रांगोळी - भाग ३

Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20

रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..

रांगोळी च्या ३ र्‍या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ... Happy

या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623

तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तनिश्का, प्रतिसाद लिहीता तिथे खालाच्या बाजुस "मजकूरात image किंवा link द्या." असा मजकुर दिसेल. त्यातल्या इमेज वर क्लिक केलेत, तर तुम्ही फोटो टाकु शकाल.

लेट झालाय मान्य पण यावर्षीच्या दिवाळीतला प्रयत्न इथे टाकल्याशिवाय चैन पडत नव्हत..

दिवस पहिला ११ ठिपके ११ ओळी
11 thipke 11 oli.jpg

दिवस दुसरा ११ ठिपके ११ ओळी
11 thipke 11 oli 1.jpg

दिवस तिसरा १७ ठिपके १७ ओळी
17 thipke 17 oli.jpg

दिवस चौथा आत्मबंधंकडुन प्रेरणा घेउन केलेला प्रयत्न
phulanchi.jpg

या हळदिकुंकवाला काढलेल्या रांगोळ्या..

माझी छोटी मावसबहिण मयुने काढलेली रांगोळी.

हि माझ्याघरी दादाने काढलेल्या दोन्ही.. एक रांगोळीची अन् एक धान्याची...

स्वरा, शब्दाला मस्तच रांगोळ्या, टीना ती copycat भारी जमलीय, मुग्धा फुलांची रांगोळी झक्कास ...

या माझ्या काहि ,
morpis rangoli.JPGrangoli diva.JPG

हि कुंदनची बनवलीय कार्ड बोर्डवर जुनी पत्रिका चिकटवून
kundan rangoli.JPG

हि वाहिनीने काढलेली
rangoli sadhna.JPG

व्वा सगळ्यांच्या रांगोळ्या खुप सुरेख..
हल्ली ईकडे यायलाच होत नाही..
पण लौकरच पुन्हा धागा पुर्वव्रत सुरु होईल..

छान आहेत
हल्ली तु रोज काढत नाहीस का रांगोळी

वा वा सायुताई! तिन्ही छान आहेत,पण पहिली जरा जास्तच आवडली. Cute आहे अगदी. हल्ली रोज रांगोळी काढत नाही का?

आला ब्वा वर धागा...
मस्तच रांगोळी सायु..
रामनवमीची काहीतरी जोरदार एंट्री असेल अस वाटलच होत..भारीच..

धन्स ग टीना...:)
बाकी कोणीच पाहिलेली दिसत नाहीये रांगोळी..

अरे,.काय झाले
इतक्या दिवसात कोणीच नाही टाकल्या रांगोळ्या.
आधी हा धागा नेहमी पहिल्या पानावर असायचा.

Pages