तुमचे एखादे क्रश आहे का हो :)

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 March, 2016 - 17:38

क्रश म्हणजे प्रेम नाही. क्रश म्हणजे आकर्षण नाही. क्रश म्हणजे क्रश. या त्या रोमॅंटीक भावना असतात ज्या एखाद्या सेलिब्रेटीबद्दल वाटतात, किंवा शाळा, कॉलेज, कॉलनीतील सर्वात चिकण्या मुलाबद्दल / सर्वात देखण्या मुलीबद्दल वाटतात.
आपल्या क्रशला पटवणे हा आपला हेतू कधी नसतोच, ते मिळालेच पाहिजे असा हट्टही नसतोच, किंबहुना बहुतांश वेळा ते आपल्या आवाक्याबाहेरचेच असते.
ईतर कोणाच्या प्रेमात पडून जीवाचा कोंडमारा आणि मनाची घालमेल करण्यापेक्षा एखाद्याच्या गोड स्वप्नात हवे तेव्हा रंगणे आणि न गुंतता तितक्याच सहजतेने बाहेर पडणे अशी सोय करून देतात ते हे क्रश.
बॅचलर आणि सिंगल लोकांचेच एखादे क्रश असते असे गरजेचे नाही. तुम्ही कोणासोबत प्रेमबंधनात वा विवाहबंधनात अडकलेले असतानाही साईड बाय साइड तुमचे क्रश असू शकते. तसेच तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल माहीतही असते, ते देखील विदाऊट आक्षेप.

बाकी क्रश म्हणजे काय सर्वांना माहीत असेलच. मग कशाला उगाच पाल्हाळ लावा. त्यापेक्षा सरळ लिहा ना..

माझे पहिले क्रश - मनिषा आंटी.

हा हा, खरेच. माझ्याबरोबरच्या ईतरांना ती आंटीच वाटायची. किंवा मी वयात येईस्तोवर खुद्द मलाही ती आंटीच वाटू लागलेली. पण येस्स मनिषा कोईराला ही माझे सर्वात पहिले वहिले क्रश होते. अग्नीसाक्षीतील इकरार करना मुश्कील है ने मला तिचा दिवाणा केले होते. राजा को राणीसे प्यार हो गया ने त्यावर कळस चढवला होता. तिला बघून मनात त्या भावना यायच्या ज्यांचा अर्थ समजावा ईतकी अक्कलही मला आली नव्हती.

माझे दुसरे क्रश - सानिया मिर्झा

हिच्या बद्दल ईथेही ( http://www.maayboli.com/node/53590 ) आधी लिहिले आहेच. तेच कॉपीपेस्ट करतो.
" एकेकाळी वहीच्या मागच्या पानावर जिचा फोटो मी चिकटवला होता अशी एकमेव क्रिडापटू. अन्यथा हा मान मी चित्रपटसृष्टीतील कोण्या हिरोईनलाही अपवादानेच दिला होता. पण यामागे निव्वळ सानियाचे ग्लॅमरस दिसणे एवढेच नव्हते, तर तिचा स्पोर्टी लूक वेड लावायचा. आसपासच्या मुलींमध्ये तो अभावानेच आढळायचा. तिच्या एकेक स्टाईल स्टेटमेंटचे आम्हा मुलांनीही कॉपी करून झाले होते. मग ते तिच्यासारखे कानातले घालणे असो वा चष्म्याची फ्रेम असो. खेळाच्या जोडीनेच आपला असा एक वेगळा ठसा उमटवणारी महिला क्रिडापटू म्हणून तिची ही अचिव्हमेंट नाकारता येत नाही. "

सध्या शोएब मलिकला जावईबापू बोलण्यातच धन्यता मानतोय Happy

माझे तिसरे क्रश - कॅट उर्फ कतरीना कैफ

आताची नाही हो, ती अगदी सुरुवातीची. बूम चित्रपटातून तिच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली तेव्हा तिचा एक फोटो मी वहीत ठेवायचो. मागच्या बाकावर बसून बघायचो. पुढे ती सलमानची गर्लफ्रेंड होणार आहे असे कानावर आले आणि तेव्हाच सलमान नजरेतून उतरला.
असो, आजही ती मला जगातली सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक वाटते. पण आता ती क्रश असणे हा भूतकाळ झालाय.

माझे चौथे क्रश - पीसी उर्फ प्रियांका चोप्रा

हिच्या रूपाचा, हिच्या व्यक्तीमत्वाचा मी ईतका दिवाणा झालो होतो की जी मुलगी हिच्यासारखी दिसायची तिला मी प्रपोज करत सुटायचो. प्रॉब्लेम असा व्हायचा की हाईटमध्ये मार खायचो आणि त्यातली एकही प्रियांका आजवर पटली नाही.
असो, आता ती देखील क्रश लिस्टमधून बाद झाली आहे. पण सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून तिला बघायला आवडते.

अवांतर - तिच्या हॉलीवूड जाण्याचे आणि तिथे चमकण्याचे मात्र फार दुख झाले. आपली प्रियांका आणखी काही जणांत वाटली गेली अश्या टाईपचे दुख.

माझे पाचवे क्रश - नव्हे माझे पहिलेवहिले मराठी क्रश - सई ताम्हणकर.

हा धागा वाचा. http://www.maayboli.com/node/50822 पुढे काही लिहायची गरज उरणार नाही
पण तरीही तिथला एक उतारा कॉपीपेस्टतो,

" सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्‍यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्‍या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्‍यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स! "

अ‍ॅण्ड फायनली,

मी जर मुलगी असतो. तर अर्थातच शाहरूख खान माझा क्रश असता. आणि ऑल टाईम क्रश बनून राहिला असता Happy

........................................................................
........................................................................

