काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो दार आपटण्याचा सीन किती बोअर झालाय...! कितीदा तेच ते!
आणि काल वेणू ते वॉचमन चे कपडे काय पांघरुन बसला होता!! काहीही दाखवतात..अगदी काहीही.
पण शिव गुलाबी टॉवेल मधे काय सुंदर दिसत होता...एकदम चिकना !
@सुलू_८२ - ही वेणूचीच भाषा ए. Happy

माझ्या एका शेजारणीनं एकदा तिच्या ३ वर्षांच्या बच्च्याला नाश्त्याला ऑमलेटच खायचं होतं आणि तिच्याकडे अंडी नव्हती म्हणून माझ्याकडे मागितली होती Uhoh
त्यामुळे कालचा भात-मागा-सीन मला फार काही अचाट वाटला नाही Lol

बाथरुम घासायचा ब्रश नाहीच. तसं तर साबण, पेस्ट पण नाही.

पण मिरच्या, लिंबु, कोथिंबीर, बटाटा, कांदा, मोठं भांडं म्हणजे टोप, कढई वैगेरे (आपल्याकडे नसलेल्या साइजचं), जास्तीची ताटं वाट्या, कप वैगेरे गोष्टी शेजार्‍यांनी मागितल्या आहेत. आणि मी पण अशा गोष्टी शेजार्‍याक्डे मागते.

पण आज मी फोडणीचा भात किंवा पोळी करायच ठरवतेय ब्रेकफास्टला तर तुमच्याकडे शिळा भात किंवा पोळी आहे का? अस कोण विचारेल?>>>+१

येस हे सगळ एकमेकांशी असलेल्या रिलेशनवर अवलंबून आहे . आमची रिलेशन्स खूप छान होती त्यामुळे आम्हाला द्यायला ही काही वाटायच नाही. फक्त सांगायच हे होत की अशी मागणारी लोक जगात असतात. ती अतिशयोक्ति नाहीये.

मनिमाउ, मग्याच्या आइसारखं उठ्सुट सुई दोरा, साबण, भात पोळी मागणं ही अतिशयोक्तीच आहे.
शेजारी पाजारी असा व्यव्हार चाल्तो पण तो इतकाही नसतो. अग्दी एमेजन्सीच्या वेळी मागणं असतं ते. सतत आपलं हे द्या न ते द्या कसं चालेल.

विठ्ठल | 2 June, 2016 - 12:48

च ह द्या मधे कृत्रिमच हसतात... सगळेच. हो पाहिलंय मीही. मागे लालबागची राणी & लाल इश्क वाले आले होते तेव्हा हे प्रकर्षाने जाणवले. ती लालबागची राणी क्यामेरा तिच्यावर आल्यावरच उगीच तोंडावर हात ठेवून मोठ्याने हसत होती. आणि त्याच पिक्चर मधला एक लहान मुलगा तोही हसत होता.

शिळा भात किंवा पोळी मागायचं जरा अतीच. बाकी हेमाताईनी लिहिलंय त्याप्रमाणे अनुभव येतात, मी देणेकरी असते. Lol अर्थात रिलेशनशिप चांगलं आहे आमचंही त्यामुळे काही वाटत नाही.

काल तो एकच शॉट बघितला मग मी काही बघितली नाही सिरीयल. ते एकट्या शिवसाठी किती बघायची, तो जीव तोडून acting करणार आणि समोर ठोकळा. बोअर होणार.

निशा साड्या काय नेसते रोज? मुंबईची नोकरी करणारी बाई ड्रेसवाली दाखवायला हवी होती.
ती गवरी पण हवा येऊ द्या मधे बळंच तोंडाचा एवढा मोठा आ वासत होती किती वेळा.
ट्युशनचा विषय निघालाच त्यात Proud

