काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो लिहिलत ते लिहिलत. आणि सॉरी कशाला Happy
आम्ही पण मस्करीच करत होतो.
नैतर <<< ठाण्यातिल द्रुश्य दाखवुन आम्ही गोरेगाव ला राहातो म्हणने तर सगळ्या सिरिअल मधे असते....
मुम्बई चे लोकेशन दाखवुन दिल्ली म्हणतात...... अस बरेच लोकेशन इकडे तिकडे करतात>>>

इतकं तर आम्हालापण कळतं. Happy

अग्गं मुग्धटली... तो हिरो गंगाघाटसे बंबई लोकलसे आयेगा क्या >>>> पियुने शिव सीएसटीला उतरुन ठाण्याला टॅक्सीने का आला अस लिहिलय.

पहिल्यांदाच मुंबईत आलेला माणूस एवढं सामान घेऊन काय लोकलने जायची हिंमत करेल.. लोकलच्या यार्डातच पोचेल तो Lol
आणि मालिकेत तर तो गोरेगावला गेला आहे.

_आनंदी_ असे एडिट नाही करायचे प्रतिसाद... आपण पण आपली बाजू लावून धरायची Wink तेवढंच आपलं स्वतःचंही मनोरंजन होतं.
नाहीतरी कितीही बाजू घेतली तरी वळणाचं पाणी वळणालाच जाणार आहे.

मोहन जोशीचे कॅरेक्टरही नाही आवडले. उगाचच परदेश, परप्रांतिय सगळ्यांना सारखी नावे ठेवतो.>> अरे त्या शिवाय का गौरीच्या परप्रांतीय लग्नाला त्याचा कडाडून विरोध दाखवता येईल. Happy

तो विकी नंतर शिव आणि गौरी च्या मध्ये व्हिलन म्हणून येणार नक्की.

बकि हिरॉईनला फारच लाऊड शब्द असलेले डायलॉग दिले आहेत. पहिल्यांदाच नीट कपडे घालून दार उघडता येत नाही का असं कुणी विचारतं का? मी तर त्याने कपडे घातलेत की नाही हे सरळ इग्नोर मारलं असतं. दाखवणार्‍याला लाज नाही तर बघणार्‍याला कशाला या सुत्रानुसार...
शिवाय खड्ड्यात जा..? Uhoh

मला पण गौरी उगीचच खूप रूड बोलते आहे त्याच्याशी असे वाटले. म्हणजे आई इतकी गोड अन ही अशी?! तिचा चेहरा खरेच सामान्य आहे. असे वाटू लागले आहे.

दक्षिणा + +++

आणि परत म्हणे माझ्या आजीच्या स्वैपाकाला तु आवडला नाही म्हणुच कसा शकतोस? अरे ही काय बळजबरी आहे .. कालचा भाग नाही आवडला एव्हढा

आई इतकी गोड अन ही अशी?>>> वडलांवर गेलेय Happy

सिरेलीत सगळंच टोकाचं असतं ह्या नियमाने ती जरा जास्तच रुड बोलतेय.
बिचार्‍याची लाज शरम पण काढली तिने. वर खड्ड्यात जा पण म्हणते.

विकी अति डोक्यात जातो एन्ट्रीपासूनच. जाम पैसेलुबाडू आणि लबाड आहे तो. मिठी छुरी.

तो विकी 'तू तिथे मी' मधलाच ना?

हिरो छान आहे... अॅक्टींग पण मस्त करतोय. चेहर्‍यावरचे एक्स्प्रेशन जबरी. Happy

पण मला तो फारच इरिटेटिंग वाटला एकुणच. >> मी नताशा, मलाही आधी ते फार आपलं-परकं करतायत असंच वाटलं होतं. Happy पण नंतर कथेच्या अनुषंगाने ओके वाटलं.

हिरो छान आहे... अॅक्टींग पण मस्त करतोय. चेहर्‍यावरचे एक्स्प्रेशन जबरी. स्मित>> +११ मला पण हीर्वीणीपेक्शा तोच आवडलाय

पहिल्यांदाच नीट कपडे घालून दार उघडता येत नाही का असं कुणी विचारतं का? मी तर त्याने कपडे घातलेत की नाही हे सरळ इग्नोर मारलं असतं. दाखवणार्‍याला लाज नाही तर बघणार्‍याला कशाला या सुत्रानुसार...>> नॉय दक्षिणा, तिच्या असं वागण्यामागे कारण आहे. आणि ते कारण चक्क लॉजिकलही आहे.

खरतर त्यांना अस दाखवायच असेल की तिच प्रमोशन एका यु पी वाल्या माणसामुळेच हुकल ना ..मग ती त्याचा राग ह्याच्यावर काढत आहे...

अस मला तरी वाटल

नंतर तिला पश्चाताप वगैरे होईलच...

तो विकी नंतर शिव आणि गौरी च्या मध्ये व्हिलन म्हणून येणार नक्की.

>>> पुढे जरा ओळखी वाढल्या की विकीच्या लांड्यालबाड्या कधीतरी शिवला कळणार, तो गौरीला नाहीतर आजीला सांगण्याचा प्रयत्न करणार, त्यांना आधी राग येणार, गैरसमज होणार, मग तो खरंच बोलत होता हे लक्शात येणार, ती प्रेमाच्या गाडीतली शेवटची काडी ठरणार Proud

Pages