काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्याच वेळा वाक्याच्या सुरुवातीला नैतर शेवटी ज्याच्याशी बोलतात त्याचं नाव घेतात ते ऑड वाटतं कानांना.
ती तुलसी प्रत्येक वाक्याशेवटी मिहीर म्हणायची.

घरातलं फोल्डिंग फर्निचर आवडल, मम स्वस्ति.

मी रात्री १२ ला बघते कारण ९ ला अशोका (नवरा बघतो) असतं.

हिरोईन खूप उजवी आहे (दिसण्यात, अभिनयात) बाकी झीच्या हिरवीणी फार बोअर.

सगळ्या शिरेलीचे धागे उचकटून पहा, सगळ्यावर पहिल्या पहिल्यांदा 'पाहतेय' आवडतेय, हिरॉईन गोड अहे, हिरो भारी आहे, कथा पण बरी वाटतेय असेच प्रतिसाद दिसतील.
जरा थांबा ही शिरेल पण उजव्याची डाव्या बाजूला यायला वेळ नाही लागणार Lol
झी आणि त्याच्या हिरॉईनी आढ्याचं पाणी जसं शेवटी वळचणीला जातं तसंच वागतात शेवटी.
कथा असो वा हिरॉईन, एकिला झाकून दुसरीला काढावी तर दुसरी पहिलिच्या वरच असणार

लय भारी दक्षे.

बरोबर आहे तुझं. मग शिरेलीला बाय बाय, टाटा माझ्याकडून Wink . ते मी झटक्यात करते Lol .

पदर खोचुन लोकी किसणारी हिरोइन आठवा. ही प्रमोशन साठी रडतेय ते लवकरच विसराल. +१

नायिकेच्या वडीलांचं अती आपला-परका करणं खटकलं. भाजी मार्केटमध्येसुद्धा बिहारी विक्रेते मराठी अजिबात न कळणारे, भाज्यांचे रेट्स कमी ठेवणारे आणि मराठी विक्रेता उद्धट, उर्मट, दुप्पट भाव लावणारा दाखवला. स्टिरीओटाईप/ जनरलाईझेशन इ.इ. Angry

शिव सीएसटी स्टेशनला उतरून टॅक्सीने ठाण्याला का आला ते कळलं नाही.
बहुतेक ट्रेन ठाण्याला थांबत नसावी. Uhoh

आणखी एक , सहज सुचल म्हणून .

वर कोणीतरी भाजी मार्केट मध्ये सिल्क ड्रेस घालून फिरण्याचा उल्लेख केला होता .
हल्ली सहसा ओढणीवाले ड्रेस घालून आणि साड्या नेसून ऑफिसला जाण्यारा मुलींच प्रमाण घटलयं .
सकाळच्या वेळी , मुम्बईच्या लोकल ट्रेन्च्या गर्दीत मुली,बायका सहसा सुटसुटीत कुर्ता- सलवार प्रीफर करतात .
( फार जनरलाईझ्ड असेल विधान कदाचित , पण एक निरिक्ष्ण नोंदवलं)
गौरी , रिक्शाने ऑफिसला जाते म्हणून असेल कदाचित Happy

अवांतर : मला मेदेचे ड्रेसेस फार आवडायचे , फार आपल्यासारखेच वाटायचे.

मला लव्ह स्टोरी/फॅमिली स्टोरी बघायला आवडली असती.
पण राजकीय अँगलमध्ये इंटरेस्ट नाही. प्रोमोज बघून लव्हस्टोरीवर भर असेल असं वाटलं होतं. पण इथे परप्रांतिय किती भारी असतात, मराठी लोक त्यांना विरोध करतात किंवा मराठी भाषेचा आग्रह धरतात हे चूक आहे असा काही propaganda असेल तर बघणार नाही.

शिव सीएसटी स्टेशनला उतरून टॅक्सीने ठाण्याला का आला ते कळलं नाही.>> ठाण्याला नाही, गोरेगावला गेला.

मंडईचं नाव आणि स्थळ दाखवलं काय मालिकेत?

आणि हिंदी सिनेमात एकाच गाण्यात हिरो हिरॉईन पॅरीस ते पिवळेबुद्रूक फिरतात ते चालतं तुम्हाला आणि मराठी सिरीयलीत तसंच दाखवलं की लगेच भुवया उंचावता काय? Biggrin

अरे त्या मंदेला बोलवा रे कुणीतरी, नाहीतर ह्या झी मराठी वाल्यांना जागे करा! त्या जानुश्रीला इतक्या वेळा त्या तलावपाळीवर दाखवले कि आता ती तलावपाळी (होसुमी… बघितलेले) कोणीही ओळखू शकेल. मग हे बापलेक भाजी घ्यायला, तेही स्कुटरवरून, गोरेगावातुन ठाण्याला, जांभळीनाक्याच्या मंडईत का आले? ती गौरी तलावपाळीवर का बागडत होती? तिकडे काम करते का ती?

