"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण तेच वाटतं ग. पण त्याच्या ७० च्या खाऊपेक्षा घरच्यासाठी रोजची ७० ची भाजी जास्त गरजेची आहे ना. आता तोच खाऊ मोठ्या ग्रोसरीस्टोअरमध्ये येईल २-३ दिवसात. त्यावेळी थोडे जास्त पैसे देवून कार्डावर घेता येईल.

It looks like Gurgaon is going more cashless than Delhi.
Here lot of Subji vendors are accepting Paytm and some big vendors accept credit cards. In our society Mother Dairy, Needs Supermarket and medcial shop accept Paytm and Cards. So I am almost cashless. We iron cloths ourselves so that front also ok. But still we need at least 5000/- cash at home for emergency. Our office is having ATM and it is refilled at least 3 times a week. So managed to get 4500/- (5x500 once & 1x 2000/-).
But outside in the market it is very bad.

जनार्दन रेड्डी आणि गडकरींना किती गैरसोय सहन करावी लागली असेल या नोटाबंदीमुळं.. आमची गैरसोय किस झाड की पत्ती आहे त्यापुढं.. देशासाठी (आम्हीच) एवढी गैरसोय सहन केलीच पाहिजे..

हो. गुडगाव, नोयडा बेटर आहेत. मी इस्ट पटेलनगरमध्ये रहाते. मेडिकल, ग्रोसरी स्टोअर मध्ये कार्ड चालतात. एरवी सुद्धा तिथली खरेदी कार्डानीच केली जाते. पण इथे अजूनही भरपूर छोटी छोटी दुकानं, भाज्यांच्या गाड्या, फळांच्या गाड्या आहेत. तरी आमच्याकडे बऱ्याच इटरीज मध्ये आणि दुकानांमध्ये स्वॅपिंग मशिन आणि पेटीएम सुरु झालं आहे. चांदनी चौकात रहाणारी मैत्रिण म्हणतेय कि तिथे एखादं- दुसरं दुकान सोडलं तर सगळीकडे कॅश लागतेय.

पेटीएमचे युझर्स अचानक वाढले. या वाढलेल्या युझर्सचा ताण पेटीएमचा सर्वर कसा झेलत असेल? की त्याला आधी कल्पना दिली होती जेणेकरून आवश्यक ते उपाय यांनी आधीच करून ठेवले होते ?
नाही तर पेटीएम अ‍ॅप्लिकेशन अवघ्या १० दिवसातच बंद झाले असते.स्लो डाऊन झाले असते. वापरताना त्रास झाला असता. पण यापैकी कुठे ही मेजर इश्शूज नाही.

आश्चर्यच !

पेटीएम च्या ओनरने १% स्टेक एन कॅश केला तर ३२४ कोटी रु. मिळालेत अशी बातमी आहे. इकॉनॉमिक टाइम्स ला.

नोट बंदी मुळे जी डिमांड स्लो डाउन झाली आहे त्याचा एक परिणाम म्हणजे तयार असलेल्या मालाची इन्वेंटरी पडून आहे. लोक नवे घ्यायला कचरत आहेत त्यामुळे कंपन्यांना जसे एफ एम सीजी, व्हाइट गुड्स कार्स व इतर बीटू बी मटेरीअल्स ची इन्वेंटरी जेव्हा तयार होउन पडून राहते तेव्हा त्याची पण एक कॉस्ट कॅरी व्हायला सुरू होते. हा मा ल विकला तर फायदा नाहीतर गळफास अशी परिस्थिती असते.
फॅक्ट्रीज उभ्याकरायला कर्ज घेतलेले असते त्याचे इं ट्रेस्ट लागू होतच राहते पण माल विकला न गेल्याने
परत फेड करायला हातात पैसा नाही. सर्वेच काही मल्लाया नाहीत. त्यामुळे हे कर्ज सर्विस करणे अवघड होत जाते. असे रिपल इफेक्ट आहेत त्यांचा अभ्यास आधी करायला हवा होता. कार चे उदाहरण घ्या. डिसेंबर महिन्यात बनवली गेलेली गाडी आता मागील वर्शीचे मॉडेल होईल १५ २० दिवसात.
तो स्टॉक ठेवणे ही अवघड असते. खराब होउ शकतो व मग कोणी घेत नाही. किंवा नुकसान सोसून विकावी लागेल.

