"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना, paytm पेक्षा राष्ट्रियीकृत बॅंकांचे UPI वापर. एक पैसाही जास्तीचा जात नाहिये आणि तात्काळ पैसे transfer होतायत.

गेल्या आठवड्यात तर वाचलं कि सध्या मुंबईचा आर्थिक राजधानीचा दर्जा गेला आहे आणि दिल्ली आर्थिक राजधानी झाली आहे. नेहेमीपेक्षा सध्या कॅश रिक्वायरमेंट जास्त आहे खरं तर. पण नेहेमीच्या एक पंचमांश कॅश येतेय असं त्या वरच्या बातमीत दिसतंय.

एटीएम हॅंग झाल्याचे नाही बघितलं अजून. पण सामान घेतल्यानंतर पैसेच देता न आल्याचे घडलंय.

मी फक्त दूधवाल्याला चेक दिला.तेही दुसर्‍या दिवशी आईला चिंचवडला पोहचवून परत यायचे होते म्हणून असलेले पैसे दिले नाहीत.बाकी सगळे रोखीने व्यवहार करत आहे.अजून अपवाद डेंटिस्टचा,त्याच्याकडे डेबिट कार्ड चालतेय.
बँकेतून,१०च्या कॉईनमधे नवर्‍याला १०००/- मिळाले.तो दुसर्‍यादिवशी बदलायला जाणार होता.त्याला म्हटले राहू दे.ती बॅग तशीच ठेवली.
ऑफीसच्या कँटीनवाल्याला विचारले की तुम्हाला हवे आहेत का? तर म्हणाला नको बरेच आहेत.नंतर सांगतो.भाजी,फळे घेताना,रिक्षामधे, सुट्या पैशांचा प्रॉब्लेम आला नाही.
पण एटीएमबाहेरच्या रांगा पाहून तसेच इतरत्र ऐकून,इथे वाचून बर्‍याचजणांना त्रास होतोय हे जाणवतय.कार्डाचा सोर्स आहे म्हणून तितकेसे वाटत नाही.पण ज्यांच्याकडे हे पर्याय नसतील त्यांचे हाल होतच असतील ना.सातीने सांगितलेला किस्सा चटका लावून गेला.आज २ हजार माझ्या खिशात असले तरीही ते नसल्यासारखेच आहेत.कारण मला सुटे द्यायला दुसर्‍यांकडे सुटे नाहीत.

दिल्ली सुधारली तर देश सुधारेल असं पॉलिसीमेकर्सना वाटत असावे म्हणून दिल्लीला सुधारण्यासाठी सगळे पर्याय उपलब्ध करून देत असावेत.

इतरत्र जास्त नोटा पाठवा आणि तिकडला लायनीतला वेळ कमी करा म्हणावं. आम्हाला १० मिनिटांऐवजी २०-३० मिनिटं लागली तरी तेवढं चालेल. सगळ्यांना reasonable वेळेत पैसे मिळायला हवेत.

कॅशलेस वर मात्र भर द्यायला हवा. मोबाईल जसं सगळेच वापरायला शिकले तसे ज्यांना वयापरत्वे, निरक्षरतेमुळे शक्य नाही ते लोक सोडता बाकिच्यांनी शिकून घ्यायला हरकत नाही. ज्या कॅशलेस पद्धतीत तोटा नाही त्या पद्धती स्वीकाराव्यात लवकरात लवकर.

तो म्हणाला, एटीएम बंद नसतच, मी दर दिवशी संध्याकाळी ६ वाजता पैसे लोड करतो ९ वाजेपर्यंत संपतात.
का संपतात त्याच उत्तर त्याने दिल की त्याने स्वतः एका बाईला ५ कार्ड घेऊन प्रत्येकी २,००० रु काढताना बघितलय.

......

त्यात चुकीचे काय आहे ? तिची गरज असेल दहा हजाराची आणि दिवसा तिला नोक्रीचा खाडा नसेल करायचा , तर ती काय करेल बिच्चारी ?

आणि एकाच ब्यान्केच्या एटी एमात पाच कार्डे घासणे , याचा अर्थ कळला काय ?

बाकीची चार एटीएम कोम्यात आहेत !

आमच्याकडेही हीच परिस्थिती आहे, चारपैकी एकच ब्यान्केचे ए टी एम सुरु आहे .... एक्सिस ... तीथे दोन हजाराचे लोडिंग आजवर दोनच वेळेला झालय.. ती क्याश लगेच संपते. इतर मशीन तर बंदच .

कलिन्यात तीन चार ए टी एम आहेत... तिथेही हीच अवस्था आहे.

