"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माजी पंतप्रधान, अर्थमंत्री, अर्थतज्ञ, डॉ.मनमोहन सिंग यांचा एक लेख

http://www.thehindu.com/opinion/lead/Making-of-a-mammoth-tragedy/article...

मी अजून वाचला नाही आहे, पण इकडे शेअर करतो आहे.

सर्वा त महत्वाचे,

मी आत्ताच लाइनीत उभे राहून पैसे काढून आले. सोम वारी बँका बंद आहेत. तर पैसे काढायचे आसतील चेकने तर आत्ताच आजच काढा. परत वांधे होतील. तीन दिवस. यावेळी लायनीत सहावा नंबर होता. बँकेतली बाई सांगून गेली आधीच. की सेविन्ग मधून सहा हजार का ढता येतील, व करंट मधून १२०००
हे पण रोज नाही. काहीतरी दहा आठ दिवसांचे अंतर हवे दोन विथ ड्रॉ मधे. तरी शंबरचे नोटा नाहीत २००० च्या तीन मिळतील.

फार वैतागले की माझ्यातला नदी पलिकडचा पुणेरी जागृत होतो. म्हणून मग मी प्रकट स्वगत म्हटले की जर तसे असेल तर तीन तीन नोटा लायनीत येउन तुम्हीच द्या. व चेक्स कलेक्ट करा. त्या साठी प्रोसीजर कशाला. ते तुम्ही मागून दिवस भर करत बसा.... वॉचमन मंद हसला. बायका मराठी असल्या तरी समजत नाही असे दाखवतात. बँक कर्मचार्‍यांवर अ‍ॅटॅक् केल्यास जेल व दंड होईल अशीही नोटीस आहे. व जे मिळतात ते घ्यावे म्हणून गप बसले. मागचा माणूस १२००० त काय होईल म्हणून वैतागला होता. तो मॅनेजर बाईशी हुज्जत घालत होता. बँकेतल्या इमान शेख नावाच्या टेलर मुलाने मला न बघता का बघून कोणजाणे दोन गुलाबी व दोन हजार शंबर दिले. मी परत आले.

बँक ऑफ बरोडा जी शेजारीच आहे तिथे २४ के सर्व डिनॉमिनेशन मध्ये देत आहेत. असे कळले. एक लेबर माणूस ५००० चा चेक घेउन आला होता बॉसचा. त्यालाही तेव्ढे मिळाले. लायनीत एक काइंड सोल होता त्याने मला बसायला स्टूल दिले. व स्वत्:शीच रेमिनिस कर त असल्या सारखा म्हणॅ " पाचशेच्या नोटेची खूप आठवण येतेय. चांगली होती नाही का ती?! "

मुलगी वीकांताला येइल तिच्या हातात मला थो डे पैसे ठेवता येतील. प्रश्न संपला. पण लोक वैतागले आहेत हे नक्की. यू कॅन फील इट. बँकेत पोस्टर आहे त्यात चक्क कॅश को भूल जाओ डिजिटल हो जाओ असेच लिहिले आहे. मग गरीबाने काय करायचे?!!

मी टेलर पाशी वाट बघताना पोस्टर रीडिझाइन केले.
बँक अपनी मुठ्ठी मे : खरे तर आप बँक की मुठ्ठी मे.
टॉक टू आव र स्टाफ : डोंट टॉक टु अवर स्टाफ

वी अन्डर स्टँड युअर नीड्सः वी मिस अंडर स्टँड युअर नीड्स.

लेबर, नोकरदार, उद्योजक एव्हरी सिंगल सेक्टर इज पिस्ड ऑफ. हे लक्षात येत नसेल तो माणू स नक्की मिडवेस्ट मध्ये राहात असेल. यॉ"ल. Wink

सहा हजार चार दिवसांपूर्वी घेतले. तीन नोटा मिळाल्या.
पाचशेची नोटच नसल्याने कुणी घेत नाही. पडून आहेत. बिनकामाची नोट आहे.

http://economictimes.indiatimes.com/industry/auto/news/industry/demoneti...