ग्राहकाला डिस्काउंट म्हणजे कोणी तरी ती कॉस्ट बेअर करत असते. पण मला काय त्याचे. मी तर फकीर आहे. ना मला मुलांच्या खाउ शिक्षणाची काळजी, ना मुलीच्या लग्नाची ना पेन्शनची ना आजारी नातलगांची. मैं तो सेट हू. जे त्रास भोगत लायनीत उभे राहून पैसे काढत आहेत ते बहुतांशी संसारी लोक आहेत. किंवा ज्यांच्यावर जबाबदार्‍या आहेत. गावी पैसे पाठवावे लागतात असे एकेकटॅ लोक.

अम्बानी करण जोहर प्रभ्रुतींकडे पा र्ट्या फंक्षने नेहमीच्याच उत्साहात चालू आहेत. बॉलिवूड मधील एकाने तरी जनतेचे त्रास शेअर केलेत का? सर्वांची बोलती बंद आहे.

प्रसादक,
पे tm चे युसर्स अचानक वाढले हे खरे आहे, तरीही ते त्यांच्या टार्गेटेड लोड पेक्षा कमी आहेत,
मात्र त्याचवेळी त्यांचे ट्रांझाक्शन फेल होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे हे खरे.,

तरीही ते त्यांच्या टार्गेटेड लोड पेक्षा कमी आहेत, >> १५००% वाढ जगात कुठल्याच कंपनीचे टारगेट लोड नसेल. तरी या कंपनीने टारगेट लोड इतके जास्त आधीच ठेवले आहे जिथे इंटरनेटची बोंब आहे..

हिच कमाल वाटते

बॉलिवूड मधील एकाने तरी जनतेचे त्रास शेअर केलेत का? >>>

फक्त असंतोषावर आमिर आणि शहरुख ने मत व्यक्त केले तर काय झाले होते माहीती आहे ना

मधील एकाने तरी जनतेचे त्रास शेअर केलेत का? सर्वांची बोलती बंद आहे.----- ते स्वतःच आता जनता झाले असतील, कुठे काय कसं खातं काढायचं, काय आयडी प्रूफ, पत्ता कोणता लीगल आहे ? त्याचं प्रूफ आहे का? नाही म्हणायला आमिर, शाहरुख खान प्रभुतींकडे वोटर आयडी नक्की असणार !

क्लाउड कंप्युटिंग नावाचा एक प्रकार असतो. यामुळे सर्वर एकदम स्केलेबल होतात आणि जास्त लोड सहज सांभाळू शकतात.
मिंग्लिश बद्दल क्षमस्व.

बेफिकीर, महेश विद्यालयासमोरच्या एटीएमसमोर आत्ता किती मोठी रांग आहे, ते बघाल का प्लीज?

ते आज युनायटेड स्टेटस ऑफ कोथरूडमध्ये नसतील.
मूळातच लेश कॅश इकॉनॉमी असणार्‍या पाड्यावर असतील!

एटीएम च्या रांगेत गर्दी जास्त दिसावी म्हणून विपक्षने स्वतःची माणसं उभी केली आहे. असे खुद्द रामदेव बाबा आणि इतर भाजपा नेत्यांनी वक्तव्य केले आहे. आणि पुण्यात तर राष्ट्रवादी आहे. मग नक्कीच त्यांची माणसे असतील. असा ही एक दावा केला जाऊ शकतो.

आमिर, शाहरुख खान प्रभुतींकडे वोटर आयडी नक्की असणार !
>> अहो असे काय ते टॅक्स रिटर्न भरणारे लोक आहेत. पॅन पण आहे. ह्या इंडस्ट्रीतील रोजावर काम करणारे लोक्स एक्स्ट्रा, लाइट बॉइज, टेक्निशिअन्स चायवाले टिफिन वाले केट रर्स, व्हॅन प्रोव्हाइड
कर णारे ह्यांचे काय होते आहे . एक अक्षर छापून येत नाही.

आमिर, शाहरुख खान प्रभुतींकडे वोटर आयडी नक्की असणार ! << कृपया देशभक्त राजिव भाटीया, आणि पनामा मधे नाव आलेला अजय देवगण यांच्याकडे वोटर आयडी विचारणार का?
राजीवभाटीया तर कॅनडाचा नागरीक आहे. त्याच्या कडे वोटर आयडी नसेल बहुदा. Happy

>>>> चिनूक्स | 9 December, 2016 - 17:12

बेफिकीर, महेश विद्यालयासमोरच्या एटीएमसमोर आत्ता किती मोठी रांग आहे, ते बघाल का प्लीज?
<<<<

चिनूक्स,

मी सगळीकडेच रांगा बघत आहे. वर मी माझा अनुभव लिहिला आहे त्यावर तुमचा हा प्रतिसाद सुसंगत वाटला नाही. मला आलेले अनुभव खोटे आहेत किंवा मला असे अनुभव यायलाच नको होते असे काही लिहिले असतेत तर ते सुसंगत झाले असते. असो!

