Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भुयारात नक्की सांगाडे सापडले
भुयारात नक्की सांगाडे सापडले होते का? बहुतेक पुढील तपासासाठी अमेरिकेत पाठवले असावेत. अजून तपास होतोच आहे. नाईकांनी अजून वकिल केलेला नाही ह्याचं आश्चर्य वाटतंय. विश्वासरावने 'पुरावे तुमच्याच घरच्या कोणीतरी हा खून केलाय' असं अभिरामला सांगूनही...
छाया आणि देविका घरातून बाहेर का जात आहेत? कही इसमे कुछ राजकी बात तो नही?
अण्णांचा मृत्यू अकस्मात झाला असा पुन्हा उल्लेख झाला. हा मृत्यू नक्की नैसर्गिकच होता ना?
माईंना दत्ताने सुषल्याला विष
माईंना दत्ताने सुषल्याला विष देऊन मारून, मग माधव आणि नाथाच्या मदतीने जाळायचा प्रयत्न केला होता ते सांगायला पाहिजे. >>> तो प्रयत्न फसला हे ते कुठल्या तोन्डाने सान्गणार?
नाईकांनी अजून वकिल केलेला
नाईकांनी अजून वकिल केलेला नाही ह्याचं आश्चर्य वाटतंय>>> बहुतेक वकीलान्नाच भिती वाटत असेल की नेने नन्तर आपला नम्बर लागेल. म्हणून तेच फिरकत नसतील नाईकान्कडे. किव्वा असेही असेल की नाईकान्नाच भि ती वाटत असेल की उदया दुसर्या वकीलाने सुद्दा आपला वाटा मागितला तर.
जास्तीत जास्त महिन्याचं
जास्तीत जास्त महिन्याचं पोटेन्शियल असणारी रा खे चा २०० भागापर्यंत नेलीय, बाकी काही नाही. २०० त तरी संपणार आहे का ?
जास्तीत जास्त महिन्याचं
जास्तीत जास्त महिन्याचं पोटेन्शियल असणारी रा खे चा २०० भागापर्यंत नेलीय, बाकी काही नाही. २०० त तरी संपणार आहे का ?>> तसे काही वाटत तर नाही
काल देविकाच्या आईने देविकाला
काल देविकाच्या आईने देविकाला दुधपाण्याने ओवाळले मग अभिरामला का नाही?
काल निलिमाचं जमिनीबाबतचं
काल निलिमाचं जमिनीबाबतचं बोलणं ऐकून माधवला आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही. पहिल्यापासून ह्या दोघांची मिलीभगत तर नाही? माधव आजारी पडणं, निलिमा आणि सरिता गाडीत अडकणं, निलिमाच्या अंगात येणं, तिच्या कपाळावर कुंकू फासलेलं असणं वगैरे....दत्ता आणि कंपनी सगळं विकून निघून जावी म्हणून?
काल माई असं का म्हणाल्या की अभिरामाने सासरी काही खायला नको? त्यांना कुठे माहित आहे की देविकाची आई करणी करते?
>>काल देविकाच्या आईने
>>काल देविकाच्या आईने देविकाला दुधपाण्याने ओवाळले मग अभिरामला का नाही?
आपला तो बाब्या......
छायाचं लग्न झालं तर सरिताला
छायाचं लग्न झालं तर सरिताला काय प्रॉब्लेम आहे? उगाच तिची ललिता पवार केलीय.
त्या अभिरामने पण सांगून टाकायचं ना घरच्यांना की हिने माईला वेड लागलंय, त्यांना कुठेतरी नेऊन ठेवा असं म्हटलं म्हणून आमचं भांडण झालंय. उगाच बरजात्यांच्या पिक्चरमध्ये असतो तसा सगळ्यांनी नवं लग्न झालेल्या जोडप्याची चेष्टा करायचा प्रसंग पहायला लागला नसता. इतक्या लोकांनी देविका कुठे जातेय असं विचारलं की मला वाटलं शेवटी पांडू पण येऊन म्हणणार 'खय चालल्या देविकावैनी?'.
आजकाल ती देविकाची आई
आजकाल ती देविकाची आई तारस्वरात केकाटायला लागली की मला रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पे़काटात कोणी लाथ घातली की ते कसं ओरडतं त्याची आठ्वण येते आणि टीव्हीतून आत हात घालायची सोय असती तर काय मजा आली असती असं वाटतं. एक जोरदार ठोसा.......
सरिताला कोणी स्वयंपाकघरात आलेलं चालत नाही आणि म्हणे मलाच सगळं करावं लागतं. काय बाई आहे! वर म्हणते मला एकच दिवस माहेरी रहाता आलं. माहेरी अठरा विश्चं दरिद्रय....हिला ठेवून घेणं परवडलं असतं काय? माझी अशी जाऊ असती ना तर तिचे सगळे दात बरोबर तिच्या घशात घातले असते.
मागे कोणीतरी लिंक दिली होती
मागे कोणीतरी लिंक दिली होती ऑनलाईन बघायला; झीची न्हवते , वेगळीच होती.
कोणाला माहीत आहे का?
आपलीमराठी . कॉम
आपलीमराठी . कॉम
गणेश चतुर्थीच्या हार्दिक
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
काय गों निलीमा. तू मोदक
काय गों निलीमा. तू मोदक बनवल्यास का सरीताने? सरीताने तुका माजघरात बरां येऊ दिल्यान.
गणपती बाप्पा मस्त! निलिमाचे
गणपती बाप्पा मस्त! निलिमाचे मोदक सुबक झालेत एक्दम!
