काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना. काल परत येवढ मोठ्ठ मराठी वाक्य तिच्या तोंडावर फेकुन "अब क्या किया मैने" याच विचारात राहीला बिचारा.

अरे काळजी करू नका, तो शिव नोकरी मिळवून देणार गौरीच्या दादाला (माझा अंदाज), मग शिवचे महत्व अजून वाढणार family त. मोस्टली असं होतं शिरेलीत.

अरे हा, असं असतं ना बरेचदा, सारख्या तर असतात सर्व. सध्या लिमिटेड सिरीयल बघत असले तरी १० वर्षापूर्वी बघायचे काही सिरीयल, अगदी हिंदीही. साधारण कथानक कसे वळण घेतं हा अंदाज येतोना. हि सिरीयल बघतेय अजूनही, मध्ये काही दिवस नाही बघितली पण काल बघितली त्यामुळे मला वाटतंय तसं. शिव तारणहार.

सगळे लोक फकस्त गवरी आणी शिवचा इचार करु र्हायले, मले तं बाप्पा गवरीच्या माय नं बापुसची खूप दया येऊ र्हायली.:अरेरे: अरे कोणाकडे धुपाटणे/ मुसळ आणी असलेच काय बाय असंल तं मले उसनं द्येवा जरा. मले तं त्या पसरणीच्या घाटाला लय म्हंजी लयच बुकलावस वाटु र्‍हायले.:राग::फिदी:

रश्मी Lol

काल ती पैसे घेते हातातुन तेव्हा मी म्हणाले, हिला घराबाहेर का नाही काढत. त्यावर साबा म्हणल्या पण कुठलीच सून अस वागत नाही, डायरेक्ट सासर्‍यांच्या हातातुन पैसे काढुन घेत नाही. एकवेळ नवर्‍याच्या डोक्याशी भुणभुण करेल पण अस वागणार नाही..

घरात भांडणं सुरू असतात, तोच विचार डोक्यात घेऊन गौरी डबा द्यायला जाते, शिवला त्याची कल्पना नसल्याने तो तिला काहीतरी रोमँटिक ऐकवतो, त्यावर कुणीही प्रेमात पडलेली 'हो रे.. तू मराठीत बोलायचा प्रयत्न करतो आहेस... पण घरात अशी परिस्थिती आहे... मी काय करू? ... मला काहीच सुचत नाहीये... तू समजून घेशील का?...' इत्यादी इत्यादी मनातली खळबळ त्याच्यासमोर उघड होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करेल...
तो प्रयत्न डोळ्यांतून, चेहर्‍यावरून दिसायला हवा... पण इथे गौरीम्याडम मख्ख !! Sad

लले, तू फारच अपेक्षा करतियेस त्या गवरीकडुन Lol

काल निशा पुन्हा पैसे घेउन गेल्या हातातुन ओढुन Lol आणि किती ती असंबद्ध बोलते की घराबाहेर काढल्यावर सोय व्हावी म्हणुन, सेव्ह करतेय भविष्यासाठी Proud

पण मला त्या शिवचा प्रामाणिक प्रयत्न आवडला मराठीतुन बोलायचा Happy तोच काय तो प्रेमाळलेला वाटतोय बाकी उजेडच आहे सगळीकडे.

तो प्रयत्न डोळ्यांतून, चेहर्‍यावरून दिसायला हवा... पण इथे गौरीम्याडम मख्ख !! अरेरे>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

त्यामुळेच शिव पण आता मी काय केलं असा बघत होता..

डोळ्यातुन व्यक्त होता येत नाहिये तर एखाद वाक्य तरी द्यायच ना तिला..

तिला तर गिरकी अवॉर्ड द्यायला पाहिजे..
शिव काहितरी सांगतोय ...ही निघाली गिरकी घेउन
तो काही विचार्तोय....ही निघाली गिरकी घेउन ...
सर्किट वाटते..

संथ चालली आहे ही मालिका..
ह्या गतीने लग्न कधी दाखवतील काय माहित?

कालचे वेणु अन शिवचे मराठी ट्रांसलेशन पण मस्त. >>>> पण ज्या शिवला मराठी भाषेचा गंधही नाही त्याला त्या भाषेची स्क्रिप्ट कशी काय माहित?

हिंदी आणि मराठी दोन्ही देवनागरीत लिपीतच लिहितात ना? >>>> मग त्याला "पातेलं" हा शब्द वाचताही यायला हवा.. जो त्याला नाही आला.

ज्या शिवला मराठी भाषेचा गंधही नाही त्याला त्या भाषेची स्क्रिप्ट कशी काय माहित? >>>>
नाहि तो हिन्दी स्क्रिप्ट्चे भाषांतर करायला सांगतो वेणुला

पण ज्या शिवला मराठी भाषेचा गंधही नाही त्याला त्या भाषेची स्क्रिप्ट कशी काय माहित? >>>

नाही शिव त्याला हिन्दी स्क्रिप्ट्चे मराठीत भाषांतर करायला सांगतो आणी वेणु त्याची मस्त वाट लावतो

अरे हो, ते लक्शातच नाही आले.

पण खरच काल त्या निशाचा खुप राग आला आणी शु गो - मो जो ची दया.

असतील का अश्या कुणी निशा सारख्या Angry

हिंदी आणि मराठी दोन्ही देवनागरीत लिपीतच लिहितात ना? >>>> मग त्याला "पातेलं" हा शब्द वाचताही यायला हवा.. जो त्याला नाही आला. >>>>

जाउदे, मला काय म्हणायचय ते कळत नाहीये इथे.. युद्ध सुरु व्हायच परत.. असो.. >>>

अहो कळले तुमचे म्हणनने. जरी उच्चार वेगळा असला तरी लिहा-वाचायला तरी यायला हवा होता पण नाही जमला, जाऊद्या ना.

इरिटेटिंग भाग कालचा...
मुर्ख गौरी येवढं मराठीं मधे बडबडली शिवला काही कळल नाही..
खरच प्रेम असत तर तिला वाटल असत ना की शिव गोंधळुन जातोय त्याला काहीच समजत नाहिये .. आपण थोड तरी त्याला समजेल असं बोलावं पण नाही..

इथे तिचा मराठी भाषेचा अट्टाहास फारच टोकाचा झालाय...

तिच्या बॉसने पण लगेच ७५००० रोख दिले तिला.. देवा

त्या गौरीचे बाबा तिचा सर्व पगार इन्वेस्ट करतात असं म्हणालीना ती काल, मग कर्ज घेतल्यावर पगार कमी आला हप्ता कापुन घेतल्यावर तर बाबांना काय सांगणार आहे ती.

काल हिंदीतून सांगायला हवं होतं गौरीने शिवला, शिकतोय ना तो मराठी पण जरा वेळ लागेलना त्याला.

त्या गवरी मुळे हल्ली कंटाळा यायला लागला आहे Angry शिवसाठी किती दिवस बघणार????

तिच्या बॉसने पण लगेच ७५००० रोख दिले तिला.. देवा>>> त्याबद्दल फार काही वाटले नाही. गवरी (जर) बाराच काळ तिथे नोकरी करत असेल तर ७५००० म्हणजे काही फार रक्कम नाही.

Pages