फॅक्ट री कमी कपॅसिटी वर चालवाव्या लागत आहेत. हे ही एक वेगळे नुकसान असते कारण इतर ओवर हेड तेवढेच असतात पण आउट पुट कमी. ह्याचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे जे काँट्रॅक्ट लेबर हायर केले जाते, रोजीच्या भावाने त्यांना काम मिळत नाही. फेक्टरीत येउन हात हलवत बसावे लागते. एक टाइपचा जॉब शिकून त्यात थोडे प्राविण्य मिळवलेले असते त्यामुळे दुसरी कडे लगेच जॉब मिळत नाही. जर प्रॉडक्षन बंद झाले तर रोजचे कॅश पे आउट मिळत नाही. हा पॅटर्न सर्व मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये आहे.
मला घरी कॅश आहे. एटी एम मधून मिळते आहे म्हणून हा प्रश्न सुटला असे होत नाही. कंप्लीट इकॉनॉमीचा रथ जो आतापरेन्त स्वतःच्या जोरावर चालला होता. त्याच्या स्पीड ला खीळ बसली आहे व त्याचे परिणाम दूरगामी आहेत.

अमा,
तुम्ही काटकसर शिका, लेकीलाही शिकवा.

खरं तर अर्धकुशल कामगारवर्गानेही काटकसर शिकायला हवी.
दररोज अर्धी भाकरी खात असतील तर पाव भाकरी खायला हवी.

गैरसोय असं काही नसतंच हो.
देशासाठी इतकं तर करायला हवंच.

अय्यो साती मेरा तो काट कसर का धागा बी है. इदरिच. उप्पर लाती देख. रु बाळासारखेच मला देखील रांगेत उभे कसे राहावे, उभे राहून काय उद्योग करावे असा धागा काढावे असे वाटू लागले आहे.

या सगळ्या असंतोषाचा उद्रेक होईल, अशी भिती वाटतेय मला. लोकांच्या सहनशक्तीला मर्यादा असतातच. आपण इथे मजेने लिहितोय खरे पण अनेकांच्या पोटावरच पाय पडला आहे.

दिनेश,

तुम्ही "दंगे घडवून आणणार्‍या" लोकांसारखे बोलत आहात काय? Wink सांभाळा!
गेस्टापो पकडून नेतील नाहीतर...

रु पे कार्ड कुठली बँक देते?
आपल्या एक्जिस्टींग कार्डला रु पे कार्ड करून घेता येतं का?

मला कालच मिळालेले आय सी आय सी आय बँकेचे माझेच ए टी एम कम डेबिट कार्ड 'रु पे' चे आहे.

आधीचे कार्ड नुसतेच ए टी एम कार्ड होते म्हणून बदलून घेतले, आता खरेद्या करता येतात का पाहू.

१०% लोकांचा असंतोष कितीसा मोठा असेल? ९०% लोक नोटबंदीच्या समर्थनात आहे.

भारतात ३१% लोक इंटरनेट वापरतात त्यातील २५% लोकांचा दैनिक वापर आहे. या २५% पैकी १९% लोकांच्या मोबाईल मधे नेट आहे. १९% पैकी अवघे ८% लोकांनी नमो अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड केले आणि ८% पैकी ५% लोकांनी मतदानात भाग घेतला होता.

आता इतक्या प्रचंड संख्येने लोकांनी नोटबंदीच्या समर्थनात मतदान केले आहे, तर असंतोष उफळणार कुठे ?

आधीचे कार्ड नुसतेच ए टी एम कार्ड होते म्हणून बदलून घेतले, आता खरेद्या करता येतात का पाहू.------ अकाउंट मध्ये बॅलन्स हवा आणि विक्रेत्याकडे swiping machine हवे. ते कार्ड पॉकेट्सला किंवा upi ला attach करुन without swipe पण वापरता येईल.

सहसा डेबिट कार्ड visa / master / maestro नी issue केलेली असतात. Rupay भारतीय आहे. अजून त्यांचं international debit card आलेले नाही, बहुतेक.

जसे mastercard . visa card आहे तसे भारत सरकारने RUPAY डोमेस्टिक लेवल वर वापर होण्यासाठी कार्ड आणले आहे (२०१२ पासून)

अकाउंट मध्ये बॅलन्स हवा >>>

राजसी - कितीही कुंथले तरी हव्या तितक्या नोटा निघतच नाहीत त्यामुळे बॅलन्सच बॅलन्स!

