तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
ती कविता व्हात्सप आलि
ती कविता व्हात्सप आलि
अनिता सांगतेय- डहाणूवरुन काहि
अनिता सांगतेय-
डहाणूवरुन काहि आदिवासी,ठाकर बाया रानभाजा,रानमेवा,चिकू,मध तत्सम किडुकमिडूक घेउन सकाळी नाक्यावर विकायला येतात.दोनेक तासात विकून दोन अडिचशे मिळायचे.जाताना बाजारातून मीठ, मसाला,चहा साखर तेल,आगपेटी,बिडी असे जिन्नस घेउन जायच्या.त्यांच्याकडे मोबाईल नाही. ना बॅंक खाते.हल्ली त्या अगदी दोन पाच रुपयात ही माल विकतात.आता शंभर रुपये सुध्दा सुटत नाहित.त्यांना black money, demonization,corruption,terrorism कळत नाहि.त्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत आणि पोटात भूक.
(अनिता माझ्या सख्ख्या मैत्रिणीची सख्खी मैत्रीण आहे.)
त्यांना कॅशलेस चे फायदे
त्यांना कॅशलेस चे फायदे सांगा. त्यांच्या चेहर्यावर हास्य उमटेल
साती CA, CS अँड कॉस्ट
साती
CA, CS अँड कॉस्ट अकाउंटंट या 3 हि इंस्टिट्यूट्सनी पाठिंबा दिला आहे असे fb वर वाचले,
CS च्या website वर असे काही उल्लेख आठलाले नाहीत.
गंमत चाललीये. स्वतःचे अनुभव
गंमत चाललीये. स्वतःचे अनुभव खोटे आणि परस्परहवाल्याचे खरे.
किमान मी विरोधी लिहीणा-यांच्या अनेक पोस्ट्सना सुरुवातीला तुमचे म्हणणे पटले,तर्कशुद्ध आहे अशा अनेक कमेण्ट्स केल्या. पण त्यांच्याकडून काहीच सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. उलट माझ्या पोस्ट्सचं टायमिंग काय, डॉलर की रुपया या असल्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली. त्याहीपेक्षा यांच्यातलेच एक सदस्य आक्षेपार्ह भाषेत अंगावर धावून आल्यासारखे डाफरत होते ते यांना दिसत नव्हते का ? अॅडमिन यांनी डिलीट केली ती पोस्ट.
आणि हे शांतपणे लिहीलेल्या प्रतिसादांना डाफरणे असे कुठल्याशा गब्बरच्या अड्यावर म्हणतात तरी यांचेच खरे ! आनंद आहे सगळा.
मला आता लेटेस्ट मी कुणाची ड्युआयडी आहे हे जघ्णून घेण्यातही गंमत वाटेनाशी झाली आहे.
अवांतराबद्दल क्षमस्व
एका मिठाईवाल्याला रसगुल्ले
एका मिठाईवाल्याला रसगुल्ले बनवायचे होते. त्याने दुकानाबाहेर बोर्ड लावला. लोक रसगुल्ल्यासाठी जमा झाली. मिठाईवाल्याने त्यांच्याकडून रसगुल्ल्यासाठी पैसे घेतले. आणि आत रसगुल्ला बनवायला गेला.
आत गेल्यानंतर मिठाईवाल्याने दुध घेतले आणि त्यात लिंबाचा रस टाकला. दुध तर फाटले पण त्याचे पनीर बनले नाही. कारण मिठाई वाल्याला पनीर बनवता येतच नव्हते. मग आता काय करायचे विचारात मिठाईवाला बसला.
कारण फाटलेले दुध तर परत जोडता येणार नाही.
पण आपला मिठाईवाला तर अतिहुशार होता. त्याने त्या फाटलेल्या दुधाचे "ताक" बनवले. आणि बाहेर घेऊन आला
"ताजे ताक प्या. गारेगार ताक प्या." म्हणत दुकानासमोर जमा असलेल्या लोकांना ताक वाटू लागला. लोकांना त्याची चालाखी लक्षात आली. "आम्हाला रसगुल्ला हवा. त्यासाठी तु पैसे घेतले" मिठाईवाल्याने बाहेर येऊन "बोर्ड" बदलला रसगुल्ल्याच्या जागी "ताक" लिहिले. आणि लोकांना सांगू लागला.
