"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे गैरसोयीचा विषय आहे कृपयाच!
तुझ्या गळा, माझ्या गळा करायला कट्टा/अड्डा/विपू आहेत.
Wink

>>>>

बेफि,

तुम्ही ही मनाने अगदी जेम ऑफ अ पर्सन आहात, असे म्हणतो. फक्त उचकवत जाऊ नका ब्वा. काये ना, सर्जन'स टेंपर उफाळून येतं मग.

शुभरात्री!
<<<<

झाडू,

विषय काहीच्याकाही दिशेने का नेताय? काही प्रश्न विचारले.

१. तुम्ही त्यांनी धाडल्यासारखे त्यांचे महत्व का सांगताय?
२. त्या सगळ्याचा नोटबंदीशी काय संबंध आहे?
३. आपापले अनुभव सांगायला नेमका काय प्रॉब्लेम आहे?
४. नोटबंदी झाल्यानंतर बिचार्‍यांसाठी जे केले (जर काही केले असेल) ते लिहिल्यानंतरही असे ट्रोलिंग शोभते का?

Happy

डिजिटल व्यवहार करणारांना सरकार लकी ड्रॉ काढून बक्षीस देणार आहे.
नोटाबंदीमुळे, रांगांत मरण पावलेल्यांसाठी काही योजना आहे का?

अमा
मिसळ पाव ३५ रु ला असावी. एका मिसळीचे किती हे विचारलं नाही. चौघांचे १८० रु झाले. त्यातही चहाचे २४ रुपये होते. मला १८२० रु सुट्टे मिळाल्याचा आनंद झाला तर आज स्कूटीने हजार रुपयांचं काम काढलंय. जिथे दुरुस्तीला दिली (रस्त्यात बंद पडल्याने) त्याच्याकडे ना कार्ड रीडर, ना पेटीएम ना काही.

गेल्या माझ्या सानुल्या नोटा !!

अनिल
एका गरीब, भोळ्या अबलेची अशी चेष्टा करता का हो ?
दुकानाचं नाव तरी द्यायचं. फोटो तरी...
मी किती तरी फोटो दिलेत. अमानवीय धाग्यावर जाऊन वाचा.

http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=131...

ठाण्यात डॉक्युमेंट नोंदणीचे प्रमाण कमी होऊनही आर्थिक व्यवहार तिपटीने वाढलेत. याचाच अर्थ आता जमिनीचे व्यवहार "खर्‍या" रकमेंत नोंद होऊ लागले आहेत. पूर्वी काळ्या पांढर्‍याच्या रेशोमुळे किती महसूल बुडाला असणार याची कल्पना येते.

सातींनी स्वखर्चाने एका गावासाठी तयार केलेली शुद्धपाणीपुरवठा सिस्टीम, व त्यामुळे साथीच्या आजारांपासून त्या संपूर्ण गावाला मिळालेली मुक्ती याबद्दलची बातमी माबोवर तुम्हालाही मिळालेली आहेच. >>>>>>>>> ओह ग्रेट! मला माहित नव्हतं साती. ग्रेट!

अरेच्या कथित भक्ताने "पेटीएम" वापरण्याबद्दल उत्तर दिले नाही. जिथे दिवाळीत सगळी कडे "चायनाचा माल बॅन करा" म्हणून आरोळी ठोकत फिरत होते. तिथे आता ४५% चीनची भागीदारी असणार्‍या कंपनीचे अ‍ॅप्लिकेशन वापरणे देशभक्ती आहे असे सांगत फिरत आहे. Wink

भक्तांवर काय एक एक दिवस येतात. वाईट वाटते

आज गुवाहाटी मधे एका व्यापार्‍याच्या घरात मोठी रक्कम ( दीड कोटी, म्हणजे फार मोठी नाही तर ) सापडल्याची बातमी आली आहे. ती सुद्धा नव्या नोटात ! कुठून आल्या या नोटा ? थेट शेजारी देशातून काय ?

.

सुरुवातीलाच सांगतो की कुठलाही पक्षीय चष्मा न वापरता आणि व्यक्तिप्रेमात अथवा द्वेषात न बुडता एखाद्या घटनेचे किंवा निर्णयाचे आणि त्याच्या परिणामांचे स्वत्ंत्रपणे मूल्यमापन करण्याचे तारतम्य असलेला मी एक साधासुधा नागरिक आहे!

नोटबंदीनंतरच्या गेल्या महीनाभरात मला आलेले अनुभव:
घरात असलेली महीन्याभराच्या खर्चासाठी आणि इतर शिल्लक अशी २५-३० हजाराची कॅश पुढच्याच वीकेंडला कर्वे रस्त्यावरील कराड अर्बन बॅंकेत नेउन भरली.... सोबत तो फॉर्मपण जोडला.... सगळ्या प्रकाराला मोजून १०-१५ मिनिटे लागली असतील!