दिल्लीला सुधारण्यासाठी सगळे पर्याय उपलब्ध करून देत असावेत. >> मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात हेही एक कारण असावं Happy

दक्षिण-पुर्व दिल्लीच्या ग्रेटर कैलाश-१ परिसरात एका वकीलाच्या लॉ फर्मवर टाकण्यात आलेल्या धाडीत एक-दोन कोटी नव्हेतर तब्बल १३.५६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. हा खजिना त्याच्या कार्यालयातील कपाटात ठासून भरलेला होता. त्यात अडिच कोटी रूपयांच्या नव्या नोटांचाही समावेश आह
http://m.maharashtratimes.com/nation/crime-branch-raided-t-and-t-law-fir...

सामान्य माणसाला दोन हजार्ही मिळत नहीत. याना कुठुन मिळतात ?

पुण्यातल्ले भाजपाचे हुजरे गाडी भरुन नोटा घेऊन फिरत आहेत... ५०० - १००० च्या जुन्या.
तरीच बेफिकिर भौ ना पुण्यातले ए टी एम विना गर्दीचे दिसताहेत.

ऐकायला आले की

अपेक्षित गर्दी झाली नाही आणि प्रचंड विरोध काळे झेंडे , विरोधी नारे चालू असल्याने "घाबरलेला माणूस" सभेला आला नाही. पण भाषण देण्याचा मोह सुटला नाही. "मै हू क्राईम मास्टर गोगा आया हूं तो कुछ चुरा के जाऊंगा" या धर्ती वर "भाषण दे के ही जाऊंगा",.

परवा कॅनेरा बँकेत उभ राहुन दोन तासात २४,००० रु कॅश काढलेली. त्या ब्रांचच्या मॅनेजरलाच विचारल दोन दिवस
तुमच बँकेबाहेरच एटीएम बंद दिसत आहे काय कारण आहे ?

तो म्हणाला, एटीएम बंद नसतच, मी दर दिवशी संध्याकाळी ६ वाजता पैसे लोड करतो ९ वाजेपर्यंत संपतात.
>>
किती थापा माराव्यात बरे भक्तानी? कोणताही मॅनेजर अथवा ब्रॅन्च एटीएम मध्ये कॅश भरीत नाही. अगदी ब्रँचच्या आवारातील सुद्धा. ते काम दुसर्‍या कंपनी ला आउट सोअर्स करण्यात आलेले असते. ती कंपनी तिची व्हॅन परस्पर येउन कॅश लोड करून जाते त्याचा ब्रँचेसला पत्ताही नसतो.
माझी कर्वे रोड व सेनपती बापट रोड स्टेट बँकेत दोन्हीकडे खाती आहेत. तीन दिवस लाईनीत उभे राहून एक पैसाही मिळाला नाही मध्येच सांगितले जायचे आता पैसे संपले. लाईन मधेही उभे राहू नका . शनिवारी से. बा रोड शाखा चालू असते ती संडे ब्रँच आहे. शनिवारी सकाळीच साडे दहाला लाईनीत गेलो तर बँकेचा दरवाजा उघडताच शिपायाने बोर्ड आणून लावला ' कॅश शिल्लक नाही ' एकही ट्रँझॅक्शन व्हायच्या आधीच. ! बांकेत फक्त खाती उघडणे, १०००/५०० च्या नोटा स्वीकारणे अशी फुटकळ कामे चालू होती त्यामुळे अजिबातच गर्दी नव्हती. लोकानी विचारले शेजारच्या एटीएमात पैसे कधी भरणार त्यानी सांगितले आम्ही भरत नाही त्याची वेगळी वॅण येते व परस्पर पैसे भरले जात असतात. आमच्या बँकेत आता मंगळवारी आले तर दुपारी कॅश येईल.

हे सगळे कोथ्रुडातच राहणार्‍या तर्र कीरतनकाराला दिसत नसेल कारण सगळ्या भाजप्यांनी डोळ्यावर कातडे ओढून घेतल्;ए आहे.त्याला मंगळवारी लाइनीत उभा केला पाहिजे.

रच्याकने , भाजप्या उज्वल केसकरचे १० लाख १०००/५०० चे पकडले त्याबद्दल इथे अवाक्षरही नाही. बापदेव घाटातून पाचगणीला यांचा बाप गेला होता काय ?

मोजून चार ते पाच (?) सदस्य त्रास होतो म्हणून अत्यंत एकतर्फी आरडाओरडा करीत आहेत.
काही सदस्यांनी पाच मिनिटांत पैसे न मिळण्याचा वैयक्तिक अनुभव लिहीलेला आहे. पण त्याचबरोबर पैसे मिळत नाहीत ही शक्यता देखील फेटाळलेली नाही. अशा सदस्यांच्या लिखाणाबद्दल ज्या पद्धतीने आक्षेप घेतले जात आहेत ते पाहता इथे पक्षीय अजेण्डा राबवला जातोय हे लक्षात येतंय.

