काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता गौरी किती चांगली आहे ह्यचे प्रसंग आणि तिर्हे मुंबईत शिव किती चांगला आगे ह्यचे प्र्देशन.

शिव मुंबईत नवा असतो तेव्हा भाषेच्या, खाण्यापिण्याच्या भिन्न सवयींच्या थोड्या तरी गमतीजमती दाखवल्या होत्या. तश्याच गौरी तिकडे गेल्यानंतरच्याही दाखवल्या असत्या तर जरा मजा आली असती. प्रोमोमधे `दूधी नहीं, लौकी' दाखवलंही होतं. अम्माचा दु:स्वासही तसा दाखवता आला असताच की.

लले, काल दाखवल की अम्मा तिला सांगते की तुझा वेळ जात नसेल तर चावल चुनके रखना. गौरीच्या चेहर्‍यावर नेहमीप्रमाणे काहीच भाव नाहीत. मग ती विचारते म्हणजे निवडु ना?
तर अम्मा म्हणते हां हां चुनके रखना

स्मिता, कुठली सिरियल सेन्सिबल काय दाखवते ग? Lol शेंडा ना बुडखा, जो तो स्वतःला रुचेल्/जमेल तसे स्क्रिप्ट लिहितो आणि हे सगळे आंढळेपणाने डिलिव्हर करतात डॉयलॉग.

जो तो स्वतःला रुचेल्/जमेल तसे स्क्रिप्ट लिहितो >>>> हो पण काय तरी कॉमन सेन्सच्या गोष्टी, ज्या तुझ्यामाझ्या लक्षात येतात त्याही नसाव्यात?

का त्या लेखकुच्या / दिरेक्टरच्या लक्षात येतात आणि तु-मी म्हणजेच प्रेक्षक बावळट आहेत. त्यांना काय दाखवाल ते ते आवडते असं वाटतं ह्या सिरेलवाल्यांना?

शनिवारचा भाग पुन्हा आचरट.
हे तिघे बिन्डोक निशाचा पाठलाग करत असतात, तर दुर्बिणीतून आजीला निशा आपल्या दिशेने येताना कशी दिसते? आणि निशा तिच्या आईच्या घरीच जात होती ना? मग पाठलागाचं नाटक कशाला?
शिव मुंबईला आलाय का हे हम्माने निशाला का नाही विचारलं? निशा आणि हम्माचं गूळपीठ असताना आपण मुंबईत आहोत हे हम्माला कळणार नाही असं शिवला वाटतंय का?
हम्माला काय वाटतंय याने त्याला फरक पडत नाही. तो गौरीपासून लपवतोय (कशाला ते?) असं दाखवून सारवासारव करतील कदाचित.

डीटेक्टिव्ह भाग अचाट्च होता. बालिश एकदम! काय आजीने टोपी गॉगल लावला वेणूने रुमाल बांधला म्हणजे रूप बदलते का एकदम! त्यापेक्षा वेणू आणि आजीने बुरखा घालायला पाहिजे होता Proud

हो ना.....आणि आजी कशाला त्यांच्या मधे मधे जात्येय....... काही चालता येत नाही तरी!
आणी पसरणीच्या आईचे घर आता बहुतेक वेगळेच दाखवताहेत...आधीचे वेगळेच होते. ते नची व शिव गवरी गेले होते तेव्हा हेच घर होते का ? आताचे ग्राऊंड फ्लोअर ला आहे. अगदीच बोअर!
आणि पोहे किती खातात हे लोक! सारखे आपले पोहे !! आजकाल नाश्त्याचे आयटेमही बोर्ड वर लिहून ठेवायला लागलेत! बाकी मेंबर्स आहेत का अजून खानावळीचे? Happy
आणि मोजोना का म्हणे गायब केलंय सध्या?

ते इतकं लहान मुलांचा खेळ असल्यासारखे, टोपी आणि रूमाल लावून आणि दुर्बिण लावून बघणे.

ती निशा आजीच्याच दिशेने येतेय तर दुर्बिण कशाला?

