काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डायरेक्टर अजय मयेकर आहे, ह्यांची एक सिरीयल आवडली होती आणि एक अजिबात नाही (फक्त दोन आठवडे बघितली जेमतेम).

अन्जू Lol अगं पोळीला तव्यावरच असताना जर तेल लावलं तर तव्याला पण लागतं ते आणि मग लगेच असा थोडा काळपट दिसायला लागतो. Happy नको काळजी करु. Wink

एकुणात काय झाल काल? नायिकेला प्रमोशन म्हणजे ती नोकरी करतेय, म्हणजे ती तडफदार वै वै असणार आणि लग्न झाल रे झाल की मुळुमुळु.

तिची आज्जी मालवणी बोलायचा प्रयत्न करते Happy
पण एकंदरच घराचा सेट अप आवडला . म्हणजे उगाचच केतकर काकांच्या घरासारख चौपासी वाडा नाही . आणि भलं मोठ्ठ कीचन . मस्त एक्दम पसारा , नॉर्मल घरासारखा वाटला. कीचन आवडलं .मुलगा आणि सून जरा जास्तच वयाचे आणि आगाउ वाटले. हिरविण नेहमी प्रमाणे गुणी मुलगी .

बाबांची बडबड चालू असताना आईच वैतागणं एकदम नॅचरल Happy

हैला!! पैल्याच भागात फुल्ल ठाणेदर्शन!
जांभळी नाका मार्केट आणि तलावपाळी.
होसुमीयाघमध्येही ठाणेदर्शन होतं. ही मालिका त्या वळणावर जौ दे नको रे म्हाराजाऽऽऽ

त्या आजी म्हणजे जावयाच्या सासूबै आहेत ना का सुनेच्या?
प्रोमोज मधे ती आई बाबा म्हणून स लि भ च्या सिनेमात असल्यागत घरभर पळून खाली येते ना.
म्हणजे आजी , मुलगी जावई , नात अस कुटूंब आहे ना?

हो, पहिल्या भागात सासू-जावयाची टशन मस्त वाटली. (आता टशनचे मुद्दे रिपीट व्हायला नकोत म्हणजे मिळवली. कारण पहिल्याच भागात बर्‍याच मुद्द्यांना हात घालून झालाय.)

जांभळी नाका भाजी मार्केटमध्ये सिल्कचा ड्रेस घालून, केस मोकळे सोडून बाजारहाटाला आलेल्या गौरीबद्दल अतीव आदर दाटून आला. Proud

आजी पहिल्या सीनमध्ये मालवणी/कोकणी हेल काढून बोलल्या; पण नंतर किचनच्या सीनमध्ये बर्‍यापैकी प्रमाण मराठीच ऐकू आली.

आता तो हिरो मुम्बईत हरवणार आणि आपली मुलगी त्याला मदत करणार .
किन्वा तो तिच्या हापिसात येणार , तिच्या प्रमोशन्च्या अगोदर , तिच्या जागी .
मग बाबा भडकणार , बाहेरून लोक येउन आमच्या मुलांचे हक्क मारतात.

आजी पहिल्या सीनमध्ये मालवणी/कोकणी हेल काढून बोलल्या;>> परब आहेत त्या Wink पण ती भाषा कृत्रिम नाही वाटली राखेचासारखी. मुंबईतल्या मालवणी आजी वाटल्या त्या.

शुभांगी गोखले च्या क्लासमधल्या मुलांची मात्र चिंता वाटली Wink एकीकडे स्वयंपाक करताना मुलांना फक्त काहीतरी वहीत लिहायला सांगायचे Uhoh बिचारी मुलं Sad

सासू-जावई संवादांनी मजा आली. उलट भैया विरुद्ध मराठी भट्टी जमली नाही. नक्की कोणता स्टॅन्ड घ्यायचाय त्यांना? Happy
मुलगी गोड आहे Happy सायली नाव का तिचं?
'श्यामला'ला कोणी वेगळा वॉर्डरोब का देत नाही? तिला स्वत:लाही कंटाळा येत नसेल का? पण फेशियल एक्स्प्रेशन्स जबरदस्त देते शुभांगी गोखले! Happy

दादा-वहिनी मात्र सपशेल चुकलेच आहेत. एक तर थोराड आहेत किती. आणि मुंबईत एकत्र कुटुंबात राहणारे लोक कितीही आळशी असले तरी वर्किंग डे ला असे लोळत पडत असतील असं वाटत नाही.

