कोजागिरी मसाला दूध गटग

Submitted by सायो on 17 September, 2016 - 12:44
ठिकाण/पत्ता: 
शनिवारवाडा, न्यूजर्सी. (योग्य वेळ येताच पत्ता मिळेल. शेजारीपाजारी बेल वाजवून 'शनिवारवाडा हाच का?' म्हणून चौकशी करू नये)

कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्‍यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.

माहितीचा स्रोत: 
तो आणि कशाला हवाय?!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 15, 2016 - 12:40 to Tuesday, October 18, 2016 - 12:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आला आला!! नवा धागा आला!! बर गटग संध्याकाळी आहे ना ?
बुकलाबुकली Happy शनिवारवाड्यात काक(वा) मला वाचवा च्या आरोळ्या ऐकू येणार तर !!

कप तुम्ही देणार म्हणता, मग आम्ही दूध कशात आणायचे?

की दावणीला बांधून थेट म्हैसच घेऊन यायची?

पलिकडच्या गावातल्या सातीअक्कांकरता- आम्ही त्यांच्याएवढे मॉडर्न नसल्याने साधं मसाला दूधच पितो. त्यांच्यासारखं चढवलेलं मसाला दूध पित नाही. Wink

विकु, तुमा आरियाना? की टांगमारियाना? >>> Lol बुवांच्या व्हॉकॅब ने हरयानवी-हैद्राबादी हायब्रिड वळण घेतले Happy

विकु हस्ते परहस्ते आरियानापर्यंत पोहोचलेच का शेवटी ? सारखे बुवांच्या प्रकरणाची आठवण काढून काढून उसासे टाकत खरे Lol

भा Lol

Pages