काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिळाले की त्याला सिग्नल. तो म्हणाला ना हमारा प्यार इकतर्फा नही है|

निशावहिनीला सिग्नल दिसू नये म्हणून गौरी काळजी घेत असेल Wink

काल आजी आणि निशाचा सीन धमाल होता. निशा बाकी सगळ्यांच्या अभिनयातली कमतरता आपल्या ओव्हरअ‍ॅक्टिंगने भरून काढतेय.

परवाच्या भागात गौरीला उद्देशून मितूच्या तोंडी एक छान वाक्य होतं : माझं घर बसायच्या आधीच तू..... (हे पहिलं क्रियापद ऐकून माझे कान चांगले मिनिटभर बसले त्यामुळे पुढचे क्रियापद काय ते लक्षात राहिले नाही) .....उधळून लावलंस इ. काही असू शकेल.

माझं घर बसायच्या आधीच तू..... (हे पहिलं क्रियापद ऐकून माझे कान चांगले मिनिटभर बसले त्यामुळे पुढचे क्रियापद काय ते लक्षात राहिले नाही) .....उधळून लावलंस इ. काही असू शकेल.>>>> Lol

उभं केलंस असं असेल. Happy

भ्रम.. मस्त! Happy

आणि एक डायलॉग होता.. मीतूच्या तोंडी...."मी लावलेल्या प्रेमाच्या झाडावर ही गौरी येऊन बसलीये ना..!!"...कोण लिहीतं असले भयाण डायलॉग्ज?
हिंदी साईडर आहे वाटतं लेखक.......शिव ला कंपॅटिबल म्हणून?

."मी लावलेल्या प्रेमाच्या झाडावर ही गौरी येऊन बसलीये ना..!!">>> Lol

कैतरीच. निदान मी लावलेल्या प्रेमाच्या झाडाची फळं ही गौरी खाणारे असं तरी म्हणायचं

त्या शिवला नक्की इतकं प्रेम कधी झालं?>>>>>>

मला पण असच वाटल .. एक दोन काय ते सिन झाले..

पण येवढ अगदी मी सूर ती ताल.. ई. कधी झाल..??

वेणू म्हणाला तस जर मितू खुष नाहिये तर गौरी तोपर्यंत आपल्या भावना नाही दाखवु शकत
बरोबर दिसणार नाही ना..

सगळेजण बहुधा आपापले डायलॉग आपणच लिहित असतील असं वाटतं. दिग्दर्शकाला अगदी नैसर्गिक वागणं अभिप्रेत असावा.

माझं घर बसायच्या आधीच तू..... (हे पहिलं क्रियापद ऐकून माझे कान चांगले मिनिटभर बसले त्यामुळे पुढचे क्रियापद काय ते लक्षात राहिले नाही) .....उधळून लावलंस इ. काही असू शकेल.>>>.ती मितू फिल्मी आहे ना, म्हणून असा dialogue असावा. मी असा विचार केला आणि सोडून दिलं.

परवाच्या भागात गौरीला उद्देशून मितूच्या तोंडी एक छान वाक्य होतं : माझं घर बसायच्या आधीच तू..... (हे पहिलं क्रियापद ऐकून माझे कान चांगले मिनिटभर बसले त्यामुळे पुढचे क्रियापद काय ते लक्षात राहिले नाही) ..... >> Rofl

"मी लावलेल्या प्रेमाच्या झाडावर ही गौरी येऊन बसलीये ना..!!">>> Rofl

आत्ता हसू येतय पण खरंच भयानक होते ते संवाद. तेव्हा ऐकताना मी पण 'सुधीरबुधीर' झाले होते. Proud

तो मिर्चीवाला एपिसोड आज आहे..

गौरी एकदाची हसायला लागली बाबा..

नव्या जाहिरातीत चक्क हसुन लाजत आहे...

मिरचीवाला सीन झाला का ? शिवचे डोळे बोलके आहेत, फ्लर्ट करायला छान जमत त्याला, पण समोरून प्रतिसाद अगदीच थंड

नाही हो.. गौरी ला मितु ने सिग्नल दिल्यापासुन चांगली हसायला लागली आहे.. म्हणजे दोन एपिसोड तर् बरी
वाटली आता बघु..

मिर्ची वाला एपिसोड आज आहे..

शिवच्या बाजूनेच जास्त प्रेम दिसते आहे. प्रेमाळलेला फिल्मी मुलगा. मला पण तो हम दिल दे चुके सनम वालाच सीन आठवला. आज लोटाभर पाणी जव ळ ठेवून बघा बै. क्किती खोडकर आमची गौराई.

हम दिल दे चुके सनम मध्ये सल्लु, ऐशला कैतरी चिडवतो म्हणुन तो मिरच्यांचा सीन आहे ना? इथे तर हा फक्त उत्तर मागतोय..