इतकी निर्बुद्ध पद्धतीने हाताळणी. आणि शिव नोकरी सोडोन्न बसलाय का?
आणि गौरी तिथे तांदूळ निवडत नोकरी करणार का?
आणि नचीला आप्पा काय सांगतो ते अजून गुलदस्त्यातच.

आणि पसरणीची आई (हो, तीच ती ३२+ दात असलेली!) , तरी किती बंडल आणि निर्बुद्ध!
कुणा दिनेश भाई ला कंफर्म करुन आता त्या शिव ने पाठविलेल्या माणसाला बोलावणार! !
आणि गवरी ! वाराणसीत सुद्धा ब्रँच असलेल्या कोणत्या अशा मल्टिनॅशनल कंपनीत काम करतेय...की हवी तितकी सुट्टी घ्या! का ही ही !

आजीचे एकच आवडले निशाला ती बोलून दाखवते बर्याच गोष्टी ...
ती ६४ दातवाली बाई अतिशय डोक्यात जाते. सारखा आपला एकच डायलॉग अग्गं निशा अस्सं काय करतेस?

पण काल लगेच शिव -वेणू-आजी ने आत जायला नको होते. पुरेसा पुरावा गोळा करायचा,पोलीसांना बोलवायचे व पद्धतशीरपणे निशाला पकडायचे सोडून, घाईघाईने आत जायची काय गरज?

नाही! काल निशाने पटकन पैशांची बॅग ओढून घेतलीन स्वतःकडे!
७० लाख सावंतांना नाही, त्या अप्पाला देतील व डील कँसल करतील!

ते निशाला नचि बाहेर घालवतो वगैरे प्रोमोत दाखवताहेत, पण मला ते नक्कीच कुणाचं तरी स्वप्न वाटतं !

Happy

निशा कशाला असं स्वप्न पाहील?

नचि तर काय.... स्वतःच्या डोक्याने चालतच नाही कधी...कुणी असं म्हटलं तर असं...कुणी तसं म्हटलं तर तसं.......
निशा त्याला बावळट्ट म्हणत्ये ते बरोबरचे !

कालचा भाग थोडा बघितला, आजीचे डायलॉग भारी मस्त होते, आई अगदीच कणाहीन असल्यासारखं काय वागते, एवढं घर हातातून गेलं तरीही सुनेला सांभाळून घ्यायच्या मागे. आजी मस्त म्हणाली पाय कुठेत तुझे. नातवाला पण मस्त सुनावलं. शिवला काही त्या शॉटमध्ये फारसा वाव नव्हता. निशाचे चोराच्या उलट्या बोंबा चालूच पण सर्व सीन आजीच्या हातात होता आणि तिने सिक्सर मारली.

पुढे नाही बघितलं. ते बनारस आल्यावर channel बदललं.

फार टणटण चालू होत काल. निशाचा आक्रस्ताळेपणा, आज्जींची शेरेबाजी, नचिकेतच जिकडे अधिक भार तिकडे झुकणं, शिवचं तिथे असुनही नसणं आणि शुगो तर कुठल्या मातीच्या बनल्यात कायमाहिते? इतक सगळं डोळ्यासमोर होउनही राहुदेत रे नचि, शांत रहा. बापरे हातच सगळं गमावलेली कुठली बाई इतकी स्थितप्रज्ञ असु शकते? जरा म्हणुन राग येत नाही का?

आज्जी काल तिला छान कावळी म्हणाली पण. इतक होऊनही निशाचं गौरीला शिव्याशाप देणं चालूच होतं. कुणीतरी सांगा तिला अस तिच्या शापाने नाही पण गौरी तिच्या थंडपणामुळे नक्कीच हातचा शिव गमावुन बसेल एक दिवस Wink

शुगो तर कुठल्या मातीच्या बनल्यात कायमाहिते? इतक सगळं डोळ्यासमोर होउनही राहुदेत रे नचि, शांत रहा. बापरे हातच सगळं गमावलेली कुठली बाई इतकी स्थितप्रज्ञ असु शकते? .
अहो निशासारखी कपटी बाई सासरी माझा छळ करता अशी पोलीसात तक्रार करु शकते हे शुगोंना माहीत असेल. त्यामुळे संभाळुन घेत असतील. Wink

Pages