Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निलीमा घाबरली पण भुतांका न्हय
निलीमा घाबरली पण भुतांका न्हय तर माणसातल्या भुतांका
भाऊकाका तुमची व्य चि
भाऊकाका तुमची व्य चि बघण्यासाठीच ह्या धाग्यावर येते.
अरे त्या पांडुला हाणा रे
अरे त्या पांडुला हाणा रे कुणीतरी
त्या अजयला ढगात पाठवलयं उद्याच्या भागात. फेसबुकावर कुणी असाल तर माझी ही तक्रार नोंदवा बर तिथे. त्या छायाच्या नशीबी शोलेच्या जया भादूरी चा रोल आलेला दिसतोय. इतिहास आपण बदलु शकत नाही, पण असल्या काल्पनीक कथेत तरी बदल करा की जरा. या सार्याच्या मागे कर्ता करविता तो जतिन सेठ आणी गुरवच असावेत.
पण का माहित नाही, त्याला
पण का माहित नाही, त्याला बघितले कि मला सारखा रामायणातील जांबुवंत आठवतो.>>खो खो > सॉरी मला सुग्रिव म्हणायचे होते. रामायण सिरीयल मधील सुग्रिव चा चेहरा आठवून बघा.

thank you thank you मी पण आता
thank you thank you मी पण आता सिरीयल कधी संपेल याचीच वाट बागात आहै....
@भगवती
विश्वासरावचा character main दाखवण्या साटी आता है लॉग नीलिमाच्या characterला week दाखवतं आहै .
( Personal View ) ते नीलिमा सारख्या strong characterला suddenly आवड week कसा दाखवू शकतात . ज्या बाईला एक माणूस दमकी देऊन जातो "तू जास्त दिवस जिवंत राहणार नाही " तेव्हा तिला त्याचा काही फरक पडत नाही आणि Suddenly विश्वासरावच्या entry नंतर तिला जातीं भाईचा एक कॉल काय येतो लगेच तिचा B.P low झालेला दाखवळ आहै.
विश्वासरावचा character नक्की का आणला आहै मला आजून समजला नाही,महिना संपत आला तरी याचे काय 3 आठवडे पूर्ण झाले नाही.कधी कधी आसा वाट हा 'मी किती चांगला आहै' है दाखवण्याचा प्रयत्न करतो For Eg. जर त्या तळघराबदल याने media ला सांगितले नसते तर त्यांना तोंडीच कळणार होते कि नाईककांच्या घरात तळघर आहै, same goes with Mumbai house matter त्याने आधीच inform करायला पाहिजे होता atleast proper वेळ बगुन तरी .
@रश्मी.. मला आसा वाट कि Pandu
@रश्मी.. मला आसा वाट कि Pandu culprit आहै
@सामी Even I used To think He looks like a monkey
Please ignore my Marathi grammatical mistakes
माकाय पांडूच सूत्रधार आसा असा
माकाय पांडूच सूत्रधार आसा असा वाटता. अजयक मारतले

सामी
<< माकाय पांडूच सूत्रधार आसा
<< माकाय पांडूच सूत्रधार आसा असा वाटता. >> ह्यां तर सगळ्यांक ठावक आसा ! लेखक म्हणान खरो << Panduच culprit आहै >> !!
छायाच्या लग्नाचे जे काही
छायाच्या लग्नाचे जे काही व्हायचे ते होवो; पण त्या निमित्ताने दिग्दर्शकाने कालच्या भागात दोन्ही भावांचे बहिणीप्रती प्रेम आणि ममता यांचे सुरेख आणि आत्मियतेने चित्रण केल्याचे जाणवले.
छायाच्या लग्नाचे जे काही
छायाच्या लग्नाचे जे काही व्हायचे ते होवो; पण त्या निमित्ताने दिग्दर्शकाने कालच्या भागात दोन्ही भावांचे बहिणीप्रती प्रेम आणि ममता यांचे सुरेख आणि आत्मियतेने चित्रण केल्याचे जाणवले. >>>>>> +१११
पण त्याआधी दाखवलेला छायाचा त्रागा मात्र अजिब्बात आवडला नाही .........
प्रोमो मध्ये छाया लग्नाच्या
प्रोमो मध्ये छाया लग्नाच्या पेहरावात मस्त वाटत होती पण तिचा तो होणार नवरा नदी नाल्यातून का धावत होता ?