भारत देश कॅशलेस सोसायटी कसा होईल याबद्दलचा एक उद्बोधक व्हिडीओ व्हॉट्स अप वर मिळाला. हे सहज शक्य आहे. मायबोलीवर व्हिडीओ कसा अपलोड करतात हे माहीत नाही.

मी अनेकदा क्लिअर केलेलं आहे कि मी कुठल्याच पक्षाची समर्थक नाही. मी धोरणांचं समर्थन करतेय.
तो व्हिडिओ शक्य झाल्यास अपलोड करीनच . कारण त्यानंतर शंका राहणार नाहीत.

तोपर्यंत सकारात्मक विचार करणा-यांनी हे पहावं.
https://www.youtube.com/watch?v=Nk0CVmbA5j4

जिथे एक घाबरट सरकार जरा काही कुठे झाले, विरोधाचा सुर कोणी आवळला की पटापटा त्या भागात इंटरनेट बंद करते तिथे कॅशलेस साठी इंटरनेट कुठून आण्णार ?

आणि गेल्या वर्षी "फेसबूकचा संस्थापक" मार्क भारतात येऊन "फ्री इंटरनेट" सेवा देण्याचा प्रस्ताव मोदी सरकार समोर ठेवलेला. तो सरकारला अटींसकट अत्यंत आवडला होता. त्यासाठी भक्तमंडळीनी फेसबूक वर स्वतःचा डीपी सुध्दा बदललेला. पण लवकरच त्या मागे कसले कटकारस्थान आहे याचा उलगडा झाला आणि सुज्ञ जनतेने आपापले डिपी बदलले आणि सरकारच्या या निर्णयावर विरोध मोठ्याप्रमाणावर व्यक्त केला, ऑनलाईन पिटीशन्स वगैरे काढलेले. ट्रायने सुध्दा या विरोधातच आपले मत दिले आहे. मार्क ला आपला "फ्री इंटरनेटचा" बोरिया बिस्तर गुंडाळून पळावे लागले होते.

आता तोच प्रस्ताव "कॅशलेस सुविधा" नावाने मागील दरवाजातून मोदींना पुन्हा तर आणायचा नाही ना?

लोकांना इतके हेल्पलेस करून टाकावे जेणे करून नंतर कितीही जाचक अटी घातल्या तर लोकांकडे ती स्वीकारण्याशिवाय पर्यायच नसेल अशा रितीने नंतर कुठला विरोधी होत नाही आणि आपल्याला जे हवे असते ते ही सहजतेने मिळते.

सरकारच्या आंधळ्या नितीचे आंधळे समर्थन करणारे .. सकारात्मक

सरकारच्या आंधळ्या नितीचे डोळसपणे विरोध करणारे... नकारात्मक

छान

सरकारच्या आंधळ्या नितीचे आंधळे समर्थन करणारे .. सकारात्मक

सरकारच्या आंधळ्या नितीचे डोळसपणे विरोध करणारे... नकारात्मक >>>

तुम्ही माझे अनेक प्रतिसाद मुद्दाम नजरेआड केले आहेत. जेव्हां त्रास होतोय हे खरे आहे असे मी म्हटले तेव्हां माझ्याशी प्रेमाने गप्पा मारण्यात आल्या. पण निर्णय चांगला होता असे म्हणाले तेव्हां अंगावर धावून आक्षेपार्ह भाषेत प्रतिसाद दिले गेले. याला अंध नीतीचे समर्थन म्हणत असाल तर मला काहीही म्हणायचे नाही. एखाद्याने पटवून घेतलंच पाहीजे असा माझा आग्रहही नाही आणि तशी मला गरजदेखील नाही.

विरोध करताना चांगल्याला चांगले म्हटले पाहीजे इतकेच.
कालच मी एक यादव म्हणून पायलट आहेत त्यांची एबीपी माझा च्या कट्ट्यावरची मुलाखत पाहिली. त्या माणसाने चक्क विमान बनवलं. बरं तंत्रज्ञान उपलब्ध आहे असं ते मान्य करतात. विमानाची बॉडी भारतात बनवून त्याला उपलब्ध भाग बसवले तरी किती प्रचंड फायदा होतो हे पहायला मिळालं.

