Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08        
      
     आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता  हयसर येवां अन धुमशान घाला.
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता  हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
 
रश्मी, भारीच हां
रश्मी, भारीच हां
आमच्या घरात कोम्बड्या
आमच्या घरात कोम्बड्या नाssssssय...पण तळघरात सांगाडे हाssssय...येतांव काsssय???
थॅन्क्यु काळजीवाहू.
थॅन्क्यु काळजीवाहू.:स्मित:
क्लिओ माका कोंबुबाय बघुचा
क्लिओ माका कोंबुबाय बघुचा हाव!
 माका कोंबुबाय बघुचा हाव!
रश्मी, क्लि भारीच. आता
रश्मी, क्लि भारीच. आता सांगाडे सोडून गोंडस भुतंपण येऊद्यात, धागा कसा रंगीबेरंगी होईल.
कित्याक धांवताहास नाईकांच्या
कित्याक धांवताहास नाईकांच्या घराकडे ? ते काय मोहेंजोदडोच्या उत्खलनातले
सांगाडे आसत आणि काय हृतिक रोशन येतलो त्येंच्यात्सून असां वाटलां ?
भारीच भाऊकाका . Thanx.
भारीच भाऊकाका .
 .
Thanx.
भाउकाका: व्यंचि मस्तच
भाउकाका: व्यंचि मस्तच ...........
रश्मीतै अमावस्येक मध्यरात्री
रश्मीतै अमावस्येक मध्यरात्री भेट ! दाखवते तुका कोंबुबाय
 अमावस्येक मध्यरात्री भेट ! दाखवते तुका कोंबुबाय 
व्यचि मस्तच!
आजचा एपिसोड - नाईकांकडे
आजचा एपिसोड - नाईकांकडे रक्षाबंधन ; पण, अचानक राखीतून राख निघाली नाहीं, माधवला ओवाळल्यावर सरिताने ' आमकां ती जमीन द्येवा'ची री ओढली नाही, गणेशाने रांगोळीऐवजीं मातींत रेघोट्या ओढल्या नाहीत, माई अण्णांक बघून लाडात आली नाही , सुषमाने बाहेर जातां जातां कांहींही टोमणा मारला नाहीं, पांडू कांही पचकायला आला नाहीं, नाथाला बायकोने कुणावरही छू: केलं नाहीं, नाना दांत विचकून हंसले नाहीत,......... एकंदरीत, छायाचा थोडासा 'मेलोड्रामा' , निलीमाचा मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न व विश्वास रावची नेहमीची अरेरावी सोडली तर आज प्रथमच नाईक कुटूंब रक्षाबंधनाच्या निमित्ताने कां होईना पण एक 'नॉर्मल' कुटूंब वाटलं !
आज प्रथमच नाईक कुटूंब
आज प्रथमच नाईक कुटूंब रक्षाबंधनाच्या निमित्ताने कां होईना पण एक 'नॉर्मल' कुटूंब वाटलं !>>>>>>> मग ही सिरेल बघण्यात काय मजा ??????????
माधवला ओवाळल्यावर सरिताने >>>> माधवाक सुसल्यानी ओवाळूक होवा नाय?????
<< मग ही सिरेल बघण्यात काय
<< मग ही सिरेल बघण्यात काय मजा ?????????? >> माकांय तांच सुचवचां होतां !

<< माधवला ओवाळल्यावर सरिताने >> माधवाक सुसल्यानी ओवाळूक होवा नाय? >> माधवाक मानलेल्या बहिणीन [ सरितान] आपल्या आधी ओवाळल्यान, ह्येचो सुसल्याक राग इलो आणि ती न ओवाळताच भायेर गेली !
[ आणि, हो, सांगाचां रवलां; त्या सांगाड्यांचो लॅब. रिपोर्ट इलो. ते माणसांचे सांगाडे नाय तर बकरिच्ये आसत आनी हाडां पाठवलीं त्येच्यांत कांहीं कांही माशांच्ये कांटे पण आसत; इतक्यांय नाय कळणां म्हणान रिपोर्टात विश्वास रावावर ताशेरे ओढलेत. मग नाथा कबूल करता कीं नाईक घरांत मासे -मटण खाणत नाय म्हणान अण्णा त्येकां भुयारात गुपचूप आणून बकरो कापूंक लावत, मासे आणूक सांगत आनि थंयच रांदून दोघय त्येच्यावर ताव मारीत.
