काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच. ह्या सगळ्या सिरेलीतली कपट कारस्थानानी वागणार्‍या माणसांचा जितका राग येत नाही तितकी ही अतिचांगली, अतिसोशिकपणाचा ओव्हरडोस होउन ओकारी आणणारी माणसं डोक्यात जातात. Angry

खरंच. ह्या सगळ्या सिरेलीतली कपट कारस्थानानी वागणार्‍या माणसांचा जितका राग येत नाही तितकी ही अतिचांगली, अतिसोशिकपणाचा ओव्हरडोस होउन ओकारी आणणारी माणसं डोक्यात जातात. राग>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> स ह म त ....................

हो ना. मोजो काय हार मानुन गावाला गेले. शुगो काय सहनशीलतेची मुर्ती. गौरी आदर्श सुन, वेणु मितुला सोडुन आजीबरोबर काय फिरतोय, शिव नवीन लग्नाच्या बायकोला सोडुन हेरगिरी करतोय. काहिही!

झी वर फिजिकल गोष्टींना काहिच महत्व नाहिये..
म्हणजे फिजिकल रिलेशन चा मोह टाळला तर माणुस एकदम महान होउन जातो
नवं लग्न झाल असताना.. असल्या भानगडी कोण करत बसेल..

परवाच्या भागात ऑलरेडी वेणूने गौरी ला सांगितलं ना फोनवर? नवीन घर दिलं अप्पाने म्हणून? मग ती घटना आजच्या एपिसोडमध्ये कशी घडली Uhoh

ह्या सिरियलमुळे माझ्या साबांना "सगळ्या सुना अश्याच स्वार्थी आणि लबाड" असं वाटायला लागलंय बहुतेक.. जसे बालमनावर वाईट परिणाम करणाऱ्या मालिका असतात तशी हि वृद्ध मनावर वाईट परिणाम करणारी मालिका आहे.

हुशार शत्रूपेक्षा मूर्ख मित्र अधिक धोकादायक असतो या म्हणीवरून वेणूचं कॅरॅक्टर बेतलंय. मालिकेच्या सुरुवातीपासून तो तेच करत आलाय. -शिवच्या अडचणींत भर घालणं.

असं ते वेणूच पात्र इतकं वेडं का दाखवलय तेच कळत नाही , बरं तो वेणू चांगला एमार दाखवलाय. म्हणजे बरी हुशारी असलेला माणूस लागतो मार्केटींग मध्ये.

काहीही दाकहवलय...

अप्पाने चक्क घर दिलं फुकट आणि ते कसं लिगल आहे आणि अप्पा कसा आता सुधारणार आहे आणि नातं मिळाल' वगैरे डोक्यात जाणार्या अनरीयलिस्टीक गोष्टी ते ही आजच्या काळात.

अहो निशासारखी कपटी बाई सासरी माझा छळ करता अशी पोलीसात तक्रार करु शकते हे शुगोंना माहीत असेल. त्यामुळे संभाळुन घेत असतील>>>>

केपी, त्या शिरेलचा लेखक मायबोली वाचत असेल तर नक्की आता कहानी में ट्विस्ट येणार बघ तुझ्या ह्या वाक्यामुळे! Wink

अप्पाने चक्क घर दिलं फुकट आणि ते कसं लिगल आहे आणि अप्पा कसा आता सुधारणार आहे आणि नातं मिळाल' वगैरे डोक्यात जाणार्या अनरीयलिस्टीक गोष्टी ते ही आजच्या काळात. ... Happy
यांनी पैसे परत केले ना...आता ते जुनं घर तर ऑलरेडी विकलंय म्हणे...सो नवीन फ्लॅट!
गवरी म्हणे...."जे (महान) काम करायला तू तिकडे गेला आहेस त्या बद्दल मी आयुष्य भरही वाट पहायला तयारे...."...काहीही आचरट डायलॉग! तो काय युद्ध भूमीवर गेलाय का?

