काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा टीव्ही पण सुट्टी असल्याने गेम्स खेळायला पळून गेला दुसर्‍या खोलीत. मग सुटलेच बघणे. इथेच अपडेट वाचते.

याला ' गौरी इफेक्ट ' म्हणतात .
गौरीला पाहून प्रेमाचा गुलाबी रंग उडून पांढरा फटक पडला.>>>> मी वेणू च्या शर्ट बद्दल बोलत होते, शिवच्या नाही.

आज चला हवा येऊ द्या मध्ये सर्वात जास्त गौरी उर्फ सायली संजीव हसत होती. सिरीयल मध्ये हिला अस मोकळ हसायला तिच काय जात होत.

शिव उर्फ रिषी सक्सेना ला मराठी येत नसल्यामुळे त्याला जोक्स कळत नव्हते. त्यामुळे तो हसत नव्ह्ता.

बाकी आजीच गाण छान झाल.

अन्डी-हन्डी.:हहगलो:

गौरी शिवला insensitive म्ह्णते?

उदया शिव मितूला त्याच गौरीवर प्रेम आहे हे सान्गायला जाणार आहे.

उद्या पुन्हा शिवची गौरीबरोबर flirting चालू. Blush

कोणी आजी भेटल्या तर तिचे गौरी म्हणत गाल ओढतात.>>>> मला जर ही कुठे भेटली तर मग तिला एकच विचारेन. कि बाई ग, कुठल्या जन्माचा सूड उगवतेस शिववर. एकदा तरी प्रेमाने बोलत जा की त्याच्याशी. शेवटी तो तुझा भावी नवरा आहे म्हटल.

गौरीने गाणं छान वाजवलं, हसत पण खुप होती, च ह ये द्या मधे. आजी गाणं छान गायल्या आणि नाचल्याही छान. मोजो आणि शुगो, वेणूने पण एन्जॉय केलं. शिवला मात्र काही कळत नव्हतं, तो स्थितप्रज्ञ होता.

नाही अंजली, मोजोना आवडत नाही कामाला घरात दुस-या कोणाला ठेवलेलं (स्वावलंबनप्रेमी). ती मोलकरीण ते नसतांना येते आणि चुकून आलेच तर थापा मारतात आजी आणि मोलकरीण.

ओह असं आहे होय! स्वावलंबी इतकं व्हायचं असेल तर मोजोला भांडी घासायला लावली पाहिजे. काहीही लॉजिक!

तो आहे एक डायलॉग शुगोच्या तोंडी आजींशी बोलताना, ह्यांना कळलं तर स्वत: भांडी घासतील.

मलापण हे स्वावलंबन काही पचनी पडलं नाही, सर्वजण काहीना काही उद्योगात बिझी तर, भांडी घासायला आली मोलकरीण तर काय हरकत आहे.

हो सस्मित. एकदा कशावरुन तरी मोजोंच्याच बोलण्यात आल होत, बहुतेक मितु शिवच्या प्रेमात आहे हे मोजोंच्या लक्षात येत त्यावेळी.. नक्की कारण नाही म्हैती.

घरात टीव्ही नसण्याचं काय कारण सांगितलं मोजोनी? असं विचारायचं होतं मला. मला वाटतं झीच्या टपराट मालिका बघुनच टीव्ही विकला असेल त्यांनी Lol

Lol सस्मित.. अग घरात टिव्ही नसण्याच कारणच नै म्हैती अस म्हणाले मी..

टिव्ही नसल्याचा उल्लेख मितु प्रकरणाच्या वेळी झालेला होता अस आहे ते.

काल तर काहीच विशेष घडलं नाही. वेणू आणि शिव चे संवाद तर केवळ वेळ भरुन काढण्यासाठी होते . आणि वेणूला इतकी मीतू ची काळजी आहे तर तो तिला का नाही समजावते? अगदी घोळ घोळ घालताहेत.
हां नही तो!

आज शिव मितुला सांगणार आहे..बघुया..

पण पुन्हा काहीतरी घोळ होणार आहे.. असच वाटत आहे..

सगळे लोक पुन्हा पुन्हा तेच बोलत आहेत

काल चला हवा येउ द्या पाहिल..

वाटल शिव (रिशी) ला सगळे सेट वर त्रास देतअसावेत मराठी येत नाही म्हणुन..

शुभांगी गोखले तसं म्हणाल्या पण

घरात टिव्ही नाही असं सांगितल्याच येउन गेलं का मालिकेत? काय म्हणे कारण?>>>> कारण मोजोचा शिस्तप्रिय (?) स्वभाव. टिव्ही मुळे मुलान्वर वाईट सन्सकार होतात असे त्याला वाटते. मग रेडिओ सुसन्सकारी असतो हे कुणी त्यान्ना सान्गितले बरे?

खर तर पहिल्या एपिसोड पासून मला कळले कि ह्यान्च्या घरात टिव्ही नाहीये. Sad

आज शिव मितुला सांगणार आहे..बघुया..

पण पुन्हा काहीतरी घोळ होणार आहे.. असच वाटत आहे..>>>> नाही, नुकताच नवीन प्रोमो पाहिला. शिव मितूला सगळे काही सान्गतो. "माझ गौरीवर प्रेम आहे" इ. इ. ते ऐकून गौरी त्याच्याकडे प्रेमाने बघते.

मितू ची यावरची प्रतिक्रिया काय आहे ते अजून दाखवले नाही. Uhoh

गौरीने गाणं छान वाजवलं.>>>> +११११११११११११

हसत पण खुप होती.>>>> काय करणार, सिरियल मध्ये तिला फारसे हसायला मिळत नाही ना.

शिवला मात्र काही कळत नव्हतं, तो स्थितप्रज्ञ होता.>>>> Rofl

आजचा शेवटचा सीन शिवने काय कमाल केला!! खलास!!
मितुला लवकर कशाला बोलावलं ते विचारायला गौरी त्याच्याकडे येते तेव्हा त्याचे डोळे पुन्हा बोलतात! किती खट्याळ हसतो तो गौरीला बघून! मग मस्त दाराशी रेलून थेट तिच्या डोळ्यात बघत बोलतो. गौरम्माही जरा बरं वागतेय त्या सीनमधे. मुद्दाम (वेणूसमोर आहे म्हणूनही) तिला काही न सांगणं, स्पष्ट न बोलताही तिचं अस्वस्थ आणि पझेसिव होणं एंजॉय करणं, मग ती त्याला हाक मारून थांबवते तेव्हा "हमारा प्यार सच्चा है क्योंकी वो एकतर्फा नहीं" वगैरे... थेट आय कॉन्टॅक्ट करून तो जे काय मस्त काम करतो ना! :डोळ्यात बदाम!:

शिवने मितूला सांगितलं का???

त्या नवीन प्रोमोत शिव मितूला सांगत असतो तेव्हा तिच्या कानात हेडफोन असतात का????

Pages