Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
प्रज्ञा९ +
प्रज्ञा९ + १११११११११११११११११११११११११११
ते मंग्याची आई पात्र अतिषयच
ते मंग्याची आई पात्र अतिषयच बेक्कार आहे सिरेलीत. त्याच प्रयोजन काहीच कळत नाही. उगाच दर एपिसोडमधे ५ मिनिट्स खातय ते पात्र.
हो ना. कहर आहे ती बाई
हो ना. कहर आहे ती बाई म्हणजे.. शेजार्यांकडे दुध, साखर, विरजण मागण्यापर्यंत ठिक आहे. शिळा भात किंवा पोळी? कशासाठी तर फोडणीचा भात किंवा पोळी करायची आहे ब्रेफाला म्हणुन.. जनरली फोभा किंवा फोपोचा ब्रेफा नाईलाज म्हणुन केला जातो अस आपल मला वाटत हो.. इथे म्हणजे ही ठरवतेच फोभा किंवा फोपो करायच आणि आपल्या घरात नाही म्हणुन मागायला येते शेजारी...
पूर्वी शाळेत एकांकीका बसवताना
पूर्वी शाळेत एकांकीका बसवताना त्यात 'विनोदनिर्मिती' साठी मंगती सारखं पात्र टाकत असत.
गौरीला धड लाजताही येत नाही. डोळ्यांतून भावच व्यक्त होत नाहीत.
डायरेक्टर भंकस आहे. मुळात
डायरेक्टर भंकस आहे.
मुळात शेजारीपाजारी दाखवायचे म्हणुन घुसडलेले पात्र. त्या ऑफीसमधे ये जा करतात तशी कुठल्या हाफिसात चालते. तिकडे जॉबसाठी अप्लाय करावा. ती वेडी वहिनी-इतके कुणी हावरे असते का? तो विकी गायबच केला. त्याची ना पोलीसात तक्रात ना काही. एकाच सीनमधे वेगळे कपडे, एसेमेसच्या वेळेचा घोळ, गौरीचे कपडे, त्या शिकवण्यांचा बाजार सगळे सगळेच टपराट डायरेक्शनचा भाग आहे. ती शिवकी अम्मा पण कजागपणा करणार नंतर व क वाल्या सिरीलीप्रमाणे ही पण चालणार.
नैतर काय काल जिन्यात शिवला
नैतर काय काल जिन्यात शिवला अडवुन विचारत होती तेव्हाही डोळे थंडच आणि शिव जास्त डोळ्यातुनच बोलत होता, dialouges were just to support the expressions..
तेव्हाही डोळे थंडच>> खूप
तेव्हाही डोळे थंडच>> खूप एक्सेल वर काम करून होत असेल तसं . प्रेम असेल हो तिचं चला हवा येउद्या मध्ये छान दिसत व हसत होती.
खूप एक्सेल वर काम करून होत
खूप एक्सेल वर काम करून होत असेल तसं >> स्मित स्मित
च ह द्या मधे कृत्रिमच
च ह द्या मधे कृत्रिमच हसतात... सगळेच.
शेजार्यांकडुन शिळा भात आणुन
शेजार्यांकडुन शिळा भात आणुन त्याचा फोभा करायचा आपल्या घरी नाष्ट्याला, हा म्हणजे कहर दाखवलाय अगदी. इतके गळेपडु लोक असतात याबद्दलच शंका आहे.
बाकी त्यावहिनीबद्दल काहीही न बोललेलंच बरं. पात्र योजना पार गंडलिये इथे.
अशी एंडिव्हिज्युअल पात्र असतील कदाचित पण ती एकाच घरात म्हणजे कमाल आहे दिग्दर्शकाची.
काल निशावैनीने, नवर्याला इंटरव्ह्युसाठी शुभेच्छा वगैरे न देता माझ्या इस्त्रिच्या साड्या आणल्या नाहीत म्हणुन नाराजी व्यक्त केली. बाकी मोजोंचे स्वावलंबनाचे धडे फक्त सासु, लेक आणि बायकोसाठीच का? लेक सुनेसाठी नाहीत अस दिसतय.
बाकी काहीही दाखवताहेत. निशासारखी मुलगी जी स्वतः नोकरी करतेय, स्वावलंबी आहे, ती अशी कुणाला बातम्या पुरवण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाईल अस वाटत नाही. फक्त पैसे मिळताहेत म्हणुन काम धाम सोडुन किंबहुना दुसर्यांना कामाला लावुन अशी' किती करायच एकट्या निशाने' अस म्हणत बसेल अस वाटत नाही.
मला दर एपिसोडगणिक हाच प्रश्न
मला दर एपिसोडगणिक हाच प्रश्न पडतो की अरे नक्की काय दाखवायचय यांना?? ह्या सगळ्या प्रकारात एक ना धड भारंभार प्रसंग होत चाललेत. एकटा शिव किती दिवस ती नौका तारणार काय माहित??
अशा वस्तू मागायला येणारे
अशा वस्तू मागायला येणारे असतात.