गौरीचं टाळकं सरकलेलं आहे ना पण!! शिव ने काय घोडं मारलंय हिचं तेच कळत नाही....मस्करी केली म्हणे!
मूर्ख भावनाशून्य, पत्थरदिल कारटी !!!!! :-|

अग आंगो पण इथे मिरच्या खाउ घालण्याचा काही संबंधच नाही.. मस्करीच करायची तर सिच्युएशनला साजेलशी करायची ना.. इथे ती मूर्ख नाही तर डायरेक्टर मूर्ख आहे.

निधी, शिव गौरीला सारखा सारखा माझ्या प्रश्नाच उत्तर दे म्हणत अस्तो. त्याचा रात्रीच्या जेवणाचा डबा भरताना ही शहाणी त्याच्या डब्यात बाकीच्या अन्नाबरोबर हिरव्या मिरच्या पण भरते.. हा चिडुन कचाकचा मिरच्या चावुन खात असताना हि धावत येउन त्याच्या हातातुन मिरची हिसकावुन घेते आणि म्हणते वाट्ट मी मस्करी करत होते म्हणुन.. हे सगळ आजच्या भागात दाखवणार आहेत...

आँ.. बरी आहे ना गौरी. Uhoh सरळ उत्तर द्यायचं तर का छळते त्याला.

मला हल्ली ती हाफमॅड वाटू लागली आहे. Proud

ओके मुग्धा. मी हल्ली पाहत नाही त्यामुळे समजलं नही.

अग ती त्याला म्हणते की तु मला मराठीतुन विचारशील तेव्हा मी माझ उत्तर देईन. त्यावर तो म्हणतो की आज संध्याकाळी डबे घेउन येशील तेव्हा तयार रहा. आता इतक झाल्यावर हिला डब्यात मिरच्या भरायच का सुचल काय जाणे ब्वा?

मला हल्ली ती हाफमॅड वाटू लागली आहे. >>>>> हाफ का? उरलेल हाफ शिवच्या प्रेमात पडलीय म्हणुन माफ का? Lol

Happy

मुग्धा, तुझे अपडेटस मस्त! खरंच मिरच्यांचं प्रयोजनच काय ते कळलं नाही!

ती हाफ मॅडच आहे....ते जास्त डेंजर असतात फुल मॅड पेक्षा.....

हि गौरी स्वत:ला हम दिल दे चुके ची नन्दिनी समजते का? शिवला आधी मिरच्या, आणि नन्तर दही खायला लावायला?

बाकी सिरीयलची हम दिल दे चुके होऊ नये म्हणजे झाल(तसेही गौरी नन्दिनी सारखीच तिखट, उदधट वागते कधी कधी) , हि प्रेम करायची शिववर, आणि मोजो तिचे लग्न भलत्याच कुणाशी लावून द्यायचा. मग गौरी शेवटपर्यन्त त्याच्याबरोबरच फिक्स राहायची. मग सिरीयलच्या टायटलला अर्थ काय राहणार?

उगाच नाही हिरो-हिरवीणी ची नावे शिव-गौरी आहेत.

हम दिल दे चुके सनम मध्ये सल्लु, ऐशला कैतरी चिडवतो म्हणुन तो मिरच्यांचा सीन आहे ना? इथे तर हा फक्त उत्तर मागतोय..>>>> नाही, उलट ऐश सल्लुला चिडवते कि, "मीठा खाना सिर्फ मीठे बुद्दुओ के लिये है, हम जैसे तिखे होशियारो के लिये नही." कारण आधी तो हलवा खात असतो ना. मग काय, सल्लू रागाच्या भरात मिरच्या खातो.:हाहा:

रच्याकने मुग्धटली, तु सल्लु, ऐशला कैतरी अस लिहिलस, मी चुकून सल्लु,ऐश,कैतरीना अस वाचल.:फिदी:

हां सुलु आठवल.. नक्की कोण कोणाला चिडवत होत ते आठवत नव्हत, पण या शिरेलीतल्या कथानकाशी त्याचा का ही ही संबंध नाही येवढ नक्की आठवत होत.

बाकी सिरीयलची हम दिल दे चुके होऊ नये म्हणजे झाल(तसेही गौरी नन्दिनी सारखीच तिखट, उदधट वागते कधी कधी) , हि प्रेम करायची शिववर, आणि मोजो तिचे लग्न भलत्याच कुणाशी लावून द्यायचा. मग गौरी शेवटपर्यन्त त्याच्याबरोबरच फिक्स राहायची. >>>>> या कन्सेप्टवर "जुळुन येती रेशीमगाठी" नावाची शिरेल कम खाद्यसंस्कृती शो येत होता "सौभाग्यवती"च्या आधी.. सौभाग्यवती सुरु झाल्यावर जुयेरेगा परवडली अस म्हणायची वेळ आली.

Pages