रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पुढच्या एपिसोडात नेने वकीलांच्या बायलेक कुंकू लावून माई " नेने भाओजी जांवक नाय; ते ह्येंच्यासारखेच घरातल्या कपाटात बसले असतले" असां म्हणाली, तरी आश्चर्य वाटण्याचां कारण नाय !

>>आणि ,' जगूचां कीं मरूंचां ?' असां जर स्टेजवर हॅम्लेटान सुरूं केल्यान तर मालवणी मोठ्यान आराडतलोच, ' मेल्या, आमकां तां कित्या इचारतस ? मेलसच तर तेराव्याक आम्ही येवचां कीं नाय तितक्यां सांग

Proud Proud

अण्णा ड्यांबिस आहेत. शेवंता झाडावरून खाली येत नाही म्हटल्यावर घरातच हिरवळ बघायला मिळेल म्हणून हळदीकुंकवाचा घाट घालायला सांगितलान बायकोला. बाकी हिरवळ कमीच होती म्हणा. सहारा वाळवंटात जास्त हिरवळ असेल ह्यापेक्षा. तिथे नाना बाहेर यायला मिळत नाही म्हणून कसरती करत होते का काय.

आमंत्रणं द्यायला पांडू गेला तेव्हाच म्हटलं की काहीतरी रामायण होणार. बरं, एव्हढ्या रात्री का ठेवलंन ते हळदीकुंकू? माझी आजी म्हणायची तसं दिवस गेला रेटारेटी आणि चांदण्याने केर लोटी. मला तर वाटलं की देविकाच्या आईला येताना काहीतरी दिसणार. माईंनी स्वतः फोन करून तिला आमंत्रण द्यायचं ना. देविकाला सांगतात तुझ्या आवशीला बोलाव म्हणून. वर त्या ढालगज भवानीने स्वतःच्या मुलीच्या हळदीकुंकवात तरी गप र्‍हावं की नाही तर तिने सुध्दा तमाशा केला.

विश्वासरावचं एकूणात 'बालिश बहू बायकात बडबडला' झालंय. बिचारा काही नयनमनोहर दृश्य दिसतील म्हणून खाली आला आणि नेनीणीच्या तोफेच्या मार्‍यात अडकला. आणि अभिराम म्हणत होता की तो परिस्थिती नीट हॅन्डल करेल. मजा बघत होता तो सगळी. म्हणे ३ आठ्वड्यात शोध लावतो. हे तो अनेक दिवसांपूर्वी म्हणाला होता. ब्रह्मदेवाचे ३ आठवडे नाहीत ना म्हणे? आता २४ सारखी टाईमलाईन दाखवा म्हणावं ३ आठवड्यांची.

नेनीण हॅज लॉस्ट इट. विश्वासरावला सांगत होती की ह्यांनीच मारलंय माझ्या नवर्‍याला. म्हणे तुम्हाला सांगायला आले. परत जुनी रेकॉर्ड लावली होती. वेगळं असं काहीच सांगितलं नाही. त्याने विचारायला हवं होतं की बाई, तुमच्या डोक्यावरच्या छतावर तुमच्या नवर्‍याची मुंडी आणून लावेतो तुम्ही काय झोपला होता का? म्हणे मला वेड लागलं असतं तर मीही नवरा आहे म्हणून आनंदात वावरले असते. काय ते नवर्‍यावरचं प्रेम उतास चाललंय. त्या हीर, ज्युलिएट, लैलाने सुध्दा तोंडात बोटं घातली असतील.

एक आहे मात्र - नेनीणीने माईला तुम्हाला वेड लागलंय असं स्पष्ट सांगितलं. हे घरातल्यांनी वेळेत केलं असतं तर ही वेळ आली नसती. आता तर काय शापवाणी उच्चारलेय तिने. मला तर बेगॉन मारल्यावर झुरळ कसे मरून पडतात तसे माधव, दत्ता, अभिराम मरून पडलेत असं दृष्य दिसलं. नाईक दोषी नाहीत असं कळलं तर उ:शाप देणार का? अभिराम म्हणाला की जमिन नेनेकाकांना दिल्याचं कुठे लिहिलं नव्हतं तर बाई म्हणतात की सगळा व्यवहार तोंडी होता. हो का? मग ह्यांनी पण म्हणायचं की नेनेंनी त्यांचं घर तुम्ही गेल्यावर आम्हाला द्यायचं असं अण्णांना सांगितलं होतं. देईल ही बयो? मी निलिमाच्या जागी असते तर म्हटलं असतं की सबळ पुरावा असेल तर आणा समोर. नाहीतर आमच्याच घरात येऊन फुकट तमाशा करु नका. अब्रूनुकसानीचा दावा लावेन. आणि लढायला तुमचा घोव नाहिये आता इथे. पण निलिमा माधवला म्हणते काही बोल. घ्या आता. तो काय बोलणार?

