काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि मितू किती चीप दाखवलीये.>>>> ती मितू तरी परवड्ली गौरीपेक्षा. निदान तिला काळजी तरी आहे शिवची.

उसके अब पर निकल आ रहे है... आई जेव्हा मुली पाहिल्या आहेत सांगते तेव्हा गौरी कडे कटाक्ष टाकतो...:इश्श:

हा धागा वाचून गेले साताठ दिवस ही मालिका पाहिली.

शुभांगी गोखलेंनी साकारलेले मिसेस सावंतांचे कॅरॅक्टर म्हणजे सानिसातली हेतलबेन. सारखं आपलं 'जवा दे ने' (कोकिला ऐवजी सावंत).

नायिका नायकाशी सतत मराठीत का भांडते असा प्रश्न अनेकांना पडलाय. पण त्या वेणूची मातृभाषा तर मराठी नाही. मग तो ज्याला मराठी कळत नाही त्या शिवशी का बरं ६०% मराठी +४०% हिंदीत बोलतो?

वेणूचं काम केलंय समीर खांडेकरने. प्लेझंट सरप्राईझ या नाटकातुन तो काम करतोय. आज रात्री ९.३०ला बालगंधर्व,पुणे येथे शुभारंभ आहे या नाटकाचा. 'हवा येऊ द्या' मधे येईलच तो.

आज पाठच्या बर्याच पोस्टी वाचून काढल्या. शिव ला बघून डोळ्यात बदामच्या बाहुल्या ठीक. पण किती त्या जणींच्या ? छळ नुसता. नाही का . शिव शिव शिव Lol

वेणू स्टार प्रवाहच्या मिसेस माधुरी दीक्षित मध्ये पण होता. मालिकेत वेणू कारवारचा दाखवलाय.

काम चांगलं करतो तो समीर खांडेकर वेणूचे.

नायिका नायकाशी सतत मराठीत का भांडते असा प्रश्न अनेकांना पडलाय. पण त्या वेणूची मातृभाषा तर मराठी नाही. मग तो ज्याला मराठी कळत नाही त्या शिवशी का बरं ६०% मराठी +४०% हिंदीत बोलतो? >>>
मे बी सिरेल मराठी आहे म्हणुन सर्वजण जास्त मराठीच बोलतात

चला, आज गौरी चे एक्स्प्रेशन सहीत विचारही कळले. गौरी के दिल मे भी कुछ कुछ होता है. अखेर गन्गेत घोड न्हाल म्हणायच.

संकर्षण पूर्वी खवय्येचं अँकरिंग करायचा. म्हणजे आता असा काही कॉम्बो एपिसोड असेल की काय! :कपाळाला हात!!:

संकर्षण पूर्वी खवय्येचं अँकरिंग करायचा. म्हणजे आता असा काही कॉम्बो एपिसोड असेल की काय! :कपाळाला हात!!:>>>> गुढीपाडवा स्पेशल कार्यक्रम होता. त्यावेळी हि सिरियल जस्ट सुरु होणार होती म्हणून त्याच्या प्रमोशन साठी हा कार्यक्रम ठेवला होता. मी पाहीला होता हा कार्यक्रम. Happy

रच्याकने, आज शिव गौरीला purpose करणार आहे.

गौरी र र रटाळ आहे. जेमतेम हसण्यापलीकडे काहीच अभिनय करू शकली नाही.

दिग्दर्शक म म महारटाळ आहे. प्रोपोज केल्यावर कोणी पुरुष आपल्य प्रेअसीला असे भर रस्त्यात सोडून का जाइल? का काल जे झाले तो गौरीला झालेला भास होता?

त्या गवरीला लाजण्याच्या/मनात 'लड्डु फुटण्याचा' अभिनय देखिल करता येत नाहिये. ती इतक्या मोठ्याने का बोलते हेच कळत नाही. ती म्हणे मॉडेलिंग करायची. Sad

काल्चा प्रपोजचा सीन खरं होता का भास? आणि प्रपोज केल्यावर इतका मख्ख चेहेरा गौरीचा..!!

आणि भरीत भर आता निशा पाहणार दोघांना आणि बातमी ताबडतोब बनारस्ला पोचणार..

ए हो यार. कैतरीच दाखवतायत. एक नक्की काय ते ठरवा रे, गौरी शिवच्या प्रेमात पडलीय किंवा हा सगळा शिवचा भास आहे. चेहर्‍यावरची माशीच हलत नाही तिच्या.

Pages