गेल्या महीनाभरात दोनदा सिन्हगड रस्त्यावरील ICICI बॅंकेतून १५-१५ हजाराची कॅश काढून आणली आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर महीन्याला लागणाऱ्या कॅशची सोय झाली.... दोन्हीवेळेला बॅंकेत तासाभरापेक्षा जास्त वेळ मोडला नाही.... अर्थात शनिवारची गर्दी टाळण्यासाठी कंपनीच्या flexible timings चा सदुपयोग करुन odd दिवशी आणि odd वेळेला गेलेलो..... कोणतीही काचकूच न करता देण्याइतकी कॅश दोन्हीवेळेला बॅंकेत होती
अर्थात दोन हजाराच्याच नोटा मिळाल्या पण सुट्टे मिळायला फारशी अडचण आली नाही.... एकदोन दुकानदारांनी नाकारल्या नोटा पण सुट्टे झाल्यावर द्या, तोवर लिहून ठेवतो असा चांगूलपणा दाखवून.... घराशेजारच्या पेट्रोलपंपावर शंभर रुपयाचे पेट्रोल भरले तरी दोन हजाराचे सुट्टे मिळत होते
बाकी सगळी बिले, ग्रोसरी, हॉटेलींग आधीपासूनच कार्डावर होत होते त्यामुळे दोनवेळा काढलेले पैसे निवांत दोन महीने पुरतायत.... अजुन एकदाही ATM ची पायरी चढायची वेळ आलेली नाही की PayTM पण वापरलेले नाही!
सिन्हगड रोड सारख्या मध्यमवर्गीय परिसरात एक ATM वरच्या रांगा सोडल्या तर या निर्णयाचा फारसा प्रभाव जाणवत नव्हता!
गेल्याच वीकेंडला किरकोळ खरेदीसाठी unlimited ला गेलेलो.... दुथडीभरुन वहात होता मॉल.... आणि सगळी तुमच्या आमच्या सारखीच सर्वसामान्य माणसे..... सरळ साधे सॅलरीड लोक!

आता आपल्यासारख्यांच्या संपर्कात येणारे तुलनेने गरीब लोक म्हणजे घरी येणाऱ्या कामवाल्या बायका, सोसायटीतले हाउसकीपर, दुधवाले, नेहमीचे भाजीवाले, गाड्या धुणारे वॉचमन, आजुबाजुचे किरकोळ दुकानदार.... मला तरी या सगळ्यातले कुणीही कमालीचे चिडलेले दिसले नाही..... अर्थात थोडीफार गैरसोय सगळ्यांचीच होत असणार पण ज्या टोकाचे गळे काढताना लोक सोशल मिडीयावर दिसले, न्यूज चॅनेल्सवर दिसले त्याचा हलकासा अंशही मला या लोकांशी बोलताना दिसला नाही.... सहज उत्सुकता म्हणून मी जवळपास यातल्या प्रत्येकाशी या विषयावर बोललो तर यातले काहीजण "कशी ठासली काळ्या पैसेवाल्यांची!" या विचारानेच खुष होते आणि करु थोडे दिवस adjust असाच एकूण बहुतांश लोकांचा अभिप्राय दिसला मला!

बर, पुण्याबाहेरचे म्हणाल तर मी सातारचा असल्याने तिथली खबरबात नातेवाईकांकडून, मित्रांकडून येतच असते..... उलट पुण्यापेक्षा फटाफट कामे होतात तिकडे बॅंकातुन.... एकतर तुलनेने लोक कमी आणि परत सगळे एकमेकाला ओळखत असतात..... मग जास्त चिडचिड नाही होत कुणाचीच!

चुलत भावंडे अजुन गावाकडेच राहून शेती, भिक्षुकी करत असल्याने त्यांच्याकडूनही थोडाफार कानोसा घेतला.... नोटबंदीच्या दुसऱ्याच आठवड्यात गावच्या घरी एक function पण झाले..... कुठेही काही अडले नाही.... उलट छोट्या मोठ्या अडीनडीला गावकी आणि भावकी अधिकच जवळ आली

हा अर्थातच व्यक्तिगत अनुभव आहे आणि माझ्यादृष्टीने बिनचेहऱ्याच्या सोशल मिडीयापेक्षा तो माझ्यासाठी जास्त विश्वासार्ह आहे