नक्की कोणता स्टॅन्ड घ्यायचाय त्यांना? >> ती कादिपची नांदी आहे. हिरॉईनने हाच माझा नवरा असं जाहिर केल्यानंतरच्या पन्नासेक भागांची केलेली सोय आहे ती.

एक तर थोराड आहेत किती. >> Lol

आणि मुंबईत एकत्र कुटुंबात राहणारे लोक कितीही आळशी असले तरी वर्किंग डे ला असे लोळत पडत असतील असं वाटत नाही.>> जाऊ दे गं. सेकंड शिफ्टला जाणार असतील. पण भाऊ उठतो तेव्हा त्याच्या कानशीलाजवळ उगवलेला सूर्य दाखवणे हे सही पिक्चरायझेशन आहे.

शुभांगी गोखले टिपरे मध्ये होती. चांगली आहे ती.

पण तिचे ते थांबून थांबून डायलॉग मारणं चालतं.

(चला आणखी एक नावं ठेवायला मिळाली सिरियल. Proud

मला कालच्या एपि मधले सासुबाई-जावयाचे डायलॉग आवडले.रेडिओ,फोड्णी एकदम टीपीकल.हिरवणीने पटापट गाद्या उचलल्या.आपल्यासारखी काम करताना पाहुन बरं वाटल Proud बाकी पोळी की फुलका हा प्रश्न पडला आनि तवा फारच जाळला होता की घासला नव्ह्ता ?? एकंदरीत ही सीरीयल येता जाता,काम करता उरकता पहावी अस ठरवल आहे.

पहिला भाग छान वाटला. पुढे काय होईल ते दिसेलच कालपरत्वे. एकूण काय मोहन जोशी कंजूस आणि परप्रांतीय द्रष्टे दाखवले आहेत (आणि त्यांचीच मुलगी पुढे परप्रांतीयाशी लग्न करेल Proud ). शुभांगी गोखलेची आई दाखवलीये इकडे त्या मला खूप आवडतात. अगदी आभाळमाया मध्ये त्या 'माई' ची भूमिका करत असल्यापासून. (मला असं का वाटतय कि त्या हिरविणीच्या जागी त्या हिरोला प्रमोशन मिळेल म्हणून Proud )

दादा-वहिनी मात्र सपशेल चुकलेच आहेत. एक तर थोराड आहेत किती. आणि मुंबईत एकत्र कुटुंबात राहणारे लोक कितीही आळशी असले तरी वर्किंग डे ला असे लोळत पडत असतील असं वाटत नाही. +११११

शुभांगी गोखले च्या क्लासमधल्या मुलांची मात्र चिंता वाटली डोळा मारा एकीकडे स्वयंपाक करताना मुलांना फक्त काहीतरी वहीत लिहायला सांगायचे अ ओ, आता काय करायचं बिचारी मुलं अरेरे +१११११

मला त्या पोळ्या , फुलके जे काही होत ते फार कच्च आणि जाड वाटलं . Happy
हिरवणीने पटापट गाद्या उचलल्या.आपल्यासारखी काम करताना पाहुन बरं वाटल>>>+ १००००
शुभांगी गोखले च्या क्लासमधल्या मुलांची मात्र चिंता वाटली >>> हो हो . प्रतिज्ञा हा काय क्लास्मध्ये शिकवण्याचा विषय आहे . अभ्यास कमी पडलायं , दिग्दर्शकाचा Happy

पण भाऊ उठतो तेव्हा त्याच्या कानशीलाजवळ उगवलेला सूर्य दाखवणे>> थोराड आळशी झोपाळू भाऊ बघून त्याच्या कानशिलात द्यावीशी वाटली मला त्यामुळे कानशीलाजवळचा सूर्य काही दिसला नाही Proud Light 1

स्वस्ति | 29 March, 2016 - 00:24
म्हणजे नायिकेच भाउ आणि वहिनी का? >> हो !

मुग्धटली | 29 March, 2016 - 00:25
कोणी केलय हे काम? ओळखीचे आहेत की नवे चेहरे आहेत? <<<< यातला भाऊ मला वाटत 'मला सासू हवी ' मध्ये होता.

Pages