काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निशा आणि हम्मा ने अख्खी सिरीयल चालवलीये त्यांच्या 'बळा' वर Happy
अजून किती भागां नंतर गौरी अभिनय करू शकेल...? लावा पैज Happy

एकदाची नोटबंदी पोचली बुवा यांच्यापर्यंत. खरं तर हे या मालिकेच्या पथ्यावरच पडलंय. निशाला धडा शिकवणं सावंतांना जमण्यातलं नव्हतं.

आज कॉमेडी होणार आहे.

पण आता ग्यानबाचीमेख अशी आहे की नीशा उघड्यावार सावंत उघडयावर गवरी कावरीबावरी. तो जो ज्याने ८० लाख दिले तो मज्जेत. अडाणचोट लोक सगळी. आता नीशाची धुस्फुस रडारड अम्माचा थयथयाट. बरे झाले दिया परदेस म्हणायची वेळ.

आज आज्जी आणि वेणू मस्त डिटेक्टिवगिरी करणारेत Lol त्यांची वेशभुषा पण मस्त दाखवलिये प्रोमोत. काहीतरी चटपटीत बघायला मिळेल एकुणात.
कालच्या आज्जींच्या म्हणी पण भन्नाट

डोंबलाची डिटेक्टिव्हगिरी. वेणूपेक्षा गौरीची मैत्रीण (मितू का?) हवी होती तिथे.

बाकी झी मराठी एच डी सुरू झाल्याने एक भाग २२ मिनिटांत आटपतोय. वा वा!

एच्डी विथ रेकॉर्डरवाला सेट टॉप बॉक्स घ्या. मी तर जाहिराती, फ्लॅश बॅक्स, हे सगळं फास्ट फॉर्वर्ड करतो. शिवाय हवं तेव्हा पाहता येतं.

तेच मला समजत नव्हतं...दोन दोनदा का दाखवतात टायटल साँग्ज! एच डी मुळे का? का पण?
कालची डिटेक्टिव्ह गिरी एकदम भंकस! काहीही घडलं नाही. उगीच सगळे जण आशा लावून बसलो होतो. अतिशय फालतू एपिसोड! आणि शिव ला काय बोलावत्येय आजी पुन्हा इकडे........ मला वाटलं की तीच काहीतरी चमत्कार करेल! शिव च्या च्या गळ्यात पुन्हा लोढणं.....तक्रारी आणि समस्या.....संपता संपत नाहीत.!
दुश्मन है प्यार के जब लाखो गम संसार के, दिल के सहारे कैसे प्यार करे......असे वाटत असणार त्याला!

दुश्मन है प्यार के जब लाखो गम संसार के, दिल के सहार कैसे प्यार करे.>>> आणि तेही त्या मद्दड गवरीवर जिच्या चेहर्‍यावरची रेषही हलत नाही

हो ना......आणि तिच्याशी लग्न झाल्या पासून समस्याच जास्त! आजकाल तर गवरी दाखवतच नाहीयेत...का कोण जाणे! Happy

काहीहीभाग पुन्हा एकदा.
तसा ह्या सिरियलचा लेखक कल्पनेत दळीद्री आहेच.

काय ते वेणूने ऑफीस सोडून , गॉगल लावून आजीला घेवून तश्याच अवतारात बाहेर जाणं, मग त्या निशाच बुरखे घालून जाणं.

छ्या!
एखादं पहिलीतलं नाटक.....

कल्पना दारिद्र्याचा उत्तम अविष्कार!
आणि निशा व तिच्या आईने टिकली तशीच ठेवलेली....कुणालाही ओळखू नाही का येणार !! का ही ही !!
आणि आजी खुर्चीवर बसून का राहिली मग...? पसरणीच्या मागे जायचं सोडून?
शिवच्या अम्माचा थोडाच सीन होता...पण नेहमी प्रमाणेच विनींग ! अतिशय सहज डायलॉग्ज, जणू ती खरीच अम्मा आहे शिव ची!
बहुतेक, हिंदी डायलॉग्ज व शिवच्या घरची ष्टोरी वेगळा लेखक लिहीतोय व सावंतांच्या घरचा गोंधळ वेगळा लेखक लिहीतोय......!!

भंकस आणि भंपक पणाचा कळस.
बनारस म्हणजे काय सारसबाग-स्वारगेट आहे का काय? Uhoh उठले की चालले...

प्रोमोमध्ये आणि सोमवारच्या प्रिकेपमध्ये दाखवल होत की, आजी आणि वेणू रिक्षातून निशा आणि तिच्या आईचा पाठलाग करतात. त्या मायलेकी दुकानात फिरत असतात वै वै. पण एपिसोडमध्ये अस काहीही दाखवल नाही.:राग: आणि कालच्या प्रिकेपमध्ये निशा आईशी फोनवर पैश्यासन्दर्भात बोलताना आजी चोरुन ऐकते अस दाखवलय. एपिसोड पुढे मागे झाला का की काय? Uhoh

शिव ला काय बोलावत्येय आजी पुन्हा इकडे>>> नैतर काय, आधीच त्याच्या मागे काय कमी कटकटी आहेत, वर आणखी हा त्रास? आता तो मुम्बईमध्ये येऊन काय करेल?

गवरी दाखवतच नाहीयेत...का कोण जाणे! >>> हिरवीण बदलतात की काय! Uhoh मग टायटल song चे काय होईल?

वेणूपेक्षा गौरीची मैत्रीण (मितू का?) हवी होती तिथे.>>>> वेणू आणि मितू ने ही डिटेक्टीवगिरी करायला हवी होती. तेवढाच लवस्टोरीला वाव. Wink

गौरीचं काम करणारी अभिनेत्री (?) बहुतेक उपलब्ध नाहीए. त्यामुळेच शिवला मुंबईला पाठवतील.
परवा हम्मा गौरीसाठी जेवण घेऊन निघाली, तेव्हा ती जेवणासोबत टोमणे, अपमान इत्यादीही भरवेल असे वाटलेले पण तो सीन आलाच नाही.

बाकी ५००-१००० च्या नोटांबद्दल यांना १५ दिवसांनी कळतं, तेही त्याचा जोक जान्हवीच्या बाळंतपणासारखा व्हायरल झाल्यावर. आणि या बायका मूर्खासारख्या बुरखा घालून आणि ब्रीफकेस घेऊन नोटा खपवताहेत.

इथे साथ निभाना साथियातली उर्मीबेन (राशीची आई) असती, तर तिने आतापर्यंत त्या नोटा खपवल्या असत्याच, वर दुसर्‍यांच्या नोटा खपवायची एजन्सी घेतली असती.

शिव च्या बहिणीने काल छान सांभाळून घेतलं त्याला. सगळ्याच गोष्टी आई वडिलांना सांगायच्या नसतात. Happy
केळी वाल्याकडे हजार चे सुटते मागते निशा तो सीन हाईट होता Sad

सगळ्याच गोष्टी आई वडिलांना सांगायच्या नसतात. >>> हे बोलताना शिवची बहीण शुन्यात हरवून गेली होती. आता यापुढचा ट्रेक तिच्या पर्सनल problems वर आधारीत असणार, गौरी ते problems सोडवेल. पण त्यासाठी आधी ती जागेवर तरी असायला हवी ना.:अओ:

Pages