आक्रमण आहे अशा कंड्या पिकवण्यात मग्न होते.

इति वार्ता:

शंभरेक लोक असतील एव्हढ्या मोठ्या रांगा आहेत. > एका व्यक्तीला एटीएम मधुन पैसे काढायला साधारण अडीच मिनिटे लागतात. त्या १०० व्य क्रमांकावर असलेल्या व्यक्तीने २५० मिनिटे आपली कार्यक्षमता वाया घालवावी ? का? >>>

१. मी लिहीलेले खोटे असेल असे तुम्हाला म्हणायचे असेल तर ते मी आधीच मान्य करते.
२. असे म्हणायचे नसेल तर रांगेत का उभे रहायचे हे त्याला विचारून कळवा किंवा लोकांना समजून सांगा.

आज हॉटेलवाल्याने पेटीएमचा स्टीकर फाडून टाकला. वर सरकारची लायकी सुध्दा काढली. एक तर लोकांचे पैसे त्याच्या खात्यात नीट येत नव्हते. रोज रोज १० पैकी ३-४ जणांबरोबर त्यावरून वाद चालू. वर छूपे टॅक्स मुळे उगाच त्याच्या खिशातून पैसे जाऊ लागले होते. बँकेत पैसे गेल्यामुळे त्याच्याकडे इतर सामान खरेदीसाठी पैसाच उपलब्ध होत नव्हता.
कसला थर्डक्लास निर्णय आणि त्याची अंमलबजावणी आहे. म्हणत पेटीएमवाल्याला शिव्या देऊन हकलून लावले.

नमो नमो.

ज्यांना अजुनही नोटांची गरज आहे त्यांच्याकरिता एक आनंदाची बातमी

http://www.loksatta.com/pune-news/open-account-in-post-office-deposit-ol...

खाते उघडा, जुन्या नोटा भरा आणि लगेच २४ हजार काढा!

बँकेत पैसे आहेत, पण मिळत नाहीत, अशी काहीशी अवस्था सध्या सर्वत्र आहे. एटीएम समोरील रांगा कमी होण्याची चिन्हे नाहीत. बँकेतूनही नागरिकांना पुरेशी रक्कम मिळत नाही. या सर्व गडबडीत टपाल खात्याने मात्र अनेक नागरिकांना दिलासा दिला आहे. आजही टपाल कार्यालयात जाऊन खाते उघडले आणि त्यात जुन्या नोटांद्वारे रकमेचा भरणा केल्यास खातेदाराला त्याच दिवशी लगेचच २४ हजार रुपये काढता येतात. अगदी २५ हजारांचा भरणा करूनही २४ हजार रुपये काढता येऊ शकतात.

ज्यांना कॅशलेस व्यवहार करायचे आहेत अशांना मात्र सावधगिरीची सूचना देणारी ही दुसरी बातमी

http://www.loksatta.com/pune-news/pune-cyber-cell-arrests-three-for-sbi-...

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बनावट क्रेडिट कार्डद्वारे एक कोटी एकेचाळीस लाखांचा गंडा

पोस्ट ऑफिसांकडे नोटा आहेत आणि बँकांकडे तेवढ्या नाहीत , हे कसं?
खात्यातली रक्कम काढण्यावर २४००० ची मर्यादा आहे. पण जुन्या नोटा जमा करून दुसर्‍या नोटांच्या रुपात काढण्यावर मर्यादा नाही. पण मुळात बँकांकडे आणि व्यवस्थेत तेवढ्या नोटा आहेत का? प्रत्येक बँक स्वतःची अशी मर्यादा ठरवून देतेय.

साती,

फार वाईट वाटलं त्या मुलाबद्दल.
काल सुप्रीम कोर्टात पिटीशन सादर झाले होते. निर्णय काय झाला ते कळले नाही.
आता परत नोटा रिवाईव्ह करायची ऑर्डर निघाली, तरी गोंधळ होणार आहे.