८ नोव्हेंबरला बातमी कळल्यावर पटकन् एटीएममध्ये जाऊन चारशे रुपये काढले आणि ११ तारखेला एका ए टी एम मध्ये सहज मिळत होते म्हणून २००० रुपये काढले. त्यानंतर आजतागायत ए टी एम मध्ये गेलो नाही. बँकेतून चार वेळा पैसे काढले, सर्व दोन हजाराच्या नोटा मिळाल्या. एकुण बारा हजार काढले. प्रत्येक विथड्रॉलला सुमारे दहा मिनिटे लागली. प्रत्येक नोटेचे कोणत्या ना कोणत्या दुकानदाराने त्वरीत सुटटे दिले. सर्वांचे पगार चेकने केले. सर्वांनी चेक आनंदाने स्वीकारले. क्रेडिट कार्डवर किराणा भरला.

रविवार पेठेत काही ठिकाणी १५ तारखेपर्यंत जुन्या नोटा घेणार आहेत. कोणाला गरज भासली तर मला विपू करावीत.

हे स्वतःचे अनुभव लिहिलेले आहेत. स्वानुभव लिहायला येथे परवानगी असेल अशी आशा आहे. धन्यवाद.

बँकेत जाऊन ३ तास लाईन मधे उभे राहून ६०-७० हजार जुन्या नोटा भरून टाकल्या. सोबत पॅनकार्ड. आधारकार्ड. दिले. पैसे भरण्याच्या स्लीप बरोबर अजुन १ फॉर्म भरून द्यावा लागला. आधारकार्ड च्या झेरॉक्स वर फोटो काळवंडला होता स्वाक्षरी करणार्‍याने ओरिजनल कार्ड मागितले. ते ही दाखवले. फोटो बरोबर नाही म्हणून रिजेक्ट केले. दुसरे आयडी प्रुफ दाखवा ऑर्डर आली. पॅनकार्ड ओरिजनल दिले. "हा तुमचाच फोटो का?" म्हणून विचारणा झाली. "एका मिशी मुळे माझ्या चेहर्‍यात इतका फरक पडतो हे पहिल्यांदाच मला कळले" तरी बरं पासपोर्टचा फोटो मोबाईल मधे ठेवला होता. तो लगेच काढून दाखवला. "आपण यांना पाहिलेत का?" च्या धर्तीवर "आपण मला ओळखलात का?" अशी विनंती करावी लागली. तुच्छतेने कटाक्ष टाकून झेरॉक्सवर साहेबांनी स्वाक्षरी केली आणि पुढच्या लाईनीत उभे राहून पैसे भरा अशी दुसरी ऑर्डर केली. तिथून निघून दुसर्‍या लाईनीमधे उभे रहावे लागले. अर्ध्यावर नंबर आल्यावर समोरचा कर्मचारी लंच टाईम म्हणून निघून गेला. अर्थात त्याच्या जागी दुसरे कोणी आले नाही आणि आम्ही अपेक्षा ही केली नाही. शेवटी ती सुध्दा माणसे आहे म्हणुन पोटात ओरडणार्‍या कावळ्यांकडे दुर्लक्ष केले. ३० मिनिटांच्या लंच टाईम नंतर १० मिनिट पान सुपारी पानी इ. सुध्दा येतात असे समजून ४० मिनिटांनी कर्मचारी जागेवर आले. नंबर लागल्यावर पैसे भरून स्लिप वर शिक्का मारून दिला. मनात देशभक्ती दाटून डोळ्यांच्या कडा पाणावल्या. विजयी झाल्याचा साक्षात्कार झाला. आनंदी मनाने बँकेच्या बाहेर पडलो. आता सगळ कॅशलेसच करायचे असे मनात ठरवून घरी जाऊ लागलो. रस्त्यात पोटातल्या कावळ्यांनी आता ओरडणे सोडून चोची मारायला लागले.
असे ही घरी जाऊन जेवायचेच आहे. म्हणून थोड्या अंतरावर वडापावाच्या गाडीवर एक वडापाव खाऊ तात्पुरता आराम मिळेल विचार केला. वडापाव खाल्यानंतर आठवले "कॅशलेस" लगेच त्याच्या कडे स्वाईप मशिन मागितली.
त्याने कॅलक्युलेटर काढून काहीतरी बटने दाबली. नंतर स्वाईपमशीन पुढे केले. "१३.५० झाले" म्हणाला. मी समोरची पाटी बघितली. वडापाव समोर १० रुपये असे स्पष्ट लिहिले होते. त्याला इशार्‍याने दाखवले. "आपल्यासारख्यांकरीता येगळी किंमत हाय साहेब. टॅक्स जोडून दिले. तुम्ही बटन दाबा" मनात विचार आला कि १० रुपयात काळ्या पैसे वाल्यांना वडापाव चारणार्‍याने माझ्यासारख्या व्हाईट कॉलर व्हाईट मनी वाल्याकडून ३.५० रुपये जास्त घेतले. पण देशासाठी ३.५० रुपये जात आहे बघून अभिमान दाटून आला. "तु भी क्या याद रखेगा किस देशभक्तो से पाला पडा है" असे मनात बोलून एंटरचे बटन जोरात दाबले.
