काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही नाही ग मने, ती स्वानंदीसुद्धा प्रोमोजमधुन अशीच दाखवली होती, प्रत्यक्षात काय निघाली? हिचही तेच होणार.. फार अपेक्षा ठेउ नकोस.

स्वानंदीवाली सिरियल नाही बघत गं मुग्धा. पण ही मुलगी स्वानंदीपेक्षा क्युट आहे. बरीच निवेदिता ओशी सारखी वाटते मला.

हो ही मुलगी क्युट आहे दिसायला. पण ते सोशिक वगैरे काही सांगता येत नाही, ते शिरेलीवाले तसंच दाखवतात.

हिरो पहिल्या प्रोमो मध्ये वयाने मोठा दिसत होता पण दुसऱ्या प्रोमो मध्ये मात्र छान दिसतोय तिला साजेसा...आणि हिंदी मध्ये काम केलेलं असल्याने अभिनयाच्या बाबतीत उजवा असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.. बाकी कळेलच मालिका सुरु झाली कि...

दुसरा प्रोमो छान आहे. हि सिरीयल रिपीट असेल रात्री तर बघेन निदान सुरुवातीला तरी. ९ वाजता नवरा अशोका बघतो. त्यावेळी नाही बघता येणार.

आणि हिंदी मध्ये काम केलेलं असल्याने अभिनयाच्या बाबतीत उजवा असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही>>> का हो कमी लेखता आपल्या मराठी कलाकारांना Sad

स्वानंदीवाली सिरियल नाही बघत गं मुग्धा. पण ही मुलगी स्वानंदीपेक्षा क्युट आहे. बरीच निवेदिता ओशी सारखी वाटते मला. >>>>> तिच्या दिसण्याबद्दल काही वादच नाही ग मने. पण प्रोमोज बघुन तुला जे वाटतय ना की ही हिरॉईन वेगळी असेल तर तस काही होइल अस मला वाटत नाही.

का हो कमी लेखता आपल्या मराठी कलाकारांना>>> नाही हो नाही.. मराठी कलाकार सुद्धा उत्तम अभिनय करतात. अगदी अभिमान आहे मला मराठी कलाकारांचा.
इतकाच म्हणायचं होता कि अगदी नवशिका वाटत नाही. अनुभवी वाटतो. सध्या मराठी मध्ये नवीन कलाकार घेतात(उदा. वासू) म्हणून मी हिंदी चा उल्लेख केला.
बाकी मी सुद्धा मी मराठी..झी मराठी.:) Happy Happy

सिरिअलबद्दलच चर्चा करा की. बाकी साठी जा ऋन्मेषच्या क्रशच्या धाग्यावर Proud

मने, फारच बाई अपेक्षा तुला झीच्या हिरोईनिंकडून.
मलाही ती निवेदिता सारखी दिसली

तिच्या सासुला सालासकट हलवा आवडत असेल.

मी पण कधीची गाजरं आणुन ठेवलीत.
सासु म्हण्ते गाजरं सुकली मऊ पडलीत फ्रीजमधे. म्हटलं होउदेत मऊ. मी आता लौकी चा हलवा करणार आहे. आजच २ किले दुधी आपलं लौकी नेते कशी.

सस्मित Lol झाला का सालासकट दुधी... आपलं लौकी हलवा. Wink

नवीन प्रोमो बघितला का लोक्स? मोहन जोशी आणि शुभांगी गोखले गौरीचे बाबा - आई आहेत. Happy

नाही. आधी फ्रीजात असणारी १ किलो गाजरं आणि त्यात १ किलो आणुन गाजर हलवाच केला. Happy

मोहन जोशी - शुभांगी गोखले जोडी कशात तरी होती ना.
आणि ती हिरवीण डोक्यावरुन पदर बिदर काय घेते.

मोहन जोशी - शुभांगी गोखले जोडी कशात तरी होती ना. >>> एका लग्नाची तिसरी गोष्ट मध्ये त्याचे खोटे आई बाबा होते ते

ती हीरॉईन भलतीच गोड आहे. मुळुमुळु नाही स्मार्ट आहे, तरीही निरागस. फारच आवडलीये. (सध्या तरी).

शुभ शुभ बोल गं. आशेवर जग चालतंय.
(स्वगत: सुस्कारा! हो माहिते. म्हणूनच ’सध्या तरी’ असं म्हणले.)

डोक्यावर पदर घ्यायची पद्धत इथेही आहेच. पण तरी ती स्वतःच्याच आ बा ना नमस्कार करताना डोक्यावर पदर घेते ते पट्लं नाही.

शुभ शुभ बोल गं. आशेवर जग चालतंय.
(स्वगत: सुस्कारा! हो माहिते. म्हणूनच ’सध्या तरी’ असं म्हणले.)>>> Lol

बादवे, तो मुळुमुळु शब्द लिहिलेला किती गोड दिसतोय Happy

सस्मित, अग तेच तर! युपी वाले स्वतःच्या आई वडिलांसमोरही डोक्यावर पदर घेउन नमस्कार करतात. वर त्याना मम्मीजी पापाजी म्हणतात :p

पण तरी ती स्वतःच्याच आ बा ना नमस्कार करताना डोक्यावर पदर घेते ते पट्लं नाही.>> ती आधी नमस्कार करते, आणि नंतर आईच्या गळ्यात पडते, ते पण पटत नाही. आई बाबा सासरी आलेत तर मी तरी पहिली त्यांना मिठी मारते.. नंतर बाकी सगळं. Happy

युपीत लग्गेच गळ्यात पडत नसतील. Happy

बादवे, मी कधीच आई पप्पांना नमस्कार करत नाही. म्हणुन ते डोक्यावर पदर घेणं, पाया पडणं वैगेरे मला जम्या नही.

बाकी ती एवढी गॅलरीतुन धावत येताना बघुन मला उगीचच सलिभची आठवण आली. Happy

मला हीरोईन फारच आवडली दिसायला. आई बाबा तर आपले फेवरेट, त्यामुळे बघणार ही मालिका.
ती डोक्यावरून पदर घेते तेव्हा आईला आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही का? सासरची रीत मुलीने जपलेली पाहून. आणि मग सवयीनुसार आईला घट्ट बिलगते की ती. Happy

आई बाबा तर आपले फेवरेट, ती डोक्यावरून पदर घेते तेव्हा आईला आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही का? सासरची रीत मुलीने जपलेली पाहून >>> +१००

Pages