तुमचे एखादे क्रश आहे का हो :)

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 March, 2016 - 17:38

क्रश म्हणजे प्रेम नाही. क्रश म्हणजे आकर्षण नाही. क्रश म्हणजे क्रश. या त्या रोमॅंटीक भावना असतात ज्या एखाद्या सेलिब्रेटीबद्दल वाटतात, किंवा शाळा, कॉलेज, कॉलनीतील सर्वात चिकण्या मुलाबद्दल / सर्वात देखण्या मुलीबद्दल वाटतात.
आपल्या क्रशला पटवणे हा आपला हेतू कधी नसतोच, ते मिळालेच पाहिजे असा हट्टही नसतोच, किंबहुना बहुतांश वेळा ते आपल्या आवाक्याबाहेरचेच असते.
ईतर कोणाच्या प्रेमात पडून जीवाचा कोंडमारा आणि मनाची घालमेल करण्यापेक्षा एखाद्याच्या गोड स्वप्नात हवे तेव्हा रंगणे आणि न गुंतता तितक्याच सहजतेने बाहेर पडणे अशी सोय करून देतात ते हे क्रश.
बॅचलर आणि सिंगल लोकांचेच एखादे क्रश असते असे गरजेचे नाही. तुम्ही कोणासोबत प्रेमबंधनात वा विवाहबंधनात अडकलेले असतानाही साईड बाय साइड तुमचे क्रश असू शकते. तसेच तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल माहीतही असते, ते देखील विदाऊट आक्षेप.

बाकी क्रश म्हणजे काय सर्वांना माहीत असेलच. मग कशाला उगाच पाल्हाळ लावा. त्यापेक्षा सरळ लिहा ना..

माझे पहिले क्रश - मनिषा आंटी.

हा हा, खरेच. माझ्याबरोबरच्या ईतरांना ती आंटीच वाटायची. किंवा मी वयात येईस्तोवर खुद्द मलाही ती आंटीच वाटू लागलेली. पण येस्स मनिषा कोईराला ही माझे सर्वात पहिले वहिले क्रश होते. अग्नीसाक्षीतील इकरार करना मुश्कील है ने मला तिचा दिवाणा केले होते. राजा को राणीसे प्यार हो गया ने त्यावर कळस चढवला होता. तिला बघून मनात त्या भावना यायच्या ज्यांचा अर्थ समजावा ईतकी अक्कलही मला आली नव्हती.

माझे दुसरे क्रश - सानिया मिर्झा

हिच्या बद्दल ईथेही ( http://www.maayboli.com/node/53590 ) आधी लिहिले आहेच. तेच कॉपीपेस्ट करतो.
" एकेकाळी वहीच्या मागच्या पानावर जिचा फोटो मी चिकटवला होता अशी एकमेव क्रिडापटू. अन्यथा हा मान मी चित्रपटसृष्टीतील कोण्या हिरोईनलाही अपवादानेच दिला होता. पण यामागे निव्वळ सानियाचे ग्लॅमरस दिसणे एवढेच नव्हते, तर तिचा स्पोर्टी लूक वेड लावायचा. आसपासच्या मुलींमध्ये तो अभावानेच आढळायचा. तिच्या एकेक स्टाईल स्टेटमेंटचे आम्हा मुलांनीही कॉपी करून झाले होते. मग ते तिच्यासारखे कानातले घालणे असो वा चष्म्याची फ्रेम असो. खेळाच्या जोडीनेच आपला असा एक वेगळा ठसा उमटवणारी महिला क्रिडापटू म्हणून तिची ही अचिव्हमेंट नाकारता येत नाही. "

सध्या शोएब मलिकला जावईबापू बोलण्यातच धन्यता मानतोय Happy

माझे तिसरे क्रश - कॅट उर्फ कतरीना कैफ

आताची नाही हो, ती अगदी सुरुवातीची. बूम चित्रपटातून तिच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली तेव्हा तिचा एक फोटो मी वहीत ठेवायचो. मागच्या बाकावर बसून बघायचो. पुढे ती सलमानची गर्लफ्रेंड होणार आहे असे कानावर आले आणि तेव्हाच सलमान नजरेतून उतरला.
असो, आजही ती मला जगातली सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक वाटते. पण आता ती क्रश असणे हा भूतकाळ झालाय.