मी बरेचसे व्यवहार कॅशलेस करतेय. पण ज्या काही 2 हजारच्या नोटा घेतल्या होत्या त्या मार्केटात किंवा कॅंटीनमध्ये, वाण्याकडे अल्प खरेदितही लगेच सुट्या करून मिळाल्या.
--- रिक्षावाला - दुकानदार आणि भाजीवाला तिघांनी १०० -१०० सुट्टे दिले २००० चे गेल्या १५ दिवसात. शक्य तिथे कॅशलेस

प्रत्येक बँक स्वत:चा नविन नियम काढत आहे. सगळा फालतूपणा चालू आहे.

एसबीआय ने वेगळा फॉर्म काढला आहे त्यात तुम्हाला पॅनकार्ड नंबर लिहून किती पैसे भरायचे कसे भरायचे ते लिहायचे आहे. आधारकार्ड झेरोक्स लावायची गरज नाही. व्हेरिफिकेशन ची सुध्दा गरज नाही

देना बँकेत कुठला ही वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही फक्त एक आधारकार्डची झेरोक्स जोडून स्लीप भरायची. सोबत वरिष्ठ अधिकार्‍याची सही घ्यावी लागत आहे.

एचडीएफसी बँक मधे स्लीप भरायची आहे सोबत पॅनकार्ड, आधारकार्ड दोन्ही झेरोक्स जोडायचे आहे. सोबत २ फॉर्म जोडायचे आहे. एकात तुमचे नाव खातेक्रमांक वगैरे लिहायचे आहे तर दुसर्‍या फॉर्म मधे खाते नंबर बरोबर किती रक्कम भरत आहात? १००० कि ५००? का भरत आहात? तुमचा बिझनेस काय आहे? इ भरायचे आहे.

अ‍ॅक्सेस बँक मधे एका ब्रांच मधे स्लीप भरून घेत आहे तर दुसर्‍या ब्रांच मधे आधार कार्ड दाखवून भरावे लागत आहे.

----

तळटीप खास हुशार लोकांसाठी :- "स्वतःच्या खात्यात पैसे भरणे" या प्रक्रियेवर आहे.

सरकारने सगळा वेड्याचा बाजार भरवला आहे.

>>>> anilchembur | 10 December, 2016 - 10:47 नवीन

बेफिकिर वृत्तांत...<<<<

ह्यापेक्षा अधिक गचाळ, हिणकस आणि संस्कार्प्रदर्शक पातळी लवकरच गाठाल ह्याची खात्री आहे.

अवांतर - नानबा नावाचे भक्त खोटे बोलत आहेत ह्यात शंका नाही.

गैरसोय होणारे रस्त्यावर उतरून निषेध करत नाहीत ह्याचा अचंबा वाटतो. इतकी संयमी आणि क्षमाशील माणसे आहेत म्हणूनच बहुधा परकीय आक्रमणे यशस्वी झाली. Wink

कमाल आहे बुवा एका "घाबरलेल्या माणसाची"

प्रचंड बहुमत असुन सुध्दा "मला संसदेत बोलू देत नाही" असे रडगाणे गात असेल तर कठीण आहे.
संसदेत बोलण्याकरीता आधी संसदेत जावे लागते याची माहीती कोणीतरी घाबरलेल्या माणसाला द्या. की याला डिजिटली "स्काईप, व्हॉट्सअप" वर व्हिडीओ कॉलिंग करून संसदेत बोलायचे आहे?

दिनेशदा,

१. नोटबंदी करताना डोकं जाग्यावर होतं का?
२. जनतेने आपले स्वतःचे किती पैसे स्वतःच्या खात्यातून काढावेत यावर RBI आणि सरकार बंधन घालू शकते का?
३.नागरिकाला आपापला कायदेशीर कामधंदा करण्यास या नोटबंदीने विरोध केला का?
४. किती पैसा परत येईल आणि तो पुन्हा प्रिंट कसा करणार याचा काही विचार केला होता का?
५. हे सगळं करताना काही सुनिश्चित विचार यापाठी होता की आपलं झटक्यात घेतला निर्णय?

वरचे प्रश्न काही कुणी फुटकळाने आपल्या ब्लॉगवर नाहीतर वॉलवर लिहिलेले नाहीत बरं!

माननीय सर्वोच्च न्यायालयाने विचारलेत हे प्रश्न मोदी सरकारला !

