काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगल्या पात्रांना कसलाच पत्ता न लागणे आणि खलपात्रांना लगेच बित्तंबातमी समजणे या तत्वावर भारतीय मालिकांचा डोलारा उभा आहे.>>>

मुळात खलांची छिद्रान्वेशी वृत्ती असते त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीत आधी वाईट शोधायचा प्रयत्न करतात आणि सत्प्रवृत्त हे नेहमी चांगल्या गोष्टी पाहतात.. ह्या मुळ मानवी स्वभावाचे विस्तारीत स्वरुप मालिकांमध्ये दाखविले जाते खल आणि चांगली पात्रे रंगविताना असे मला वाटते...

माणिकमोति, इतक्यावेळा ते शीर्षकगीत ऐकूनही उत्तरेकडूनी... जाईल सासरला ह्या तीन ओळी प्रयत्न करूनही कधीच समजल्या नाहीत.. तुम्ही महान आहात _/\_ Happy

काल कधी नव्हे ते या सिरियलचा एक एपिसोड पाहिला.
काय ती मुर्ख गौरी त्या मीतुला समजवायला कशाला गेली होती? Uhoh तिचं ती आणि तो शिव घेईल की पाहून.
शिव चं तुझ्यावर नाही माझ्यावर प्रेम आहे असं सांगत होती , बावळट ध्यान Angry

फार बोअर व्हायला लागलीय आता. हा प्रेमाचा track इंटरेस्टिंग करायला हवा होता तर जास्तच पकवतायेत. >> + १

शिवला चांगले फ्लर्ट नाही करता येत आहे आणि गौरीसुद्धा बोर करतेय

शिवला चांगले फ्लर्ट नाही करता येत आहे आणि गौरीसुद्धा बोर करतेय>>>>

मल वाटते ते लेखकाला सुचत नसावे काय लिहावे... आनि जे काही लिहलयं ते ह्या दोघांनाही जमेना आणि समजेना,,,,,

मल वाटते ते लेखकाला सुचत नसावे काय लिहावे... आनि जे काही लिहलयं ते ह्या दोघांनाही जमेना आणि समजेना,,,,, >>> अरे बापरे, ह्या सिरीयलचा लेखक पण पांडूच की काय Wink

शिवला चांगले फ्लर्ट नाही करता येत आहे आणि गौरीसुद्धा बोर करतेय>>>> आदित्य देसाई ची आठवण झाली. :डोळ्यात पुन्हा बदाम:

मला एक कळत नाही की, मोजोचा जर प्रेमाला विरोध नसेल, तर मग प्रेमपत्राला विरोध का? :अओ:परवा तर मोजो शा.खा. स्टाईल प्रेमावर भाषण देत होता, हिन्दी मध्ये गाणे काय गात होता ( बरीच सुधारणा झालीये मोजोमध्ये.) पण त्यादिवशी तर साध प्रेमपत्रावर बोलायच होत रेडिओवर तर केवढा आकान्डतान्ड्व केला होता ह्या माणसाने , अगदी राजीनामा द्यायला सुद्दा तयार झाला होता. आता त्याला कळायला हवे की, जो माणूस प्रेम करतो तो कधी ना कधी प्रेमपत्र लिहितोच ना. प्रेमपत्र लिहिण्यात वाईट काय आहे? Happy

मोजो सान्गत होता, नचीकेत लहानपणी खुप हट्ट करायचा, भोकाड पसरायचा. पण गौरी कुठलाच हट्ट करायची नाही, अशीच विचार करत बसायची. ( परक्या माणसान्ना बोलताना विचार करत जा म्हणाव) रिअली? मला हे खर वाटत नाही. मला तर इथे उलटच दिसतय. Lol

फार बोअर व्हायला लागलीय आता. हा प्रेमाचा track इंटरेस्टिंग करायला हवा होता तर जास्तच पकवतायेत.>>>> मन्दार देवस्थळी असायला हवा होता इथे. मला तो होमिसुयाघ चा सुरुवातीचा ट्रेक अजूनही आठवतो. Blush

आज शिव गौरी ला "बच्ची" म्हणाला. हाउ क्यूट! Blush

Pudhe gauri dhimm hasat nasel tar bichara shiv ekta kiti prayatn karnar romantic scene dyayacha.. aajchya episode pasun punha chidchid aani serious mode on kela hyani

लई बोर झालं >>> +१००

प्रेम व्यक्त केल्याच्या दुसर्‍याच दिवशी नायकाला 'ये कहा फस गये हम' असे वाटणे म्हणजे दिग्दर्शनाची हद्दच झाली.

आता झी मराठीवरची एकही मालिका बघण्याच्या लायकीची राहिली नाहीये.

हो ना. एक नोटीस केल का कालच्या एपिसोडात? शिव ज्या रेझरने शेव्ह करत होता त्या रेझरच कव्हरसुद्धा काढलेल नव्हत आणि शेव्ह करता करता कट झाल्याची खूणही त्याच्या गालावर दिसत नव्हती नंतर वेणूशी बोलताना तो गाल समोर आल्यावर

मी सुद्धा हेच ऑब्झर्व्ह केलं ! आणि किती गोंधळात पडलेला वाटतो स्क्रिप्ट राईटर?
वहिनी अती बोअर करते!
आणि ही शिव ला ताडताड बोलायचं कधी थांबवणार...काय अधिकार हिला त्याला सतत चिडून बोलायचा ?
तो बिचारा कंफ्यूज्ड आणि ऑलरेडी "ये कहा फंसे हम" अशा विचारांत असेल तर काय अर्थ त्या प्रेमकथेला?
कोण लिहीतं असे भरकटलेले आणि संतापजनक डायलॉग्ज?

बरेच दिवसात बघितली नाही मालिका . पण एक्म्दरीतच वरचे प्रतिसाद वाचून शिव पण आता तारू शकेल असं काही वाटत नाहिये Sad

>>
तो बिचारा कंफ्यूज्ड आणि ऑलरेडी "ये कहा फंसे हम" अशा विचारांत असेल तर काय अर्थ त्या प्रेमकथेला?<<<
+१

हे अगदी पॅथेटीक वाटले. जुम्मा जुम्मा चार दिन नाही झाले तर बिचारा निराश आणि चिडून म्हणतो दाखवलं.
जराही खट्याळ बोलणं, रुसणं, रोमँटीक प्रपोज करणं तर नाहीच.

खूपच अनरोमँटीक आहे.

मी मध्येच एकदा बघितली तेव्हा शिवला मराठी बर्‍यापैकी समजायला लागलंय असं मला वाटलं कारण तो गौरी जे काही बोलत होती त्याचं पटकन उत्तर देत होता. काल बघितलं तर परत त्याचं "हमें कुछ समझ में ही नहीं आता" चालू होतं. Uhoh

सगळे शिवच्या अम्माशी व्यवस्थित हिन्दीतून बोलतात अन् शिव बरोबर बोलताना शुद्ध मराठीत, हे प्रकरण काय झेपत नाही.

सगळे शिवच्या अम्माशी व्यवस्थित हिन्दीतून बोलतात अन् शिव बरोबर बोलताना शुद्ध मराठीत, हे प्रकरण काय झेपत नाही.

>> ती यांचे फाल्तू नखरे सहन करत बसणार नाही माहितीये यांना. शिव मऊ लागला म्हणून कोपराने खणत आहेत त्याच्याबाबतीत.

Pages