कोजागिरी मसाला दूध गटग

Submitted by सायो on 17 September, 2016 - 12:44
ठिकाण/पत्ता: 
शनिवारवाडा, न्यूजर्सी. (योग्य वेळ येताच पत्ता मिळेल. शेजारीपाजारी बेल वाजवून 'शनिवारवाडा हाच का?' म्हणून चौकशी करू नये)

कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्‍यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.

माहितीचा स्रोत: 
तो आणि कशाला हवाय?!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 15, 2016 - 12:40 to Tuesday, October 18, 2016 - 12:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडे Lol

मस्त झाला कार्यक्रम. छोटाच गृप होता पण तरी गप्पांची कमतरता नव्हती. लो कार्ब लो शुगर वीकडे असल्यामुळे कार्ब्सकरता जीव आसुसला होता. सगळी कसर निघाली. पाव-भाजी, कोबी वड्या, मब, शाळीग्रामी पेढे. भेळ तर खुपच खाल्ली! मस्त झाले होते सगळे पदार्थ. कॅरिओकी मुळे आणखिन जास्त मजा आली. मै आणि माझा डान्स राहून गेला पण तो पुढच्या वेळी. Proud
हिवाळी गटगची वाट न बघता एक कॅरिओकी गट होउन जाउन्द्या! Happy

हो, करून टाका एक कॅरिओकी गटग. +१

फोटो ब्लॅकबेरीवर काढलेले असल्याने पुसट आले होते. मी शक्यतो फोटो ठेवत नाही. पुसून टाकले. असो आपल्या मनात या कोजागिरी गटगच्या हळूवार आठवणी जुन्या पुस्तकातील मोरपीसासारख्या आहेतच. त्यांना फोटोचे मूर्त स्वरूप कशाला?

"ये क्या जगह है दोस्तो" ची ऑडियो क्लिप मात्र आहे. ती इथे अपलोड करू का ?

असो आपल्या मनात या कोजागिरी गटगच्या हळूवार आठवणी जुन्या पुस्तकातील मोरपीसासारख्या आहेतच. त्यांना फोटोचे मूर्त स्वरूप कशाला? >> Lol

विकु आज सकाळी सकाळी काय? >>> टण्या छुपा टचेआले फॅन आहे असे मला वाटते.

Pages