अशोक. | 16 September, 2016 -
अशोक. | 16 September, 2016 - 12:52
छायाच्या लग्नाचे जे काही व्हायचे ते होवो; पण त्या निमित्ताने दिग्दर्शकाने कालच्या भागात दोन्ही भावांचे बहिणीप्रती प्रेम आणि ममता यांचे सुरेख आणि आत्मियतेने चित्रण केल्याचे जाणवले.>>>>>>>>>>>.स ह म त
<< पण त्या निमित्ताने
<< पण त्या निमित्ताने दिग्दर्शकाने कालच्या भागात दोन्ही भावांचे बहिणीप्रती प्रेम आणि ममता यांचे सुरेख आणि आत्मियतेने चित्रण केल्याचे जाणवले. >> तो एकच एपिसोड वेगळा पाहिला, तर हें खरं आहे. पण आतांपर्यंतच्या छायाला मिळालेल्या वागणूकीच्या पार्श्वभुमिवर , त्यांत 'मेलोड्रामा'च अधिक असल्याचं जाणवलं, हेंही खरं. कालच्या एपिसोडमधेही उगीचच छायाचा त्रागा परत परत उगाळत सिरीयलचा वेळकाढूपणाचा उद्योग चालूच होता.
होय, भाऊ नमसकर....तुम्ही
होय, भाऊ नमसकर....तुम्ही म्हणता तसा मेलोड्रामा होता हे मान्य; पण एखाद्या मुलीच्या कपाळी (तिच्या दुर्दैवाने...तिचा तसा काही दोष नसताना) लग्नासंदर्भात सुखाचे दोन दाणे वा टिळा लागत नाही आणि त्याचवेळी तिचे तिन्ही भाऊ त्यांच्या संसारात मग्न आहेत, पोरेबाळे आहेत...हास्यविनोदात राहू शकतात; हे पाहिल्यावर छायासारख्या मुलींच्या मनी वेदनेचा अग्नी सतत धुमसत असणार आणि त्याच्या जिव्हा प्रसंगी कधीही आणि कुणावरही...वेळकाळ न पाहाता...ती सोडत राहाणार. मानसिक स्थिती दोलायमान असण्याचे ते परिणाम असतात.
लग्न होऊन ती जाईल असे चित्र समोर येत असतानाच सुषमा त्याबाबत तिला काहीतरी अभद्र बोलली आहेच....त्याचा परिणाम आजच्या भागात दर्शविला गेला आहे असे दिसत्ये.....बाकी लग्न व्हावे तिचे ही इच्छा एक प्रेक्षक या नात्याने आहे माझी.
<< बाकी लग्न व्हावे तिचे ही
<< बाकी लग्न व्हावे तिचे ही इच्छा एक प्रेक्षक या नात्याने आहे माझी.>> अशोकजी, याबद्दल तर या धाग्यावर सर्वच जण सहमत असतीलच .
>>छायाच्या लग्नाचे जे काही
>>छायाच्या लग्नाचे जे काही व्हायचे ते होवो; पण त्या निमित्ताने दिग्दर्शकाने कालच्या भागात दोन्ही भावांचे बहिणीप्रती प्रेम आणि ममता यांचे सुरेख आणि आत्मियतेने चित्रण केल्याचे जाणवले
बाप रे! मला तर ते अति वाटलं. हे लोक एका क्षणाला कचाकचा भांडतात आणि दुसर्या क्षणाला गळ्यात गळे घालतात. सगळे नाईक मेंटल आहेत.
>>पण त्याआधी दाखवलेला छायाचा त्रागा मात्र अजिब्बात आवडला नाही
तिचं डोकं तपासायला हवं. काय तो थयथयाट की माझ्या लग्नाची काहीच तयारी नाही वगैरे. आणि म्हणे माझं हक्काचं घर. बये, त्यापेक्षा इतकी वर्षं शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिली असतीस तर काहीतरी उपयोग झाला असता. नुसतं 'लगीन, लगीन' करत बसली. त्यापेक्शा त्या 'वाडा चिरेबंदी' मधली प्रभा जास्त पटली मला.
>>प्रोमो मध्ये छाया लग्नाच्या
>>प्रोमो मध्ये छाया लग्नाच्या पेहरावात मस्त वाटत होती पण तिचा तो होणार नवरा नदी नाल्यातून का धावत होता ?
त्याला कजाग छायाबरोबर लग्न करण्यापेक्षा पाण्यात जीव द्यायचा होता. मग कुठे खोली जास्त आहे ते पहात असेल.
तो नक्की गायब आहे का ह्यांनी नुस्तं पिल्लू सोडलंय काय माहित. बाकी ह्यांच्या कथानकाच्या कोलांटउड्या पाहून आमच्या मेंदूला मुंग्या आल्या त्याचं काहीच नाही आणि देवघरात मुंग्या आल्या तर काय बोंबाबोंब. त्याचं पुढे काय झालं ते दाखवायचं पांडोबा इसरले.