या तरुणाला शेवटच्या क्षणी मेक इन इंडीया मधे संधी मिळाली आणि नंतर तेच आकर्षण झालं. राष्ट्रपती येऊन पाहून गेले. मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. एव्हढ्यावरच नाहीत थांबले तर त्या तरुणाला २०० कोटी कर्ज आणि शंभर एक जागा दिली. हा तरूण आता महाराष्ट्रातली शहरे विमानाने जोडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी खाजगी क्षेत्रालाच अशा शहरांमधून विमानतळ बनवायची परवानगी दिली आहे. २००० रु पेक्षा कमी खर्चात महाराष्ट्रात कुठूनही कुठेही जाता येईल.

किती साध्या साध्या गोष्टी आहेत या ?
यातले चांगले अ‍ॅप्रिशिएट होताना दिसत नाहीये. मान्य आहे की अजून खूप पल्ला गाठायचाय. पण अशा प्रकारे एका दलित तरुणाला दोनशे कोटी रु, चं कर्ज आधीच्या काळात कधी ऐकले होते का ? जे कर्ज आता मोदीजींनी राईट ऑफ केले ते आधीच्या सरकारांनी दिलेले होते. ते राइट ऑफ करावेच लागले असते, ज्यांनी कर्ज दिले त्यांच्यात ते धाडस नव्हते.

मी आज बारामतीच्या आसपासच्या भागात फिरले. बारामती उंडवडी कुर्कुंभ मार्गावर पाणी येत नव्हते. या सरकारने इथे पाणी आणलं. आधीच्या राज्यकर्त्यांनी मतं मिळाली नाहीत म्हणून पाणी रोखून धरले होते. काही गावात रस्ते होऊ देत नव्हते.

भाजप ज्या परिवारातून आलेला आहे त्या विचारसरणीबद्दल वाद आहे आणि तो वाद मान्य आहे. पण या छोट्या छोट्या गोष्टींनी जर आयुष्य सुकर होत असेल तर कोण विचारसरणीला कवटाळून बसेल हो ? भाजपनेही ते मुद्दे केव्हांच सोडून दिले आहेत आणि फक्त विकासावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. ज्या राज्यात भाजप सरकार एकदा येते तिथे नंतर दुस-या कुणालाही का संधी मिळत नाही ?

कारण जनतेच्या सोयीसाठी सरकार प्रयत्नशील आहे हे जाणवतेच आहे. माझ्यावरचा नकारात्मक प्रचाराचा भाग पुसून टाकून या सरकारकडे स्वच्छ नजरेने पाहता येण्यासाठी मलाही खूप वेळ लागला. आता अगदी तटस्थ नजरेने पाहता येतंय याबद्दल समाधानी आहे.

केवळ नकारात्मक चष्मे फेकून द्या. प्लीज !

वडापाववाला पेटीएम झाला, दवाखान्यात स्वाइप मशिन लागली, पण सरकारी नोकर व पुढारी लोकं लाच खाताना चेक , पेटीएम की कार्ड वापरणार ? माझ्या या वेताळप्रश्नाला कोणत्याच धाग्यावर कुणीच विक्रमवीर खांद्यावर घेईना झालाय ..

जनतेचा एकेक रुपया नियंत्रित करुन याच दोघांचेच फावणार ना?

'आपल्या' भाषेत बोलायचं तर ते सी सी एफ होतं, तेंव्हा एक्स्ट्रिमिटीज गार पडतात, स्प्लँक्निक सरक्युलेशन बोंबलतं ... हे सगळं कशासाठी ? तर मोठ्या ऑर्गनचं पोट भरावं म्हणून.

तसं , आता वडापाववाला, इंजेक्शनवाला , रिक्षावाला यांच्याकडून रुपया दोन रुपया पेटीएम ला देणार .. ही सगळी माया नंतर कुठे जाणार ? आठवे / नववे / दहावे वेतन , भत्ते, मल्ल्याची राइट ऑफ कर्जं , अंबानीची टॅक्समाफी यालाच ना?

आपल्याला थंड करुन बडी धेंडं जगणार आहेत , हे निर्बुद्ध पायाना का समजेना झालंय ?

अलिबाग मधे परिस्थिती सुधारली आहे. ए टी एम समोरील रांगांची लांबी कमी झाली आहे. दहा पंधरा माणसे साधारणपणे असतात. भाजी वाले व दुकानदार सुटे देवू लागलेत पाचशेच्या नोटा ही मिळू लागल्या आहेत. नोटांचा पुरवठा लवकरच वाढेल व सध्या दोन हजार च काढण्या चे बंधन काढून घेतले जाईल असे कळाले. चिरंजीव रात्री भटकायला मिळावे म्हणून मुद्दाम रात्री साडेनवा नंतर " आता रांग फार नसते.. एटीएम मधुन पैसे काढायला जाऊ का आई ?" असे विचारून त्या बहाण्याने गावात फिरून येतात. Happy

Pages