यांची उत्तरे देताना सरकारचे वकिल मुकुल रोहतगींची तंतरली म्हणे!

'लहान मुलांना दात येताना त्रास होतो ना, तसा थोडासा त्रास आहे हा सुरूवातीला. आता फक्त १०-१५ दिवस अधिक चालेल.'
रोहतगी साहेब म्हणाले.
मात्र सरकारने १० ते११ लक्ष कोटी रूपये परत येतील असा अंदाज बांधला होता मात्र आत्ताच जवळपास १२ लक्ष कोटी परत आलेत असे म्हणाले ते.

कोर्टाने डिस्ट्रीक्ट को ऑप बँकात पैसे भरायला तरी परवानगी द्या म्हणाल्यावर 'आता बँकांचं कामकाज कसं चालवावं हे कोर्ट ठरवणार का' असा उलटाच प्रश्न रोहतगीनी विचारला.
वर पुन्हा या सूचनेचा विचार करू असेही म्हणाले.
पुढिल सुनावणी १४ डिसेंबर!

मजा मजा चाललीय सगळी.
मागच्या आणिबाणित आम्ही जन्मलो नव्हतो त्याची कसर हे नवे लोकप्रिय सरकार भरून देत आहे.

Happy

मला इतक्यात खालील मेल प्राप्त झालेली आहे.

sati4.jpg

मी पूर्वीपासून अशा कमेण्ट्सकडे दुर्लक्ष करत आलेले आहे. हे लिखाण कुठे आहे याबद्दल कल्पना नाही. अड्डा वगैरे काही कल्पना नाही. सुरूवातीला मी अमेरिकन संपन्न बायका म्हणून माझ्यामागे सीबीआय, अस्मिता, रॉ अशी खाती लागली होती. अतिशय अपमानकारक भाषेत माझ्याशी संवाद केले गेले. या सर्व प्रकारांकडे मी दुर्लक्ष करत आले आहे.

मला तक्रारी करायची सवय नाही याचा अर्थ बेताल वागून स्वतःच ढोलके वाजवावे असा होत नाही. असो.

देशात दंगे भडकावे म्हणून भक्त आणि त्यांचे हुकुमशाह प्रयत्न करत आहे. असे वाटू लागले आहे. शांत असलेल्या जनतेला सतत "तुम्ही दंगा का करत नाही" असे टोचण देऊन उचकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशा भक्तांनी लाईनीत २ तास उभे राहिलेल्य जनतेला जाऊन प्रत्यक्ष विचारावे. चेहर्‍यावर काँग्रेसचे चिन्ह छापले जाईल याची गॅरंटी भक्ताला मी इथे बसून देतो.

आहे का हिंमत ?

वर काही मजेशीर प्रतिसाद आलेले आहेत. नोटाबंदी करायला नको होती असे कोणाकोणाचे म्हणणे आहे? त्यांना लगेच सगळे देशद्रोही म्हणतील असा खोटा प्रचार करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदीचा निर्णय मागे घ्यायला सांगावा, शक्य असेल तर! Happy

नरेंद्र मोदीचे भाषण दिवसेंदिवस अत्यंत हास्यास्पद होऊ लागले आहे. आता भाषणाला उभे राहिले की त्यांचा आवेश बघून "स्टँडअप कॉमेडियन" वाटू लागतात. व्हॉट्सअप वरचे विनोद, खोट्या बातम्या, हास्यास्पद दावे इ. केविलवाणे मुद्दे घेऊन स्वतःची पाठ थोपटून घेऊ लागतात.
आजच्या भाषणात तर हद्दच केली. "१००-५० च्या नोटांना ८ नोव्हे, पुर्वी कोणी विचारत होते का ? त्यांना काही किंमत होती का? आज त्यांची ताकद वाढवण्याचे काम "मी" केले"
काय हे. काय हा मुद्दा. याच्या पेक्षा चांगले विनोद तर कपिल शर्मा मधला अधून मधून येणारा साईड कॉमेडीयन सुध्दा करतो. ती ही स्क्रिप्ट असते आणि हा वाचतो ते ही स्क्रिप्ट आहे. तरी चांगले लिहिता येऊ नये ?