मला तर दिसतंय की आरोपी म्हणून
मला तर दिसतंय की आरोपी म्हणून आता आण्णांना आणून विश्वासराव उभं करणार समोर आणि समस्त नाईकांना फेफरं येणार. ते कसे गेले ते सांगितलं नव्हतं.
अभिरामला शर्ट द्यायला पैसे नाहियेत का? त्याची बनियन पाहून कंटाळा आला.
बहीणीच्या प्रेमाचो सगळो
बहीणीच्या प्रेमाचो सगळो अतिरेक दाखवून सिरीयलीत शेवटीं त्या अजयचो खून पाडल्यानीच ! 'खूनी कोण', होय सस्पेन्स ताणतहतच !! बंद होऊंक इली तरी डोक्याक नसतो ताप देवचां काय बंद करणाहा नाय ही सिरीयल !!
कालच्या पूर्ण एपिसोडमध्ये
कालच्या पूर्ण एपिसोडमध्ये छाया घरून निघायच्या आधी आपल्या खोलीत फिरून येते हा एकच सीन मला आवडला.
बाकी छायाच्या दुर्देवाचो
बाकी छायाच्या दुर्देवाचो दशावतार बघता तो मकर राशीचो असतलो असं वाटता माका.
कधी कधी बेरीनानावर संशयाची
कधी कधी बेरीनानावर संशयाची सुई फिरते
<< कधी कधी बेरीनानावर संशयाची
<< कधी कधी बेरीनानावर संशयाची सु ई फिरते >> त्येंकां सध्यां फक्त 'सलाईन' लांवच्या सुईचीच गरज दिसताहा!!
त्येंकां सध्यां फक्त 'सलाईन'
त्येंकां सध्यां फक्त 'सलाईन' लांवच्या सुईचीच गरज दिसताहा!! >>>>>>
(No subject)
भाऊकाका, व्य चि भारीच.
भाऊकाका, व्य चि भारीच.
बेरीनानांच्या हाडांची काडं
बेरीनानांच्या हाडांची काडं झालेली आहेत ते कशाला काय करतायत.
त्या पांडूला म्हणावं तरण्याताठ्यांना मारण्यापेक्षा त्या बेरीनानाला उचलंव.
छाया बिच्चारी आहे खरच!
छाया बिच्चारी आहे खरच! विश्वासरावाच तो माणूस म्हणजेच अजय असावा, म्हणूनच त्याचा खून झाला असावा.
काल अजयची डेड बॉडी नाईकांना
काल अजयची डेड बॉडी नाईकांना दाखवायला विश्वासरावने नकार दिला. बहुतेक अजय मेलेला नाहिये. कदाचित त्याला झाडाला लटकावलं हे खरं असावं. पण तो वाचला असावा. खुन्याला 'तू जिंकलास' असं दाखवून द्यायचं असेल. पण त्यापेक्षा अजय वाचलाय हे जाहिर करून त्याच्यावर परत कोण हल्ला करतं ते शोधणं जास्त सोपं होतं नाही का? आणि अगदी लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत त्याला पुरावे आणायला कशाला पाठवायचं? बरं पाठवलं ते पाठवलं त्याच्यावर कोणी लक्ष ठेवायला नको? अजयच्या घरचं कोणी नाही हे माहित असूनही छायाच्या ३-३ भावांपै़की एकही 'वरधावा' म्हणून त्याला आणायला गेला नाही? आता अजयची खरी ओळख नाईकांना सांगायची काय गरज आहे?
निलिमाचा बदललेला पवित्रा पटला नाही. तिला अजयची डेड बॉडी का पहायची होती ते कळलं नाही.
सरिता हे सगळं सोडून जाऊ या म्हणते. नाईकांना इथून पळवून लावायला हे कोण करत असेल तर एक तर तो जगनसेठ आहे, पांडू किंवा नाईकाच्या चुलत घराण्यातले लोक.
<<नाईकांना इथून पळवून लावायला
<<नाईकांना इथून पळवून लावायला हे कोण करत असेल तर एक तर तो जगनसेठ आहे, पांडू किंवा नाईकाच्या चुलत घराण्यातले लोक.>>
जतिनसेठ तो. बाकी पांडू असू शकतो. चुलत घराण्यातील लोक नसतील असे वाटते कारण अजून ते मालिकेत दाखविलेले नाहीत. बाकी मला कधी कधी अभिरामचा संशय येतो. (रहस्यकथेतला सगळ्यात अनपेक्षित धक्का).
Pages