निलिमा छान दिसतेय या फोटोत.
निलिमा छान दिसतेय या फोटोत.
काय गों निलीमा. तू मोदक
काय गों निलीमा. तू मोदक बनवल्यास का सरीताने? >>>>>>>>> जतिन शेठ ने आणून दिले असतील. ....
101 मोदकांचा नैवेद्य बनवला
101 मोदकांचा नैवेद्य बनवला आहै निलीमा ने
मुंबैकर चाकरमानी इले नाय अजून
मुंबैकर चाकरमानी इले नाय अजून म्हणान काळजी कित्याक तुकां ? गणपतिच्या आधीं
नाईकांच्या घराचां दर्शन घेंवची पद्धत आसा हल्लीं !
काय चालू आहे मालिकेत सध्या?
काय चालू आहे मालिकेत सध्या? विश्वासला काही शोध लागलाय का?
छायाच्या लग्नाचे. विश्वासला
छायाच्या लग्नाचे. विश्वासला अजून शोध नाही लागला.
भाऊकाका व्यंगचित्र मस्त.
गणेशबाप्पांच्या मोदकांची जादू
गणेशबाप्पांच्या मोदकांची जादू विलक्षणच म्हणावी लागेल. एरव्ही निलिमाबद्दल इतक्या प्रेमाने कुणी संभाषण करत नसतील, पण ह्या वरील फोटोने कमालच केली आहे. परगावाहून खास गणपतीसाठी आलेली आपली बहीण वा भाची असून आपल्या सर्वांसाठी आनंदाने मोदक करत आहे असेच वाटत आहे निलिमाकडे पाहताना.
परगावाहून खास गणपतीसाठी आलेली
परगावाहून खास गणपतीसाठी आलेली आपली बहीण वा भाची असून आपल्या सर्वांसाठी आनंदाने मोदक करत आहे असेच वाटत आहे निलिमाकडे पाहताना.>> मनातले बोललात
<< एरव्ही निलिमाबद्दल इतक्या
<< एरव्ही निलिमाबद्दल इतक्या प्रेमाने कुणी संभाषण करत नसतील,>> अशोकजी, एरव्ही तीच जर डोळे वटारून, हातांत बाँम्ब आणि तोंडात कडू कारलां घेवन वावरता, तर कोण प्रेमान बोलतलो तिच्याबद्दल !!
काल अजयचो 'इंटरव्ह्यू' झालो
काल अजयचो 'इंटरव्ह्यू' झालो एकदांचो. तो मूळचो सातार्याचो असानय त्येचां मालवणी बर्याच नाईकांच्या मालवणीपेक्षां खूपच बरां वाटलां. नवर्या मुलाची चौकशी फक्त त्येचोच इंटरव्ह्यू घेवन भागता ? गांवांत कोणाकच अजय कोण ह्यां ठावक नाय; पण घरांत जवळ जवळ कोंडूनच ठेवलेल्या छायान मात्र त्येकां नेमको कसो आणि खंय गांठल्यान, ह्यां इचारुंचां एकाय नाईकाक सुचलां नाय ? 'हा तुमच्या घरांतला प्रश्न आहे ', ह्यां पालुपद गिरवत विश्वासराव सर्कशीतल्या रिंगमास्तरासारखो नाईकांक खेळवत असता, ह्यां कालच्या इंटरव्ह्यूतय दिसलांच !
छायाच्या लग्नाची घाई
छायाच्या लग्नाची घाई नाईकांपेक्षा विश्वासरावलाच अधिक आहे, जसं काही ती त्याच्याशीच लग्न करणार आहे. ......
भाऊ नमसकर...."...तर कोण
भाऊ नमसकर...."...तर कोण प्रेमान बोलतलो तिच्याबद्दल !!..." ~ अगदी बरोबर. तिची भूमिकाच अशी काही रंगविली आहे की ती सदैव कोणत्या तरी कोड्यात आहे असेच वाटत राहाते. तरीदेखील अन्य दोघींपेक्षा (सरीता आणि देवकी) निलिमा सर्व पुरुष घटकांच्या तोडीस तोड पद्धतीने कथानकात आहे हे मान्य केले पाहिजे.
नीलिमा इथे छान दिसतेय हे
नीलिमा इथे छान दिसतेय हे मात्र खरं. एरवी ती फार आगाऊ वाटते. अभिराम नेहेमीच चांगला दिसतो.
बाकी ह्या धाग्याचो TRP घटलाय हा. मी पण क्वचित इथे फिरकते.
भाऊकाका व्य.च. सॉलिड.
<< निलिमा सर्व पुरुष
<< निलिमा सर्व पुरुष घटकांच्या तोडीस तोड पद्धतीने कथानकात आहे हे मान्य केले पाहिजे.>> मान्य. कांहीं पुरूष घटकांपेक्षांही [ विशेषतः माधव ] तर सरसच !!!
<< 101 मोदकांचा नैवेद्य बनवला आहै निलीमा ने >> १०१ ! सिरीयलीतल्या प्रत्येक अनुत्तरित प्रश्नाचो जप करत एकेक मोदक वळताहा ती !!
<< 101 मोदकांचा नैवेद्य बनवला
<< 101 मोदकांचा नैवेद्य बनवला आहै निलीमा ने >> १०१ ! सिरीयलीतल्या प्रत्येक अनुत्तरित प्रश्नाचो जप करत एकेक मोदक वळताहा ती !! >>
तरीपण अनुत्तरीत प्रश्न जास्तच होतील हं.
Pages