काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल हिंदीतून सांगायला हवं होतं गौरीने शिवला, शिकतोय ना तो मराठी पण जरा वेळ लागेलना त्याला.. हो ना. ती जराहि हिंदी तुन बोलत नाही..शिवला समजतय की नाही याची काहिच पडली नाहिये तिला.हे कसलं प्रेम?

तिच्या बॉसने पण लगेच ७५००० रोख दिले तिला.. देवा>>> त्याबद्दल फार काही वाटले नाही. गवरी (जर) बाराच काळ तिथे नोकरी करत असेल तर ७५००० म्हणजे काही फार रक्कम नाही. >>>>

मान्य, पण असे लगेच तेही रोख रक्कम देत नाहीत कुठेही, बर्याच प्रोसिजर अस्तत

अगदी अगदी काल हेच वाटल एपिसोड बघताना.. एरव्ही खट्याळपणा किंवा गंमत म्हणुन ठीक आहे, पण काल जेव्हा तिला मनापासुन शिवला काहीतरी सांगायच होत तेव्हातरी तिने त्याला समजणार्‍या भाषेत सांगायला हव होत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जर गौरी इतक मराठी मराठी करते तर शिवनेसुद्धा हिंदी हिंदी कराव. ती जशी तु मला मराठीतुनच प्रपोज कर म्हणुन हट्ट करु शकते तर यानेही तुसुद्धा माझ्याशी हिंदीतुनच बोल असा आग्रह धरावा.. हा आपला सतत "ये गौरीजी क्या बोल के गयी, कुछ समझा ही नही" मोडमध्येच असतो..

मान्य, पण असे लगेच तेही रोख रक्कम देत नाहीत कुठेही, बर्याच प्रोसिजर अस्तत>>> हो पण कंपनी छोटी असेल (One man show) तर बॉसच्या हातात सगळ असत. त्यामुळे लगेच रोख रक्कम पण लगेच देता येते.

मग हिंदीच का काढत नाही शिरेल.. बरोबर आहे जे काही चालु आहे ते..पण शिव ला काही च समजत नाहीये त्याचे काय?

मग हिंदीच का काढत नाही शिरेल.. बरोबर आहे जे काही चालु आहे ते. >>>> कांपो, आपल्याला जर समोरच्या माणसाशी संवाद साधायचा असेल तर त्याला कळणार्‍या भाषेत बोलण हे कॉमन आहे.. मी लिहिलय त्यानेही तिच्यासारखा हट्टीपणा करावा, पण त्याआधी हे ही लिहिल आहे की एरव्ही गंमत म्हणुन तिने मराठीचा आग्रह धरण ठीक आहे, पण कालच्या प्रसंगातल तिच मराठीमधल बोलण हे अगदी बळंच वाटत होत.

बोलण्याच सोडुन द्या इथे कुणी काही कारणांनी रोमन लिपीत मराठी (जी आपण सर्रास व्हॉट्सअ‍ॅप आणि SMS साठी वापरतो) लिहित असल तरी इथल्या सदस्यांकडुन त्याची हेटाळणी झालेली मी पाहीली आहे.. अशा वेळी तो माणुस म्हणतो का की अख्खी मामायबोलीच रोमन लिपित करा म्हणुन..

एरव्ही गंमत म्हणुन तिने मराठीचा आग्रह धरण ठीक आहे, पण कालच्या प्रसंगातल तिच मराठीमधल बोलण हे अगदी बळंच वाटत होत. >>>>>>>>>>+१११

आपण एखाद्याशी बोलतो ते त्याला आपल्या भावना पोहचवण्यासाठीच ना..

मग समोरच्याला काहिच कळत नसेल तर निदान थोड तरी त्याला कळेल अस बोलावं..

मी लिहिलय त्यानेही तिच्यासारखा हट्टीपणा करावा, पण त्याआधी हे ही लिहिल आहे की एरव्ही गंमत म्हणुन तिने मराठीचा आग्रह धरण ठीक आहे, पण कालच्या प्रसंगातल तिच मराठीमधल बोलण हे अगदी बळंच वाटत होत.>> +१.
ती मनापासून काहीतरी सांगतेय.. तर त्याला समजण्यासाठीच सांगत होती ना.. मग त्याला समजेल अशा भाषेत बोलावं ना. नाहीतर उपयोग च काय बोलून??