माझे चौथे क्रश - पीसी उर्फ प्रियांका चोप्रा

हिच्या रूपाचा, हिच्या व्यक्तीमत्वाचा मी ईतका दिवाणा झालो होतो की जी मुलगी हिच्यासारखी दिसायची तिला मी प्रपोज करत सुटायचो. प्रॉब्लेम असा व्हायचा की हाईटमध्ये मार खायचो आणि त्यातली एकही प्रियांका आजवर पटली नाही.
असो, आता ती देखील क्रश लिस्टमधून बाद झाली आहे. पण सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून तिला बघायला आवडते.

अवांतर - तिच्या हॉलीवूड जाण्याचे आणि तिथे चमकण्याचे मात्र फार दुख झाले. आपली प्रियांका आणखी काही जणांत वाटली गेली अश्या टाईपचे दुख.

माझे पाचवे क्रश - नव्हे माझे पहिलेवहिले मराठी क्रश - सई ताम्हणकर.

हा धागा वाचा. http://www.maayboli.com/node/50822 पुढे काही लिहायची गरज उरणार नाही
पण तरीही तिथला एक उतारा कॉपीपेस्टतो,

" सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्‍यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्‍या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्‍यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स! "

अ‍ॅण्ड फायनली,

मी जर मुलगी असतो. तर अर्थातच शाहरूख खान माझा क्रश असता. आणि ऑल टाईम क्रश बनून राहिला असता Happy

........................................................................
........................................................................

असो,
धागा खुला आहे. कोणाला आपापले क्रश आठवायचे असल्यास .. एवढी हिंमत तर प्रत्येकात असतेच Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडणारी/र्या
सोनाली बेंद्रे, मौशुमी चटर्जी, लीना चंदावरकर.

वैचारिक मोड :काय साम्य आहे बरे तिघीत?

सध्याचा क्रश, सनी वैनी Happy

त्याआधी आशिकीची अनु अगरवाल. शाळेत असताना आपली गफ्रे सावळीच असावी असं फार वाटायचं.

या दोघींशिवाय आवर्जून दुसऱ्या खोलीतून येऊन टीव्ही बघावा असं अधे मध्ये कोणीच नाही

चला परत चुंबनावर धागा काढा पाहू तेव्हाच्या मंडळींची वय वाढली असतील . मॅच्युअर झाली असतील. लग्न झाली असतील. त्यामुळे अशा सामाजिक प्रश्नावर साधकबाधक चर्चा होण्याची शक्यता दाट आहे.
ऋन्म्या घे रे पुढाकार. Wink

धागा काढायला पण तुम्ही ऋ ला सांगताय. साधकबाधक चर्चा काय करणार तुम्ही मग?

त्याला सांगण्यापेक्षा तुम्ही काढा की धागा.

अजिबात चर्चा करणार नाही म्हणून तर रुन्मेशला सांगितले असे ही एक धाग्यावेताळ पुरेसा आहे.

माझा क्रश, ह्र्तिक रोशन, रसेल क्रो..
मिसो आजुनही छावा दिसतो.. बाजीराव मस्तानी मध्ये पण छोट्याश्या रोल मध्ये होता.

