काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झंपी आणि पियू.... Rofl
शिवला मात्र फुल्ल मार्क्स!
आनंदी म्हणत्येय तसं...प्रत्येक गोष्ट फील करत होता..
रिअली ऑसम!
ही माठी त्याला काय करतोयस शिव.......कुणी पाहिलं तर....नको ना.....असं म्हणून डिसकरेज करत्ये!!

Angry

तेच ना, पातळ झिरझिरीत कॉटनचे गाउन घालून काही बायका येतात बाहेर अगदी न लाजता( त्यांच्या हिंमतीची पण दादच :फीदी: )

आणि गौरी तो बनारसी टाईप अति भडक रंगाचा साधा गाऊन घालून घरात लाजत होती.

त्यामानाने, जुयेरेगा मध्ये बरा सीन होता मिलनाचा.

होनासूमी मध्ये तर चावटच होता. ( ते. अतिच होतं डोक्यावर दुपट्त ओढून व्रण लपवायचे, ते ही त्या सहा म्हातार्‍यांपासून..) : फीदी:

हे:!!! ते "काय करतोस शिव" ऐकून मरीमर हसले दर वेळी. इंदिरा गांधी त्यांच्या मारेकर्‍याला म्हणाल्या होत्या, "ये तुम क्या कर रहे हो!" आणि कपिल देव सिक्सर मारायला जाऊन उंच कॅच उडवायचा तेव्हा त्याला एक रेडिओ कॉमेंटेटर "ये तुम क्या कर रहे हो कपिलदेव!" असं म्हणायचा त्या दोन्हीची आठवण झाली. शिवने लाडात येणे म्हणजे गवरीने इतके घाबरण्यासारख्या सिचुएशन्स आहेत का काय!!

म्हणजे इतर पात्रं अजिबातच करमणूक करत नाहीत...हो ना? >> नाही ग इतर पात्र पण करमणुकीचं करतात पण त्यांची वेगळी आणि हिची वेगळी. करमणुकीत फरक आहे. झंपी आणि पियू. +१

@सस्मित
कुणी येईल ना एक तसंच सतत. अरे मग दरवाजा बंद करा ना. नुसतं कुणी येईल कुणी बघेल >>>>>>>.

शिरेली मधल्या घरांना कडी कोयंडे लावत नस्त्येत .
ते जर लावले तर मालिकेतल्या खल्पात्राना, तमाम साळकाया माळकाया ना कान देऊन आत काय बोलणं चाललंय ते कसं ऐकता येईल ?
किंवा केव्हाही कधीही मध्येच भसकन घुसून आत काय चाललंय हे कसं बघता येईल?
अन मग आधीच कल्पना दारिद्र्याने गांजलेल्या मालिका लेखकांना स्टोरी मे ट्वीस्ट कसा बर् आणता येईल ?

>>>>कल्पना दारिद्र्याने गांजलेल्या मालिका लेखकांना ----

अगदी हेच मनात येते. असे निर्बुद्ध संवादलेखक, दिग्दर्शक असतात का? की झी त्यांना निर्बुद्ध बनवते.

>>>>> येते. असे निर्बुद्ध संवादलेखक, दिग्दर्शक असतात का? की झी त्यांना निर्बुद्ध बनवते.<<<<
किती ते बालिश संवाद आणि पटकथा.

काल काय , शिव काय तो म्हणत होता की इंतझार करने के लिये शादि कि क्या?
स्वतःची हम्मा काय कैदाशिण आहे माहीत नाही.... आणि कामं घरातली पुरुष तर करतच नाहीत; मदत सुद्धा नाही.

पालीचं नशीब चांगलं आहे. हम्मा किचनमध्ये असताना कधी आली नाही.
कालच्या गौरीच्या जावेच्या रिअ‍ॅक्शन्स भारी होत्या. परवा, हाथ पकड लिया असं ओरडलेली ती. आता शिवगौरीला बघून तीच बिघडेल (म्हणजे सुधारेल) आणि मज्जा येईल.
गौरी स्वैपाक करतानाचं पार्श्वसंगीत एकदम सस्पेन्स हॉरर टाइप असतं. ती जे काही रांधतेय ते नक्की बिघडणार असं वाटत राहतं.

निशा काही सुधारलेली नाही.

गौरी स्वैपाक करतानाचं पार्श्वसंगीत एकदम सस्पेन्स हॉरर टाइप असतं. ती जे काही रांधतेय ते नक्की बिघडणार असं वाटत राहतं.>>> Lol

कोणी युपी वाल्यांनी हिच्याकडे बघुन आपल्या मुलासाठी मुंबईची मुलगी पसंत केली तर ती तर सगळ्या सासरच्यांना पोत्यात बांधेल (असा त्रास दिला तर).

तो गुलाबी गाऊन घातल्यावर इतकी लाजत होती आणि आता?
काल तर फिक्कट निळ्या (सेम!) गाऊन मधे चक्क लिस्ट करत होती
(१० किलो तूप म्हणे. आणि १० किलोच कणीक!! काय पण प्रमाण!)
तर पाय मुरगळला!
:-|

लेखक दिग्दर्शक जाम कलुशित मनाचा आहे/ असणार..

छान ४ एपिसोड नाही दाखवले कधी....
अगदी प्रेमाचे दिवस होते तेव्हाही.. थोड काही चांगलं दाखवायचे की लगेच काहितरी कट कारस्थानं..

मोजो शुगो आज्जी पात्रांना जिवंत ठेवण्यासाठी नीशा ..

मी आता खुप नाही बघत.. आधी बर्यापैकी ठर्वुन बघायचे..

हम्मा कांगावखोर आहे. आणि नेहमी सुना किंवा अबला पात्रं आपलं म्हणणं शिरेलीत नको तिथे ठासून सांगतात आणि हवं तिथे वो, मै, मेरा मतलब ऐसा नही था करत बसतात. :रागः

हो ना..सुकी बटाट्याची भाजी, चार पोळ्या आणि बचकभर ठेचा.... खरच रद्दी डबा.!
अम्मा किती नॅचरल अ‍ॅक्टिंग करत्ये. बेस्ट! संवाद म्हणत्येय असं वाटतच नाही.

"गौरी, तुम जानती नही हो? डिब्बे मे सब जाता है, रोटी, सब्जी, सलाद, दही, दाल, अचार....."
"तुम जानती हो की हम तुम्हे साडीयोंसे तोल सकते है. फिर भी तुमने उस चार मामुली सी साडियो़के लिये हमे दो दो बाते सुना दी?"

Pages