काल शिव मितुचा गैरसमज दूर करतो एकदाचा. शांतपणे निवांतपणे.. "गौरी के बिना शिव कैसे अधुरा है" हे विविध उदाहरण देउन सांगतो. दरम्यान गौरी आणि वेणु त्या स्थळापर्यंत पोचुन त्यांच बोलण लपून ऐकत असतात. शिव मितुला क्लिअरली सांगतो की त्याच गौरीवर प्रेम आहे. मितु हर्ट होते आणि तद्दन फिल्मी डायलॉग टाकते की मै शिव की मीरा बनके रहुंगी. इथे वेणु कन्फ्युज्ड की शिवच्या (प्रत्यक्ष शंकराच्या) लाईफमध्ये मीराचा काही रोल होता का? त्यावर शिव परत सच्च्या प्यारची चार-पाच उदाहरण देउन तिला पटवायचा प्रयत्न करतो की तुझ्यावर प्रेम करणार आहे कोणीतरी.

या सगळ्यानंतर गौरी आणि वेणु समोर येतात, मितु गौरीवर चिडते आणि तरातरा निघुन जाते. तिच्या मागे मागे वेणु जातो, गौरीसुद्धा जायला निघते तर शिव तिला अडवतो आणि म्हणतो की वेणू घेईल तिला सांभाळुन, तु नको जाउस. गौरी फोन करुन वेणूला मितुच्या मनस्थितीबद्दल विचारते.. या सगळ्यात निशा वहीनी जी गौरी घराबाहेर पडेपर्यंत इस्त्रीच्या साड्या आल्या नाहीत म्हणुन मॅक्सीमध्येच असते ती साडि नेसुन, बाकीच आवरुन गौरी आणि मितुचा पाठलाग करायला बाहेरही पडते..

झाल येवढच..

धन्स मुग्धा. कालचा भाग दिव्यांच्या गोंधळामुळे गेला. मला त्या शिवच्या तोंडची हिंदी बोली ऐकायला फार आवडतं. फार गोड बोलतो तो Happy

स्निग्धा तो शिव मुळातच शुक्ला असल्याने अस्खलित हिंदी बोलतो. >>> हो म्हणजे मराठी सिरीयल आहे म्हणून हिंदीचा चुराडा नाही करत. त्याचे संवाद कोण लिहीतं काय माहित. नाही तर आपल्या मराठीत आज काल
'मला मदत कर, चूकलचं माझ' नसतच 'माझी मदत कर, माझी चूक झाली' च असतं Sad

हो म्हणजे मराठी सिरीयल आहे म्हणून हिंदीचा चुराडा नाही करत. >>>> नाहीच करणार कारण मुळात दोन भाषांच्या फरकावरच तर मालिका बेतलेली आहे ना?

ते लपलेले दिसत नव्हते का मीतूला....? इतके ऑबव्हिअयसली लपले होते झाडामागे. काहीपण दाखवतात.
आणि निशा वहिनी स्वत: फताडा गाऊन घालून इस्त्रीच्या साड्या आणायला नवरा, मग नणंद मग सासू ..यांना सांगू तरी कशी शकते......? इतकं निर्लज्ज कुणी नसतं!
शिव चं हिंदी मस्त, डायलॉग्ज डिलीव्हरी मस्त, डोळे बोलके आणि स्माईल तर फारच मस्त!
काल तर काँफिडंस आणि रुबाब होता त्याच्या बोलण्यात.

मुग्धा मस्त अपडेट्स .
होसुमियाघ चे वृत्तांत अशोक मामा लिहायचे त्याची आठवण झाली

आं.गो, ती सांगते कुठे? हि मालकीण आणि नवर्‍यासकट बाकीचे सगळे हिचे नोकर असल्यागत विचारते. शुगोच्या जागी जर माझी सासु असती ना तर सरळ म्हणाली असती तुझ्या साड्या आहेत ना मग स्वतः आणायच्या असतील तर आण नैतर जा तशीच मॅक्सीवर ऑफिसला. कुठल्याही घरात सासु इतकही नरमाईने वागत नाही हां..

होसुमियाघ चे वृत्तांत अशोक मामा लिहायचे त्याची आठवण झाली >>>> हाय राम, त्यांच्याइतक कधी ग जमाव मला.

मुग्धा.... अगदी अगदी.... Happy

आणि मुग्धटली कोण म्हणतं तुला? इतकं छान नाव आहे मु ग्धा ..तर...?

Pages