हा निर्णय योग्य की अयोग्य? निर्णय योग्य पण अमलबजावणीच्या नावने बोंब आहे का? हा निर्णय घेणे खरच अपरिहार्य होते का? सरकार खरेच भांबावले आहे का? हा एक पब्लिसिटी स्टंट आहे का? या सगळ्या सोपस्काराचा फायदा तोटा किती? हे सगळे जाहिर होईलच त्यासाठी इतक्या हातघाईवर येण्याची गरज नाही

पण कोणत्याही राजकीय नेतृत्वावर पातळी सोडून टीका करताना किंवा हेतूंवर शंका घेताना आपली राजकीय, सामजिक आणि अर्थविषयक समज किती आहे याचे एकदा आत्मपरीक्षण करावे .... ऐकीव आणि गूगलीय माहितीच्या आधारे खुसपटे काढणे सोप्पे असते पण या सगळ्या शक्याशक्यतेची गणिते मांडून,लूपहोल्स झाकून आणि शक्य तितकी गोपनीयता पाळून असे निर्णय घेणे आणि आपली राजकीय कारकीर्द पणाला लावणे इतकेही सोपे नसते .... त्यामुळे वैयक्तिक टीका जरा जपूनच करा!

http://www.loksatta.com/desh-videsh-news/demonetization-krishna-raj-stat...

" ज्यांनी काळ्यापैशाचा व्यवहार केला तेच बँकेच्या लाईनीमधे मरण पावले."

देशभक्त, राष्ट्रप्रेमी भाजपाच्या अतिहुषार केंद्रीय मंत्री क्रिष्णाराज.

चला मोदी बोलले तेच खरे आहे.. भक्त लोग बजाओ टाली.

स्वरुप, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असणारच पण इम्प्लिमेंटेशन पातळीवर मात्र पहिले काही दिवस नियोजनाचा अभावच जाणवला.. आणि तेच आम्ही सर्वांनी लिहिले आहे. कुणाचाही अनुभव खोटा असण्याची शक्यता नाहीच.

सोशल मिडीयापेक्षा, इथे अनेकांनी पेपर मधे वाचलेले , प्रत्यक्ष बघितलेलेच लिहिले आहे.

आणि सरकरने, अजूनही कुठलेही ठोस निवेदन दिलेले नाही. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय होतोय ते बघू उद्या.

साती... नेहमीच अपेक्षेपेक्षा चांगल्या वागता बाई तूम्ही Happy

Wink

हा धागा गैरसोयीबद्दलचा आहे मित्रहो.

पण धन्यवाद!

१ जानेवारीला वर्षपूर्ती होईल प्रकल्पाची. त्यानंतर आकडेवारीसह सविस्तर लेख लिहेन.

बाकीच्यांना अड्ड्यावर प्रकल्प, तयारी वगैरे माहिती रूटीन गप्पांमधून दिड वर्षापासूनच माहित आहे.
पण त्या गप्पा वाहिल्या म्हणून लिंक देता येत नाही.

असो.
सध्या आपण गैरसोयींकडे वळुया.

स्वानुभव :

स्टेट बँक सोडल्यास, बाकी कुठल्याही बँकेच्या ए टी एम मधे सातत्याने पैसे भरल्याचे गेल्या महिन्याभरात पाहिलेले नाही.

बँक ऑफ इंडीयाच्या एक ए टी एम मधून १०० च्या वीस नोटा मिळाल्या.

एच डी एफ सी च्या एका ए टी एम मधे एकदा पैसे होते पण दारापर्यंत पोहोचेस्तोवर संपले

आय सी आय सी आय च्या एकाही ए टी एम मधे पैसे आहेत आणि तिथे रांग आहे असे दिसलेच नाही (चंदा कोचर - सगळ्यात इफेक्टीव्ह सी ई ओ म्हणे)

घेतलेल्या निर्णयाचा स्वतःच्या सोयीने अर्थ बँका लावत आहेत असे मत गेल्या महिन्याभरात तयार झालेले आहे.

दोन हजारांचे सुट्टे करायला तितकेसे कष्ट पडले नाहीत - चार वेळा सुट्टे करून घेता आले.

पाटील,

मूळात बँकांकडे रोकड किती येतेय ( नव्या नोटांची ) त्यावरून ब्रांच पातळीवर त्या ठरवत असाव्यात असे वाटतेय.
त्या बाबतीत आर बी आय काही सर्क्यूलर्स काढतेय का, ते कळत नाही,

राजन साहेब गेल्यापासून आर बी आय सरकारच्या निर्णया खाली आली आहे. त्यामुळे जेटलीसाहेब जे म्हणतील तेच उर्जित पटेल नामक व्यक्ती करतील.