सनी लिओनी तर (एक मिनिट.. आजुबाजुला कोणी आहे का..., हुश्श.. नाही वाटतं. हा- तर ती) आमचीही फेवरिट. Wink तिचा प्रत्येक शिनमा अगदी ज्वलंत आणि कौटुंबिक, घरातल्या मंडळींनी एकेकटं बसून बघण्याजोगा!! Wink
बापरे कोणी ऐकलं नाय ना? Uhoh पला पला पला.. Wink

माझा फर्स्ट क्रश डीडीएलजे चा शाखा. नववीत होते मी तेव्हा. कसला दिसलाय तो त्यात. मोजुन ५० पोस्ट्कार्ड साइज फोटो विकत घेतले होते मी त्याचे त्या सिनेमातले. खाऊतले ५० पैसे खर्चुन.>>> +१
माझा पण मेजर क्रश शाखा!

Mala naay awadat miso
>>>
नशीब. कोणीतरी बोल्ले इथे असे. अन्यथा मी चक्रावून गेलेलो एवढा मिसो क्रश क्लब बघून. तसे प्रत्येकाची आपापली आवड असते, पण एवढी मोठी संख्या असेल असे वाटले नव्हते. मला तर तो कोणत्या पिढीचा आहे, कधी आला, कधी गेला, काही ठाऊक नाही. नाही म्हणायला सोळा डिसेंबर चित्रपटात पाहिलेले ईतकेच त्याचे पडद्यावरील दर्शन. तसेच त्याच्या आणि मधू सप्रेच्या वादग्रस्त जाहीरातीबद्दल जनरल क्नॉलेज म्हणून ऐकून आहे तेवढेच. अर्थात आपल्याकडे अश्या गोष्टींच्याच फार चर्चा होतात, जसे सईचा विषय निघताच बिकीनीचा विषय चघळला गेलाच पाहिजे तसेच हे. त्यामुळे त्यावरून त्याच्याबद्दल काही मत बनवले नव्हते. पण इथले प्रतिसाद बघून मिसो मे ऐसा क्या है जो औरो मे नही हे जाणून घ्यायची उत्सुकता चाळवलीय.

अवांतरम - तो मराठी आहे का?

>> क्रशची साग्रसंगित आणि शास्त्रीय व्याख्या वाचून डोळ्यात पाणीच आलं.

Happy Lol

मलाही मिसो तेव्हा कधीच आवडला नव्हता .. आता प्रगल्भता वाढली असं वाटू लागल्यावर मी मुद्दाम लक्ष देत आहे बघायला की आता तरी आवडतो का ..

>> अवांतरम - तो मराठी आहे का? >>> हो !!! मिलिंद सोमण

मराठी असणे म्हणजे काय? आडनावाने वाटतो मराठी, मुंबई चा आहे (बहुतेक अंधेरी, कल्पिता एन्क्लेव्ह मध्ये फ्लॅटही असेल आई-वडिलांचा), ती कुठल्या त्या शूज ची काँट्रोव्हर्शियल अ‍ॅड त्याने केली, मधुश्री सप्रे (जी पार्ले टिळक ह्या मराठी आयकॉन शाळेतली) ला डेट करायचा पण ह्यामुळे तो मराठी आहे किंवा नाही हे कसं ठरवणार? Happy

ओके, ते सोनम म्हणून एक हिरोईन होती त्यामुळे सोमन नाव सुद्धा पटकन मराठी वाटत नाही मला. आडनावांवरून जाती धर्म प्रांत ओळखण्यात मी कच्चा आहे. असो, पण मग त्याने कुठल्या मराठी मालिका वा चित्रपटात काम नाही केले का? तसे कित्येक मराठी हिरोईनींनीही नाही केलेय, पण पुरुष मंडळी शक्यतो करतात.

त्याने हल्लीच कुठल्या तरी मराठी सिनेमात काम केलं वाटतं .. (पण तसं तर अमिताभ रेखाही दिसले मराठीत? किंवा मग मनोज जोशी (आधीचे राऊ) जे कायम मराठी वाटत आले ते गुजराती निघाले ..)

तीन मराठी चित्रपटात तरी केलंय मिसोने काम ऋन्मेष. गंध, संहिता आणि मागच्यावर्षी एक आलाय, नाव विसरले (सरकार बहुतेक). आता तो चांगलं मराठी बोलतो, पूर्वी नसायचं तेवढं. तो उत्तम धावपटू आहे. मागे काहीतरी रेकॉर्ड केलाय त्याने marathon मध्ये.