काय एकेक स्वप्नां पडतत माकां ह्या सिरेलीमुळे !! :डोमा:]
काल नाईकांच्या घरातल्या तमाम
काल नाईकांच्या घरातल्या तमाम ढालगज बायांनी दिवट्या पुरुषांसमोर दिवे ओवाळले. मला तर वाटलं आता देविका पण माधवला ओवाळते का काय. निलिमा म्हणजे कुत्र्याचं शेपूट आहे तरी तिला सरिता आणि माधवने तू पण ओवाळतेस का म्हणून विचारायचं सोडलं नाही. माईंनी नानांना का राखी बांधली ते काही मला कळलं नाही. ते तिचे सासरे ना? रणजित विरजणराव नेमके मिठाच्या खड्यासारखे आले. ह्यानेच तो पेपर जाळला असेल आणि गावकर्यांनी जाळला म्हणून सांगितलं. निलिमाने म्हटलं नाही की मी जोवर गावकर्यांना पेपर जाळताना प्रत्य्क्ष डोळ्यांनी पहात नाही तोवर विश्चास ठेवणार नाही.
>>भाउकाका: व्यंचि मस्तच
>>भाउकाका: व्यंचि मस्तच ...........
+ १
मला तर ते सांगाडे भुयारात आणून ठेवण्यात पांडू-सुशल्या किंवा नाथा-सुशल्याचा हात दिसतो. मागे छायाचा बाहुला पुरतेवेळी तो हलला, सुशल्याऐवजी त्या पोत्यात दुसरंच काही होतं जे नाईकांनी जाळलं. ह्या सगळ्याच्या वेळी हा नाथा तिथे होता आणि घाबरल्याची अॅक्टींग करत होता.
अरे हो, ह्या सिरियलीचे १५०
अरे हो, ह्या सिरियलीचे १५० एपिसोडस झाले असं लोकसत्तात आलं होतं.
मालिकेचे १०० भाग पूर्ण
मालिकेचे १०० भाग पूर्ण झाल्यावर झालेल्या समारंभाबद्दल बातमी आली होती. त्यात निर्माता व दिग्दर्शकाने सांगितले होते की आता मालिका शेवटाकडे वाटचाल करत आहे व २०० भागांनंतर मालिका संपणार आहे.
त्यानुसार, दसरा (११ ऑक्टोबर) च्या आसपास ही मालिका सीमोल्लंघन करेल.
सरीतानी माधावला आणि माईंनी
सरीतानी माधावला आणि माईंनी नानांना राखी बांधली? काय पण. नगास नग करायचे म्हणून काही पण का?
काल सौम्य शब्दात काहोईना पण
काल सौम्य शब्दात काहोईना पण अभिराम ने विश्वासरावला थोडं झापलेलं बघून बरं वाटलं.
आत्ता ग बया! धागा लय मंजी लयच
आत्ता ग बया! धागा लय मंजी लयच माग ग्येला. शोभत नाय ओ, शोभत नाय. अगदी प्रेक्षकांची शोभा झाली तरी सिरीयल माका बघुची हाव. परवाच्या एपिसोड मध्ये ठोकळ्यो उर्फ माधवच्या ८-१० डायर्या सापडल्या. नेहेमी एकच दिसायची. मला वाटत बाकीच्या डायर्या त्याने वर कौलावर वळचणीला ठेवल्या असतील. मग काही माकडे तिथे आल्या नंतर त्यांनी त्या वाचल्या असतील. त्या डायर्यांमध्ये काहीच वाचण्यालायक न सापडल्याने त्यांनी नाईकांच्या घरावर दगड आणुन ठेवली असतील. म्हणले असतील की घरात एक दगड आहे जो काहीच करत नाही त्याला सोबत म्हणून हे दगड. तर तेच दगड नाईकांच्या कौलावरुन गारांसारखे खाली आपटले.:खोखो:
छायाबायला बरा विश्वास सापडला भाव म्हणून. ती काळी भावली कोण आणुन ठेवतं त्या विश्वासच्या खोलीत? बहुतेक गणेश तर नाही? कारण सरीता, दत्ता, छाया असे करत असतील असे नाही वाटत, कारण दत्ता आणी सरीता विश्वासला बर्यापैकी टरकुन आहेत. छायाने त्याला भाऊ मानलाय. म्हणजे उरला गणेश.
डायर्यांवरुन सिरीयल फारच प्रेडिक्टेबल झालीय.
