रांगोळी - भाग ३

Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20

रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..

रांगोळी च्या ३ र्‍या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ... Happy

या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623

तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोराची थीम आहे काय ग सायुतै?

दोन्ही मोर मस्तच. पहिला तर अगदीच खास होता.

धागासम्राट कुठे गेले? फक्त सम्राज्ञींच्याच रांगोळ्या येत आहेत...

हा पण छान आहे, पण मध्ये पूर्ण काळा करण्याऐवजी दोन-तीन रंगांच्या शेड्स केल्या असत्यास तर जास्त छान दिसला असता.

मुग्धा धन्स, मुद्दामच काळा रंग वापरला आहे.. नेहमी पेक्षा जरा वेगळे रंग आणि आकार काढण्याचा प्रयत्न करते आहे...

पण कोणाचेच प्रतिसाद येत नाहीयेत....

या लिंकवर मला काही रांगोळ्या दिसल्या ज्या सायुंच्या रांगोळ्यांशी साधर्म्य दाखवतात. मे बी आय एम राँग . कारण माझ्या फार लक्षात नाही. पण सायुंच्या कडप्पावरून हिंण्ट मिळाली

जस्ट चेक इट

https://m.facebook.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%AA%E0...

शशां, टीना, शब्दाली सगळ्यांचेच आभार ---------/\----------

जाई, अग मी त्या बोटांच्या रांगोळ्या व्हॉट्स अप वरुन बघुन काढल्या होत्या... बहुतेक तस मेन्शन पण केल होत.... Happy

सायुतै...फ़ारच छान!
लॅन्डस्केप, मनमयुर..दोन्ही थीम्स...बेस्ट!

Pages