मूळात बँकांकडे रोकड किती येतेय ( नव्या नोटांची ) त्यावरून ब्रांच पातळीवर त्या ठरवत असाव्यात असे वाटतेय.
त्या बाबतीत आर बी आय काही सर्क्यूलर्स काढतेय का, ते कळत नाही,>>>

एन के जी एस बी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाशी झालेल्या गप्पांमधे असे कळले की मोठ्या बँका (जसे एस बी आय, आय सी आय सी आय इ.) लहान बँकांना कॅशसाठी अक्षरशः रडवत आहेत - उदा. एन के जी एस बी वाल्यांची आय सी आय सी आय कडे ५ कोटीची ठेव असूनही त्यांना एका वेळी १ लाखच मिळतील वगैरे ऐकावे लागते असे ते म्हणत होते.) त्यामुळे आम्ही आमच्या कस्टमरना काहीच अ‍ॅश्युरन्स देऊ शकत नाही असे ते म्हणाले.

जर हे काळ्या पैश्याच्या विरुद्ध युद्ध होते ( सरकारच्या मते ) तर त्याची आखणी देखील युद्ध पातळीवर व्हायला नको होती का ? आणि तीदेखील गोपनीयता बाळगून करता आलीच असती.

नेमका कुठला फॉर्म भरायचा. आधार कार्ड हवे कि पॅन कार्ड हवे, त्याची कॉपी जोडायला हवी का, याबाबतीत
बँक ऑफिसर्स स्वतःच काहीतरी ठरवत होते, त्यात सुसूत्रता नव्हती. हे सगळे आधीच ठरवता आले असते.

आणि प्रत्येक वेळी ही कागदपत्रे का लागतात ? खाते उघडताना ती जमा केलेलीच असतात. ती नोंद बँकाकडे
हवी ना ?

आणि काळा पैसा, काळा पैसा काय करताय लेको ? तो काय एका रात्रीत जमा होतो का ? सरकारचे गुप्तहेर खाते आहे ना ? पुर्वी इनकम टॅक्स डीपार्टमेंटचेही सर्वे सर्कल असायचे ? काय करतात ते, का नाही शोधून काढू शकत ते ? जे काळा पैसा बाळगून असतात ते बहुतांशी शो ऑफ करतातच. गावातल्या प्रत्येक माणसाला माहीत असते ते.

आज तूम्हा आम्हाला देशाबाहेर जायचे विमान पकडायचे असेल, तर अगदी विमानतळाच्या दारातच झाडाझडतीला सुरवात होते. त्यानंतरही एअरलाईन काऊंटर, इमिग्रेशन असे टप्पे आहेतच. हे सगळे बिनबोभाट पार करून, मल्ल्या पळाला. पण हे सगळे तो कसे तोडू शकला त्याबाबत मात्र सगळे चिडीचूप !!!
काळा पैसाच कामी आला असेल ना हे दरवाजे उघडायला ?

सिंहगड रोडच्या आयसीआयसीआय मधे १५००० मिळतात ? थँक्स या माहितीबद्दल. आज स्टेट बँकेत चार हजार मिळाले पुन्हा. दोन नोटा. ३९०० मागितले तर नाही म्हणतात.
अकाउंट ओपन करते उद्याच (एक जुने अकाउंट जिवंत झाले तर पाहते).

बाकीच्यांना अड्ड्यावर प्रकल्प, तयारी वगैरे माहिती रूटीन गप्पांमधून दिड वर्षापासूनच माहित आहे.
पण त्या गप्पा वाहिल्या म्हणून लिंक देता येत नाही.>>>>>> कुठे आहे हा अड्डा? Happy

स्वरुप, तुम्ही बेफिकीर किंवा अश्विनी के यांचे डुआयडी का? Wink

तुम्ही जरी पहिल्या पॅरात तुमची भूमिका क्लिअर केलीत तरी तुम्ही त्रास न झाल्याचं इथे लिहिलंत, मोदींविरुद्ध, त्यांच्या निर्णयाविरुद्ध तळतळाट नाही केलात म्हणजे तुम्ही छुपे मोदीभक्त असणारच. ह्या बाजूला किंवा त्या बाजूला अशी भूमिका घेणंच अपेक्षित आहे आणि तुम्हांला त्रास झाला नाही तरी तुमच्या नातेवाईकांना, शेजार्‍यापाजार्‍यांना कसा त्रास होतोय हे ही सांगणं अपेक्षित आहे इथे.

आता मायबोलीवर ज्यांना त्रास होतोय त्यांना तुमच्याकडे पैसे आणायला जा असं सांगण्यात येईल. Wink
(ही पोस्ट लाईटली घ्याल अशी अपेक्षा आहे).

नोटबंदी पाठोपाठ एचवनबी व्हिसावर पण बॅन येणार >>>

या दोन्हींचं रिलेशन काय हे कळेल का ? मला लॉजिक नाही कळालं.

Pages