कोजागिरी मसाला दूध गटग

Submitted by सायो on 17 September, 2016 - 12:44
ठिकाण/पत्ता: 
शनिवारवाडा, न्यूजर्सी. (योग्य वेळ येताच पत्ता मिळेल. शेजारीपाजारी बेल वाजवून 'शनिवारवाडा हाच का?' म्हणून चौकशी करू नये)

कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्‍यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.

माहितीचा स्रोत: 
तो आणि कशाला हवाय?!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 15, 2016 - 12:40 to Tuesday, October 18, 2016 - 12:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेनूची थीम ठरवा काहीतरी - म्हणजे आयटम्स ठरवता (आणि रिजेक्ट करता :P) येतील.
सगळे पांढऱ्या रंगाचे पदार्थ वगैरे?

मी बवडे आणतो. ट्रेला पांढरं कवर लावून. Proud

सगळ्यांनी जमून दूध वगैरे प्यायचं म्हणजे सात्विक कार्यक्रम दिसतोय त्यामुळे बियर वगैरे चालेल की नाही माहित नाही.

बरं मग पांढरीच थीम असेल तर विचार करते अजून काहीतरी. मी भेळ, दहीवडे या मेनूला सुटेबल ऑप्शन बघ होते आधी.

अरे, पांढरा रंग हे एक आपलं सजेशन होतं - मेनूबद्दलचं डिस्कशन सुरू करण्यासाठी.
काहीही ठरवा थीम. Happy
(नाही, फॉइल लावलेले ट्रे ही थीम होऊ शकत नाही! :P)

बीअरबी बसंल आन बवडेबी बसत्याल. >>बेवडे बी बस्त्याल असं कोणी कोणी वाचलं - खरं सांगा Happy

मी व्हाइट रशियन करुन आणणार होते . तेव्हढ्यात रंग बदलला Sad

सिंडे केशर न घालता श्रीखण्ड पण आणू शकतेस की Happy

पुलाव, दहीवडे, मुळ्याची कोशिंबीर, साबुदाणा खिचडी, उ.मो., रसमलई, (ह्ळद न घालता) सुरळीच्या वड्या पहा कित्ती पर्याय आहेत.

सुरळीच्या वड्या पांढऱ्या कशा होतील ? (पांढरा नको पिवळा पण चालेल) प्रकाश (ला नाही) पाडा. Proud

आणि मुळ्याची कोशिंबीर!!!!... अरे बापरे.

मी ते चुकुन,

हनी, वोडका पांढरीच असते ना हो?

असं वाचलं व बुचकळ्यात पडलो! गोगांनी पत्नीला लिहायची विपु चुकुन इथे लिहिली की काय ?

Pages