काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गवरीला नाकातली रिंग मस्तं दिसते. आता ती टिपीकल तिकड्चीच दिसते. मुंबईत एकदम निस्तेज दिसायची. हा गेटअप जरा खुलवतो तरी तिला.

आता बदलेल गेटप. सुती साड्या नेसेल.

अंदाज केल्यापेक्षा वेगळंच घडतंय. हम्माने गौरीचा छळ करायच्या ऐवजी दादी, शिव, बाबूजी आणि मजनूचाचा मिळून हम्माचाच छळ करताहेत.

निशा आणि आजीचा पोरखेळ चाललाय.

>>>अंदाज केल्यापेक्षा वेगळंच घडतंय. हम्माने गौरीचा छळ करायच्या ऐवजी दादी, शिव, बाबूजी आणि मजनूचाचा मिळून हम्माचाच छळ करताहेत. ---

हो ना. हम्मा बिच्चारी वाटते कधीकधी.

बादवे, सावंतांचे नवीन घर म्हणजे सेट आहे ना (जुने घर खरे वाटायचे). खिडकी, दाराबाहेर खोट्या ईमारती दिसतात. आणी असे एक पायरी उतरुन मग घर पहिल्यांदाच पाहिले. काहीतरी विचित्र रचना आहे.

अग काही जणींना येत असेल . चालतंय
आणि काही तरी प्रसंग नको का हम्माला सगळ्यांनी मिळून छळायला Wink

शिव परत आवडाय्ला लागलाय Happy

गौरी जरा जास्तच दुर्लक्ष करतेय बिचार्याकडे .
बरोबर म्हणतोय तो , त्या भारी साड्यामध्ये ती अम्माची सून दिसते , त्याची गौरी नाही .

परवा अम्मा म्हणाल्या साड्या आश्रमात दिल्यात तर कसा रागाने बघत होता

गवरी अगदी बथ्थड पणे..."शिव, अरे काय हे...नको....घरचे काय म्हणतील..."..असं निर्जीव पणे बोलत राहते.
एक्सप्रेशन्स च्या नावाने बोंब!

>>>>>
एखादा नवरा इतका सपोर्ट करतोय हिला काहीच नाही त्याचे... दुर्लक्ष करते त्याच्याकडे अरेरे<<<<

ती त्या कजाग सासूमुळे करत आसेल.

बनारस मध्ये गजरे घालणे वाईट समजतात?

खरे तर हि सिरियल बंद केल्ले पाहिजे. आता दाकहवण्यासारखं काही नाहीच आहे.

नवरा गजरा घालतोय आणि हिला नीट लाजता पण येत नाही. म्हणतात ना दैव देतं आणि कर्म नेतं.
शिव सारखा इतका चांगला अभिनेता (निदान शिरेलित तरी) नवरा म्हणून लाभला असताना साधा लाजण्याचा अभिनय करता येत नाही तिला, बाकी कुणी असती तरी अभिनयच करावा लागला नसता, आपोआपच गालावर लालीबिली आली असती नायिकेच्या.

आणि ही सरला येडछाप... गौरीची नक्कल करायला जाते पण तिची शक्कल बिघडते. इतकी माठ आहे की घरचे चिडलेत हे ही बिचारिच्या लक्षात येत नाहिये.

निशा वहिनीचं अजूनच काही निराळं सुरु आहे.

चॅनेल खूप खुश आहे ह्या मालिकेवर. हनिमून स्वित्झर्लंडमध्ये शिव-गौरीचा. वीणा वर्ल्ड sponcerer बहुतेक. लकी आहेत ब्वा. आत्ताच प्रोमो बघितला. याचा अर्थ TRP चांगला आहे अजूनही मालिकेचा. उगाच channel किंवा वीणा वर्ल्ड इतका खर्च नाही करणार दोघांवर.