घरी येणार्‍या मोलकरणीचे प्रकरण म्हणजे ओढुन ताणुन आणलेले वाटते. >>>> हो ते आहेच विठ्ठल पण प्रामाणिकपणे सांगायच तर त्यावेळचे सासु-जावयातले संवाद आणि अभिनय धमाल आणतात. अख्खी शिरेल इतकी कंटाळवाणी होते त्यात हे बघायला जरा बर वाटत...

बाकी घरात कामाला मोलकरीण नको असण्यामागच कारण कळ्ळ नाही...

मी वरती तसे लिहीले तर ती सिरीयलमधे फक्त हिंदीच येईल. चॅनेल मराठी, सिरीयल मराठी, प्रेक्षक मराठी तर मग हिंदीत जर संभाषण चालु राहिले (ते सुध्दा हिरो हिरवीणीचे ७५%) तर सिरीयल मराठी राहिल का? स्टार प्लस वगैरेला जाईल की. तसेच हिंदी गाण्यात, इंग्रजी शब्द, मराठी गाण्यात हिंदी, इंग्रजी शब्द बघुन आपण नाही का वैतागत. तसेच इथे ७५% हिंदी आले तर प्रेक्षकवर्ग वैतागु शकतो. त्यामुळे तसे करत असतील. मुळातच पहिल्या दिवसापासुन ती थोडी हेकेखोर दाखवली आहे व शिव अ‍ॅडजस्ट करणारा त्यामुळे ते तसेच ठेवले असावे. तरी बर कालपरवाच शिव त्या मितुला सांगत होत ना. हम उनकी नजरोंसे समझ जाते है के वो हमस्त नाराज है. मग 'डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे' असे गौरीला वाटत असेल. Happy

भावनाशून्य डोळे असतात तिचे. त्यात काय डोंबल वाचु शकणारे तो?>>
प्रेमात पडलाय तो. भावनाशून्य डोळ्यात पण पोहेल. Wink

तसेच इथे ७५% हिंदी आले तर प्रेक्षकवर्ग वैतागु शकतो. >>>>>>>

नाही ... एखादं सुचक हिंदी वाक्य टाकायला हरकत नव्हती.. अगदी ७५% हिंदी नाही बोललं तरी

मोजो शुगो चे डायलॉग असेच आहेत..

थोडफार मोडक तोडक बोलुन संवाद तरी पुर्ण करतात ते..

मुगु, अगं मोजो स्वावलंबनप्रेमी असतात त्यांना बाहेरून कोणी घरात येऊन काम केलेले आवडत नाही म्हणून मोलकरीण नको असते त्यांना. (हे लॉजिक मला पटलं नाही).

शिव साठी एक तडकते फडकते मराठी गाणे. ""डोळ्यात सांजवेळी आणु नकोस पाणी"" ( हे अर्थातच तो गवरीला म्हणेल)

आजी आणी जावया मधील संभाषण व लटक्या भांडणा मुळे ही सिरीयल तसेच पांडुमुळे राखेचा सुसह्य होतेय.

मुग्धा Lol मागे मोलकरीण पहिल्यांदा घरात येते तो अभिनय जबरी होता. जावई आत्ताच घरात परतेल याची कल्पना नसलेल्या आजी मोलकरणीला घरात घेतात. मग जावई आल्यानंतर मोलकरीण पळाल्यावर आजी म्हणतात अरे देवा, आता माका भांडी घासुक लागता.:हहगलो: मग सावंत उर्फ मोजो हैराण होऊन आजींकडे बघतात तो प्रसंग हाईट होता.

काल नचीकेत वडलांना पैसे देत असताना मला फारच धाकधुक वाटत होती की पसरणीचा घाट मध्येच येऊन पैसे हिसकावुन घेतो की काय.:अओ::फिदी:

हो मलापण धाकधुक होती रश्मी, मी म्हणत होते की. मोजो आत्ताच्या आत्ता तुम्ही जा आणि द्या शिवला पैसे नाहीतर ती येईल.

काल नचीकेत वडलांना पैसे देत असताना मला फारच धाकधुक वाटत होती की पसरणीचा घाट मध्येच येऊन पैसे हिसकावुन घेतो की काय.अ ओ, आता काय करायचंफिदीफिदी >>>+ ११ मलाही तशीच भिती वाटत होती.

Pages