"मित्रांनो. माझ्या भाऊ बहिनींनो.. रसगुल्ल्यात जी साखर असते ना. त्या साखरेने तुम्हाला भविष्यात मधूमेह होऊ शकतो. तुमचे भविष्य उज्ज्वल बनवण्याकरीता मी त्याग केला आहे आनि त्या फाटलेया दुधाचे पनीर न बनवता तुमच्यासाठी "आरोग्यवर्धक ताक" बनवले आहे. रसगुल्ला सोडा. ताक प्या. मित्रांनो ताक प्या. तुम्ही ही प्या आणि सगळ्यांना ताक प्यायचे फायदे सुध्दा सांगा"
"गो शुगर _ लेस" "ड्रिंक्_ताक" "आरोग्याला अपायकारक रसगुल्ल्याचा त्याग करा"
प्रसादक!
प्रसादक!
सीए लोकांची पोस्ट उडवलेली
सीए लोकांची पोस्ट उडवलेली दिसते
फोटु पाठवलाय तुम्हाला! सी ए
फोटु पाठवलाय तुम्हाला!
सी ए लोकांनी निषेध केल्यावर ती पूर्ण लिंक आणि डायरेक्टीव त्यांच्या साईटवरून काढून टाकलेत.
एकप्रकारे हा अघोषित आणिबाणिला केलेल्या विरोधाचा विजय म्हटला पाहिजे.
आय अॅम प्राऊड ऑफ ऑल सी ए कम्युनिटी.
पण सीए तशीही हुशार जमात आहे.
बाकीच्यांना ही अघोषित आणिबाणी नाकारली पाहिजे हे समजेल तो सुदिन!
http://www.loksatta.com/desh-
http://www.loksatta.com/desh-videsh-news/chartered-accountants-body-warn...
https://web.archive.org/web/2
https://web.archive.org/web/20161209205742/http://icai.org/new_post.html...
डिलीट केलेली पोस्ट आर्काइवमधे.
कॅशलेस इंडीया मे हॉटेल पर
कॅशलेस इंडीया मे हॉटेल पर खाना खाते वक्त सावधनी बरते ... नेटवर्क ना आने पर बरतन धोने पड सकते है..!!
उद्या कुठल्या हॉटेल मधे अशी पाटी दिसू लागली तर जोरात नमो नमो बोला
मुळात दुकान न काढता, सरकारला
मुळात दुकान न काढता, सरकारला एक पैसा न भरता, कसली पावती न देता अशी विक्री करणे बरोबर आहे का? उद्या एखादया डॉक्टरने टोपली घेऊन बसलाआणि वैदयकिय सेवा पुरवल्या किंवा मोबाईल कंपनीने कावडीत फूटपाथवर मोबाईल विकायला ठेवले तर चालेल का? बँकांनी त्यांचे प्रॉडक्ट पाटी आणून विकले तर चालतील का? मुळात दुकान हवीतच कशाला सगळेजण रस्त्यावर सेवा, सुविधा आणि उत्पन्न विकायला बसवू. रस्ता आपलाच आणि सरकार आपण निवडून दिलेले! कोणी आपल्यान पैसे देत घेत का?
बरोबर आहे राजसी तुमचे, घरातली
बरोबर आहे राजसी तुमचे,
घरातली रद्दी विकली तरी महिन्याला 100 रु सुटत असतील,
वर्षाचे 1200 रु चे उत्पन्न तुम्ही रिटर्न मध्ये दाखवता का?
मुळात असे adhoc उत्पन्न आपण स्वीकारलेच नाही पाहिजे,
व्यवस्थित TAN no वगैरे काढून रद्दी विकली पाहिजे
मुळात दुकान न काढता, सरकारला
मुळात दुकान न काढता, सरकारला एक पैसा न भरता, कसली पावती न देता अशी विक्री करणे बरोबर आहे का?
हो... त्या व्यवसायाची गरज असेल तर तात्पुरता स्टॉलच रहाणार.. उदा. पेपरवाला , नाष्टा सेंटर
पावती देणे न देणे सरकारलाही देणेघेणे नसते... आपले नेट प्रॉफिट योग्य दाखवावे इतकीच अपेक्षा असते.
घरातली रद्दी विकली तरी
घरातली रद्दी विकली तरी महिन्याला 100 रु सुटत असतील,
वर्षाचे 1200 रु चे उत्पन्न तुम्ही रिटर्न मध्ये दाखवता का?
रद्दी नसते, इ-पेपर वाचतो.
रद्दी नसते, इ-पेपर वाचतो. (परवाच एका पाहुण्यांना प्रॉब्लेम झाला! बाळाचं used diaper wrap करून फेकायला रद्दी पेपर नाही, tissue पेपर वापरला)
बाकी एखाद्याने पुस्तके, periodicals चे deduction घेतले नाही ( बिल भरूनहि) तर एकूण हिशोब नाही का झाला?
