रांगोळी - भाग ३

Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20

रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..

रांगोळी च्या ३ र्‍या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ... Happy

या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623

तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायुतै, आत्मबंध .. मस्त रांगोळ्या!
सायुतै.. रंगावलीच्या धाग्यावर टाक ना हे दुसरे बाप्पा..

ईतक्यात ईकडे येणेच झाले नाही.. तुम्ही सगळ्यांनी कीत्ती छान छान रांगोळ्या टाकल्या आहेत,खुप छान वाटते आहे आज धाग्यावर येऊन..

आत्मबंध १५ सप्टेंबर ची रांगोळी खुप भरगच्च, मस्तच.. अर्थात बाकीच्याही खुप सुरेख...
डी विनीता, दसरा स्पेशल खरच स्पेशलच!! Happy
रेणु दोन्हीही रांगोळ्या छान, फक्त फोटोचा साईझ थोडा मोठा हवा होता.
टीना तुझ्या ही रांगोळ्या येऊ देत.. बरेच दिवसा पासुन पाहिल्याच नाहीयेत..

सध्या काही कारणामुळे मोठ्या / थीम रांगो़ळ्या काढायला वेळ मिळत नाहिये...
त्यामुळे ह्या माझ्या काही ईटुकल्या पिटुकल्या रांगोळ्या...

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!!!
टीना रांगोळ्या पण दे ईकडे..
वैशाली, क्रोम मधे उघडुन बघा मा.बो.

अख्खी दिवाळी सरली अन् कोणाच्याच रांगोळ्या नाही आल्या म्हणजे काय...
माझ एक ठिके कि मी काढल्याच नाई पण बाकीचे लोक कुटिसा हारपले ?

ज्या दोन चार काढल्या त्याचे फोटो दावते थांबा..

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/t31.0-8/fr/cp0/e15/q65/15000693_1096520157112916_3662294453660365623_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/t31.0-8/fr/cp0/e15/q65/15002286_1159649980787953_6526634137666306577_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9

वा.. दिवाळीपासून मायबोलीवर यायला आत्ता वेळ मिळाला आणि आजचा दिवस सार्थकी लागला.. एवढ्या सुंदर रांगोळ्या बघुन आता माझ्या रांगोळ्या इथे टाकायला कसेतरी वाटतेय, तरी टाकेन लवकरच..

आत्मबंध काय सुरेख रांगोळ्या... डोळ्याचे पारण फीटलं...
स्वरा सगळ्या रांगोळ्या भारी...गणपतीची जास्त आवडली..
शब्दाली, तुमच्या बहिणीची रांगो़ळी पण छानच...
माणीक काही ही काय! तुझ्या रांगोळ्या खुप छान असतात...
लौकर टाक ईकडे...
टीना, रांगोळ्या टाकते म्हणुन कुठे गुडुप झाली देव जाणे..:अओ:

Pages