काल सरिताची अगदीच शेळी झाली होती. नेनीणीच्या झिंज्या धरून बाहेर काढायला हवी होती तिला.

आणि हो, त्या सांगाड्यांचं काय झालं? पुढे काही तपास झाला का?

विश्वासराव खाली आल्यावर कोणालातरी आपादमस्तक न्याहाळत होता तेव्हा आधी मला वाटलं की देविकाकडेच बघतोय. पण तो माईंकडे आश्चर्याने बघत होता. मेल्याची नजर वाईट आहे. विशेषतः गालात जीभ घोळवत बघतो तेव्हा तर अगदी व्हिलन वाटतो. Angry

<<विश्वासराव खाली आल्यावर कोणालातरी आपादमस्तक न्याहाळत होता.... मेल्याची नजर वाईट आहे.>> Wink
मेल्या अण्णांच्या घरांत इतके दिवस रवलो, काय तरी गुण लागतलोच ना ! Wink
<< आणि हो, त्या सांगाड्यांचं काय झालं? पुढे काही तपास झाला का? >> मारुतिच्या शेपटासारखी वाढणारी यादी आसा ना अनुत्तरित प्रश्नांची, तिच्यात कधींच जावून बसलेहत हेय प्रश्न !!!

<< नेनेवयनी म्हणता, ' ह्येनी अण्णांची इतकी कामां केल्यानी पण त्येचो एक पैसो घेवक नाय '.>>

तुझ्या गांववाल्या त्या नेनेवयनीक जरा समजावून सांग; लुबाडण्याच्या कटात
वकील फालतू फी घेणतच नाय साथीदाराकडसून, फक्त लूटीतलो वांटो घेतत !!
Medal.JPG

एखादा खून झाल्यानंतर ज्या परिक्षेत्रात खून झाला आहे तिथल्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होतो व तिथले पोलिस तपास करतात.इथे तर हा विश्वासराव लांबच्या गावावरुन आला आहे व तपास करतो आहे.डायरेक्टरला साधी गुन्हे अन्वेषण विभागाची बेसिक माहीती पण नाही.

घाउक रीतीने सगळा तपास विश्वासरावच करतील, असे दिग्दर्शकाने ठरवले असेल. नाहीतर इतकी प्रकरणे आहेत नाईकांकडे हवालदारापासून ते CBI पर्यंत सगळ्यांना तपासाला संधी द्यावी लागली असती.

पण नाईकांचे प्रकरण साध्या पोलीसस्टेशनकडून CID कडे गेले आहे म्हणून गावपोलीस काही करत नसावेत.>>> कुछ तो गडबड है, दया पता लगाओ. दया, तोड दो ये अलमारी.

<< दया, तोड दो ये अलमारी.>> . अण्णा त्येच्यातून भायेर इले कीं त्येंका चायचो कप समोर लागता, ह्यां लक्षांत ठेवा ! Wink

जर विश्वासराव lead आहै ( सद्याची story बगुन तरी आसा वाटत आहै ) तर आधी नीलिमा सगळं शोधून काढणार आसा का दाखवत होते ???
विश्वासरावचा character सिरीयल मध्ये अन्य मागचा नक्की हेतू काय ???? JUST FOR TRP का
I mean He is repeating the same stuff which Nilima has already said in earlier Episode फक्त एव्हडाच Difference आहै कि त्याची बोलण्याची पडत तोंडी वेगळी आहै compare to Nilima's .
Full story repeat होत आहै, मग ते गुरव काका बदल असो किंवा आईचा आजारपणा विषयी आणि आता छय्याचा लग्न

"खूनी कितीही जवळचा असला तरीही मीं त्याची गय करणार नाही" , ह्यां तो सतरांदा आजय बोललो; परत जर विश्वास रावान ह्यां वाक्य उच्चारलां तर मात्र आम्ही त्येचीच गय करूंचंव नाय [ त्येची बदली नक्षलग्रस्त चंद्रपूरच्या जंगलात झालीच समजा ] !! Wink

विश्वासरावचा character सिरीयल मध्ये अन्य मागचा नक्की हेतू काय ???? >>> नेनेवकीलाचा खून विश्वासरावने तर केला नसेल ना?