बाकी इथे समाजाबद्दल चर्चा चालू आहे. जे चूक आहे ते चूकच आहे.
नाही होत... पेपरचे डिडक्शन का
नाही होत... पेपरचे डिडक्शन का ? गिर्हाइकासाठी घ्व्तले दाखवणार ?
एखादा financial planner
एखादा financial planner त्याच्या economic टाइम्स / finanacial express चे deduction घेत नसेल म्हणता!
नगरपालिका निवडणुकीच्या
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक पोटे यांच्या मोटारीत दहा लाख रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बोपदेवजवळील हिवरे गावात निवडणूक अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली. या संदर्भात प्राप्तिकर विभागालाही माहिती देण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी एक वाजण्याचा सुमारास चंदेरी रंगाची इनोव्हा (एम एच.१२ एल डी ९९९०) गाडी पकडण्यात आल्याचे गस्ती पथक प्रमुख राजेसाहेब लोंढे यांनी सांगितले आहे. गाडीचे मालक उज्ज्वल गोविंद केसकर,चालक अमोल दिलीप बलकवडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपक अशोक पोटे आणि प्रल्हाद रामभाऊ सायकर हे सर्वजण मोटारीत होते. त्यांना या रकमेचा समाधानकारक खुलासा करता आला न आल्याने प्राप्तिकर विभागाला याची माहिती देण्यात आली.
http://m.maharashtratimes.com/maharashtra/pune-news/kesakar-found-guilty...
पूर्वी अशी कारवाई होत नसे.
पूर्वी अशी कारवाई होत नसे. आता होत असलेल्या अशा प्रकारच्या कारवाईचे स्वागत करायला हवे.
अग्गोबै .. खरे की काय !!!!
अग्गोबै .. खरे की काय !!!! आणि आत्ता सापडतात ते सगळे भाजपावालेच.
बाकी तुमचा बुरखा का सपना पैलेच फट गया है ..
सरासरी ५५०० माणसांमागे एक
सरासरी ५५०० माणसांमागे एक एटीम! एका माणसाला ठीकठाक उभे राहायला सुमारे दोन फूट जागा लागत असेल तर रांग पाहिजे सव्वा तीन किलोमीटरची! दिसणार्या रांगा आहेत शंभर मीटरच्या. म्हणजे अधिकाधिक १६४ माणसे रांगेत असणार! खरे तर तेवढीही नाहीत.
२. सर्व वाहने रस्त्यावर सुरू, सर्व हॉटेल्स, थेटरे, बार्स, कपड्यांची दुकाने, भाजीपाला, फळे, किराणा, टपर्या, सर्व काही चालू.
>>>>>>>>>>> १. काल मी २.३० ते ६.३० एटीम च्या रांगेत होतो, ५० नंबर तरी पुढे असतील. काहीजण सकाळी १०.३० पासून रांगेत होते. जेवणापुरते दुसर्या कुणाला तरी रांगेत थांबवून पुन्हा रांगेत यायचे. शेवटी कंटाळून काही जण निघून गेले, ६.०० वाजता माझा नंबर १०-१२ वा असेल. अखेरीस ६.३० पर्यंत एक छदामही मिळाला नाही. मीही कंटाळुन निघून आलो. तरी माझ्यामागे अजुनही ६०-७० लोक असतील.
२. माझ्या ओळखीचे एक्जण आहेत ज्यांचे हॉटेल आहे. दिवसाकाठी ७ ते ८ हजार होणारा गल्ला २ ते ३ हजारावर आलाय. मी मंडईत एका मावशींकडे नेहमी भाजी घेतो त्याही म्हणाल्या कि खुप कमी गल्ला जमतोय.
आज माझ्याकडे टोट्ल १८ रुपये आहेत. कंपनीत उसने पण देत नाही कुणी, सगळ्यांकडेच कॅश shortage आहे
आबासाहेब. पुण्यात काही
आबासाहेब. पुण्यात काही विशिष्ट ठिकाणी चिक्कार पैसे आहे आणि काही जणांना अवघ्या १० मिनिटांमधे मिळतात. त्यांच्याशी संपर्क साधा व त्यांना "खरी" समाजसेवा करण्यास संधी द्या.
इकडे का अशी दृश्य दिसत
इकडे का अशी दृश्य दिसत नाहियेत?
काल रात्री ९ वाजता आकृती कमर्शियल सेंटरमधली लायनीतली ३ atm चालू होती. प्रत्येकी ५-६ माणसं लायनीत. मी रिक्षात असल्याने कितीच्या नोटा येत आहेत ते विचारलं नाही.