पत्ता बहुतेक काल विचारतो तो शिव गौरीला, गोरेगावचा होता.

ठाण्याला भाजी बहुतेक खुप स्वस्त मिळत असेल, गोरेगांवहुन स्कुटरवर येऊन घेण्याइतकी परवडत असेल ;).

शिव सीएसटी स्टेशनला उतरून टॅक्सीने ठाण्याला का आला ते कळलं नाही.
बहुतेक ट्रेन ठाण्याला थांबत नसावी. >>>>> पियु, कुठल्याही ट्रेन्स ठाण्याला थांबतातच. फास्ट असो किंवा स्लो.

कुठल्याही ट्रेन्स ठाण्याला थांबतातच>> Lol नाही गं मुग्धटली.

आणि शूटींग लोकेशन ठाणे आहे, म्हणजे सिरीयलीतलं लोकेशन ठाणेच असेल असं नाही. उरणला शूटिंग करून सिनेमात रामगढ म्हणतात की नै?

काल हिरवीण हिरोला झापायला गेली तेव्हा दारात उभे असताना कपाळावर टिकली नव्हती. खोलीत गेल्यावर होती. परत बाहेर आल्यावर टिकली गायब Uhoh

मंजुडी, माझ्या ९ वर्षापूर्वीच्या नॉलेजप्रमाणे काही मोजक्याच ट्रेन्स ठाण्याला थांबायच्या नाहीत नैतर सगळ्या स्लो आणि फास्ट ट्रेन्स ठाण्याला थांबतात, २००७ नंतर यात काही बदल झालेले असतील तर नाही माहित. मी लोकल्स बद्दल बोलतेय एक्स्प्रेसबद्दल नाही. एक्स्प्रेसची यादी काढली तर न थांबणार्‍याच जास्त आहेत.

मंडईचं नाव आणि स्थळ दाखवलं काय मालिकेत?>>> नाय वो. Happy

टिकलीचं माझ्याही लक्षात आलं. दोनेक वेळा आलटुन पालटुन होती आणि नव्हती.

हिरो आवडलाय...डोळे मस्त आहेत त्याचे. सध्या त्याच्यासाठीच बघत आहे. त्याचा काही इंटरव्ह्यू वगैरे आला असेल तर टाका कृपया!

तो सीएस्टी ला उतरलेला दाखवला. सीएस्टीहुन ठाण्याला गेला की सीएस्टीहुन चर्चगेट ला जाउन गोरेगावला गेला ते काही दाखवलं नाही Happy

टिकलीचा घोळ पब्लिकच्या लक्षात आलेला दिसतोच आहे.

शुभांगी गोखलेच्या मनगटावरचा टॅटू दिसला का कुणाला? Wink

बाकी, गंगाकिनारेहून मुंबईत येणार्‍या ट्रेन्स म्हणजे पश्चिम रेल्वे ना? त्या व्हीटीला जातात? खुसपटं काढायचीच म्हटलं तर... Proud

आता तो विकी तिकडे आजीला परस्पर सांगणार की त्या नव्या मुलाने अ‍ॅडव्हान्स परत मागितलाय... आणि ते पैसे मधल्यामधे लाटणार.. काल शिव त्याला जेव्हा म्हणतो की 'अ‍ॅडव्हान्सचे पैसे बुडले तर बुडू देत, मला ढंग का खाना पाहिजे', तेव्हाची त्याची रिअ‍ॅक्शन पाहून असंच वाटतंय.

तेव्हाची त्याची रिअ‍ॅक्शन पाहून असंच वाटतंय.>>> हो. एकुणच तो विकी जाम पकाऊ आहे. डोक्यात जातो.

मोहन जोशीचे कॅरेक्टरही नाही आवडले. उगाचच परदेश, परप्रांतिय सगळ्यांना सारखी नावे ठेवतो.

त्याची सासू मात्र बेष्ट. रच्याकाने, त्या कवळी लावतात का? चेहरा नवीन कवळी बसवल्या सारखा दिसतो.

बाकी, गंगाकिनारेहून मुंबईत येणार्‍या ट्रेन्स म्हणजे पश्चिम रेल्वे ना?>> तोहार ऐसा काहे करे ललनवा..

वाराणासीहून मुंबई सीएसटीला येतात ट्रेन्स.

मोहन जोशीचे कॅरेक्टरही नाही आवडले. उगाचच परदेश, परप्रांतिय सगळ्यांना सारखी नावे ठेवतो.>> + १०००

शुगो चे पन्चेस भारी . परवाम्हणते , गांधीलमाशी बसलेली ना कोपर्यात ...
काल म्हणते चण्याची भाजी वाढली आहे तुम्हाला , त्याचही टायमिंग सही .

Pages