यांनी पैसे परत केले ना...आता ते जुनं घर तर ऑलरेडी विकलंय म्हणे...सो नवीन फ्लॅट!>> भाड्याणे शुटींगकरता घेतलेल्या बिल्डीगव फ्लॅटचे काँट्रक्ट संपले असेल. मग बदला घर. सिंपल आहे. आता पुढचे ११ महिने तरी संपत नाही शिरेल. Proud

हायला त्या जुन्या नोटा तर खोलीभर पडल्यात त्या आप्पाकडे आणि त्यात ही सत्तर लाखाची भर कस काय म्हणे तो हे सगळ लिगलाईज करणार? आणि मी सुधारलोय, लिगल गोष्टी करुन फुकट फ्लॅट.
आहे का असा कुणी अप्पा मला त्याला भेटायचय नक्कीच Wink

नोटाबंदीमुळे काळा पैसा असलेल्या कोणाचं धाबं दणाणलं असेल तर ती फक्त निशा.
काळ्या पैशातून *म्हणजे जुन्या नोटांतून) गरीब कल्याण योजनेचं पहिलं गिर्‍हाईक आप्पा.

आणि मोजोंनी असं काय इंप्रेस केलं आप्पाला? की तो घर द्यायला निघाला काँप्लिमॅटरी!

इतपत चांगले तर सगळेच लोक असतात की !

तुम्ही मालिका बघता का?

मागच्या वेळी अप्पाने त्याला सांगितलेलं की तुमच्या सुनेनं तुम्हाला फसवलंय, तिला पोलिसात द्या. इत्यादी.
त्यावर कशीही असली तरी ती माझी सून आहे असं सांगितलं.

त्याआधी शिव गौरी आलेले आणि आम्ही ७० लाख परत करतो असं म्हणालेले. वर हे बाबांना सांगू नका, कारण घर गेलंय हे बाबांनी आमच्यापासून लपवलंय.इत्यादी.

तेव्हा खुष होऊन अप्पाने सावंतांना ते घर भाड्याने दिलं असं सागितलेलं.

आहे का असा कुणी अप्पा मला त्याला भेटायचय नक्कीच >> शुके आहेत का असे कचर्‍यातले ७० लाख. तरच आप्पा नविन फ्लॅट देतो.

आजच्या मटाला बातमी आहे की सायली संजीव मनोरंजन क्षेत्रात काम करते म्हणुन तिला एका सोसायटीने, तेही फिल्मसिटीरोडवरच्या, विकत देण्यास नकार दिलाय.

आजच्या मटाला बातमी आहे की सायली संजीव मनोरंजन क्षेत्रात काम करते म्हणुन तिला एका सोसायटीने, तेही फिल्मसिटीरोडवरच्या, विकत देण्यास नकार दिलाय>> थंडाक्काचा थंद अभियन बघीतला असेल कदाचीत त्यान्नी Proud

>>>>जसे बालमनावर वाईट परिणाम करणाऱ्या मालिका असतात तशी हि वृद्ध मनावर वाईट परिणाम करणारी मालिका आहे.-----

सहमत. ईथे निशा वाईट. मानबो मध्ये समिधा वाईट, खुकखु मध्ये मोनिका वाईट. सुनांना वाईट दिवस येणार.

हिंदी फिल्म / सिरियल्ची कॉपि ... ती पण फालतु..इकडे मारे गौरी मुंबईची मुलगी म्हणुन फिरत होती..
आणि पसायदान कोण म्हणत अस उठल्या उठल्या.. आपल्याकडे अशी प्रथा अस्ल्यासारख दाखवत आहेत..

शिव मुंबई किंवा बनारस सेम वागतो.. गौरी मुंबईला गेली की वेगळी वागते उद्धट आणि बनारसला आली की वेगळीच मुलगी असल्यासारखी वागते.. अ‍ॅक्च्युली ती आहे तशी इथे बनारसमधे सांभळुन घेत आहे हे
दाखवायला पाहिजे ... पसाय्दान म्हणणार्या गौरी कडे बघवत नाहिये..

Happy
खरंय आनंदी....पसाय दान असं कुणीही उठल्यावर नाहून म्हणत नाही! महाराष्ट्राची प्रथा म्हणे!

आणि ती खरं तर अतिशय बेसुर गाते...हे कुणीतरी प्लेबॅक दिलंय!

पसायदान म्हणतांना शून्य भाव असलेल्या गवरीकडे पहावत नाही हेच खरे!

पसायदान कोण म्हणत अस उठल्या उठल्या.. >>>>> कोणत्या वेळी म्हणतात?

पसायदान म्हणतांना शून्य भाव असलेल्या गवरीकडे पहावत नाही हेच खरे!>>> +१. पण पसायदान म्हणताना काय एक्सप्रेशन असायला हवेत चेहर्‍यावर? इथे तर आधीच आनंद

Pages