अशी वेगवेगळ्या ठिकाणी अगदी दोन टोकाची परिस्थिती का दिसतेय? नोटा सगळीकडेच पाठवायला हव्यात ना? इकडे एकतर नोटा जास्त पुरवल्या जात असाव्यात किंवा लोकं जास्त प्रमाणात कॅशलेस व्यवहार करत असावीत किंवा दोन्ही गोष्टी होत असाव्यात.
हाल काढणाऱ्यांबद्दल सहानुभूती आहेच.
अश्विनी, स्वानुभव असले तरी ते
अश्विनी, स्वानुभव असले तरी ते गैरसोयीचे असले तरच लिहायचे आहेत. चांगले अनुभव लिहायचे नाहीयेत. चांगले अनुभव आलेल्यांवर ट्रोल्स अॅटॅक करू लागलेले आहेत हे आपण वर पाहात आहोतच.
परवा कॅनेरा बँकेत उभ राहुन
परवा कॅनेरा बँकेत उभ राहुन दोन तासात २४,००० रु कॅश काढलेली. त्या ब्रांचच्या मॅनेजरलाच विचारल दोन दिवस
तुमच बँकेबाहेरच एटीएम बंद दिसत आहे काय कारण आहे ?
तो म्हणाला, एटीएम बंद नसतच, मी दर दिवशी संध्याकाळी ६ वाजता पैसे लोड करतो ९ वाजेपर्यंत संपतात.
का संपतात त्याच उत्तर त्याने दिल की त्याने स्वतः एका बाईला ५ कार्ड घेऊन प्रत्येकी २,००० रु काढताना बघितलय. एक कोटक महिंद्राच, बाकिची ईतर बँके ची पण कॅनेरा बँकेच कार्ड त्या बाईकडे नव्हत. कँनेरा बँक एटीएम मधुन पैसे काढायला चार्ज लावत नाही, बाकिच्या बँका १७ रु चार्ज लावतात. एटीएमच्या आजुबाजुच्यांना माहीत आहे की पैसे संध्याकाळी मिळतात ते येतात आणी घेऊन जातात, दिवसा च्या वेळेला बँकेतुन पैसे घेऊ शकतात.
हे फक्त माहीती साठी दिलेल आहे,
अश्विनी, कालच कोणत्या तरी
अश्विनी, कालच कोणत्या तरी पेपरात वाचले मुंबईच्या निम्मी कॅश दिल्ली/ एनसीआर मध्ये पाठवली जातेय.
Compared to an average of Rs 25 crore, the flow of currency was 60 crore. On Friday large private banks in Mumbai got around Rs 60 crores while it was 25 crore in Delhi.
A leading bank in Delhi received Rs 24 crore against its normal requirement of Rs 125 crore.
हा कालच्या पेपरातला मजकुर आहे. नेहेमीपेक्षा जास्त कार्ड स्वाइप होत असल्याने मशिंन्स हॅंग होणे, ट्रांझॅक्षन फेल्युअर होणे पण वाढले आहे. मी स्वतः ४-५ वेळा हा अनुभव घेतलाय. पेटिएम नी पेमेंट न होण्याचा पण अनुभव घेवून झालाय.
कँनेरा बँक एटीएम मधुन पैसे
कँनेरा बँक एटीएम मधुन पैसे काढायला चार्ज लावत नाही, बाकिच्या बँका १७ रु चार्ज लावतात.>>> सध्या कोणत्याच बॅंका चार्ज लावत नाही आहेत. आरबीआय च्या रुल्स प्रमाणे.
इथे कोणत्याही एटीएममध्ये एकापेक्षा जास्त कार्ड वापरू दिले जात नाही सहसा. अगदी १०-१२ जणच जर रांगेत असतिल तर तसे करू देतात. पण अशी स्थिती मला तरी इथे कधीच दिसली नाहीये.
आता तर कोणत्याही एटीएममध्ये कॅश येण्याच्या वेळा फिक्स राहिल्या नाहीत इथे.
अल्पना, वाटलंच. मुंबई आर्थिक
अल्पना, वाटलंच. मुंबई आर्थिक राजधाyनी म्हणून जास्त येत आहेत का पैसे इकडे?
इकडे एकदाच सिंडिकेट बॅंकेचं atm hang होताना पाहिलं. एकाच माणसाचं कार्ड त्यात घातलं की hang होत होतं ३-४ मिनिटांसाठी. त्याला पैसे काढताच आले नाहित ५-६ वेळा प्रयत्न करून. कार्डात काही problem असावा. बिचाऱ्याकडे दुसरं कार्डही नसावं. मी म्हणूनच दोन कार्ड हातात तयार ठेवते मागच्यांचा खोळंबा नको म्हणून.
Pages