असो,
धागा खुला आहे. कोणाला आपापले क्रश आठवायचे असल्यास .. एवढी हिंमत तर प्रत्येकात असतेच Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या क्रश बद्दल कित्येक आठवणीही जोडल्या गेल्या आहेत. त्या प्रतिसादात आठवतील तश्या टंकतो. त्या आठवणींशिवाय धाग्याला मजा नाही Happy

आतापर्यंतच्या शाळा आणि कॉलेज जीवनात इतक्या आल्या आणि गेल्या की नावेही आठवत नाहीत. आता कुठे बारावी संपतेय बघू पुढे काय काय घडतंय.

माझं क्रश गाणं / संगीत असतं
हे क्रश नक्की कशामुळे, गीत, आवाज, चाल, की संगीत हे सांगणं अवघड असतं.
हे क्रश मी कितीही वेळा ऐकलं तरी परत केव्हाही त्यात रमायला आवडतं.
काही मोजके क्रशः
कोणास ठाऊक कसा
उगवला चंद्र पुनवेचा
पग पादम् संगीत गीत सरगम
उड जाएगा हंस अकेला
मन हो राम रंगी रंगले
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
घेई छंद (fast)
झुमरु
रात्र काळी
जा तो से नही बोलु कन्हैया
आणि हेच इन्स्ट्रुमेन्टल जे आत्ता ऐकत होतो:
https://www.youtube.com/watch?v=QKnuEUwjQrA
थांबवतो लिस्ट.

माझे अजून क्रश असतात ते म्हणजे कोडी.
त्याबद्दल नंतर कधी.

<< तसेच तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल माहीतही असते, ते देखील विदाऊट आक्षेप.>> नाही सहमत; तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्या 'क्रश'बद्दलचा ' ग्रज' धुमसत असतोच !

अहो, आज डेंटीस्टकडे तुमची 'क्रश' भेटली;
कवळी बसवून घ्यायला आली होती !
crush.JPG

भाऊ Rofl

मला वाटले तुमचे एखादे क्रशर आहे का हो?

म्हटले लागत असेल दगडं भरडायला, पण हा तर वेगळाच मामला निघाला.

असो, क्रशर आहे...पण त्याचा काय उपयोग, जाव द्या!

<< आहे ना क्र्श pm मोदी...>> संभलके ! भेटेल त्याला अफझलखानासारखी घट्ट मिठी मारून 'क्रश' करायची खोड लागलीय त्याना हल्ली !!! Wink

आपल्या क्रशला पटवणे हा आपला हेतू कधी नसतोच, ते मिळालेच पाहिजे असा हट्टही नसतोच, किंबहुना बहुतांश वेळा ते आपल्या आवाक्याबाहेरचेच असते.
ईतर कोणाच्या प्रेमात पडून जीवाचा कोंडमारा आणि मनाची घालमेल करण्यापेक्षा एखाद्याच्या गोड स्वप्नात हवे तेव्हा रंगणे आणि न गुंतता तितक्याच सहजतेने बाहेर पडणे अशी सोय करून देतात ते हे क्रश.>>>>> हे पटलं .

आमचा पहिला वहिला क्रश अजूनही कायम आहे . लिस्ट लंबी है कभी फुरसत मैं टँकेंगे Wink

<< आमचा पहिला वहिला क्रश अजूनही कायम आहे . >> मला वाटतं, तोच खराखुरा !! बाकीचे, नुसतेच टाईम-पास !!! Wink

आपल्या क्रशला पटवणे हा आपला हेतू कधी नसतोच, ते मिळालेच पाहिजे असा हट्टही नसतोच, किंबहुना बहुतांश वेळा ते आपल्या आवाक्याबाहेरचेच असते.
ईतर कोणाच्या प्रेमात पडून जीवाचा कोंडमारा आणि मनाची घालमेल करण्यापेक्षा एखाद्याच्या गोड स्वप्नात हवे तेव्हा रंगणे आणि न गुंतता तितक्याच सहजतेने बाहेर पडणे अशी सोय करून देतात ते हे क्रश >> सहि है...

माझे बोटावर मोजण्याइतके नै आहे. Proud
बघू वेळ मिळाल्यास सांगेलही Wink

मला बै त्या इराणी बैची लई जलस होते...क्रश मधे असे होते का हो?>>>>. होते ना, नन्तर ज्या व्यक्तीचा राग करतो तिच्याच प्रेमात पडायला होते.:डोमा:

माझी सिनीयर कलिग सोनिया गान्धीन्चा फार राग करायची ( ती कॉलेज मध्ये अभाविप ची मेम्बर होती )/ जेलस असायची. पण आता अवस्था अशी आहे की सोनिया गान्धीचे पोस्टर पण दिवाणखान्यात भिन्तीवर विराजमान आहे. आपली आपली आवड..

रश्मी तै समजुन घ्या हो.. मला इराणी बै जेलस का आहे ते..बाई च्या क्रश मधे मी का पडु भारतिय संस्कृती मला आवडते हो.

भाऊ Proud

srd , सोनाक्षी आहे खरी क्रश मटेरीअल. मला ती हिंदीतील सई ताम्हणकर वाटते किंवा विरार वर्सोवा सईलाही मराठीतील सोनाक्षी बोलू शकतो. माझ्या पोस्टमध्ये तसा उल्लेखही आहे.

<पीसी आहे ना त्या लिस्टीत>
असते एकेकाची आवड.
>>>>>>>
मला पीसी आवडते म्हणून माझी गर्लफ्रेंडही माझ्यावर जळते. आणि तिला चिडून हायना उर्फ तरस बोलते.

Pages