कोजागिरी मसाला दूध गटग

Submitted by सायो on 17 September, 2016 - 12:44
ठिकाण/पत्ता: 
शनिवारवाडा, न्यूजर्सी. (योग्य वेळ येताच पत्ता मिळेल. शेजारीपाजारी बेल वाजवून 'शनिवारवाडा हाच का?' म्हणून चौकशी करू नये)

कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्‍यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.

माहितीचा स्रोत: 
तो आणि कशाला हवाय?!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 15, 2016 - 12:40 to Tuesday, October 18, 2016 - 12:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोजागिरी म्हणजे लेट भेटायचं आहे का? पण मग साउथीजना घरी जायला उशीर होईल. अर्थात एबाबांनी बस काढली तर कुछ हो सकता हय.

बामा सुमडीत येऊन रेजिस्टर करून गेल्या काय?

लवकर निघायचं ठेवा बर्का नाही तर मला परत यायला फार उशीर होतो. गेल्या वेळी शेवटचे धा मिन्ट अनावर झोप येत होती.

बायांनी केस धुवा त्यादिवशी म्हणजे सोडता येतील. पांढरी साडी, ड्रेस आपला आणा. मेणबत्त्या मी देईन. पांढरे कपडे घालून, केस सोडून हातात मेणबत्ती घेऊन नेबरहूडात चक्कर टाकणं हे सांकात अ‍ॅड करता येईल हव्म तर.

>>> बायांनी केस धुवा त्यादिवशी म्हणजे सोडता येतील.
म्हणजे? केस तुमच्याकडे सोडून जायचं?! Proud

माझ्यासकट सर्वांच्या कीबोर्डाच्या वाफा त्या न झालेल्या गटगच्या बाफवर सोडून झाल्याने इथे वर्दळ दिसत नाही. नाहीतर आत्तापर्यंत १२००-१३०० पोस्टी यायला हव्या होत्या.

>> भेळे करता फरसाण कुठले वापरता?

आमच्या मुंबईत कित्येक भैय्ये भेळेत फरसाण घालतच नाहीत. कुरमुरे, कांदा, बटाटा, टोमॅटो, कोथींबीर, चटण्या, लिंबू, चुरलेल्या पुर्‍या आणि वरून शेव. (तसा इथे काही संबंध नाही, उगीच एफ वाय आय)

सायो विचारलं कारण घरी भेळ करताना नेहमी डोंबिवली हुन आणलेलं फरसाण च खाल्लं गेलंय.
इथले दीप्/मिर्च्मसाला/बॉम्बे भेल/आनंद वगैरे वापरुन बघितले नव्हते.

आनंद ची प्रॉड्क्ट्स चांगली असतात. मेनली स्प्यासी लिहिलेल्या गोष्टी स्पायसी असतात. स्पायसी मिक्स्चर खरंच असते Happy
आता नवरात्र संपलं की आनंद चं स्पायसी भेल मिक्स आणुन बघतो. Happy

आनंद ब्रांडचं कुठलं हे पण आता विचारतो. गेल्या टायमाला आनंदचं एक भेळ मिक्स आणलं तर त्यात इतका जास्त कडक स्टफ होता (महा कडक तळलेली डाळ महा कडक पुऱ्या आणि काय काय).
नेक्स्ट टायमाला नुसते पिवळ्या रंगाचे कुरमुरे आणि बारीक शेव वालं पाकीट आणणारे.
मॅक्स, फरसाण हल्दीरामचं मिक्स (का कायश्या अशाच) नावाचं चांगलं आहे. कॅनडात त्याचं पर्पल पाकीट होतं इकडे येई येईतो रंग बदलू झाला.
सुरतीचं ताजं असेल तर चांगलं असतं, पण ते फालतू पिशव्यात विकतात त्यामुळे हमखास वास येणारं अत्यंत बेकार असतं.
डोंबिवलीहून फरसाणच्या ऑर्डर घेण्यात येत आहेत. संपर्क साधा. Proud

मला वाटलं आनंद म्हणजे त्या आपल्या ह्यांच्याबद्दल काही आहे. Proud त्या ब्रँडच्या गोष्टी स्पायसी असणारच. Wink

लंच टायमाला की सांजच्याला आहे गटग ?

वेन्यूचा झिप कोड टाका ना प्लीज. म्हणजे ड्रायविंग किती करावं लागेल तो अंदाज येईल

मागच्या वेळी अख्खा आड्रेस दिला होता तर तरी तुम्ही बाहेरच्या बाहेर कलटणार होतात. आता नुसता झिप कोड दिला तर तुम्ही निस्त्या लिविंग्स्टनच्या पेरीफेरीवर फेर्या मारत बसाल, गरागरा गरागरा.
Proud

Pages