काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही आवडला पहिला भाग. मोहन जोशी, शुभांगी गोखले असताना संवादांमधल्या सहजतेची गॅरंटी मिळाली होतीच ती पूर्ण झाली. एकंदर वातावरण, टेकिंग आवडलं. हिरोच्या उत्तर प्रदेशी असण्याची, त्याबद्दलच्या वडिलांच्या नाखुशीची पार्श्वभूमी छान जमलीय.

हिरॉईनची एन्ट्री उगीच लाडिक, माना वेळावत, आधी नाजूक पावलं, केसातले गजरे वगैरे मिरवत अल्लडपणे केलेली नाही हे तर फार म्हणजे फारच आवडलय.

मला त्या पोळ्या , फुलके जे काही होत ते फार कच्च आणि जाड वाटलं . स्मित>>+१०००

शुभांगी गोखले च्या क्लासमधल्या मुलांची मात्र चिंता वाटली >>> हो हो . प्रतिज्ञा हा काय क्लास्मध्ये शिकवण्याचा विषय आहे . अभ्यास कमी पडलायं , दिग्दर्शकाचा >>> हो ना तेही येवढ्या मोठ्या मुलांना Uhoh

आणि नायकाच्या एन्ट्रीमध्ये तो येवढा सैरभैर का झालेला दाखवला आहे? एजुकेशनमुळे नवीन शहरात जाण्याएवढा कॉन्फीड्न्स तर येतोच की!

ते ब्याकग्राउंड ला रेडीओचं म्युझिक वाजवलंय ते आजच्या काळात पण वाजतं??

अभ्यास कमी पडलायं , दिग्दर्शकाचा>> अभ्यास तुमचा कमी पडतोय. Wink
दिग्दर्शक दूरदृष्टीचा आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत हे वाक्य योग्य टायमिंगला येण्यासाठी प्रतिज्ञेची सोय केली आहे त्याने. सावंतबाई संस्कारक्षम शिक्षिका असतील Happy

ते ब्याकग्राउंड ला रेडीओचं म्युझिक वाजवलंय ते आजच्या काळात पण वाजतं??>>> तो रेडीओ आजच्या काळात मिळतो का ?
आमच्याकडे या पेखा थोडा छोटा होता , मी शाळेत असताना , देउन टाकला .

सारे भारतीय माझे बांधव आहेत हे वाक्य योग्य टायमिंगला>>+१
मस्त टायमिंग साधलं.
जेव्हा शु गो ची आई तिला लेक्चर देत असते तेव्हाही रेडीयोवर काहीतरी रीलेटेड टोला असतो. शु गो आईला म्हणते ऐकलंस का?

स्वस्ति Proud
बादवे , आता ही करीयरीस्ट, छान, कडक पन्जाबी सुट घालणारी नायिका बनारस च्या ह्वेली मध्ये करीयरला तिलांजली देउन, डोक्यावर पदर घेउन धावताना नै बघवणार Uhoh

हिराॅईनचं प्रमोशन हिरो पळवतो.. आणि मुंबईत येतो.

आता दोघांचे कडाक्याचे वाद आणि मग प्रेमात पडणं असा सुरुवातीचा प्रवास असणार वाटतंय एकंदरित.

हिराॅईनचं प्रमोशन हिरो पळवतो >>> हेराफेरी स्टाईल !! (आणि मग 'मैं लडकी... पॉ पॉ पॉ... तू लडका... पॉ पॉ पॉ... दोनो मिले... पॉ पॉ पॉ) Wink

इतक्यात ती बनारसला जाईल असंही नाही. म्हणजे या एका वर्षात वगैरे.

कलर्स वर ’अस्सं सासर सुरेख बाई’ म्हणून मालिका लागते.तिचे प्रोमोज होते त्यात नायक-नायिकेच्या लग्नानंतर लहान घर असल्यामुळे काय कुचंबणा होते वगैरे होतं. मालिका सुरू होऊन किमान सहा महिने झाले असतील. अजून त्यांचं प्रेमही सुरू झालेलं नाहीये Proud

मालिकेचे पाचेकशे भाग झाले की मग जाऊ शकते ती बनारसला. तेव्हा कदाचित प्रे़क्षकही म्हणतील, जा बाई आता तुझ्या घरी Proud

मालिका सुरू होऊन किमान सहा महिने झाले असतील. अजून त्यांचं प्रेमही सुरू झालेलं नाहीये >>> मग कादिप तर कालच सुरू झाली आहे... घाला बोटें, करां हिशेंब Proud

मालिकेचे पाचेकशे भाग झाले की मग जाऊ शकते ती बनारसला. तेव्हा कदाचित प्रे़क्षकही म्हणतील, जा बाई आता तुझ्या घरी>> Lol

मलापण पोळ्या जाड वाटल्या पण विचार केला, तवा प्रकरण लिहीलं तेवढं पुरे ;). पोळ्यांबद्दल लिहील दुसरं कोणीतरी.

लगेच काय न कित्ती कीस पाडताय .. Proud Lol
माझ्या साबा सांगत होत्या नणंदेला ही सिरिअल बघ म्हणुन.. जरातरी रिलेट होईल( ती मुंबईतुन दिल्लीला गेली)
तर नणंद म्हणे जाऊ दे .. एकदा रिअल बघितलं तेच खुप आहे Proud

जाड पोळ्या तर जाड पोळ्या... सावंतांच्या घरातले सगळे विनातक्रार त्या पोळ्या खातात हे महत्त्वाचे Proud

जाड पोळ्या तर जाड पोळ्या... सावंतांच्या घरातले सगळे विनातक्रार त्या पोळ्या खातात हे महत्त्वाचे :फिदीफिदी:: >>>>>>> Rofl

हो सस्मित ती शिकवणीला आलेली मुलं आहेत. त्या मुलांना ट्युशनला इतक्या सकाळी बोलावलंय, ती आई बिचारी पोळ्या करते एकीकडे आणि शिकवते, मग बहुतेक शाळेत जात असणार, शिक्षिका आहेना.

मला त्या पोळ्या , फुलके जे काही होत ते फार कच्च आणि जाड वाटलं >>>अगदी अगदी. एकही पोळी/फुलका फुगत नव्हता. नुसत्याच जाड कच्च्या रोट्या Uhoh

अरे, त्या "का रे दुरावा" च पुढे काय झाल कुणी सांगेल का ? या सिरीयलची वेळ तीच आहे म्हणुन विचारतो आहे.

फुल्ल स्टोरी (मापांसकट) >>> Lol

पूर्वीच्या मालिकांची कथानकं कशी टाईट्ट असायची, आजकालच्या मालिकांची फारच लूज असतात... नाही का हो साहेब? (प्रो.ठिगळे) Wink

Pages