कोजागिरी मसाला दूध गटग

Submitted by सायो on 17 September, 2016 - 12:44
ठिकाण/पत्ता: 
शनिवारवाडा, न्यूजर्सी. (योग्य वेळ येताच पत्ता मिळेल. शेजारीपाजारी बेल वाजवून 'शनिवारवाडा हाच का?' म्हणून चौकशी करू नये)

कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्‍यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.

माहितीचा स्रोत: 
तो आणि कशाला हवाय?!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 15, 2016 - 12:40 to Tuesday, October 18, 2016 - 12:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडीच्या धाकाने होतीलही... कोणी सांगावं! फिदीफिदी >> धाकाने पांढरी ही होते का. बरं बरं. आम्हाला वेगळाच रंग माहीत होता. Wink

इथे येऊन कुणाला 'हनी' म्हणणार? त्यापेक्षा 'हनिसिंग' परवडेल हनी म्हणायला Proud

बरी दुपारीच चढली असेल म्हणाल तर बुवानी पुरवठा बंद करून ४/५ वर्षे झालीत... Sad

सुरळीच्या वड्या पांढऱ्या कशा होतील ?
सिंडीच्या धाकाने होतीलही... कोणी सांगावं! >>> लोल. म्हणजे 'हळद पिवळी...' चा उलटा इफेक्ट का? Happy

>>>पिवळे पदार्थ ही थीम ठेवा आणि ते धाकाने पांढरे करून दाखवण्याचा सांका
त्यात भाग घेणारे पांढरे फटक पडायचे Happy

Swati Lol

च्च, असं वाटतंय का माझ्या पोस्टीतून. मला कोबी इतका प्रचंड आवडतो पण फक्त भाजीकरताच की त्याची रबडी नी कलाकंद असले प्रकार कल्पनाही करवत नाही.

तारीख/वेळ:
15 October, 2016 - 22:10 - 18 October, 2016 - 21:30 >>>>>> नक्की किती तारखेला आहे???? एकदा तारिख कळली की नकार द्यायला सोप्प पडेल ............. Happy

रंग ठरला का? कपड्यांचा आणि पदार्थांचा एकच असणारे की कसं? केसांचं काय ठरलं? तीन केसांच्या बाईनं काय करावं हे कोण सांगणार?

Pages