सुजा, रात्री सर्फींग करताना तो गॅरी-राधिका शॉट दिसला मानबा चा. तो बायकोला तडातडा बोलतो म्हणून बघत होते मग add आल्या तेव्हा कादीप चा प्रोमो दाखवला.

हो प्रोमो मी पण पाहिला. बरंय की गौरीचं. या आधी कुठली नटी (मराठी चॅनलवाली) परदेशात गेली नसेल सिरियल च्या निमित्ताने.
आता हे फॅड येणार शिरेलित. सोनीवर पण बेहद चा प्रोमो पाहिला/का कहानी अबतक मध्ये पाहिलं की तो अर्जुन कुठल्याश्या बेटावर गेलाय एकटाच आणि ही त्याला वाचवायला गेली ते पण एकटंच... टायटल होतं मॉरिशस स्पेशल.
आता डेस्टिनेशन स्पेशल चे खूळ येणार प्रत्येक चॅनल्वर.

येवढं सुंदर स्वित्झर्लंड आणि गौरीचे एक्ष्प्रेशन्स ..नाही बघवणार..
शिव साठी..बघाव आपलं.

खरतर स्टोरी अजुन आहेच की.. की महाराष्ट्रियन मुलगी बनारसला जाउन कशी रहाते ई.
नवखेपणं.. दोघांच फुलणारं नातं..
स्वत्व न गमवता.. तिथल्या लोकांशी जुळवुन घेणे.. बरच काही दखवु शकतात..
इथे बोरिंग किचन पॉलिटिक्स सुरु झाल आहे ..

ते ही ओके वाटलं असतं जर गौरी बरा अभिनय करत अस्ती तर....
शिव येवढा जिव ओतुन प्रेम करतो आणि ही अजुन '' काय करतोयस शिव वरच आहे ''

गौरी दिसायला छान आहे पण अभिनय 0 अजूनही, असं इथल्या पोस्टी वाचून वाटतं. पण नशीब जोरदार त्या सायलीचं, इतक्या छान हिरोबरोबर काम, आजूबाजूला दिग्गज. झी चं award. आता स्वित्झर्लंड. सॉलिड आहे सगळं.

बरोबर ग अंजु. यालाच म्हणतात नशीब . नशीब -नशीब म्हणजे दुसरं काय ? पहिलीच मालिका. पहिल्यांदीच आल्या आल्या बेस्ट नायिकेचं अवॉर्ड / बेस्ट बहीण -भाऊ आणि काय काय अवॉर्ड्स .पहिल्याच सिरियल मध्ये परदेशात जायची संधी . अगदी स्वित्झर्लंड ? बर गुणवत्ता काय अभिनयाची? तर थंड शून्य पण नशीब आहे ना . वरच्याची साथ असली कि काहीही होत नाहीतर भले भले गुणवत्ता वाले रखडतात Happy

श्या.. काल काहीतरी वडापाव रिलेटेड संवाद कानावर पडले मी दुसर्‍या खोलीत असतांना..
तेव्हा वाटलं कि मुंबईतच उरकुन आले हनीमून. असो.

शिवने मुंबैहून सगळ्यांसाठी वडापाव आणले. दादीने गंगाजल शिंपडून आणि वतु लसीदल ठेवून वडापाव खाल्ला. हम्माला वडापाव खूप आवडतो आणि हे गवरीला माहीत आहे.

माझे भाउ-वहिनी , मुम्बई हून दुबई ला परत जाताना त्यान्च्या मित्र परिवारासाठी वडापाव घेउन जायचे ते आठवलं .

दादीने गंगाजल शिंपडून आणि वतु लसीदल ठेवून वडापाव खाल्ला. >>> म्हणजे तो ताजा झाला का ?
शिव ऑफिसमधून घरी आला की गंगाजल शिंपडतात , .कितीशे किमी वरून आलेला वडापाव बरा चालला ? . किन्वा शिव ने निघता निघता घेतला असेल . ४-५ तासात काही शिळा होत नाही .

Pages