जरा काय झालां कीं अश्ये लोकांच्या अंगावर धावून जातास तरी सोसायटींत घाबरान
तुमकां कोण 'दत्ता नाईक' म्हणणां नाय ; पण त्यामुळें, माकां 'सरिता' म्हणतत त्येचां काय !!
Rada.JPG

जरा काय झालां कीं अश्ये लोकांच्या अंगावर धावून जातास म्हणान सोसायटींत घाबरान
तुमकां कोण 'दत्ता नाईक' म्हणणां नाय, पण माकां 'सरिता' म्हणतत त्येचां काय !!>> Lol

भाऊ Proud

नायकांच्या डोचक्यात मेंदू नाsssssय.

गावात आमंत्रण द्यायला कोण गेलं होतं? पांडू.
नेनेकाकी का आल्या म्हणाल्या? आमंत्रणाचा मान ठेवायला.
मग आमंत्रण कोणी दिलं असेल? पांडूने.

हे एव्हढं क्लिअर असताना काल दत्ता आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं नाही असं नेनेकाकूला का म्हणत होता? तो पांडुला शोधत असताना बाकीचे आश्चर्यचकित का झाले होते? निदान सायंटिस्ट बाईंच्या डोक्यात तरी प्रकाश पडावा ना.

आता पांडू गायब झाला किंवा खपला तर त्याचं खापर दत्तावर फुटणार. नेनीणीने दत्ताची कॉलर धरली तरी विश्वासराव स्वस्थ बसला होता. वर ती म्हणते मी देते ह्याच्याविरुध्द साक्ष. ह्याला बेड्या घाला. ही वकिलाची बायको आहे? हिला साक्ष कशाशी खातात, अटक कशाच्या बेसिसवर होते काही माहित नाही? उगाच मेलोड्रामा करत होती म्हातारी आणि लोक बघत बसले होते. माझं बीपी वाढलं फुकट. ह्या सगळ्या गडबडीत दत्ता सवाष्णीसारख्या आलेल्या आईला बघून दचकायचं सुद्ध्दा विसरला.:-)

तरी काल देविकाच्या आईला थोडं तरी झापलंन विश्वासरावने. ती मधेच मुंगी/ढेकूण चावल्यासारखी ओरडते आणि चेहेरा वाकडा करते.

आता छाया त्या अजयला मला इथून घेऊन जा असं म्हणतेय. मला एक कळत नाही...आत्ताच प्रकरण एव्हढं हातघाईवर का आलंय? का "सावनके महिनेमे लगी है आग बदनमे" असं काही झालंय? त्रास बाई आहे. घरात काय चाललंय आणि हिचं काही वेगळंच. ३ आठवडे पण दम निघेना.

पुढील वाक्यं ऐकून वात आलायः

माई: अवो, इकडे या बघू
गणेश: ह्या घरात काही चांगलं होणार नाही
विश्वासराव: मी कोणाची गय करणार नाही
निलिमा: माधव, तू ह्यात पडू नकोस
सरिता: अहो, तुम्ही मध्ये पडू नको
छाया: माझं अजयवर प्रेम आसा
सुषल्या: ही तुमच्या पापाची फळं आहेत

त्या सुषल्याला एकदा ह्या लोकांनी सुनवायला पाहिजे की ही आमच्या पापाची फळं आहेत तर तुझी आई काय सती सावित्री होती का? ठेवलेल्या बाईची मुलगी आहेस, लग्नाच्या बायकोची नाहीस. मग तोंड बंद कर. आणि एव्हढा पापपुण्याचा हिशेब आहे तर कशाला ह्या पापाच्या संपत्तीत वाटेकरी होतेस? चालू लाग की.

भाऊ Lol

काल सरिताची अगदीच शेळी झाली होती. नेनीणीच्या झिंज्या धरून बाहेर काढायला हवी होती तिला.>>>>>>>>

हो की. एरवी वचावचा बोलणारी निलीमा पण गप्प होती त्या वेळेस. त्या नेनिण बाईंनी जाम हैदोस घातला त्यांना बोलावले म्हणून. मला गंमत वाटते की नेने वकिल हे धुतल्या तांदळातले नाहीयेत हे नेनिणला माहिती नसणार असे शक्यच नाही. आणी केवळ वार झाला तेव्हा नाईक ऑफिस मध्ये होते, तेव्हा त्यांनीच वार करुन दवाखान्यात नेले हा अजब तर्क पण गावकरी आणी बाईंनी लढवला.

