Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36
विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली
पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉर्नर ला आश्चर्य वाटत असेल
वॉर्नर ला आश्चर्य वाटत असेल ना, की ईतकं सातत्यानं एखादा खेळाडू कसा वाईट खेळू शकतो >>
यंदा अजून पर्यंत तरी नायर नि वोहराची एक इनिंग सोडली तर एकही नवातरुण भारतीय खेळाडू चमकला नाहिये
सर्फराज खान चमकला की
सर्फराज खान चमकला की सनरायझर्स विरुद्ध
वॉर्नर सबलाइम टच मध्ये आहे
वॉर्नर सबलाइम टच मध्ये आहे राव!
"वॉर्नर सबलाइम टच मध्ये आहे
"वॉर्नर सबलाइम टच मध्ये आहे राव!" - मला तरी वॉर्नर खूप आऊट ऑफ फॉर्म असलेला आठवतच नाही. मस्त प्लेयर आहे.
"यंदा अजून पर्यंत तरी नायर नि वोहराची एक इनिंग सोडली तर एकही नवातरुण भारतीय खेळाडू चमकला नाहिये" - खरं आहे. अर्थात, उथप्पा कदाचित असहमत असेल.
मी वाट बघतोय, अय्यर, मयंक आगरवाल, रिषभ पंत वगैरे खेळाडू काहीतरी चांगलं करतील ह्याची.
दोन्ही खरे ठरले मुंबई हारली
दोन्ही खरे ठरले
मुंबई हारली आणी वार्नर ने 70 पेक्षा जास्त धावा केल्या
एक वॉर्नर सुरुवातीला घेतला
एक वॉर्नर सुरुवातीला घेतला असता तर सामना वेगळा झाला असता..
हरायला लागते तेव्हा मुंबई कधीही कोणाशीही हरू शकते आणि जिंकायला लागते तेव्हा हेच.. इथून पुन्हा हेच यंदाही घडते का हे बघायचेय..
संध्याकाळी पंजाब कलकत्ता मध्ये कलकत्ता फेव्हरेट !
त्यातही टॉस जिंकून फिल्डींग घेतली तर आणखी फेव्हरेट..
"" मला गेलच्या फॉर्मबद्दल
"" मला गेलच्या फॉर्मबद्दल चिंता वाटत नाहीं " - इति कोहली.
गेलची कामगिरी सध्यां हास्यास्पद होत असली, तरीही तो टी-२० मधला अग्रेसर 'मॅचविनर' आहे हें निर्विवाद. मला वाटतं २० षटकांच्या सामन्यांत दोन-तीनच फलंदाज मॅचच्या दिवशीं चमकणं खरं महत्वाचं. गेल चमकल्याशिवाय रहाणार नाहीं हा आशावाद बाळगून त्याला प्रत्येक सामन्यात खेळवणं, हें टी-२० मधे तरी म्हणूनच अनाकलनीय वाटूं नये.
गेल स्टोर्म लवकर यावा . ही
गेल स्टोर्म लवकर यावा . ही प्रार्थना सगळेच संघ करत असतील कारण नंतर ५-६ मॅच मधे तो शांत राहतो. स्पर्धेच्या सुरुवातीला जितक्या लवकर हे वादळ येईल तितक्या चिंता कमी होतील. अन्यथा पुण्यासारखी अवस्था करायला त्याला अवघी एकच मॅच लागते. यंदा तो २० -२० मधे द्वीशतक मारेल असा ठाम विश्वास आहे
' गेलची फटकेबाजी पाहिली कीं
' गेलची फटकेबाजी पाहिली कीं पोट भरतं ', असं मीं म्हणालो होतो; पण
म्हणून त्याची मॅच असेल तेंव्हां तूं रिकामं ताट ठेवणार माझ्यासमोर !!
गेल ची अप्रतिम फटकेबाजी पाहून
गेल ची अप्रतिम फटकेबाजी पाहून तो घटोत्कचाचा कॅरेबियन मधे वाढणारा वंशज वाटतो हे जितकं खरं आहे तितकच तो थोडा ओव्हर-रेटेड खेळाडू आहे असं माझं मत आहे. 'कन्सिस्टंसी चा विरुद्धार्थी शब्द लिहा - ख्रिस गेल.'
गेल आयपीएल बाहेर ?
गेल आयपीएल बाहेर ?
आत्तां घरी आलो तर नरैनची
आत्तां घरी आलो तर नरैनची मुलाखत संपता संपतां दिसली. खूप कॉन्फीडंट वाटला तो. त्याच्या 'बोलींग अॅक्शन'चा प्रॉब्लेम सुटलेला दिसतो. आयपीएलमधे त्याला पहाणं रंजक ठरावं.
<< तितकच तो थोडा ओव्हर-रेटेड खेळाडू आहे असं माझं मत आहे. >> खरंय. शिवाय, डी.व्हिलीयर्स, डि कॉक, इत्यादींसारखे त्याचे फटके चौफेर व वैविध्यपूर्ण नसतात. पण, 'सौ सोनारकी, एक लोहारकी', हें टी-२० मधे चपखल लागू पडतं हेंही आहेच. पोलार्ड हें दुसरं बोलकं उदाहरण.
गेल आयपीएल बाहेर ? >> पुढच्या
गेल आयपीएल बाहेर ? >> पुढच्या २ मॅचेस फक्त..
