निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्लीकर वरुन टाकणे, जवळ जवळ पिकासासारखेच आहे. फक्त काही जणांना ते दिसत नाहीत इथे.
आणि आता जिप्स्याने टाकलेले फोटो, लाईन बाय लाईन डाऊनलोड होताहेत माझ्याकडे आणि त्यातही बराच वेळ जातोय.

गूगल ड्राईव्ह व्यतिरीक्त अजुन कुणाला एम्बेडेड लिंक द्यायचे ऑप्शन माहित असल्यास प्लीज सांगा.>> मी ह्या पद्धतीने टाकते.

गुगल अर्काइव्हज मधे उजव्या हाताला मॅनेज इन गुगल फोटोजचा ऑप्शन येतो आहे. ते सिलेक्ट केल्यावर आपण नव्या ठिकाणी जातो. तिथे उजव्या हाताला शेअर अल्ट्चे ग्लिफआयकॉन आहे. तो क्लिक केल्यास गेट अ लिंक हा पर्याय दिसतो त्या ऐवजी पहिल्या वेळेस new shared album आणि नंतर add to shared album. हे पर्याय निवडायचे. आपल्याला हवा तो फोटो ह्या shared album मध्ये टाकला की त्यावर right click करून image address copy करायचा जो इथे इमेज उपलोड विंडो मध्ये टाकून इमेजची हवी ती लांबी / रूंदी ठरवून इमेज अपलोड करायची.

हे फोटो मात्र कधी कधी सफारी वर दिसत नाहीत. मला आयफोन वरून दिसतात पण आयपॅडवरून दिसत नाहीत.

आदिजो, मस्त बाप्पा ... आणि सेम पिंच ... या वर्षी मी पण गहू पेरले होते करवंटीमध्ये बाप्पाच्या सजावटीसाठी! हा आमचा बाप्पा:

गौरी, गहू मस्त दिसताहेत एकदम.

पाइन कोन च्या बाजूला हिरवीफळे कसली आहेत ? डावीकडे त्या हिरव्या फळांच्या समोर कसली फुले आहेत ? सुरंगी का ?

मेधा, माझ्या (मूळच्या कोकणातल्या) मैत्रिणीकडे गणपतीला कुर्डू वगैरे अनेक फुला-पानांबरोबर या हिरव्या फळांचे गुच्छ पण बांधतात. मी नाव विसरले. ते लाल सुरंगीच्या फुलांसारखं दिसतंय ती हीच फळं उकललेली आहेत. खूप दिवस टिकतात आणि सुंदर दिसतायत! मी आठदहा दिवस घरी नाहीये, आल्यावर क्लोजप टाकते त्या फळांचा.
सायली, तेरडा मस्त!

.

ह्यावर्षी माझ्याकडे अबोली अगदी जोरदार बहरली आहे.

homeGarden

मी २७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर तसेच २२ किंवा २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर मुंबईत असणार आहे. मला ह्यावेळी निगकरांना नक्की भेटायचे आहे. मला वाशी, कुर्ला किंवा मुंबईत कुठेही भेटायला जमेल.

घराच्या मुख्य दरवाजाच्या वर जो बल्ब आहे त्यच्या खोक्याला पुर्वी एक होल होतं जर काही प्रॉब्लेम आला तर दुरुस्त करायला, त्यामधे चिमणीनं घरटं केलं ५ वर्ष तरी वास्तव्य असेल त्यांचं, खुप घाण करायचे मुख्य पायरीवर अगदी दारासमोर असल्याने सकाळी विष्ठेचा खच व्हायचा रोज तिथली फरशी धुवावी लागायची. म्हणून गेल्यावर्षी ते होल बुजवलं, काही दिवस ते चिमणीचं जोडपं वरच्या डिझाइन वर बसायचं नवं घरटं शोधुन उडुन जातील असं वाटलं, आता जवळ जवळ दिड वर्ष तरी झालं ते जोडपं अजुनही त्याच डिझाइन वर बसतं आणि पुन्हा तोच शी चा खच आहे. आता ते होलही परत उघडता येणार नाही Sad
एक लाकडी घरटं आणून टांगुन बघित्लं तर ते रॉबीन ने बळकावलं. आता काय करावं समजत नाहीए Sad

Pages