तुम्ही सहज म्हणून परिंचे, वीर, दुधाळवाडी, राऊतवाडी, महुर, चांबळी, कोडीत, न्हावी, पवना, पौड, कुळं, कोळवण, लव्हार्डे, दिसली, आंदगाव येथील हातावर पोट असलेल्या, शेतात रोजंदारीवर राबणार्‍या लोकांशी बोलून बघाल का प्लीज? त्यांना ना रांगा लावाव्या लागत ना पे टी एम समजते त्यांना! ते मजेत जगत आहेत. आणि हो, हे मी जे सगळे लिहिले ते खोटे, मजेशीर, पूर्वग्रहातून आलेले, भक्तवचन असे सगळे काही आहे हेही नक्की!

आणि तुमच्या प्रतिसादावर काहीही संबंध नसताना माझ्याबद्दल गचाळ मुक्ताफळे उधळणार्‍या ज्या बाई आहेत त्यांचा मी अनुल्लेख करतो हे त्यांच्या लक्षात येऊ शकत नाही ह्याचे फार नवल वाटते.

कृपया मला विविध ठिकाणच्या रांगा निरखायला सुचवू नयेत अशी विनंती! मी घरात बसून मते ठोकणार्‍यांपैकी नाही.

दिनेशदा,
सध्यातरी ते लोक शिव्या घालतायत.

परवा एक अठरा वर्षांचा मुलगा वारला माझ्या हास्पिटलात.
१७ तातखेपासून आजारी होता. ताप, तापात बरळणे!
२० तारखेला कसेबसे पैसे गोळा करून घरातले एका हास्पिटलात घेऊन गेले.
सीटी स्कॅन करा... ब्लड टेस्ट करा.
पैसे नाहीत म्हणून थांबले.
कसेबसे पैसे गावच्या पाटलाकडे मागून आणले.
त्याने पण १०००/५०० च्या नोटा दिल्या.
स्कॅनिंगला चाललेच नसते पण नेमके आमच्या जिल्हा प्रशासनाने खास नोटिस काढलेली तेव्हा २४ तारखेपर्यंत सगळ्या खाजगी वैद्यकीय आस्थापनांतही जुन्या नोटा चालवायची.
तर सी टी स्कॅन झाला, बाकी टेस्ट झाल्या औषधे सुरू झाली.
पण रोज रोज पैसे कुठून येणार?
नातेवाईकांचा खोळंबा. बरं गावात नोटाही मिळायला तयार नाहीत आणि कामही मिळायला तयार नाही.
शेवटी उचलून मुलाला गावातल्या पीरासमोर नेऊन टाकलं त्यांनी.

तीन दिवस पोरगं तडफडलं, बेशुद्ध पडलं.
गावातल्या एका डॉक्टरांनी अगदी स्वतः पैसे देऊन आमच्याकडे पाठवलं.
पण रोग अश्या स्थितीत गेला होता की गेला तो ४-५ तासांत.

पहिल्या दवाखान्यातून परत का नेलंत विचारल्यावर नातेवाईकांनी नोटबंदीला ज्या शिव्या दिल्यात!
साधे सरळ लोक!

असे अनेक किस्से मी आत अड्ड्यावर लिहितेय दररोज.
आता तर वाईटही वाटत नाही आणि काही नाही.
असो.

तुम्ही सहज म्हणून परिंचे, वीर, दुधाळवाडी, राऊतवाडी, महुर, चांबळी, कोडीत, न्हावी, पवना, पौड, कुळं, कोळवण, लव्हार्डे, दिसली, आंदगाव येथील हातावर पोट असलेल्या, शेतात रोजंदारीवर राबणार्‍या लोकांशी बोलून बघाल का प्लीज? त्यांना ना रांगा लावाव्या लागत ना पे टी एम समजते त्यांना! ते मजेत जगत आहेत.

Proud

बिन पैशाचेच इतके मजेत आह्व्त तर मग तख्त का पलटला म्हणे ?