गेल ची अप्रतिम फटकेबाजी पाहून
गेल ची अप्रतिम फटकेबाजी पाहून तो घटोत्कचाचा कॅरेबियन मधे वाढणारा वंशज वाटतो हे जितकं खरं आहे तितकच तो थोडा ओव्हर-रेटेड खेळाडू आहे असं माझं मत आहे. >> +१ आपल्या गल्ल्यांमधे टेनिस बॉल वर hand eye co-ordination and sheer power च्या जोरावर धुणारे बॅट्समन असतात त्याचा पुढचा रिलीज वाटात राहतो गेल नेहमी. तरीही टेस्ट्मधे ३०० काढल्यात हे कौतुकास्पद आहे.
किंग्ज इलेव्हन १२०-८ !
किंग्ज इलेव्हन १२०-८ ! एकतर्फीच होणार बहुतेक हा सामना !!
अपवाद वगळतां, टी-२० मधे
अपवाद वगळतां, टी-२० मधे स्पीनर्स, विशेषतः लेग-स्पीनर्स, बेछूट फलंदाजीवर अंकुश ठेवण्यास अधिक उपयोगी पडतात असं जाणवतं.
आज मुंबई वि. आरसीबी. मुंबईची खरी कसोटी !
भाऊ.... व्यंचि भारीच! बिग मॅच
भाऊ.... व्यंचि भारीच!
बिग मॅच ऑन द वे..... मुंबई वि. बंगळूर!
गेलच्या ऐवजी मिल्ने किंवा रिचर्डसन आत यायला पाहिजेल.... एरवी बंगळूरच्या बॉलींगचे काही खरे नाही
मुंबईने अतिप्रयोग न करता रोहीत आणि गप्टीललाच सलामीला खेळवायला हवे, मग रायडू, बटलर, ॲंडरसन आणि खाली हार्दिक, कृणाल आणि भज्जी..... गरज लागलीच तर मॅक्लाघन
मला तर मुंबईच फेव्हरिट दिसतीय!
मुंबई ने बॅटींग ऑर्डर ची
मुंबई ने बॅटींग ऑर्डर ची प्रयोगशाळा नाही केली, तर बंगळूरू पेक्षा जास्त समतोल टीम आहे. बंगळूरू तर्फे एबी, विको आणी वॉटो चालले तर मात्र सामना चुरशीचा होईल. बंगळूरू ने चि. बिन्नी ला खेळवायला हरकत नाही.
रिचर्डसन, अॅरोन, अब्दुल्ला,
रिचर्डसन, अॅरोन, अब्दुल्ला, वॉटसन, पटेल, बिन्नी - चांगले बॉलिंग ऑप्शन्स आहेत बंगळूरू कडे.
मुंबई ने एक संधी देऊन लगेच गुप्टील ला काढलं. कमाल आहे.
आत्मघाती मुंबई .. काय
आत्मघाती मुंबई .. काय मुर्खपणा आहे गुप्तिल सारख्याला काढून परत जो तब्बल ३ मॅच मधे सतत खेळला नाही त्या पोलार्डला घेतला आहे.
आज परत हारणार मुंबई .
मॅक्ल्केशानची पहिली ओव्हर काय
मॅक्ल्केशानची पहिली ओव्हर काय भन्नाट होती राव. थेट रियाझ ची वर्ल्ड कप ची ओव्हर आठवली.
रियाझच्या समोर वॉट्सन होता
रियाझच्या समोर वॉट्सन होता असामी
याच्या समोर लोकेश आहे
लोकेश ने व्याजासकट वसूल केले
लोकेश ने व्याजासकट वसूल केले
राहुल लढला पण अभिमन्यूसारखा
राहुल लढला पण अभिमन्यूसारखा शेवटीं व्यूहरचनेचाच बळी ठरला !
कोहली slowly accumulate
कोहली slowly accumulate करतोय. मुंबईसाठी धोक्याची घंटा?
बँगलोर १९० क्रॉस नक्की करतील.
बँगलोर १९० क्रॉस नक्की करतील. वानखेडीची खेळपट्टी ठणठणीत वाटत आहे.
रियाझच्या समोर वॉट्सन होता
रियाझच्या समोर वॉट्सन होता असामी >> short pitch balling खेळण्यामधे वॅटसन नि राहुल मधे काही फारसा फरक नाही.
मजा आली मॅक्लेशानच्या पहिल्या दोन ओव्हर्स मधे. राहुल आउट होणार हे उघड होते. सलामीच्या फलंदाज असून किती कमीट होतो ? एक बॉल हूक नाहि करता येत का ?
mumbai will buy 190 I
mumbai will buy 190 I guess..... RCB needs more
राहुलला बाद केल्याचा
राहुलला बाद केल्याचा पश्चात्ताप होणार आहे
"एक बॉल हूक नाहि करता येत
"एक बॉल हूक नाहि करता येत का?" - मला वाटतं की राहूल ने टेस्ट मधे खेळताना हूक मारलाय आणी शॉर्ट बॉलवर तो आऊट सुद्धा झालाय.
"सलामीच्या फलंदाज असून किती कमीट होतो?" - बहुदा anxiety असावी. हा फॉर्मॅट, अनेक दिवसांनी मिळालेली संधी अशा सगळ्याच गोष्टींची. अर्थात हा एक अंदाज आहे.
Pages