कालचो एपिसोड - रात्रीच्ये खेळ
कालचो एपिसोड - रात्रीच्ये खेळ आतां जरा जरा उजेडांत येतीत, अशी आशा दाखवणारो ! पण सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरां आतां गावतीत या भ्रमात रवशात, तर मात्र फसलास असांच समजा !!!!
गणेशाक नादाक लावणार्या मांत्रिकाच्या विश्वास राव थोबाडीत मारता, तां मात्र अगदीं 'पोलीसी' खाक्यांत !!
कालचा भाग आवडला.
कालचा भाग आवडला.
हो मला पण. विश्वास ने काल
हो मला पण. विश्वास ने काल मस्त खळ्ळ खट्याक केले.
>>त्यानुसार, दसरा (११
>>त्यानुसार, दसरा (११ ऑक्टोबर) च्या आसपास ही मालिका सीमोल्लंघन करेल.
खरा की काय? बाय माजे, नाईकांच्या तावडीतून सुटणार शेवटी. देव पावला की
काल विश्वासरावने त्या
काल विश्वासरावने त्या माणसाच्या डाव्या गालावर न मारता उजव्यावर मारलं असतं तर त्याची 'मान वेळावूनी' होती ती तरी नीट झाली असती. पण त्याचे फोटो का बरं पोलिस स्टेशनला पाठवले? आणि म्हणे ह्याला ताब्यात घ्या. एकदा तरी ह्याने फोन केला आणि नेटवर्क बिझी आहे किंवा पलीकडचा माणूस फोन उचलत नाही असा ह्याचा पचका व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. तो स्ट्रॉबेरी आईसक्रीमच्या कलरचा गुलाबी शर्ट तर अगदीच अतरंगी आहे बुवा.
काल निलिमाने छायाचं सोंग बरं उघड़कीस आणलं. पण 'ह्या घरात सगळ्यांना डॉक्टरची गरज आहे' हे पचकायची काही गरज नव्हती. त्या अजयपेक्षा खरा अजय देवगण लुक्स डिपार्टमेंटमध्ये बरा आहे असं म्हणायची वेळ आली आहे. रच्याकने, मला अशीही शंका आहे की छायाच्या नवर्याचा सुध्दा गेम झाला असावा. नाईकांचं वाईट करायला.
जतीनशेठ, नेने आणि रघुकाका ह्यांचं सूत दिसतंय एकूणात. मामला जमिनीवर येऊन ठेपणार का शेवटी?
कालचा एपिसोड - देव-जमिनीची
कालचा एपिसोड - देव-जमिनीची जबाबदारी [ नारळ ठेवणें, दिवा लावणे इ. धार्मिक विधी] आतां आपणाक जमाची नाय असां म्हणान गुरवान माधवाच्या गळ्यात मारल्यान. त्येच्यातय आतां काय लफडां असात तां 'पांडू'च जाणे !
भाविक गृहीणी, मायाळू जाऊ या पासून कजाग व भांडखोर बाई , ह्या सगळ्याची सरिताची ओव्हर-अॅक्टींग परत दाखवूंक सगळो बाकी सगळो एपिसोड वापरल्यानी !!
अच्छा! देव-जमिनीची जबाबदारी
अच्छा! देव-जमिनीची जबाबदारी होती होय ती? मी तेच विचारायला आले होते. पण माधव मुंबईवरून त्या जमिनीत नारळ ठेवून दिवा कसा लावणार? म्हणजे ई-पूजा अलाऊड आहे का?
दत्ता लई डँबिस आहे. खानेकू मै और लडनेकू मेरा बडा भाई. जमिनीवर हक्क सांगायला मात्र ह्याचा पाय पुढे असतो. माधवने खरं तर निलिमाशिवाय कुठे एकटं जाऊच नये. त्याला सगळे चुना लावतात. बरं पण, प्रश्न फक्त देवजमिनीचा आहे तर मग निलिमाने त्याला असं का विचारलं की उद्या रघुकाकांवर नेनेच्या खुनाचा आळ आला तर तो पण तू स्वतःवर घेणार का म्हणून??