भाजपचे एक प्रवक्ते मधु चव्हाण यांची पाद्यपूजाच केली पाहिजे. हा हलकट इसम कालच्या एका पॅनेल डिस्कशन मध्ये चक्क म्हणाला की मी चर्चगेट पासून अंधेरीपर्यन्त फिरलो मला कुठेही रांगा दिसल्या नाहीत. याच्या डोळ्यावर भात बांधला होता काय.? जिथे रांगा नाहीत तिथल्या बँका/ एटीएम मध्ये कॅश शिल्लक नसल्याने ओस पडल्यात हे ह्या ** याला समजत नाही काय?
काल व आज दोन दिवस रांगेत उभे राहून मला २ हजाराचे एकच नोट मिळाली आहे ती त्या मध्याच्या नाकात घालावी काय? ::राग:

आत्ता एसबीआयच्या एटीम समोर दीड किमी रांगा आहेत. शनिवार रविवार खडखडाट होत असल्याने लोक आजच पैसे काढत आहेत.

ज्यांना पाच मिनिटात पैसे मिळतात त्यांनी आपपल्या बँकांची नावे सांगितली पाहीजेत. ज्या बँकांना एरव्ही ग्राहक नसतात आणि नव्या सरकारशी चांगले आहे अशा बँकांत बहुतेक पाच मिनिटात काम होत असावे. किंवा जनता बँक, जनसेवा बँक, कॉसमॉस बँक आणि रुपी बँक या संघाच्या लोकांच्य बँकांमधे संघाचेच लोक जात असल्याने आणि सरकारकडून मेहेरनजर होत असल्याने काम पटकन होत असणार.

भाजपच्या नसे, आमदार, पदाधिकारी यांच्याकडे लाखोकरोडोच्या नव्या नोटा सापडल्या. कुठून आल्या या नोटा ?

त्यामुळे जे लोक इथे येऊन पाच मिनिटात काम झाले असे म्हणत आहेत त्यांची चौकशी व्हायला हवी.

एका शहरावर अवकळा :
नोटाबंदीमुळे एका शहरावर कशी अवकळा आली आहे ते या बातमीत आहे. आणि ही बातमी टाइम्स ऑव्ह इंडियाची आहे. लोकसत्ता किंवा इंडियन एक्स्प्रेसची नव्हे.
http://timesofindia.indiatimes.com/city/thane/Cash-crunch-sparks-worker-...

१. सरासरी ५५०० माणसांमागे एक एटीम! एका माणसाला ठीकठाक उभे राहायला सुमारे दोन फूट जागा लागत असेल तर रांग पाहिजे सव्वा तीन किलोमीटरची! दिसणार्‍या रांगा आहेत शंभर मीटरच्या. म्हणजे अधिकाधिक १६४ माणसे रांगेत असणार! खरे तर तेवढीही नाहीत.

२. सर्व वाहने रस्त्यावर सुरू, सर्व हॉटेल्स, थेटरे, बार्स, कपड्यांची दुकाने, भाजीपाला, फळे, किराणा, टपर्‍या, सर्व काही चालू.

३. लोकं रस्त्यावर उतरून मारामार्‍या, जाळपोळ करताना दिसत नाहीत. अगदी नेत्यांनी आणि त्यांच्या भक्तांनी फूस लावून पाहिली तरीही!

४. नोटबंदीमुळे उपासमारीने मेलेले अश्या सदरात बातमी नाही.

वरील चारही मुद्दे म्हणजे निखालस थापेबाजी आहे. Wink Happy

सरकारने काही रिकामटेकड्या व बेकार लोकांना प्रतिदिन ५० रुपये या मानधनावर परिस्थिती सुरलीत आहे हे मायाजालावर लिहीण्यासाठी नेमणूक केली आहे असे समजते. डोके लावून लिहीणा-यांणा जास्त देत असावेत.

आता प्लॅस्टीकच्या नोटा आण्णार म्हणे.
जिथे कागदी नोटेवरचा रंग निघतोय.. तिथे प्लॅस्टीकच्या नोटा छापणे कसे असेल Happy पाणी पडले की झाल्या स्वच्छ भारत अभियान

ज्यांना रांगा पहायच्या आहेत त्यांनी आत्ता स्टेट बँकेच्या कुठल्याही एटीएमला (पैसे संपलेले सोडून) भेट द्यावी. आणि जे कुणी रांगा नाहीत म्हणत आहेत ते एकतर गॉन केस किंवा टोल किंवा पक्के बेवडे म्हणून सोडून द्यावेत. अशा लोकांचा दृष्तीकोण कधीच बदलणार नाही. २०१९ सोडा, उत्तर प्रदेशात कानाखाली जाळ निघेल तेव्हां समजेल.

Pages