ह्या सगळ्या गडबडीत दत्ता सवाष्णीसारख्या आलेल्या आईला बघून दचकायचं सुद्ध्दा विसरला.स्मित>>>>:फिदी: तेच की. मला वाटल होतं की दत्ता आईला काहीतरी बोलेल, पण पांडुच्या कारनाम्याने भडकल्याने त्याचे तिकडे लक्षच गेले नसेल. आणी गंमत म्हणजे सुसल्याने पण त्यावर काही कमेंटस नाही केल्या. ती फक्त नाईकांवर नेनिण बाईने केलेल्या हल्ल्याची मजा बघत होती.

काल साबा म्हणाल्या अगं तो विश्वास म्हणतोय की तीन आठवड्यात खूनी पकडेल, मग सिरीयल संपणार का? म्हणलं अहो तसे नाही, नेनिणच्या हैदोसात दोन दिवस गेलेत. आज छाया तिच्या लग्नाबद्दल परत माईंचे डोके फिरवणार आहे, मग तीन आठवड्यात सिरीयल कशी संपेल्?:फिदी: पण त्या भुयारात सापडलेल्या सांगाड्यांचे काय झाले? काल अभिराम बॅटरी घेऊन बाहेर पडला तेव्हा मला वाटल की हा भुयारात काही उत्खनन करायला जातो की काय.:फिदी:

<< नेनेवकीलाचा खून विश्वासरावने तर केला नसेल ना? >> वा: ! म्हणजे नेनेवकीलाचो कांटो काढूंक नाईकानी पोलीसाकच सुपारी दिली !! आयडिया भारी पण << नायकांच्या डोचक्यात मेंदू नाsssssय.>> ह्येच्याशीं नाय जुळणां ना ह्यां !! Wink

ह्या सगळ्या गडबडीत दत्ता सवाष्णीसारख्या आलेल्या आईला बघून दचकायचं सुद्ध्दा विसरला.>> Lol हो ना. मी पण पप्पांना तेच म्हणाले.

अरे, त्या कोकणी अजय देवगणाक कोणीतरी अ‍ॅक्टींग शिकवा रे. नर्मदेतलो गोटो शरमेने मान खाली घालेल अशी गत हा त्याची. आणि ह्याच्याशी छायाक लगिन करुचो हा. आता काय म्हणावं? काल विश्वासराव घरी एकटोच कसो इलो? आणि अभिराम आधीच खोलीत हजर. हे नक्की अभिराम आणि विश्वासरावच हत ना? का पांडूच्या ३ मुंडक्याच्या बाईचे नातेवाईक? त्यांची पावलं बघूक होया.

काल देविकाची जीभ भारी चालत होती. म्हणे ह्या घरात नेहमी काहीतरी होत असतं. अग टवळे, तुला आधी माहित होतं ना. पण तरी इथेच सून म्हणून यायचं होतं ते. म्हणे आईना कुठेतरी ठेवा. वा ग वा! तिच्याच घरातून तिलाच बाहेर काढतेय. अभिरामाने जायचं तर जा म्हणून सांगितलं ते बरं केलं. स्वतःची भोचक ढालगज भवानी आई दिसत नाही होय हिला? जायचं तर जाऊ देत. उगा खायला काळ आणि भुईला भार. ह्या अभिरामाची परिक्षा जवळ आली होती ना? अजून सुरु नाही झाली ते?

काल विश्वासरावने निलिमाला हरभर्‍याच्या झाडावर एव्हढं चढवलं की मला तर वाटलं तिथे वर तिला आता शेवंता दिसणार. माधवचा आवेश किती टिकतो ते पाहू. विश्वासराव मात्र 'हा माझ्या कामाचा भाग नाही' हे ठासून पुन्हापुन्हा सांगत होता. हा नक्की काम काय करतो देवाला ठाऊक. माईंना दत्ताने सुषल्याला विष देऊन मारून, मग माधव आणि नाथाच्या मदतीने जाळायचा प्रयत्न केला होता ते सांगायला पाहिजे. अजून सुषल्याने ते विश्वासरावला सांगायची धमकी कशी दिली नाही?

Pages