आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< "सलामीच्या फलंदाज असून किती कमीट होतो?" ->> हेल्मेटवर आदळलेला बॉल व धांवा होत नव्हत्या याचं दुहेरी दडपण आलं असावं.
विराट गेला. !

मी लवकर बोललो बहुधा Wink

फेफे, राहुल च्या सुरूवातीच्य अमॅचेस नंतर खूप आशा वाटली होती एक चांगला सलामीचा फलंदाज मिळाला अशी. पण त्याला लंकेमधे ज्या तर्‍हेने बाद केले जिथे त्याला त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे ह्याचा अंदाज येत नाही हे बघून तो सलामीचा फलंदाज आहे ह्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय माझ्यासाठी. म्हणजे edge लागून बाद होणे समजू शकतो पण तीन तीनदा बॉल सोडून देऊन ऑफ स्टंप उडणे हे धक्कादायक होते. Hope he works on his weaknesses and becomes more stronger batsman. He seems to be made for test matches.

"राहुल च्या सुरूवातीच्य अमॅचेस नंतर खूप आशा वाटली होती एक चांगला सलामीचा फलंदाज मिळाला अशी. पण त्याला लंकेमधे ज्या तर्‍हेने बाद केले जिथे त्याला त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे ह्याचा अंदाज येत नाही हे बघून तो सलामीचा फलंदाज आहे ह्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय" - सहमत आहे.

कृणाल पंड्या ची बॉलिंग अ‍ॅक्शन कसली झल्ली आहे राव!

१७१ सहज व्हावे वानखेडेवर.

खरं तर मला एका गोष्टीचं वाईट वाटतं. वानखेडे, चिन्नास्वामी वगैरे एके काळची भारतातली मानाची टेस्ट केंद्र. ह्या टी-२० / आयपीएल च्या काळात त्यांची ओळख म्हणजे 'दुसरी बॅटींग घ्या आणी मॅच जिंका' अशी होऊन गेलीये.

आजची मॅच बंगलोर साठी डोळे उघडणारी ठरावी. फक्त दोघांच्या जोरावार मॅच जिंकणे एका मर्यादेनंतर करता येत नाही. त्यांची मिडल ऑर्डर आज वापरात आली, ती किती खेचू शकते हे लक्षात आले. बॉलिंग अजून सुधरवायला हवी हे लक्षात आले.

बटलर थंड डोक्याने खेळायला शिकला राव तर पुढचा वर्ल्ड कप रूटच्या बरोबर इंग्लंड ला काढून देईल.

<< बटलर थंड डोक्याने खेळायला शिकला राव तर ..>> खरंय. अप्रतिम खेळूनही, आज तो आऊट झाला तें त्या परिस्थितीत तरी आततायीपणाच होता. पोलार्ड लागला म्हणून अन्यथा त्यामुळे सामना मुंबईच्या हातचा जावूं शकला असता.

आज डि व्हिलीयर्सकडून 'मिस्फिल्ड' झाली- रन-आऊट करण्याच्या गडबडीत . पण गोलंदाजाकडे जावून दिलगिरी व्यक्त करण्याचं व कोहलीला रन-आऊटच्या धांदलीत असं झाल्याचं खुणेने सांगण्याचं सौजन्य या ज्येष्ठ खेळाडूने तत्परतेने दाखवलं याचं कौतुक वाटलं.

एबी हा खरा जंटलमनच आहे.
हारल्यावर / वा जिंकल्यवर ही तो हॅट काढून वा हॅटला हात लावून हस्तांदोलन करतो.

बाहेर बसवलेलं पोलार्ड च्या मनाला चांगलच लागलेलं दिसतय. >> असे दिसतेय खर. त्या जमालगोट्याची गरज होती खरी.

आज तो आऊट झाला तें त्या परिस्थितीत तरी आततायीपणाच होता. >> +१. विशेषतः रोहित त्याच प्रकारे बाद झाला हे बघितल्यावर तरी ...

एबी हा खरा जंटलमनच आहे. >> आधी मार मार मारतो नि मग टोपीला हात लावून सॉरी सांगतो Wink

<< भाऊ, कितीदा एडीट करणार तिच पोस्ट ? >> बटलरच्या खेळाबद्दल 'अप्रतिम खेळूनही', हें लिहीणं अत्यावश्यक वाटलं म्हणून ! एडीट केल्याचा दोष आला तरी चालेल पण कोणावर अन्याय न होवूं देणं अधिक महत्वाचं ! Wink
<< आधी मार मार मारतो नि मग टोपीला हात लावून सॉरी सांगतो >> Wink
<< बाहेर बसवलेलं पोलार्ड च्या मनाला चांगलच लागलेलं दिसतय. >> सचिनचा खूपच भंरवसा असायचा पोलार्डवर. कालच्या पोलार्डच्या संघातल्या समावेशातही सचिनचा हात असावा.

खूप दिवस खदखदत होतं हें माझ्या मनात. म्हटलं टाकूया इथं, विषयाला तितकंसं धरून नसलं तरी ! -

umpire2.JPG

यावरुनच WG Graceचा ऐकलेला किस्सा आठवला. आता आऊट देईल असे वाटल्यावर अंपायरला म्हणाला होता- 'ही गर्दी तुझी अंपायरिंग बघायला नाही. माझी बॅटिंग बघायला जमलेली आहे.'

आज जडेजा आत येईल त्यामुळे जकाती किंवा आकाशदीपला संघाबाहेर जावे लागेल
फिंच नसेल तर गुजरात खरे किती पाण्यात आहे ते कळेल

हेन्रीके ला खाली ढकलायला काही हरकत नाही..... किंवा त्याला काढून बोल्टला खेळवून बघायला पाहिजेल......धवनचा जबरदस्त बॅडपॅच चालू आहे.... त्याच्या देहबोलीकडे बघुन तो काही खेळेल असे वाटतच नाही
ओझा किंवा हूडाला पॉवरप्ले मध्ये संधी दिली पाहिजेल

वॉर्नरला स्वस्तात काढले तर निम्मी मॅच गुजरातच्या खिशात असेल!

<< 'ही गर्दी तुझी अंपायरिंग बघायला नाही. माझी बॅटिंग बघायला जमलेली आहे.'>> मीं सुद्धां वाचलाय हा किस्सा. पण मला वाटतं तेंव्हां डब्ल्यू.जी. ग्रेस हे 'गुड ओल्ड मॅन ऑफ क्रिकेट' झाले होते व हा विक्षिप्तपणा इंग्लंडमधे नुसता क्षम्यच नाहीं तर कौतुकाचाच विषय झाला होता !
<< टुर्नामेंट जेव्हढी ओपन तेव्ह्ड्ही मज्जा >> हो, पण त्याकरतां 'टीम लॉयल्टीज' सोडून द्यायला हव्या ना ! Wink

हैद्राबादवाल्यांकडे केन विल्यमसन आहे आणि त्याला बेंचवर ठेवतात. वर्ल्ड कपच्या फॉर्मनंतरही मॉर्गन त्याच्याआधी कसा खेळतो कुणास ठाऊक?

Pages