काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोड्णी मस्त दिली होती आज्जीबाईंनी अन चहा पण झकास करत होत्या. रस्सा किंवा काय ती भाजी एकदम चाटून पुसून संपवण्यासारखी होत असणार. मात्र, शुभांगी ताईंना पोळ्या करायची सवय नसावी. केवढी ती पिठी, काय ते लाटणं न काय ते भाजणं..... रेश्माकडून तरी शिकून घेयाची ना? असो हे आपले खुसपटे काढायची म्हणून...पण घर झकास आहे त्यांचं. एकदम उबदार आणि चारचौघांचे मुंबईतले घर असते तस्स्से.

आज बघितला पहिला एपिसोड. मला ती गौरी आवडली. हसल्यावर खूप छान दिसते. हिरो ही चांगला आहे. त्याला आधी कुठेतरी बघितल्यासारखं वाटलं. त्याच्या एन्ट्रीला लावलेलं गाणंही छान आहे.

Are bapre kiti barik observation te ...polya n pithi n fodni ....dhanya ahat tumi lok ......pan maja yete comments vachtana aajkal tar serial pahaychi garaj ch nai ..ithe kalte sagle
Thanks

पण गौरीच्या आईचे खरकटे बरकटे खुपच झाले. खरकट्या हाताने दार उघडले ( कणिक भिजवत असतांना). लाटणे बोटांनी नाही फिरवत तळहातांनी फिरवतात.

मालिकेचा निर्माता / दिग्दर्शक माबोवर असेल तर मालिका सुरू व्हायच्या आधी धागा सुरू झाला हे बघून सातव्या आसमानात (मालिका अर्धी हिंदी आहे, तेंव्हा थोडं हिंदी चालेल) गेला असेल. मालिका सुरू झाल्याबरोबर मात्र त्याला आसमानातल्या ढगात पाठवायची तयारी सुरू झालिये Wink

, तो शिव आता सावंताचा शेजारी होणार . >>> हम्म....आणि मग जावई होणार :p
हे म्हणजे असं झालं... भैयाला दिली ओसरी.. भैया हातपाय पसरी Biggrin

हेमाताई, भगवती करेक्ट. अगदी आईचा किचनमधला वावर आणि इतर नैसर्गिक वाटण्यापेक्षा अति अजागळ वाटला (थोडा अजागळपणा दाखवला असतात तर ते पटलं असतं). आजीचा छान वाटला एकंदरीत वावर जास्त.

प्रमोशन मिळण्याआधीच अति दवंडी पिटली. कालच लक्षात आले होतं, मिळणार नाही ते. नेहेमीच गाजावाजा करतात सिरीयलमध्ये ते घडत नाही (प्रेक्षकांना पाठ झालंय).

माधव Lol

पण मला काल प्रश्न पडला होता - ऑफिसमध्ये प्रमोशन 'अँड दी ऑस्कर गोज टू...' या स्टाईलने जाहीर करतात? Wink

शीर्षकगीतातली एक ओळ - बाबुल का घर मैं छोड आयी ओलांऽऽऽडूनवे - जरा जास्तच फ्युजन वाटलं हे Proud

आजचा भाग जाम बोअर झाला.

यान्चा काय बंगला आहे का जाहगिरदारांसारखा ???
एवढ्याशा घरात , बेडरूमचा दरवाजा उघडा टाकून , कोणी नवर्याला बेबी आणि शोना म्हणतात का??
मुलगा आणि सून जरा जास्तच कॅरिकेचर टाईप्स वाटतं . तो विकी पण डोक्यात जातोय .

नायिकेच प्रमोशन पळवलचं उत्तर भारतियानी , पण तो दूसरा होता.

शिवकुमार शुक्ला फारच नवसिखिया वाटतो , पण त्याचे डोळे खूप सुन्दर आहेत .
आता तो नायिकेच्या शेजारी पेईग गेस्ट म्हणून रहायाला येतोय.

घरातलं फोल्डिंग फर्निचर आवडल .

ऑफिसमध्ये प्रमोशन 'अँड दी ऑस्कर गोज टू...' या स्टाईलने जाहीर करतात? >> बघ ना!!
आमच्या ऑफिसात तर प्रमोशनच देत नाहीत Biggrin

कालच्या भागात शेवटी शेवटी आजचे प्रोमो दाखवले त्यात गौरी शिवला 'खड्ड्यात गेलास' म्हणते ते भारी आहे. एकदम ठसक्यात दाखवल्यात गौरीबाई.

मला ते 'ओलांऽऽऽडून वेल' ऐकू येतं. कार्ल्याचा वेल बिल असा काहीतरी संबंध लावला मी Lol
पार्श्वगायिका मधुरा देशपांडे आहेना? शेवटचा शब्द खायची सवय आहे तिला.

बाबुल का घर मैं छोड आयी ओलांऽऽऽडूनवे >>>>> मी पण वे च ऐकतेय.

कायच्या काय सरमिसळ. फ्युजन म्हणायचं का? ओके.

खड्ड्यात जा मस्त म्हणतेय ती आणि तो बिचारा घाबरलाय प्रोमोमधे.

मला आवडते आहे मालिका. पण पहिल्या भागात भाजी आणताना ती प्रत्येक वाक्य बाबा ने सुरू करत होते ते जरा वैताग वाटले. फोल्डिंगचे फर्निचर छान आहे. वहिनी कसली लडदू आहे.

Pages