तिकडून वडापाव खाल्यावर रिक्षाला आवाज दिला. "अमुक नगर चलो" बोलल्यावर रिक्षावाल्याने "पेटीएम है?" विचारले. चीन वर दिवाळीत बहिष्कार टाकलेला तर आता चीनची भागीदारी असणार्‍या कंपनीचे अ‍ॅप्लिकेशन का म्हणून घ्यावे? मी सरळ नाही म्हणालो. माझ्याकडे UPI म्हणालो. त्यानेच पैसे देईन. "ते बरोबर चालत नाही. तुम्हाला पेटीएम करायचे तर करा नाही तर रोख द्या. असे ही २० रुपये होतील" थोडा विचार केला. उगाच ५-६किमी चालत जाण्यापेक्षा आतापुरते कॅशलेस बाजूला ठेवूया. घराजवळ पोहचल्यावर २० ची नोट दिली आणि मनात निश्चय केला. "ही शेवटची नोट खिशातून गेली. आता कॅशलेस म्हणजे कॅशलेसच"
घरी गेल्यावर सपाटून भुक लागली होती. समोर ताट आल्यावर दोडका. आणि भेंडी ची भाजी बघून पोटातल्या कावळ्यांनी काव काव करत मलाच शिव्या दिल्या. अन्न हे पुर्णब्रह्म . ताटात आलेले सगळे खायचे अशी ऑर्डर मोठ्या आवाजात ऐकल्याने गपगार खावे लागले. जेवन झाल्यानंतर घरातल्या लेडी मिनिस्टरनी एक लिस्ट सोपवली "संध्याकाळी घेऊन या आणि सुवर्णाचा पगार देऊन ठेवा."
"अग पण सुवर्णाला चेक देता येईल ना. २००० तर आहे" असे बोलत माझी कॅशलेसचे घोडे पुन्हा चालवायला सुरुवात केली.
" तुम्ही गप बसा हो. १००० आधीच तिने घेतले होते त्यात तिच्या दांड्या ७०० रुपयाचा काय ती चेक घेणार आहे. ? उगाच आपले काही."
" हो पण ७०० तर ७०० त्यात काय. कॅशलेस जितके वापरू तितके आपल्या देशासाठी चांगले आहे. त्याने किती फायदे होतात.."
"ते फायदे ठेवा तुमच्याजवळ.. उद्या ती काम सोडून गेली तर माझी मदत तुम्ही करणार आहे का? ५ दिवसांपासून किचन च्या फॅनचे बघा बोलली तर लक्ष नाही"
" मी करणारच होतो. "
"तुम्ही पैसे द्या . मी करून घेते स्वतः" शेवटची फायनल ऑर्डर ऐकल्यावर मुकाट्याने १०० च्या ७ नोटा आणि फॅन दुरुस्तीचे २०० असे ९ नोटा " या वेळी शेवटच्या" म्हणत तिच्या हातावर ठेवल्या. आणि झोपायला गेलो.

हे स्वतःचे अनुभव आहे. स्व अनुभव लिहायला परवानगी आहे ना?

आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून रांगेत उभी होते. पण माझा नंबर आला नाही. साडेदहा वाजताच मला सांगितले कि आज तुम्हाला पैसे मिळू शकणार नाही. मंगळवारी या. तर गेल्या महिन्याभरात तिन वेळा उघडे दिसले. मेन मार्केटात १०-१२ बॅंका आणि एटिएम च्या मध्ये घर आहे पण गेल्या महिना भरात १० हजार पण काढू शकलो नाही आहोत आम्ही. दोन कामवाल्यांपैकी एकीला गेल्या महिन्यातला ॲडव्हांस कापून २००० द्यायचे होते त्यातले फक्त १००० दिलेत. उरलेल्या किमतीचा किराणा किंवा वाणसामान भरून द्यायला मी तयार असले तरी ती तयार नाही. त्यामुळे उरलेले अजून थोडे पैसे हातात आल्याशिवाय देता येणार नाहीत. दुसरीची परिक्षा फी ऑनलाईन भरून दिली पगाराऐवजी. ड्रायव्हर काकांचा पगार तसाही बॅंकेतच होतो नेहेमी. पण त्यांना बॅंकेतून पैसे काढता न आल्याने १००० रुपये त्यांनाही दिले. बास्केटबॉल कोचला या महिन्यात अजून फी दिली नाही.