एका बाजुला ४८ खासदार पाठीशी असणारा संसदेत येणारा म्हणतोय "मला संसदेत बोलू दिले जात नाही" हे पटण्यासारखे आहे ५४५ पैकी अवघे ४८ खासदारच बरोबर आहे.

आणि दुसर्‍या बाजूला २८२ खासदार पाठीशी असणारा, सर्वोच्च पदावर बसलेला ५६ इंची छाती असणारा पण संसदेत न येणारा म्हणतोय "मला संसदेत बोलू दिले जात नाही"

मोदीच्या बोलण्यावर जनतेबरोबर भाजपाचे नेते सुध्दा हसुन हसुन वेडे झाले असतील. अरे बिनडोकपणाला सुध्दा काही ताळतंत्र असतो. कोणी समजवा या "घाबरलेल्या माणसाला"

aper |  शनिवार, डिसेंबर 10, 2016


बॅंकेतील 44 बनावट खात्यात आढळले 100 कोटी
वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- येथील चांदनी चौकामध्ये असलेल्या एक्सिस बॅंकेवर आयकर विभागाने आजा (शुक्रवार) छापा घातला. छाप्यादरम्यान 44 बनावट खात्यांमध्ये तब्बल 100 कोटी रुपये आढळले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

नवी दिल्ली- येथील चांदनी चौकामध्ये असलेल्या एक्सिस बॅंकेवर आयकर विभागाने आजा (शुक्रवार) छापा घातला. छाप्यादरम्यान 44 बनावट खात्यांमध्ये तब्बल 100 कोटी रुपये आढळले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली. यानंतर या खात्यांमध्ये 100 कोटी रुपये जमा झाले आहेत. केवायसीची सक्ती असतानाही हा नियम पाळण्यात आलेला नाही. बनावट कागदपत्रे वापरुन ही बनावट खाती तयार करण्यात आली होती.

http://beta1.esakal.com/desh/axis-bank-over-rs-100-crore-found-44-suspec...

साती, हेच मुद्दे तर आपण पहिल्या आठवड्यापासून मांडतोय. सुप्रीम कोर्टाची काहिही ऑर्डर निघाली तर ती
सरकारवर बंधनकारक राहीलच.. पण हा त्रास काहि खोडता येणार नाही.. अजूनही सरकारने आपल्या अडचणी
खुलेपणाने जनतेसमोर मांडल्या... तर निदान शेपूट तरी वाचेल !

कुणी याची आकडेवारी कुठे वाचली का ?

१) नेमक्या किती बनावट नोटा पकडण्यात आल्या / सापडल्या ?
२) हे सर्व जितक्या तातडीने केले, तेवढ्या तातडीची गरज होती का ? अशी नेमकी काय बातमी गुप्त हेर खात्याला मिळाली होती ?
३) बनावट नोटा नेमक्या कुठून येतात, त्याबद्दल सरकारला काही माहिती आहे का ? मिळाली आहे का ?

जवळ जवळ ८० वर्षापूर्वी आचार्य अत्रे यांनी लिहीलेली ही कविता आजही लागू आहे

दे रे हरि, दे रे हरि,
दोन आण्याची मोड!
(दोन हजाराची)
मोडीसाठी भटकुन आले
तळपायाला फोड ॥ध्रु०॥

काडि मिळेना, विडी मिळेना,
इतर गोष्ट तर सोड!
मीठही नाही, पीठहि नाही,
मिळे न काही गोड!

पै पैशाचे धंदे बसले,
झाली कुतरेओढ!
'मोड नाही,' चे जेथे तेथे
दुकानावरी बोर्ड!

ट्रँम गाडितहि मोड न म्हणुनी,
करितो तंगडतोड!
कुणी 'कूपने' घेउनि काढी
नोटांवरती तोड!

मोडीवाचुनि 'धर्म' थांबला,
भिकारी झाले रोड!
दिडकि कशी तुज देऊ देवा,
प्रश्न पडे बिनतोड!

श्रीमंतांचे कोड पुरवुनी
मोडिशि अमुची खोड!
पाड दयाळा, खुर्द्याची रे
आता पाऊसझोड!

~ केशवकुमार
झेंडूंची फुले, आचार्य अत्रे)

Pages