छायाने दुसरं लग्न केलं तर गावकरी वाळीत टाकणार? आणि अण्णांनी शेवंताला ठेवली होती तेव्हा गावाने काय केलं म्हणे? मजा आहे सगळी. त्या छायाला लग्नाची एव्हढी खुमखुमी आहे ते बघून वाटतं मागचे ७ जन्म ही लग्न न होता गेली की काय. म्हणे माका तुमच्यासारखा जगूचा आहे. म्हणजे काय? नटायचं-मुरडायचं आहे? का सवाष्ण म्हणून मिरवायचं आहे? का नवर्याशी वाद घालायचा आहे? तिची लग्नाची व्याख्या माका कळत नाय. सरिताला तरी ही ब्याद कशाला घरात हवी आहे काय माहित. माझ्यासारखी वहिनी असती तर म्हणाली असती जा बाई लग्न करून म्हणजे आम्ही तरी सुखाने राहू. गाव काय चार दिवस बोलेल आणि गप बसेल. निदान रोजची कटकट तरी गेली.
बाकी देविका आता रोज संध्याकाळी सरिताच्या पाया पडणार काय? म्हणे मोठयांका मान देवूक होया. परत त्या निलिमाला कुंकू लावायला गेल्या. माहिती असून चिखलात पाय का टाकावा माणसाने? आणि मग अंगावर उडाला म्हणुन बोंबलायचं. तिला नाही आवडत तर नका ना करू.
विश्वासराव कुठे आपलं आयडी
विश्वासराव कुठे आपलं आयडी कार्ड दाखवताना दिसत नाही. 'हे पोलिसात आहेत' असं गणेशने म्हटल्यावर लगेच सगळ्यांनी त्याला माहिती द्यायला सुरुवात केली. त्या गणेशला बरोबर का घेऊन फिरतोय हा? त्याने जे झालंय ते घरी जाऊन सांगावं म्हणून?
<< आणि अण्णांनी शेवंताला
<< आणि अण्णांनी शेवंताला ठेवली होती तेव्हा गावाने काय केलं म्हणे? >> स्वप्ना राज, इतक्यां सगळा शहान्यासारखां लिवतास पण ह्यां मात्र एकदमच उलटां कसां इचारलास ? अवो, गांवातल्या मालदार माणसाची जर कोण ठेवलेली नसात, तरच गांवात त्येची चर्चा होता ! बर्याच घरांत अशा ठेवलेल्या बाईक मानाचां स्थान देत; सणासुदीक तिकां घरसून साडी-चोळी अगदीं 'ऑफिशियली' पाठवत, घरच्या धार्मिक सोहळ्यांचांय तिकां आमंत्रण पाठवत. [ अगदी हल्लींपर्यंत ह्यां असां होता; पण अगदी काल-परवाची परिस्थिती मात्र माहित नाय. शिवाय, एक महत्वाचां - ही माहिती खात्रीची असली तरी ऐकीवच आसा; वगीच संशयान माझ्याकडे बघूं नकात ! ]
 ]
भाऊ, खरं सांगताय? बाप रे! हे
भाऊ, खरं सांगताय? बाप रे! हे असं असतं माहितच नव्हतं.
>>ही माहिती खात्रीची असली तरी ऐकीवच आसा; वगीच संशयान माझ्याकडे बघूं नकात
कालचो एपिसोड - जतीनशेठ आतां
कालचो एपिसोड - जतीनशेठ आतां आपलां खरां रूपडां दाखवंक लागलो. निलीमाक त्येना फोनवर दमात घेतल्यार तिकां कांपरां भरलां आणि बसली कपाळ धरान.
देवशेतीच्या जमिनीची जबाबदारी माधवान घेतल्यान म्हणजे त्येना मरणच ओढवून घेतल्यान, अशी जाम हवा नाईकांच्या घरात निर्माण झालीहा. काल तर सगळे त्येचां सुतक पाळूंच्या तयारीकच लागलेले. नक्की कारण काय तां मात्र कोण सांगणाहा नाय.
विश्वास रावाक वरच्या दोनय गोष्टींचो वास लागलोहा पण नक्की काय तां त्येकांय कळूंक नाय.
माई काल 'नॉर्मल' होती !
जतीनशेठ निलीमाक सांगता कीं ह्या प्रकल्पात आतां मोठमोठ्ठे लोक आसत आणि विश्वास राव त्येचां कायैक वाकडां करूं शकणां नाय. कथानक नाईकांच्या घरांतच न घुटमळतां आतां मोठ्या आखाड्यांत उतरतलां असां दिसताहा. डोक्याक आतां आणखी मोठ्ठो ताप देवचो तर 'पांडू'चो इचार नाय ना !
Pages