जिथे जिथे पेटीएम चालू शकते तिथे त्याचा वापर करतेय. बऱ्याच वेळा स्वाइपमशिनवर १०० रुपयांएवढं फुटकळ बील पण भरतेय. गेल्या महिनाभरात हातात पैसे नसल्याने नेहेमीच्या एक चतुर्थांश फळं खरेदी केलीत. भर बाजारात रहात असल्याने ऑनलाईन भाजी/ फळं खरेदीची सवय नाही. पण आता ती लावावी लागेल असं दिसत आहे. रोज ताज्या भाज्या घ्यायची सवय होती. आता कार्ड चालेल अशा ग्रोसरी स्टोअरमधून संध्याकाळी मरगळलेल्या भाज्या घेतेय.

काल मुलाला शाळेसाठी काही स्टेशनरी/ रंग इ घेतले. तिथे पेटिएम होते म्हणून ३५० चे सामान घेतले. सहा वेळा तो कोड स्कॅन करूनही पेमेंट करता आलं नाही. मोबाईल नंबर घालूनही काही उपयोग झाला नाही. शेवटी कॅश द्यावी लागली. मुलाला रेवडी/ गज्जक/ मुंगफलीपट्टी घ्यायला ७० रुपये कॅश लागेल म्हणून नको म्हणाले होते.

मुलाला रेवडी/ गज्जक/ मुंगफलीपट्टी घ्यायला ७० रुपये कॅश लागेल म्हणून नको म्हणाले होते.>>>>> Uhoh सिरीयसली? खरंच खुप वाईट.

मला स्वतःला काहीही अडचणी येत नाहीयेत. पण खरंच हे सगळं वाचुन टेन्शन येतंय.

गेल्या महिनाभरात जितके पैसे काढले त्यातले निम्मे कामवाल्या/ ड्रायव्हर यांना आधी गेल्या महिन्यात ॲडव्हांस आणि या महिन्याचा थोडा पगार यातच संपले. नऊ हजार होते... गेल्या आठ तारखेपासून आजपर्यंत यांना दिलेले सोडल्यास पाच हजारात भाज्या/ दुध / इस्त्रीवाला आणि इतर चिल्लर खर्च करतेय. इतका हेल्पलेसपणा आत्तापर्यंत कधीच जाणवला नव्हता.
आमचा दुध/ दही/ पनीर असा खर्चच महिन्याला तिन हजाराच्या वर असायचा. रोज चालून/ पळून परत येताना दुध आणायचो. रोजचे रोज पैसे द्यायचो. आता गेल्या आठवड्यापासून एक दिवसाआड दोन दिवसांचे दुध आणतेय दुसरीकडून कारण तो १०० रुपये बील झाले तर पेटीएम ॲक्सेप्ट करतो.

ही खूप मोठी गैरसोय नसेलही. पण आमचं रोजचं आयुष्य पर्समध्ये किती पैसे आहेत आणि आजतरी एटीएममधून पैसे मिळतिल का आणि बॅंकेत जाण्यासाठी सुट्टी घ्यायचीये याभोवती फिरत आहे. वाढदिवस / ॲनिव्हर्सरी यांचे या महिन्यातले छोटे छोटे सेलिब्रेशन, फुलं आणनं असलं काही नाही केलं.
ही एका मध्यमवर्गीय किंवा हवं तर उच्च मध्यवर्गीय घरातली स्थिती आहे जिथे एरवीसुद्धा सगळी युटिलिटी बील , किराणा, पेट्रोल यासाठी कॅशलेस ट्रॅंझॅक्षन्स व्हायची.

सिरीयसली? खरंच खुप वाईट.>> अगं दिड हजारच कॅश आहे हातात. इतक्यांदा प्रयत्न करूनही पैसे काढता न आल्याने हे पैसे जमेल तितक्या दिवस पुरवायचे हेच डोक्यात येतं.

Pages