नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेनूचं काय ठरलं मग ?
टण्या( माणशी एक) गोड पदार्थ आणणार आहे
( वरती दहा लोक आहेत , शिवाय मंजिरी, वृंदाताई, एबाबा , ग्रिंच , ग्रिंचच्या सासूबाई, म्हणजे १५ डेझर्ट्स आणणार का ? )

वृंदाताई पण डेझर्ट आणतील म्हणाल्या आहेत .
वंदनाबेन काय देणार आहेत ?

साधारण निम्मे लोक नॉन व्हेज खाणारे आहेत असे धरावे का ? माझा चिकन चा काहीतरी प्रकार आणायचा विचार आहे - नीट आणायला जमले तर करी नाहीतर सेमी ड्राय भाजी.

एंटरप्राईज वाल्यांनी टांग दिल्यामुळे नेहमीच्या रेंट अ रेक वालयांकडून १५ पॅसेंजर वॅन बूक केली. तेवढीच उपलब्ध होती. Happy
शोनू, अ‍ॅड्रेस इमेल कर प्लीज.

माझा चिकन चा काहीतरी प्रकार आणायचा विचार आहे - नीट आणायला जमले तर करी नाहीतर सेमी ड्राय भाजी. >>

मी काय म्हणतो, निसर्गाला शरण जाऊन, व्हेजी माणसांच्या भावना न दुखवता, तुम्ही एखादे शाकाहारी गटग केले तर आकाशातील बाप तुमच्यावर आनंदीत होऊन, पाऊस पाडने बंद करून खरा वसंता आणेन.

Proud

मी पण व्हेजच. बुवांनी लिहिले आहेच. Happy

तळे आहे, तळ्यात मासे आहेत. तुम्ही लँड ऑफ थाउजंड लेक्स वाले. आपापले गळ घेउन यावा. मग मासे खायला मिळतील Happy

ब वडे, सुरळीच्या वड्या किंवा कोथिंबीर वड्या , मिनी इडल्या , मिस़ळ पाव, मसाले भात , काकडीची को,
वेदर चांगली असल्यास ग्रिल , नाहीतर फिश, श्रिंप फ्राय हा मेनू कसा वाटतोय ?

रंपा अन त्याचे सपोर्टिंग कास्ट याची सोय होइल्च

बुवा धरा काय, जरा व्हेजीटेरियन बोला Wink

पाव भाजी , बवडे, खमण हे बेनकडून आणता येण्यातले प्रकार आहेत. मी एक आणेन.

हसुबेनला पण कामाला लावायचं आहे का?

धोतरपार्टीच्या वतीने बटाटे वडे, सुरळीच्या वड्या आणि अजून काही वंदनाबेनकडचा एवज हवा असेल तर सांगा. लै जागा आहे व्हॅनमदी. हवं तर वंदनाबेन्नाच किड्नॅप्स करुन आणतो! Lol

ओ बुवा, बेन फक्त धोतरपार्टीची नाहीये, नो-पदरपार्टीची पण आहे Wink

बुवा धरा काय, जरा व्हेजीटेरियन बोला>>>> Lol

नो-पदरपार्टीची पण आहे>>>>>> पदर आहे व्हय ते. Proud Lol

व्हेज लोकांचा फार सुळसुळाट झालाय बॉ Happy शोनू, तुला मला दुसरे काही असाइन करायचे असल्यास कळव. नाहीतर (उर्वरित लोकांसाठी) ठरल्याप्रमाणे चिकनच आणेन Happy

एडिसनात रहातोस म्हटल्यावर भरपूर ऑप्शन्स आहेत तुला अरुण >>>>> मैतै, चीट शीट द्या, एडिसनात राहण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे ................ Happy

मै , चिकन चालेल.
गोगा, आमच्याघरी सामिष खाणारे आले अन फक्त व्हेज खाउन गेले असे कदापि होणे नाही . आयत्यावेळी कोणी आले तरी सुक्या माशांचा काही तरी पदार्थ बनणारच Happy
तुम्ही यायचं बघा .
भाकरी बनवणार कोणी आहे का ? कोणी बेन सुरती उंधियू बनवत असतील तर चालेल

ब वडे आमच्या इथल्या एक बाई भारी बनवतात त्यांना सांगणार आहे . मिसळ पाव, सुरळीचा वड्या घरी. मसाले भात पण ब वडे वाल्या बाईंनाच सांगेन - त्या मस्त बनवतात असं ऐकलंय.

अ आ, बाकीचे सुद्धा, काही फेवरिट रंपा असेल तर आधीच सांगा. व्होडका, जिन, टकिला, स्कॉच, वाइन / बीअर असणार

Pages