मिरच्या पोस्टाची तिकीट गोंद वैगेरे सर्रास मागणारे लोक पाहिलेत
पण तुमचा विश्वास नाही बसणार पण बाथरूम घासायचा ब्रश, नवी कोरी साबणाची वडी , पेस्ट, काड्यापेटी तवा वैगेरे मागणारे लोक ही पाहिलेत ही अजिबात अतिशयोक्ती नाहीये . मी माझ्या हाताने या वस्तू दिल्या आहेत . स्वभाव म्हणून सोडून देत असे झालं
बरोबर आहे म मो, पण शिळं अन्न?
बरोबर आहे म मो, पण शिळं अन्न?
अग मुग्धा हे सुद्धा तू
अग मुग्धा हे सुद्धा तू इमॅजिनल होतंस का ? बाथरूम घासायचा ब्रश ? अगदीच गरज नाही मागण्याची . संध्याकाळी बाजारातून नक्कीच आणता आला असता पण मागितला (स्मित )
जावई येणार म्हणून चांदीच ताट
जावई येणार म्हणून चांदीच ताट मागितलेल पाहिलं आहे.
बाकी मोजोंचे स्वावलंबनाचे धडे
बाकी मोजोंचे स्वावलंबनाचे धडे फक्त सासु, लेक आणि बायकोसाठीच का? लेक सुनेसाठी नाहीत अस दिसतय. >> सासुसासरे व नवरा छळ करतात अशी तक्रार करेल ती नीशा. करु पण शकते ती. त्यामुळे बिचकुन असतील.
मोजो कुठल्या जगात वावरतो?
मोजो कुठल्या जगात वावरतो? इंटरव्हयु मधे 'भारताचे तिसरे राष्ट्रपती कोण' असे प्रश्न विचारत नाहीत याचा त्याला गंधही नाही?
हो आणि रेडियो मध्ये कार्यक्रम
हो आणि रेडियो मध्ये कार्यक्रम करणारे हो हे ...
म मो अगदी बाथरुम घासायचा ब्रश
म मो अगदी बाथरुम घासायचा ब्रश नाही पण साबण, पेस्ट, काड्याची पेटी तर अगदीच कॉमन. पण आज मी फोडणीचा भात किंवा पोळी करायच ठरवतेय ब्रेकफास्टला तर तुमच्याकडे शिळा भात किंवा पोळी आहे का? अस कोण विचारेल?
इंटरव्हयु मधे 'भारताचे तिसरे
इंटरव्हयु मधे 'भारताचे तिसरे राष्ट्रपती कोण' असे प्रश्न विचारत नाहीत याचा त्याला गंधही नाही? >>> नचिकेतला म्हणतात की काय मोजो हे पाठ केल आहेस का म्हणुन?
बापरे चांदीच ताट??
बापरे चांदीच ताट?? असो.
शेजार्यांमधे फारच सख्य असेल तर विरजण, मिरच्या लिंबु, शेवगा (सोर्या), जास्तीची ताटं वाट्या अस काय काय नेतात. आम्ही शेजारणीला आणि नातेवाईंकामधे पण देतो काही कार्य असेल तर एक्स्ट्राची भांडी.
शेजार्यांमधे फारच सख्य असेल
शेजार्यांमधे फारच सख्य असेल तर विरजण, मिरच्या लिंबु, शेवगा (सोर्या), जास्तीची ताटं वाट्या अस काय काय नेतात. आम्ही शेजारणीला आणि नातेवाईंकामधे पण देतो काही कार्य असेल तर एक्स्ट्राची भांडी. >>>> येस्स..
पण हे शिळा भात मागणं अगदीच
पण हे शिळा भात मागणं अगदीच वेगळं वाटलं म्हणुन.
आता शिळ्या भाताला फोडणी देणं
आता शिळ्या भाताला फोडणी देणं पुरे हो.
बाकी एक शक्यता आहे की आज्जी
बाकी एक शक्यता आहे की आज्जी डब्बे करतात म्हणुन मग त्यांच्याकडे शिल्लक अन्न असेलच अस गृहित धरुन ती मंग्याची आई मागत असेल. बाकी ती सगळ्यांची दार बडवताना दाखवलिये अगदी शिव वेणुचे पण.
नाही विठ्ठल आता पुढची मागणी
नाही विठ्ठल आता पुढची मागणी होईपर्यंत शिळाभातालाच फोडनी
शुकु
शुकु
चला शिळ्या भाताला फोडणी .:.
चला शिळ्या भाताला फोडणी .:. एक पोळी आहे का वाटीभर भात मिळेल का ? थोडं लोणचं दे ग तुमच्या तुमच्या कडच छान असत .. अस ही मागितलं जाई.
ममो, लोणचं वगैरे अगदी नविन
ममो, लोणचं वगैरे अगदी नविन केलं असेल तर वाटीभर द्याव की शेजारी
बाकी आम्ही जेंव्हा कॉलनीत
बाकी आम्ही जेंव्हा कॉलनीत राहायचो तेंव्हा तर भरल्या वांग्याची/ कारल्याची भाजी, उन्हाळी साठवणीचे पदार्थ (सांडगे, पापड, कुर्डया, लोणची, गव्हाचा चीक, पापडाच्या लाट्या) घरोघरी फिरायच्या. गेले ते दिन गेले. हल्ली अचानक पाहुणे आले तर अस काही नसतच. फ्रीजात जास्तीची दुधाची पिशवी आणि उकडलेले चार दोन बटाटे/भिजवलेली पोळ्यांची कणीक ठेवणं हा सवयीचा भाग झालाय.
Pages