मला आवडतो तो. माझ्या अनेक क्रशपैकी हा एक आहे. Happy

त्याने हल्लीच कुठल्या तरी मराठी सिनेमात काम केलं वाटतं >>> गंध मध्ये होता ना तो (दिग्दर्शक: सचिन कुंडलकर), बाकी माहित नाही

अन्जू, आपली पोस्ट एकाच वेळी आली Happy

तो उत्तम धावपटू आहे. >>> हो, सध्या जे फोटोज पाहिलेत त्याचे, तो Pinkathon Ambassador आहे Happy

तो उत्तम धावपटू आहे. मागे काहीतरी रेकॉर्ड केलाय त्याने marathon मध्ये.
>>>
हो ते ठाऊक आहे. मुंबई मॅरेथोनमध्ये धावतो तो. या वयातही. दिसतो त्यापेक्षा जास्त वय आहे त्याचे हे त्या निमित्तानेच समजले. एखादाच त्याचा चित्रपट पाहिला त्यात तो मला विशेष वाटला नव्हता पण या मॅरेथोन स्पोर्टी लूकमध्ये वाटला होता.

अनवाणी धावतो तो. मध्ये मुलाखतीत सांगत होता तरुणांनी स्पोर्ट्सकडे लक्ष द्यावं, व्यसनं करू नयेत. टीव्हीवर बघितली होती मुलाखत, बहुतेक तो रेकॉर्ड झाल्यानंतरची.

तो उत्तम धावपटू आहे. मागे काहीतरी रेकॉर्ड केलाय त्याने marathon मध्ये. >>>>
मिलिंद अनेक पुर्ण मॅरेथॉन पळतो आणि लोकांमधे मॅरेथॉन as a game आणि for the fitness, यासाठी प्रयत्न करतो. तो लोणावळ्याला रहातो त्यामुळे लोणावळ्याच्या चौकातुन चालु होणार्‍या अनेक छोट्या मोठ्या मॅरेथॉन्सचा तो organizer आहे.

आणि मिलिंद फॅन्स, एवढा मोठा डिटेल कसा मिस केलात तुम्ही? असलं कसलं क्रश कि एवढं 'IRON MAN' सारखं prestigious title मिळवलं आणि त्याचा उल्लेख नाही. Wink

मिलिंदने स्वतःच्या ५०व्या वाढदिवसाची स्वतःला गिफ्ट आणि लोकांमधे फिटनेस/हेल्थ अवेअरनेस साठी, 'Triathlon' पुर्ण करुन Iron man टायटल मिळवलं. हे किती अवघड आहे हे फक्त कळवण्यासाठी थोडंसं विषयांतर करुन या टायटलची माहिती -

'Triathlon' हा एक दिवसीय सगळ्यात टफ स्पोर्ट मानला जातो. युरोपमधे होत असावा बहुतेक. देश माहित नाही. यामधे एका दिवसाच्या १७ तासांमधे २०० किमि सायकलिंग, ४ किमी स्विमिंग आणि पुर्ण मॅरेथॉन ( ४२ किमी) एक सलग पूर्ण करायचे असतात.( राउंड फिगर्स दिल्या आहेत. अंतरं किंचीत कमी-जास्त आहेत). मिलिंदने हे १५ तासात पुर्ण केलं. मस्त मॉडेल आहेच, पण बरा अ‍ॅक्टर आणि भारीच माणुस आहे.

१७ तासांमधे २०० किमि सायकलिंग, ४ किमी स्विमिंग आणि पुर्ण मॅरेथॉन ( ४२ किमी >>>>
हे सगळं मीटरमधे करू शकतो. लोखंडी नाही तर किमान लाकडी, प्लास्टीक, रबर कुठला तरी म्यान म्हणा राव !

Pages