काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला खरेच कळतं नाही की कोणी कसे पाहु शकतात अश्या शिरेल्स...

माझी मम्मा पण आहे त्यात, संध्याकाळी झी आणी दिवसा कलर्स, मी शांत पणे मोबाईलवर टाईमपास करते जेव्हा घरी असते पण हे असल काही नाही पाहत... अपवाद सध्यातरी पैलवानाची लवस्टोरी. जो पर्यंत मजा येतीये बघायचे मग कंटाळा आला की तेही बंद

अपवाद सध्यातरी पैलवानाची लवस्टोरी. जो पर्यंत मजा येतीये बघायचे मग कंटाळा आला की तेही बंद>>>>>>> खासकरुन ह्यांचं लग्न झाल्यवर त्या वैनीबैची कारस्थानं सुरु झाली की मला कंटाळा येणारच.

माझ्या दोन्ही घरी इतर कुठल्याही चॅनेल्सना काडीची किंमत नाही. ओन्ली झी मराठी.
होम मिनिस्टर पासुन जी सुरुवात होते ती १०० डेज झाल्यावर टीव्हीच बंद होते. दिवसा सहसा सासरे पिच्चर बघतात.

पसायदानाचं मर्डर.
चला कल्पतरुंचे आरव मधले ला आणि पुढे आणखी किमान दोन उच्चार चुकले किंवा चुकीची अक्षरंच म्हटली. गाण्याशी काही संबंध नव्हताच. लिपसिंकही धड नव्हतं.

बनारसमध्ये प्रबोधिनी एकादशी काल झाली.

पसाय्दान सुद्धा अतिशय बेसूर होते. कश्याला प्लेबॅक दिला होता? गौरीनेच म्हटले असते तरी फार वाईट नसते झाले.

आमच्या मासाहेब झी मराठी प्राईम टाईम, स्टार प्रवाह, कलर्स मराठी रिपिट टाईम सर्व बघतात. मी गेले तर अर्ध लक्ष त्यात. मग मी पाच मिनिटं भेटून निघते. मग मी बसत नाही जास्त म्हणून वैतागणार Lol

मी तर असं पाहीलय की पसायदान कार्यक्रमाची सांगता करताना गातात....मला उगीच आशा वाटली...:)
आणि चेहर्यावर असे भाव जसे लहान मुलं गॅदरिन्ग मध्ये गाताना आइ बाबा दिसले की हळुच स्मित करतात किम्वा फोटो वाले काका स्वत:चा फोटो काढत आहेत हे लक्षात आलं कि हसतात तशी मधुनच उगाचच हसत होती

नुकत्याच आलेल्या बातमीनुसार ..महान गवरीला सकाळी सकाळी पसायदान गाताना पाहून (तेही बनारसम्ध्ये) ज्ञानेश्वर माऊलीने ताटी पुन्हा बंद करून घेतली आहे. मुक्ताईने कितीही उपदेश केला तरीही विनवण्या केल्या तरीही त्यांनी " मी ज्या रेड्यामुखी वेद वदविले त्याने पुढच्या जन्मात मानव रूपात भलतेच गान (की दान ) भलत्याच वेळी भलत्याच लोकांसमोर गायले आणि माझी लाज काढली .. यासाठीच का केला होता मी वेद वदविण्याचा अट्टाहास ?" असे म्हणत ताटी उघडण्यास साफ नकार दिला .

स्वप्ना Lol

आणि दादी काल म्हणाली वाह कितना सुंदर भजन है... Uhoh पसायदान म्हणजे भजन? Uhoh
अर्थात उत्तर भारतीयाना याची कल्पना असणार नाही हे ठावूक आहे पण गौरी इम्प्रेशन पाडण्याच्या नादात सासरकडच्यांना काहीही ऐकवत आहे फक्त चालीत Proud

आणि ही बावळट मराठीत काय बोलते त्यांच्याशी?
दर वेळेला कुठलंही वाक्य सुरु करताना आधी मराठीत एक दोन शब्द बोलते...आणि मग हिंदीत! इतकं कृत्रिम वाटतं ते! आणि ही इतकी देवभक्त आहे?
काहीही.
आता काय दादी आधी रागाचा आव आणून यांचं पुन्हा लग्न लावून देणारे...? म्हणजे पुन्हा गृह प्रवेश...प्रेक्षकांचा अंत पाहतात अगदी!

Angry

अहो त्यांचा हनिमून दाखवायचा राहिलाय ना...तेव्हढेच २ आठवडे गाणी आणि भटकंती. वेळ काढायला.. म्हणुन असेल हे परत लग्न

अच्छा....आता मुंबईतला प्रॉब्लेमही जरा सॉल्व्ह झालाय..म्हणजे अजून जुनंच घर दाखवताहेत..पण मिळेल नवं! सो.....शिव गवरीला जरा फ्रीडम आणि रोमांसची संधी!
अरे राम! पुन्हा थंडाक्का चे क्लोज अप्स आणि संथ- सानुनासिक डायलॉग्ज ऐकणं नशिबी आहे तर!

Uhoh

अरे राम! पुन्हा थंडाक्का चे क्लोज अप्स आणि संथ- सानुनासिक डायलॉग्ज ऐकणं नशिबी आहे तर! >> असं काही नाही हो... चॅनेल बदला नशिब बदलेल

मला तरी हे दुसर्‍यांदा लग्नाचं लॉजीक काही पटलं नाही! >>>>>हिन्दी सिरियल्समध्ये नायक-नायिकान्चे दोनदा लग्न लावण्याचा ट्रेन्ड आहे. उदा. ये हे मोह्ब्बते- रमण-इशिता.

आता मराठीत हा ट्रेन्ड copy करतायत.

आता मुंबईतला प्रॉब्लेमही जरा सॉल्व्ह झालाय..म्हणजे अजून जुनंच घर दाखवताहेत..पण मिळेल नवं! >>> मिळाल ना, अप्पाने फु़कट दिलेय घर त्यान्ना.

दोघांच लग्न होउनही किती अवघडलेपणा आहे दोघात..
बोलण टिपिकल पुस्तकी..
येवढ लिहिलय येवढच बोलायचं येवढचं हसायच..
येवढे दिवसांनी भेटल्यावर काय रे आई बाबा कशे आहेत.. काय काय झालं.. इथे असं असं झालं असं काही बोलणच नाही..उगाच मोठे मोठे डायलॉग

तिने घेतलेल्या उखाण्याचा अर्थ कुणाला कळला का? उगा आपलं कैच्या कैच!
अगदी भंगार अ‍ॅक्टींग करत्ये ती. मुळात ती इतकी गरीब, गुडी गुडी, सोज्वळ गवरी कधी पासून झाली?
ती तर मुंबईची मुलगी आहे ना....( भाव शून्य डोळे, सपाट आवाज , अजिबात लवचिकता नसलेली देहबोली!)

फक्त दिसते गोड. अभिनय शून्य. हावभाव शून्य. साड्या एकसे एक आहेत. शिव पण कसला क्यूट दिसत होता पांढर्‍या शुभ्र झब्ब्यात!

कालचा सगळा एपिसोड चहापुराणात गेला. >> आजही फालतुगिरी चाललीये.

बादवे त्या अम्मा आणि गौरी.. दोघींच्या खांद्यावर (खांद्याच्या थोडं खाली) सेम ठिकाणी सेम दिसणारा तीळ आहे. Uhoh

Pages